खोपा अंतिम भाग - 4 जलद कथामालिका

खोपा एका निरागस जीवाचा

खोपा भाग - 4 जलद कथामालिका

     

रेखा जुई सोबत अबॉरशन या विषयावर बोलतांना खूप चिडत होती. आणि जुईला सुद्धा तीच बोलणं खूप लागत, कारण ती सुद्धा त्यासाठीच आलेली असते.

  "पण अबॉरशन हे एक पापच आहे. कारण इवल्याश्या जीवाचा ते जीवच घेतात ना ..!
ते फुल उमलण्या आधीच ते खूडून टाकतात, त्याची काही एक चुक नसताना. एकतर आधीच प्रिकॉशंस घ्यायचे किंवा मग बाळाला जन्म द्यायचा. हे अस अबॉरशन नको करायला. पापच आहे ते. एका अर्थी जीवघेणी कृत्य."

       जुई रेखाच सगळ ऐकून घेत होती. आणि गप्प बसली होती. कारण ती सुद्धा तिथे अबॉरशन करण्यासाठीच आलेली, हे तिने रेखाला सांगितलं नाही.

    रेखा जेव्हा जुईशी बोलत होती‌ तेव्हा तिला अस गप्प बघून रेखाने तिला विचारले,
"तु पण रेग्युलर चेकअप साठीच आलीस ना प्रेगनेंसीच्या?आता दर महिन्याला वेळेवर चेकअप साठी येत जा आणि स्वतःची काळजी घेत जा, जड वस्तु उचलत नको जाऊ. वेळेवर औषधं घेत जा. आणि हो, काही वाटलच तर पहिले हॉस्पिटलमध्ये येत जा. डॉक्टर मॅडम खुप छान आहेत या."

       इतक्यात रेखाने तिच्या पोटाला हात लावला आणि हसली, जुईला समजलेच नाही. तिने रेखाला विचारले,
"काय झाले हसायला?"

रेखाने जुईचा हात घेतला आणि तिच्या पोटावर ठेवला. जुईला त्या इवल्याश्या बाळाची हालचाल जाणवू लागली. तिने हसून रेखाकडे पाहिले आणि बोलली "बाळ खुप हालचाल करतेय ग"

"हो , बहुतेक बाळ लाथ मारतेय जुई."
हे ऐकताच जुईला खुप आनंद झाला. तिने पुन्हा रेखाच्या पोटावर हात ठेवला आणि बाळाची हालचाल तिला पुन्हा जाणवू लागली.

           रेखा खुप खुश होती. लवकरच तिच्या आयुष्यात एक नवीन पाहुणा येणार होता. मुलगा असो वा मुलगी, फक्त होणारे बाळ सुदृढ पाहिजे, इतकीच अपेक्षा होती तिची. रेखा सुद्धा चांगली शिकलेली आणि जॉब करणारी होती. म्हणजे आता तिला सातवा महिना चालू आहे तरीसुद्धा ती ऑफिसला जातेय आणि काम करतेय. 

       रेखाला बघून जुईला खुप कौतुक वाटले तिचे. क्षणभर जुईचा हात देखिल तिच्या पोटावर गेला आणि ती हसली. आपल्या पोटात देखील एक जीव वाढतोय याची तिला जाणीव झाली. आपण खुप मोठे पाप करायला निघालो होतो यामुळे तिला स्वतःचीच चीड देखील येत होती.

आपण इतके कसे स्वार्थी झालो होतो. क्षणभर सुद्धा ह्या पोटातल्या इवल्याश्या जीवाचा विचार आपल्या मनात आला नाही. निलेश सुद्धा किती समजावून सांगत होता, त्याचे म्हणने अगदी बरोबर होते. 

      कालपर्यंत बाळ नको नको म्हणणारी जुई अचानक उठून उभी होते आणि निलेशच्या दिशेने जाते.

   निलेश हॉस्पिटलच्या खिडकीतुन बाहेर बघत उभा असतो.

    "निलेश, चल घरी जाऊया ...!"

         निलेश एकदम आश्चर्याने तिच्याकडे बघत असतो आणि जुई एकदम खुश होऊन तिच्या पोटावर निलेशचा हात ठेवते आणि दोघे आनंदाने घराच्या दिशेने निघतात ..!
       
          शेवटी प्रत्येक पिल्लू खूप विश्वासानं आईच्या खोप्यात विसावलेले असतं. अगदी निर्धास्तपणे. फक्त एकाच विश्वासावर,
"काहीही झालं, तरी माझी आई मला कसलीच ईजा पोहचू देणार नाही आणि माझा बाप सदैव माझं रक्षण करायला समर्थ आहे."

आईच गर्भाशय म्हणजे केवळ एक कातडी पिशवी नसते . तो एक खोपा असतो निरागस जीवाचा ..!!!


समाप्त

सौं तृप्ती कोष्टी ©®






       
     
 

🎭 Series Post

View all