खेळ दि गेम ऑफ लव अँड हेट (भाग ८)

This is a suspens story

    स्मिता,रावी आणि अरण्यकला घरी जायला साधारणपणे दोन वाजल्या. तिघे घरी गेले. अरण्यक त्याच्या रूम मध्ये निघून गेला. रावी दोन दिवसांच्या सवयी प्रमाणे स्मिताच्या रूमकडे वळली तर स्मिता तिला थांबवत म्हणाली.

स्मिता,“रावी आज पासून  तू तुमच्या  रूममध्ये म्हणजेच अरुच्या  रूममध्ये झोपायचे.”असे म्हणून स्मिताने तिला वरच्या अरण्यकच्या रूममध्ये  नेऊन सोडले आणि त्या गेल्या; अरण्यक वॉश रूमला गेला होता.

     रावी रूममध्ये गेली तर रूम गुलाबाच्या आणि निशिगंधाच्या फुलांनी सजवली होती. सगळीकडे सेंटेड कँडल्स लावल्या होत्या. त्या कँडल्सचा  तसेच निशिगंध आणि गुलाबाच्या फुलांचा मोहक घमघमाट सगळ्या रूम भर पसरला  होता. समोर बेड ही फुलांनी सजवलेला दिसत होता. ते सगळं पाहून रावी मनातून खूप घाबरली होती. आत्ताच्या आत्ता इथून पळून जावे असा एक विचार तिच्या मनात चमकून गेला. पण तिने तो लागलीच झटकला. तो पर्यंत अरण्यक चेंज करून वॉश रूम मधून बाहेर आला. रावीला अशी अवघडून उभी असलेली व तिच्या मनाची होणारी घालमेल ओळखून तो तिला म्हणाला.

अरण्यक,“ मिस चव्हाण इतका विचार करू नका आणि घाबरू ही नका! तुमच्या मना विरुद्ध इथे काहीच होणार नाही! आपलं लग्न खूप विचित्र परिस्थिती झाले. मला कळते आहे तुमच्या मनाची तयारी हे नाते स्वीकारण्याची अजून झाली नाही रादर मला ही नाते स्वीकारायला वेळ लागणार आहे! तुम्ही चेंज करून निवांत बेडवर झोपा मी खाली झोपेण” तो म्हणाला आणि तिच्या उत्तराची वाट ही न पाहता त्याने  वार्डरोब उघडून एक वळकटी आणि एक ब्लँकेट बाहेर  काढले आणि तो ते अंथरू लागला.

     रावी त्याला काहीच बोलली नाही ती चेंज करून आली तोपर्यंत अरण्यक झोपला होता. त्याला झोपलेलं पाहून ती बेडवर जाऊन बसली आणि विचार करू लागली. हा A. V. किती साळसूदपणाचा आणि चांगुलपणाचा आव आणतो आहे. माझ्या जागी कोणतीही मुलगी असती तर इंप्रेस झाली असती कोणती का मला याचे खरे रूप माहीत नसते तर मीच इंप्रेस झाले असते. तू किती ही चांगुलपणाचा आव आण A. V. पण आज पासून तुझी अधोगती सुरू झाली आहे. आज पहिल्याच दिवशी मी तुला खाली झोपायला भाग पाडले. मला चांगलच माहीत आहे तुला स्लीपडिस्कचा त्रास आहे आणि तुझ्यासाठी असं खाली बिना गादिच झोपणे त्रासदायक आहे दोन-तीन दिवसातच त्याचे दुष्परिणाम दिसतील तुझी शिक्षा सुरू झाली अरण्यक! असा सगळा विचार करत रावी केंव्हा बेडवर निद्राधीन झाली तिला ही कळले नाही.

     जेंव्हा रावीने डोळे उघडले तेंव्हा सूर्यनारायण चांगलाच वर आला होता. तिने आळस देत घड्याळ पाहिले तर दहा वाजले होते. तिने इकडे-तिकडे नजर फिरवली तर ती एकटीच रूममध्ये होती. अरण्यक केव्हांच ऑफिसला निघून गेला होता. तिने स्वतःचे आवरले आणि जरा बिचकतच खाली गेली कारण इतक्या उशिरा ती उठली होती म्हणून स्मिता तिला बोलेल असे तिला वाटत होते. ती हळूच खाली आली तर स्मिता तिला डायनींग टेबलवर चहा घेत निवांत पेपर वाचताना दिसली.स्मिताने तिला  पाहिले आणि ती हसून  म्हणाली.

स्मिता,“ गुड मॉर्निंग रावी! तू चहा घेणार की कॉफी आणि हो नाश्त्यात ही काय घेणार ते कुकला सांग तो लगेच बनवेल!” त्या अगदी सहज म्हणाल्या.

रावी,“ sorry मॅडम ते रात्री उशिर झाला झोपायला. सर ऑफिसला गेले ही मला उठवलं ही नाही!” ती संकोचून खाली मान घालून म्हणाली.

स्मिता,“ अग सॉरी काय म्हणतेस त्यात काल असं ही आपल्याला खूप उशीर झाला झोपायला मग साहजिकच उशिरा जाग नेणार ना! आणि अरुच म्हणशील तर तो वर्को हॉलीक माणूस आहे तो रात्री किती ही वाजता झोपला तरी सकाळी उठून ऑफिसला जाणारच! त्याने तू दमली असशील म्हणून नसेल  उठवले तुला आणि काय ग तुला किती वेळा सांगायचे मला मम्मा म्हण आणि अरुला अरण्यक म्हण म्हणून तो तुझा बॉस नाही आता नवरा आहे!” त्या तिला समजावत म्हणाल्या.

रावी,“ मी विसरले मॅडम!” ती पुन्हा म्हणाली खरं तर स्मिताचे बोलणे तिच्या चांगले लक्षात होते पण तिला त्या घराशी आणि  स्मिताशी कोणतेच नाते जोडायचे नव्हते अरण्यकचा तर प्रश्नच नव्हता. म्हणून ती स्मिताला मम्मा  म्हणायला धजावत नव्हती. 

स्मिता,“ पुन्हा मॅडम!” आता स्मिता वैतागून चिडक्या सुरात म्हणाली.

रावी,“ मम्मा मला चहा पाहिजे मी करू का?” ती नाटकी हसून म्हणाली. 

स्मिता,“ बरं कर तू चहा आणि मला ही दे पाहू तरी माझ्या सुनेला काय-काय येत!” त्या हसून म्हणाल्या आणि रावीने होकारार्थी मान हलवली आणि ती किचनकडे वळली.  

★★★★

         इकडे अरण्यक ऑफिसमध्ये पोहोचला. त्याच रुटीन काम सुरू होत. आज  पाहटेच विरेंद्र  बिझनेस टूर वरून येणार होता. तो आला असेलच असे अरण्यकने गृहीत धरले होते. विरेंद्र जरी शहरात नसला तरी त्याचे आई-वडील काल रिसेप्शनला हजर होते. अरण्यक केबिनमध्ये त्याचे काम करत बसला होता. तर अचानक त्याच्या समोर विरेंद्र येऊन उभा राहिला आणि  त्याच्या टेबलवर पेपर फेकत म्हणाला.

विरेंद्र,“ वेड लागलय का A. V. तुला अरे तू त्या फडतूस सेक्रेटरीशी लग्न केलेस? Are you out of your mind?”तो तावातावाने बोलत होता. पेपरमध्ये अगदी फ्रंट पेजवर रावी आणि अरण्यकच्या लग्नाची बातमी कालच्या फोटो सहित छापून आली होती.

अरण्यक,“ वीर प्लिज यार शांत हो ना! अरे सीचवेशनच अशी होती की मला रावीशी लग्न करावे लागले.तुला सांगणार होतो मी सगळं पण वेळच नाही मिळाला आणि त्यात तू out of country होतास मग कसं आणि काय सांगणार” तो त्याला समजावत शांतपणे म्हणाला.

विरेंद्र,“ अरे कसली सीचवेशन? त्या पोरीने तुला धमकी दिली का? की तुला ब्लॅकमेल केले तिने. तुझ्यात आणि तिच्यात काही संबंध होते का? मला सांग तसं काही असले तर मी निस्तरीन सगळं! असल्या पोरिंच्या तोंडावर चार पैसे फेकले की त्या जातात रे निघून! तुझ्याकडून  चूक झाली असेल तरी तिच्याशी लग्न करण हा निर्णय खूप चुकीचा आहे A. V. ती तुझ्या लायकीची नाही!” तो पुन्हा तणतणला.

अरण्यक,“ अरे ती कशाला मला धमकी देईल आणि ब्लॅकमेल करेल! तीच बिचारी माझ्यामुळे मरणाला कवटाळत होती. माझ्यामुळे तिची खूप बदनामी झाली म्हणून मीच तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला वीर!” तो गंभीरपणे म्हणाला.

विरेंद्र,“ ती रावी बिचारी वगैरे नाही आ A. V. खल मुंड्डी आणि पातळ धुंडी आहे ती! ती खूपच चंट आहे. सावध राहा तिच्या पासून ती एक ना एक दिवस तुला गोत्यात आणणार बघ तू!” तो असं म्हणाला आणि अरण्यकच्या उत्तराची वाट न पाहता निघून गेला.

    अरण्यक मात्र हतबल होऊन विरेंद्रकडे पाहत राहिला. अरण्यक आठ वाजता घरी आला. तो आज विरेंद्रच्या बोलण्यामुळे  अपसेट होता. रात्रीच जेवण ही त्याने नीट केले नाही. स्मिताच्या हे लक्षात आले की अरण्यक अपसेट आहे  पण त्या काहीच बोलल्या नाहीत. रावी मात्र माय-लोकांच बॉंडिंग पाहत होती. तिला कुठे तरी अरण्यकचा हेवा वाटला कारण आईच असं प्रेम तिला कधीच मिळालं नव्हतं नाही म्हणायला तिच्या आत्याने तिला आईच प्रेम देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. पण आई ती आईच असते. तिने हे सगळे विचार झटकले आणि आज तिला अरण्यकशी काय बोलायचे याचा विचार करू लागली. 

            अरण्यक झोपायला बेडरूममध्ये आला आणि त्याने त्याची वळकटी अंथरली. रावी बेडवर बसून काही तरी वाचत होती पण तिचे सगळे लक्ष अरण्यककडे होते. तिने मनाची तयारी केली आणि ती बोलू लागली.

रावी,“ सर तुमच्याशी मला जरा बोलायचे होते.” ती म्हणाली.

अरण्यक,“ बोला!”  उभा राहून  तिला पाहत म्हणाला.

रावी,“ मी उद्या पासून ऑफिस जॉइन करायचा विचार करत आहे!” ती म्हणाली.

अरण्यक,“ माझी काहीच हरकत नाही मिस चव्हाण पण तुम्ही  ऑफिस काय म्हणून जॉईन करणार? म्हणजे मिसेस A. V म्हणून मालकीण म्हणून की  माझी पर्सनल सेक्रेटरी म्हणून ते आधी क्लेअर करा!” तो म्हणाला.

रावी,“ काय सर माझी चेष्टा करताय का? मला माझी लायकी चांगलीच माहीत आहे मी कधीच मिसेस A. V. म्हणून स्वतःला मालकीण समजणार नाही कारण हे नाते एक तडजोड आहे तुम्ही आणि मी केलेली. जे एक ना एक दिवस रादर हे सगळं वादळ शांत झाल्यावर  तुटणार आहे. मी माझी पायरी ओळखून आहे मी ऑफिस जॉईन करीन पण तुमची पर्सनल सेक्रेटरी म्हणूनच!” ती हसून म्हणाली.

अरण्यक,“ठीक आहे आणखीन एक माझ्या मम्माला आपल्या मधील या नात्या बद्दल काहीच माहीत नाही ती आता खूप आशा लावून बसली आहे आपल्या नात्या बद्दल तर तिच्या समोर आणि ऑफिसमध्ये ही आपल्याला नवरा-बायकोचे नाटक करावे लागेल.जो पर्यंत आपण हे नाते ऑफिशियली तोडत नाही तो पर्यंत!” तो म्हणाला.

रावी,“ठीक आहे सर!” ती म्हणाली.

       रावीने उद्या ऑफिसला जाण्याच्या हिशोबाने मोबाईलला अलार्म लावला आणि ती झोपली. अरण्यक मात्र बराच वेळ लॅपटॉपवर काम करत राहिला आणि कधी तरी मध्य रात्री झोपला.

विरेंद्रने रावी विषयी व्यक्त केलेली शंका खरी होती पण अरण्यकने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते; रावीच्या मनात काय होते? रावी आता ऑफिसला का जाणार होती तिच्या डोक्यात काय शिजत होते?

कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहे

©swamini chougule


 

    


 

     







 

🎭 Series Post

View all