नुकतीच बदली होवून एक नवे जोडपे समोरच्या फ्लॅट मध्ये राहण्यास आले . साक्षीला नवे शेजारी मिळाल्याचा खूप आनंद झाला. आता तिच्याशी गप्पा मारायला एक सखी मिळाली होती.लोभस लता ही तशी गोड होती. साखरेपरी विरघळून जाणारी, लोभस. दोघींची गट्टी जमली .भेटी बरोबर भाज्यांच्या वाट्या पोच होवू लागल्या. एकदा कचरा टाकायला साक्षी बाहेर आली होती.तोपर्यंत समीर ऑफिसला जायला बाहेर पडला .गडबडीत तिच्याकडे बघून मंद हसला. म्हणाला वहिनी अळू ची भाजी एक नंबर झाली होती बघा. ती बघतच राहिली एक हा समीर भाजी चांगली झाली म्हणतोय. आणि माझ्या अनिकेत ला सकाळची भाजी संध्याकाळी लक्षात राहत नाही.ती त्या दिवसापासून समीर ला आवडतील म्हणून दररोज वेगवेगळ्या भाज्या बनवून देवू लागली. थोडक्यात त्याच्या प्रशंसा करण्याने त्याच्या प्रेमातच पडली. आदर्श पती वाटू लागला होता तो .अनिकेत तिची तारीफ करत नाही म्हणून ती सारखे त्याला समीरचे उदाहरण देवू लागली.ध्यानी मनी फक्त तिला समिरच दिसू लागे. एक दिवस दुपारी ती लताकडे तिची भांडी मागायला गेली. दर लोटलेलच होते. म्हणून ती आत गेली.तोपर्यंत लता कुणाशी तरी फोन वर बोलत होती तिला व्यत्यय नको म्हणून ती शांत राहिली. लता ल माहीत नव्हते ती आल्याचे तिला पलीकडील व्यक्ती विचारत होती की घरकामे अवरली का? लता हसून म्हणाली अग कसली कामे भाताचा कूकर आणि चार चपात्या त्याला असा किती वेळ लागतो.समोरची म्हणाली भाजी ग त्यावर लता हसून म्हणाली अग आमचे हे खूप हुशार समोर एक कुटुंब आहे त्यातील साक्षीला स्वतःच्या भाजीचे खूप अप्रूप आणून दिली एकदा ह्यांना आयडिया सुचली .म्हणाले तुझी खूप धावपळ होते सकाळी थांब वहिनींना भाजी ची तारीफ करून रोज तुझा त्रास वाचवतो. आणि त्या दिवसापासून रोज गरम ताजी भाजी शेजारून येते. मे निवांत साक्षीने ते ऐकले व काढता पाय घेतला. घरी आल्यावर समीरच खोट रूप कसे फसवे आहे हे तिला कळून स्वतःची लाज वाटू लागली.v प्रशंसा करीत नसला तरी आपला नवरा असा दुसऱ्यांना फसवत तरी नाही. याचा अभिमान वाटायला लागला. दुसऱ्या दिवशी लता आली तेंव्हा तिने तिला कोपरापासून नमस्कार केला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा