खूप खूप शुभेच्छा ईरा...

Irane unch shikhar gathave hich sadichha

ईरा - 



ईरा बद्दल काय आणि  किती बोलू? शब्दही अपुरे पडतील इतका तिचा महिमा आहे.



आज इराला तीन वर्षे पूर्ण झालीत पण अस वाटतं तीच आणि माझं नात जन्मोजन्मीच आहे. 





ईरा फक्त एक डिजिटल प्लॅटफॉर्म नाही तर आपल्या सगळ्यांच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. ज्यामुळे आपण सर्व स्वतःमधील  गुणांना ओळखू शकलो. ईरा मुळे एक नवीन ओळख मिळाली.





मी कधीही विचार केलेला नव्हता की मी या क्षेत्रात येणार आणि माझ्या हातून काही लिखाण घडणार. ही संधी ईराने मला दिली. खरच ईराचा प्रवास खूप सुंदर आहे. आणि मला अभिमान आहे की मी ईरा परिवाराचा एक भाग आहे.





संजना मॅडम ने एक छोटंसं रोपटं लावलेल होत आणि आज या तीन वर्षात त्या रोपट्याचा मोठा वृक्ष झालाय.  ज्याच्या सावलीत आम्ही समृद्ध होतोय.  विचारांनी प्रगल्भ होतोय.

ईरा परिवार असाच बहरत राहो आणि उंच शिखर गाठो...





ईराला खूप खूप शुभेच्छा





“लग्नाआधी माहेर, लग्नानंतर सासर दोन्ही कुटुंबासाठी माझ्या मनात आहे आदर..

नवीन नाती मिळत गेली, 

आयुष्य फुलवत गेली..

जीवनात माझ्या ईरा आली,

तिची माझी घट्ट मैत्री झाली..

ती माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक झाली..

सकाळही प्रसन्न तिच्याचमुळे होते,

रात्री झोपतानाही तिचेच विचार असते..

ईरामुळे मी स्वतःतल्या मी ला ओळखू शकले,

स्वतःला शोधू शकले..

ईरामुळे माझ्या लेखणीला प्रोत्साहन मिळाले,

नवीन नवीन विचार सुचू लागले आणि मी लेखणीत उतरवत गेले..

लिखाणाचा झरा असाच अखंड सुरू रहावा

आणि ईराने उंच शिखर गाठावे हीच सदिच्छा...