किरण बेदी...

Kiran Bedi

किरण बेदी ह्या भारतीय पोलीस दलातील पहिल्या उच्चपदी महिला होत्या आणि आपल्या कामगिरीतून त्यांनी भारतीयांच्या मनात आपले घर केले आहे.

किरण बेदी यांचा जन्म ९ जून १९४९ रोजी पंजाब मधील अमृतसर मध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव प्रकाश लाल पेशावरिया आणि आईचे नाव प्रेमलता पेशावरिया होते. किरण बेदी यांचे खापर पणजोबा लाला हरगोबिंद हे एक व्यापारी होते आणि १८६० मध्ये त्यांनी पेशावर मधून निघून पंजाब मधील अमृतसर मध्ये स्थळांठायीर झाले आणि पेशवारीया हे नाव स्वीकारले. किरण बेदींचे आजोबा लाला मुनी लाल हे त्यांच्या संपूर्ण परिवारातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व होते आणि किरण बेदींवर त्यांचा खूप प्रभाव होता.

                 किरण बेदींचे आई वडील प्रकाश लाल आणि प्रेमलता ह्यांना शशी, किरण, रीटा, आणि अनू अशा चार मुली. चारही मुली अतिशय हुशार. त्यांचे आईवडील दोघेही पुरोगामी विचारांचे होते. ज्यामुळे मुलींना हुंड्यामुळे ओझे असे समजले जायचे त्यावेळी त्यांनी चारही मुलींना उच्च शिक्षण द्यायचे आणि त्यांना हवं ते करून देण्याचा निर्णय घेतला. ह्यासाठी त्यांना खूप अडथळ्यांचा सामान या करावा लागला. किरण बेदींच्या आजोबानी त्यांच्यावरचा हक्क काढून घेऊन त्यांना नाकारले. सर्व अडथळे पार करून त्यांनी चारही मुलींना उच्च शिक्षण तसेच खेळामध्येही तरबेज केले. किरण बेदींचे वडील हे अतिशय चांगले टेनिस खेळाडू होते. त्यांनी आपल्या चारही हि मुलींना टेनिस खेळण्यास शिकवले आणि त्यात अतिशय कुशल बनवले.

                  किरण बेदींची आपल्या भावी पती सोबत टेनिस मैदानावर पहिल्यांदा ओळख झाली आणि तेव्हापासून त्यांच्या गाठी जुळल्या. किरण बेदींचे पती ब्रिज बेदी हे एक देखील युनिव्हर्सिटी टेनिस खेळाडू आणि व्यवसायाने कापड उद्योगपती होते. मार्च १९७२ मध्ये किरण बेदी यांचे ब्रिज बेदी यांच्यासोबत लग्न झाले. आणि १९७५ साली त्यांना कन्या रत्न प्राप्त झाले. तिचे नाव सायना असे ठेवले गेले. मे १९९९ मध्ये किरण बेदी यांच्या आईचे निधन झाले आणि जानेवारी २०१६ मध्ये त्यांचे पती ब्रिज बेदी यांचे निधन झाले.

शैक्षणिक कारकीर्द - 

          किरण बेदी ह्यांनी शैक्षणिक कारकीर्द अतिशय वाखाणण्याजोगी आहे. १९६८ मध्ये त्यांनी अमृतसर मधील गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ वूमन मधून बी.ए. ची पदवी संपादन केली. नंतर पंजाब युनिव्हर्सिटी मधून राज्यशास्त्र विषयात मास्टर्स डिग्री मिळवली आणि सर्वप्रथम आल्या. १९८८ मध्ये किरण बेदी यांनी, दिल्ली युनिव्हर्सिटी मधून कायदा विषयात बॅचलर डिग्री मिळवली. तसेच १९९३ मध्ये आय. आय. टी. दिल्ली मधून सोशिअल सायन्स मध्ये पी. एच. डी. मिळवली.

                 एक पोलीस ऑफिसर बनण्या आधी किरण बेदी ह्या अतिशय उत्कृष्ट अशा टेन्निसपटू होत्या. आपल्या किशोरावस्थेत त्यांनी आपल्या बहिणींसोबत टेनिस खेळण्यास सुरुवात केली आणि १९६४ मध्ये त्या आपली पहिली टूर्नामेंट खेळल्या. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्था जिंकल्या. त्यांच्या टेनिस मधील कामगिरींपैकी काही महत्वाच्या कामगिरी खालीलप्रमाणे आहेत.

              ऑल इंडिया इंटरयुनिव्हर्सिटी टेनिस चषक आपली बहीण रीटा सोबत सलग ३ वर्ष पटकावले.

१९७४ मध्ये ऑल इंडिया हार्ड कोर्ट टेनिस चॅम्पिअनशिप जिंकली.

१९७६ मध्ये चंदीगड मधील राष्ट्रीय महिला टेनिस चॅम्पिअनशिप जिंकली.

श्रीलंका विरुद्ध २ वेळा भारताचे प्रतिनिधित्व ठसेल लिओनेल फोन्सेका मेमोरियल चषक हि जिंकला.

ह्या त्यांच्या अप्रतिम टेनिस कामगिरीमधील काही कामगिरी आहेत.

IPS ऑफिसर म्हणून वाटचाल - 

                वयाच्या ३० वर्षापर्यंत किरण बेदींनी आपला टेनिस चा प्रवास चालू ठेवला. पण त्याचसोबत त्यांची भारतीय पोलीस स्पर्धा परीक्षेची तयारी हि जोमाने सुरु होती. भारतीय पोलीस सेवेत आपली वाटचाल सुरु करण्याआधी १९७० मध्ये त्या अमृतसर मधील खालसा महिला महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका होत्या. १६ जुलै १९७२ ला त्यांची मसुरी येथील राष्ट्रीय अकादमी मध्ये पोलीस ट्रैनिंग सुरु झाली. त्या ८० पुरुष्यांच्या तुकडीमध्ये एकटाच महिला होत्या. त्यांचे प्रशिक्षण हे पुरुष सहभाग्यांसारखेच होते. त्यांनी जगाला दाखवून दिले कि महिला ह्या कोणत्याच गोष्टीत कमी नाही आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कोणत्याही क्षेत्रात आपले स्थान निर्माण करू शकतात.

त्यांची पहिली नेमणूक चाणक्यपुरी उपविभागामध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून झाली. ९व्या आशियायी खेळ स्पर्धेदरम्यान त्यांची वाहतूक पोलीस उपायुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यांनी क्रेन च्या साहाय्याने अनेक चुकीच्या जागी पार्किंग केलेल्या वाहनांना जप्त केले. याच वेळी त्यांना “क्रेन बेदी” असेही नाव देण्यात आले.

किरण बेदी – एक सामाजिक कार्यकर्त्या

             पोलीस सेवेव्यतिरिक किरण बेदींनी समाजकार्यातही आपले नाव मिळवले. २००८-२०११ मध्ये त्यांचा टि. व्ही. वरील आप कि कचेहरी हा कार्यक्रम जनतेमध्ये अतिशय लोकप्रिय ठरला. त्यांनी महिलांविरुद्ध होणाऱ्या हुंडाबळी, बलात्कार,घरगुती हिंसा, शोषण, ऍसिड हल्ले, सारख्या समस्यांना आळा घालण्यासाठी खूप प्रयत्न केले. आणि त्यासाठी स्वतंत्र टेलिफोन हेल्पलाईन हि सुरु केल्या. स्थानिक पोलीस जर समस्यांचे निवारण करत नसतील तर अशा जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांनी संकेतस्थळ(वेबसाइट) हि सुरु केले. एक सामाजिक कार्यकर्त्यांसोबत त्या एक कुशल वक्त्या हि होत्या. अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये त्यांना मार्गदर्शनासाठी बोलवले जाते. अशाच एका जगप्रसिद्ध कार्यक्रम टेड टॉक (Ted Talk) मध्ये त्यांना त्यांचे विचार मांडण्यासाठी वॉशिंग्टन ला देखील बोलावण्यात आले होते.

              २००७ मध्ये किरण बेदींनी नवज्योती दिल्ली फौंडेशन ची स्थापना केली. ह्या संस्थेला समाजाच्या कानाकोपऱ्यातून समर्थन मिळाले. ह्या संस्थेमार्फत त्यांनी जवळपास २५००० जणांची नशामुक्ती करून त्यांना चांगले उपचार दिले. त्यांनी भारतामधील अनेक दुर्मिळ ठिकाणी लोकांसाठी सोयी उप्लब्ध केल्या. त्यांनी महिलांच्या सामान हक्कासाठी कायम आपली झुंज चालू ठेवली.

राजनैतिक वाटचाल- 

                आपल्या समाजसेवेचा प्रवास असाच चालू ठेवण्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी २०१० मध्ये आम आदमी पार्टी(AAP) मध्ये प्रवेश केला. नंतर २०१५ मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी दिल्ली च्या मुख्य मंत्री निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.

कामगिरी, पुरस्कार, आणि त्यांनी लिहलेली पुस्तके -

                 आपल्या कामातून किरण बेदींनी भारतीयांची मने जिंकून घेतली आहेत. तिहार जेल मधील कैद्यांचे पूनर्वसन करण्याच्या मोठ्या कामगिरीबद्दल त्यांना जगभरातून शाबासकी मिळाली. आणि त्यांच्या या कामासाठी त्यांना रमण मॅगसेसे पुरस्काराने १९९४ साली नावाजण्यात आले. नशामुक्ती च्या क्षेत्रात मोठी कामगिरी केल्याबद्दल त्यांना नॉर्वे मधील गुड टेम्पलर्स ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेने आशिया पुरस्कार दिला. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पुस्तके लिहून लोकांचे मार्गदर्शन हि केले. “इट्स अल्वेस पॉसिबल” “आय डेअर”, “इंडियन पोलीस”, “लीडरशिप अँड गव्हर्नन्स ” हि त्यांनी लिहिलेले पुस्तके आहेत. ह्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय जनता, प्रामुख्याने तरुण पिढी ला प्रोत्साहित करण्याचे काम केले आहे. 

                 भारतीय पोलीस सेवेत ३५ वर्ष पोलीस महासंचालक म्हणून काम केल्यांनतर किरण बेदी यांनी २००७ साली स्वैच्छिक निवृत्ती घेतली. २२ मे २०१६ रोजी किरण बेदी यांची पॉंडिचेरी च्या राज्यपाल पदी निवड करण्यात आली.

किरण बेदी यांनी आपल्या कामगिरीतून पूर्ण जगाला दाखवून दिले कि परिश्रम आणि दृढ निश्चयाच्या जोरावर काहीही साध्य केले जाऊ शकते.

नमस्कार. सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख -रत्नागिरी )