Feb 28, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

Kinder Joy

Read Later
Kinder Joy
Kinder Joy

पाऊले घरी जाण्यासाठी आसुसलेल्या अवस्थेत असताना मी घाईत डोंबिवली स्टेशनवर पोहचलो. घड्याळ रात्रीचे नऊ ३५ ची वेळ दाखवत होते. ९:५१चा कल्याण गाडीचा फलक स्क्रीनवरती लाल रंगात मला खुणावत होता. मी एक नंबरच्या प्लॅटफॉर्म वर आरामात बसलो , घरी जाण्यासाठी चेहऱ्यावरचा आनंद हा मनात लपवू शकत नव्हतो. मी बॅग तिथल्या बेंचवर ठेवली अन बॉटल , बॅग मधून काढुन पाण्याचा एक घोट घेतला...! बऱ्यापैकी गुंता झालेला इअरफोनही काढून जीन्सच्या उजव्या पॉकेट मध्ये ठेवत मी मोबाईल मध्ये जरा बोटे सरकवत कायाप्पाचे संदेश चाळत बसलो..!

जिद मत करो बेटा , मम्मा के पास सिर्फ डेअरीमिल्क है..!
नही मम्मा , मुझे किंडर जॉय हि चाइये..?

आई मुलाची चर्चा सहज माझ्या कानाला स्पर्शून गेली , अन मी तिकडे नजर फेकली , एक तीन चार वर्षांचं छोटंस लेकरू किंडर जॉय साठी हट्ट करत होतं . मी दोन तीन मिनिट माझ्या बालपणात फिरून आलो. मी ही असं नाही तर यापेक्षा ही बेक्कार पद्धतीने हट्ट करत होतो . जमिनीवर बसून अगदी पाय पसरून, दोन्ही पाय पुढे मागे करत , हवी असणाऱ्या वस्तू साठी माझ्या हट्टीपणाला सहज भेटून आलो.

मी बॅग घेऊन तिथे गेलो..!
दीदी , "क्या किंडर जॉय चाईए इसको ..?"
त्यांनी मानेनेच होकार दिला .
एक मिनिट हा...!
मी बॅग मधून किंडर जॉय बाहेर काढत त्या लेकराच्या हातात ठेवलं..!
तो माझ्याकडे फक्त पाहत होता . परंतू तरीही तो त्याच्या डोळ्यातल्या अश्रू मध्ये आनंदाची छोटीशी किनार मला दर्शवत होता.

"अंकल को थेंकू बोलो" .?

ते लेकरू मात्र किंडर जॉय च्या आनंदात स्वतःच हरवुन गेलं होतं.

"मेरी भांजी को भी बहुत पसंद है , \"किंडर जॉय\"..! " इसलीये पास हमेशा रखता हूँ..!

"थँक्स क्यू सो मच..!" बहुत जिद्दी है ये.. !

मी त्यांनां डोळ्याच्या इशाऱ्यानेच वेलकम बोलून गेलो.
इसकी जिद ने मुझे मेरा बचपन याद दिला दिया..!

Announcing मध्ये ती स्टेशनवर बोलणारी गोड मुलगी मला सांगत होती.

"कल्याण को जानेवाली ट्रेन प्लॅटफॉर्म एक पर आ रही है" ..!

मी लेकराच्या केसातून हात फिरवत , चेहऱ्यावर आनंदाचं तोरण लावत ट्रेनकडे चालता झालो..!

ट्रेनमध्ये चढल्यानंतर सहज लेकराकडे नजर फेकली..!

" त्याच्या चेहऱ्यावरचा Joy हा त्याच्या हातातल्या Kinder Joy पेक्षाही आनंदी भासत होता..!"

सुशांत भालेराव

स्थळ - डोंबिवली स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर १
दिनांक- १ मार्च २०१८
वेळ- रात्रौ ९:३५
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//