May 15, 2021
रहस्य

अपहरण ( भाग सातवा )

Read Later
अपहरण ( भाग सातवा )

केतकी आता येऊन रडू लागली. तिन्हे केलेल्या चुकीचा चुकीचा तिला आता पश्चाताप झाला. पण आता पश्चाताप करून काही फायदा न्हवता. जे तिला बोलायचं होत ते ती बोलून गेली होती. 

केतकीचे आई वडील ही विचार करत बसले. आपल्या मुलीच्या मनात आपल्याबद्दल असं काही असेल असं त्यांना चुकूनही वाटलं न्हवतं. आपण कुठेतरी कमी पडलो असं त्यांना वाटू लागलं. केतकीचे वडील बोलले,

" पैसे कमावून आपण साठवत गेलो, मुलीला तिची आवड विचारून तिला काही हवं का हे विचारलं नाही...!"

" अहो..! पण आपण तर सगळं तिच्या भवितव्यासाठी करत आहोत ना...? आता तीच वय असं काय .? ह्या वयात तिला हवं नकोते सगळं दिल की..! पालक म्हणून काही गोष्टींच्या बाबतीत आपण तिला थोडं धाकात ठेवलं त्यात आपलं काही चुकलं नाही."

" हो ग..! पण आपली मुलगी आता मोठी झाली आहे, हे आपल्या ध्यानातच नाही आलं. "

" मोठी म्हणजे काय ओ..? अजून काय हवं तिला..? आपण तिला कोणत्याबाबतीत रोखलं होत....? हं..! तो आयफोन हवा होता तिला तो घेऊन नाही दिला म्हणून एवढ सगळं बोली...!"

केतकीचे वडील केतकीच्या आईला शांत करू लागले. केतकीच्या आईने डोळे पुसले आणि ती किचनमध्ये गेली. केतकीचे वडील हॉलमध्येच बसून होते. काही वेळात जेवण झालं.. केतकीचे वडील केतकीला बोलवायला बेडरूममध्ये गेले. केतकी शांत बसून होती. वडीलांना पाहताच तीने धावत येऊन त्यांना मिठी मारली आणि रडू लागली. 

" बाबा..! मी चुकले..! मला माफ करा...! मी खूप काही बोलले.."

केतकीचे वडील मात्र केतकीच्या डोक्यावर हात फिरवत फक्त अश्रू ढाळत होते.

" बाबा...!" केतकी मिठीतुन बाजूला झाली.

" बाबा...? बोला ना..! मला ओरडा.. रागावा माझ्यावर...!"

पण केतकीचे वडील शांतच होते. तो त्यांचा स्वभाव होतो. आजतागायत त्यांनी कधी केतकीवर हात उगारायच सोडा पण दरडावल ही न्हवतं. केतकीची आईच काय ती केतकीला धाकात ठेऊन होती. पण त्यामुळे केतकीने तिच्या बाबांनाही गृहीत धरलं होत.

" बाळा..! तुला जे पाहिजे होतं ते आम्ही तुला देऊ शकत होतो. तुझी ही माफक अपेक्षा होती. पण तुझी आई तुझी जरा जास्तच काळजी करते.तू एकटी बाहेर जाताना  तुझ्या अंगावर दागिने घालून देत नाही. का तर उगाच कुणी दागिन्यांसाठी तुला काही केलं तर..! तसच नवीन मोबाईल बाबतीत होत..! ती तुझी काळजी करते म्हणूनच ग..!" केतकीचे वडील बोलले.

केतकीने एवढा विचार केलाच न्हवता. तिने फक्त दोघांना तिच्या विचारांप्रमाणे गृहीत धरून वाईट ठरवलं होतं...

" बाळ..! जा ..! आईला सॉरी बोल..! नाहीतर ती जेवणार नाही..!"

केतकी धावत आईकडे गेली. केतकीची आई किचनमध्ये होती. आईचा हात पकडून तिला आपल्याकडे वळून म्हणाली,

" आई..! मला माफ कर..! माझ्याकडून चूक झाली. मी तुम्हाला समजून नाही घेतलं..!"

केतकीची आई रडत होती. केतकीने तिचे अश्रू पुसले.

" कधी ग एवढी मोठी झालीस ? आम्हाला कळलंच नाही.." केतकीची आई बोली.

आता दोघीही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून रडू लागल्या. केतकीचे वडील तिथे आले आणि हसत म्हणाले,

" झालं का तुमचं..? गरम गरम जेवायला भेटणार आहे की नाही..?"

" हो..! वाढते.." केतकीची आई बोलली. दोघींनी मिळून ताटं वाढली. तिघेही हॉलमध्ये जेवायला बसले. जेवणं झालं. तिघे ही आज खूप वेळ गप्पा मारत बसले आणि झोपले.

केतकीच अपहरण झालं त्या दिवसापासूनचा आजचा तिसरा दिवस होता. सकाळी गुरूनगर पोलीस स्टेशनला वर्दळ दिसत होती. साक्षी मॅडम काही पेपर्सची जमवाजमवं करत होत्या. शिंदे सर पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांच्या केबिनमध्ये गेले. लगेच साक्षी मॅडम आत आल्या..

" जय हिंद सर..! गुड मॉर्निंग .!"

" जय हिंद साक्षी.. खूष दिसतेयस...!"

" हो सर..! तुम्ही कसं ओळखलं..?"

" हा हा..! काही नाही. दररोज 'जय हिंद' बोलतेस. आज तुझी मॉर्निंग गुड आहे हे पण सांगितलंस."

साक्षी मॅडम हसल्या आणि बोलल्या,

" हो सर...! एक लीड मिळाली आहे. काल कॉन्स्टेबलकडून मिळालेल्या माहितीमुळे तुम्ही सांगितल्याप्रणाने आपण केतकीचे आणि टिनाचे कॉल रेकॉर्ड मागवले होते. ते मी तपासले. त्यात एक गोष्ट खटकली. "

" कोणती..?"

" परवा केतकीच्या कॉलेजमध्ये चौकशीला गेलेले कॉन्स्टेबल 
आपल्याला काल बोलले होते की त्यांनी टीनाकडे केतकीची चौकशी करायला एक मुलगी पठवली होती."

" हो.. आठवलं..!"

" तेंव्हा टीना त्या मुलीला बोलली की तिला केतकीबद्दल माहित नाही. तिने केतकीच्या नंबर वर कॉल केला होता, पण  तो ऑफ आला होता."

" बरोबर..!"

" पण मी टीनाचे कॉल रेकॉर्ड चेक केले. पण तिने परवा दिवसभरात एकदाही केतकीचा नंबर ट्राय केला न्हवता..!"

" ओहह..! मग ह्या टिनाला भेटलंच पाहिजे."

" तुम्ही परवानगी द्या सर..! आताच तीला उचलून आणते..!"

" तेवढी गरज नाही लागणार असं मला वाटतं. तुम्ही तिला कॉल करून इथे बोलवून घ्या. नाहीच आली तर बघू..!"

" हो सर..!"

साक्षी मॅडम केबिनमधून बाहेर आल्या. शिर्के सर नाकाबंदी मध्ये काही संशयित भेटतात का याची खबर घेत होते. टीनाने केतकीला एक ही कॉल केला नाही ही गोष्ट संशय घेण्यासारखी नव्हती, पण टीना त्या मुलीला अस का बोलली की तिने केतकीला कॉल केला होता. एवढ्यावरून तिची चौकशी होणार होती.

साक्षी मॅडमनी टिनाला कॉल केला.

" हॅलो..!"

" हॅलो..!"

" टीना...?"

" येस..! हु इज देअर..?"

" आय एम असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर साक्षी विचारे फ्रॉम गुरूनगर पोलीस स्टेशन. यु कम टू द पोलीस स्टेशन. वी वॉन्ट टू टॉक टू यु अबाऊट केतकी'स किडण्यापिंग..! "

" ओहह...! पण मला का पोलीस स्टेशनला बोलावताय..?"

" तुला मराठी येत...? ग्रेट..! तू ये पोलीस स्टेशनला. काही नॉर्मल चौकशी करायची आहे."

" ओके मॅडम. पण मला आता कॉलेजला जायचं आहे."

" मी तुझ्या कॉलेजमध्ये कॉल करून सांगते की तू कॉलेजला येऊ शकतं नाहीस. चालेल..?"

" नको मॅडम..! मी येते..!"

" गुड..! लगेच ये..!"

" ओके मॅडम."

केतकीने कॉल कट केला. आता टीनाच्या चौकशीत काही सापडतं का हे पाहायचं होत. 

इकडे केतकीच्या घरी बिल्डींगमधील शेजारचे एक एक करून विचारपूस करायला येत होते. काही महिला केतकीला आलेला अनुभव विचारत होत्या. केतकी ह्याने वैतागून बेडरूममध्ये जाऊन बसली होती. आज ती कॉलेजला ही जाणार न्हवती. केतकीच्या आईनेच तिला दोन दिवस घरीच रहायला सांगितलं होतं.