कथेचे नाव - खोपा
विषय - आणि ती हसली
फेरी - राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा
जुई चिडून फोनवर निलेशला बोलत होती .
जुई डोक्याला हात लावून बेडवर बसली होती . निलेश तिच्याजवळ जाऊन बसला .
अस का अचानक बोलावून घेतल तु मला घरी . बोल ना काहीतरी , काय झालयं ... सांग मला .
" जुईने फक्त त्याच्याकडे एक रागाचा कटाक्ष टाकला " आणि बाजुलाच पडलेली ती प्रेगनेंसी किट ओपन करून दाखवली .
पण जुई एकही शब्द बोलत नव्हती . निलेशने तिला मिठीत घेत बोलत करण्याचा प्रयत्न केला .
" काय झाल जुई ..!
आपल ठरल होत ना निलेश . कि लग्नानंतर दोन - चार " वर्षांनी आपण बाळाचा विचार करायचा ". मग हे काय होऊन बसले .
निलेश , मला माझ करियर आहे ... आणि त्यात आत्ता कुठे चांगला जॉब लागलाय . अजून आपल्याला घर घ्यायचय आणि असे बरेच काही आपल्या दोघांचे स्वप्न आहेत . त्यामुळे आत्ता सध्या आपल्याला हा विचार नको होता ना ..!
आता जे झालय ते झालय . कदाचित नियतीला देखिल हेच मान्य असाव ग ...!
पण का अशी चुक झाली आपल्याकडून .
मी उद्या सकाळीच हॉस्पिटल मधे जाणार आहे आणि चेकअप करुन अबॉरशन करुन घेणार आहे . आता ह्या विषयावर वाद घालू नकोस माझ्याशी .
त्या दोघांचे आधीच ठरले होते कि , लग्नानंतर दोन चार वर्षांनी बाळाचा विचार करायचा . त्याआधी आपल्या करियर वर फोकस करायच . एखाद छानस घर असाव , त्यात बाहेर लावलेली चारचाकी गाडी असावी , सगळ्या सुखसोयी असाव्यात . असे कोणाला वाटत नाही हो . तसेच निलेश आणि जुईचे होते " स्वप्न " आणि ते साकार करण्यासाठी दोघेही झटत होते . अगदी प्रामाणिकपणे . कसलीही कुरबुर न करता . अगदी आनंदाने राहत होते .
" हे बघ जुई , बाळ तसेही आपल्याला दोन चार वर्षांनी हवेच होते ना . मग ते जरा लवकर झाले तर काय प्रॉब्लेम आहे तुला ... !
तिने तिच नाव सांगितले " रेखा " . तिला नुकताच सातवा महिना सुरु झाला होता .
ती जुई सोबत बोलत होती तेव्हढ्यात अजुन एक पेशंट तिथे येऊन बसली आणि आपल्या नंबरची वाट बघू लागली .
रेखाने तिला सांगितले कि , आता हि मुलगी येऊन बसलीये , ती बिचारी गेले वर्षभर इथे रेग्युलर येतेय ट्रिटमेंटसाठी . लग्नाला पाच वर्ष होऊन गेली पण तिला मुल होत नाहीये .
सुरुवातीला बाळ नको म्हणून गोळ्या घेतल्या कि काय माहिती आणि आता बाळ हवय . त्यासाठी गेल्या कितीतरी महिन्यांपासून ते दोघे इथे चेकपसाठी येताय . व्रतवैकल्ये देखिल सर्व करून झाले पण त्याचा काही उपयोग नाही झाला . आता ह्या डॉक्टरांच्या सांगण्यावरून सगळी ट्रिटमेंट सुरु आहे दोघांची .
काही जणी इथे अबॉरशनसाठी देखिल येतात .
कस असत ना , ज्याला बाळ पाहिजे त्याला होत नाहीये . आणि ज्याला नकोय त्याला दिवस राहतात आणि मग काही लोकं ते अबॉरशन करून घेतात .
आपण खुप मोठे पाप करायला निघालो होतो यामुळे तिला स्वतःचीच चीड देखिल येत होती . आपण इतके कसे स्वार्थी झालो होतो . क्षणभर सुद्धा ह्या पोटातल्या इवल्याश्या जीवाचा विचार आपल्या मनात आला नाही . निलेश सुद्धा किती समजावून सांगत होता , त्याचे म्हणने अगदी बरोबर होते .
शेवटी प्रत्येक पिल्लू खूप विश्वासानं आईच्या खोप्यात विसावलेले असतं . अगदी निर्धास्तपणे . फक्त एकाच विश्वासावर , " काहीही झालं तरी माझी आई मला कसलीच ईजा पोहचू देणार नाही . माझा बाप माझं रक्षण करायला समर्थ आहे ". आईच गर्भाशय म्हणजे केवळ कातडी पिशवी नसते . तो एक खोपा असतो निरागस जीवाचा ..!!!
समाप्त
सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली - सातारा .