खेळ दि गेम ऑफ लव अँड हेट (भाग ७)

This is a suspense story

       स्मिता तिच्या रूममध्ये रावीकडे आली.रावी तोंड पाडून संकोचून उभी होती.स्मिता आली आणि तिच्या पाठोपाठ एक नोकर येऊन  टी पॉयवर नाश्ता ठेवून निघून गेला.स्मिता रावीला हसून बोलू लागली.

स्मिता,“ रावी अग इतकी अवघडून का उभी आहेस.आज पासून हे घर तुझं ही आहे आणि आपल्याच घरात कोणी असं संकोचून वावरत का बेटा!”

रावी,“ मॅडम खरं तर मला सरांबरोबर असं या घरात येताना खूप भीती वाटत होती तुम्ही आमच्या लग्नाच्या निर्णयावर कशा रियाक्ट व्हाल आणि माझ्याशी कशा वागाल हे प्रश्न मला सतावत होते. खरं तर ना मी सरांच्या लायक आहे ना तुमच्या घराच्या!” ती आवंढा गिळत म्हणाली.

स्मिता,“ आधी हे मला मॅडम म्हणणे बंद कर! अरु मला मम्मा म्हणतो तर तू ही तेच म्हण आणि हो अरुला आता सर नाही म्हणायचं तू त्याची सेक्रेटरी नाही तर बायको आहेस आता! त्याला अरण्यक म्हण!आणि माझी भीती वाटण्याचे काहीच कारण नाही रावी! माझ्या अरुचा मला अभिमानच आहे त्याने तुझ्याशी लग्न केले. एका निष्पाप मुलीचे आयुष्य बरबाद होण्या पासून वाचवले.माझा आरण्यक तसा गुणी आहे हा पण तो काही बाबतीत आदर्श आहेच असं नाही. तो काही चारित्र्यवान वगैरे नाही रादर तू जी छवी तुझ्या होणाऱ्या नवऱ्याची तुझ्या कल्पनेत रंगवली असशील तसा ही नसेल माझा मुलगा! पण आता तो तुझ्याशी कमिटेड झाला आहे त्याने तुझ्याशी लग्न केले आहे तर तो ही कमिटमेंट त्याच्या शेवटच्या श्वासा पर्यंत निभावेल हा माझा शब्द आहे!आणि हो अरु सांगत होता की तू  आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलास तर आता तो विचार मनातून काढून टाक. आम्ही दोघे तुझ्या बरोबर आहेत.ब्रेकफास्ट कर आणि खाली हॉलमध्ये ये परवा तुमचे रिसेप्शन आहे त्या दिवशीच तुमच्या लग्नाची ऑफिशियल घोषणा होणार आहे तर त्यासाठी आणि रेग्युलर वापरासाठी ही तुला कपडे, ज्वेलरी घ्यावी लागेल ना तर ज्वेलर आणि बुटीकवाली येणार आहेत.त्याची खरेदी आपण करू!”त्या म्हणाल्या.

रावी,“ बरं”ती इतकच म्हणाली आणि स्मिता निघून गेली.

       रावी स्मिताच्या बोलण्यावर विचार करत होती. स्मिता तिला खूपच भोळी भाबडी बाकी सामान्य आई असतात तशीच वाटली. यांना यांच्या मुलातील दोष दिसले नाहीत वाटत. कसे दिसणार म्हणा यांच्या डोळ्यावर तर मुलाच्या अंधळ्या प्रेमाची पट्टी बांधली आले. मॅडम तुमच्या मुलाचा तुम्हाला अभिमान वाटतो असे तुम्ही म्हणालात कारण त्याने माझे आयुष्य उध्वस्त होण्या पासून वाचवले असे तुम्हाला वाटते पण तुमच्या त्या नीच मुलाने ज्या मुलींचे आयुष्य बरबाद केले त्याचे काय? अशा किती मुलींना याने फसवले असेल! पण आता सगळा हिशोब चुकता करण्याची  वेळ आली आहे. आणि हो त्याला त्याची मला दिलेली कमिमेंट निभवावीच लागेल त्याच्या  शेवटच्या श्वासा पर्यंत आणि तो शेवटचा श्वास मी त्याला लवकरच घ्यायला लावणार आहे! आज पासून खऱ्या लढाईला सुरुवात झाली आहे मिस्टर अरण्यक वीरशैव इतके दिवस तुम्ही खूप जणांच्या आयुष्याशी खेळलात!  आता मी तुच्याच खेळात तुम्हाला मात देणार just wait and watch!  ती हा सगळा विचार करत होती तो पर्यंत खालून स्मिताने तिला आवाज दिला आणि रावी भानावर आली ती लगबगीने खाली गेली. 

      इकडे ऑफिसमध्ये अरण्यक पोहचला. तर सगळा स्टाफ त्याला विचित्र नजरेने पाहत होता.पण अरण्यक मात्र सगळ्यांकडे दुर्लक्ष करून नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत होता. तो रिसेप्शन जवळ गेला आणि तन्वीला म्हणाला.

अरण्यक,“ तन्वी पुढचे दोन-तीन दिवस मिस चव्हाण ऑफिसला येणार नाहीत तर तुम्ही जरा माझे  स्केड्युल पहा त्यांच्या डेस्कच्या ड्रॉव्हरमध्ये स्केड्युलची डायरी आहे ती घ्या आणि माझ्या केबिनमध्ये या!” तो अगदी सहज म्हणाला.

तन्वी,“ ok सर!” इतकच म्हणाली.

       अरण्यक केबिनमध्ये गेला आणि त्याने ब्लेजर काढून खुर्चीवर अडकवले आणि टेबलवरच्या ग्लासातील पाणी पिले आणि खुर्चीला टेकून बसत दीर्घ निश्वास  सोडला. नाही म्हणल तरी वरून तो नॉर्मल असल्याचे  भासवत असला तरी आतून त्याला ही या सगळ्या प्रकरणाचा त्रास होत होता. तो डोळे झाकून खुर्चीवर बसला होता तो पर्यंत तन्वी डायरी घेऊन आली.आणि  अरण्यकच्या रोजच्या कामकाजाला सुरुवात झाली

★★★

                 आज रावी आणि अरण्यकचे रिसेप्शन होते विरेंद्र बिझनेस टूरला गेला होता त्यामुळे त्याला यातील कोणत्याच गोष्टीची कल्पना नव्हती. एका दिवसात स्मिताने इंव्हिटेशन कार्ड छापून घेतले आणि  नोकरांकर्वी सगळ्या महत्वाच्या लोकांना पाठवून दिली. तसेच मिडीयाला ही मुद्दामहुन बोलावले होते.  रॉयल ब्यु  या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शनची जंगी तयारी करवून घेतली. रावीला डिझायनर साड्या आणि ड्रेसेस तसेच डायमंड ज्वेलरी  वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र असं सगळं खरेदी करून दिल. अरण्यकसाठी सूट ही स्मितानेच पसंत केला.तिने रावीला दोन दिवस स्वतःच्याच रूममध्ये झोपवून घेतले होते.

                    स्मिता पाच वाजताच हॉटेलमध्ये रावीला घेऊन पोहोचली होती. तिथे पार्ललवाली तिला आणि रावीला तयार करणार होती. अरण्यक मात्र ऑफिसमधून घरी जाऊन तयार होऊन हॉटेलमध्ये पोहचणार होता.साधारणपणे सात वाजता पार्टी सुरू झाली. अरण्यक ऑफिसमधून तयार होऊन हॉटेलवर पोहचला त्याने फेन्ट मरून कलरचे ब्लेजर तसाच शर्ट आणि ट्राव्हझर घातली होती. आधीच हँडसम असणारा तो आज मात्र किलर दिसत होता.गेस्ट आता आता यायला सुरुवात झाली होती. स्मिता हसून सगळ्यांचे स्वागत करत होती. अरण्यक पोहोचला आणि स्मिताने रावीकडे बोट करून  त्याला रावी जवळ जाऊन उभे राहा असे इशाऱ्यानेच सांगितले. त्याने स्मिताच्या बोटाच्या दिशेने पाहिले आणि तो रावीला पाहतच राहिला. तिने ही मरून कलरचा गाऊन घातला होता त्याला साजेसा मेकअप आणि केसांचा  सुंदर असा मेसी बन त्यातून केसांच्या बटा तिच्या गालावर रुळत होत्या आधीच सुंदर असणारी रावी आज कमाल दिसत होती. स्वतःच्या ब्लेजरवर त्याची नजर गेली आणि रावी आणि त्याच्या कपड्यांचे होणारे मॅचिंग पाहून तो मनातच म्हणाला या मम्माला सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट करायची सवयच लागली आहे. तो सरळ गेला आणि रावीच्या शेजारी जाऊन उभा राहिला. कॅमेराचे फॅश नुसते चकाकत होते. खरं तर रावीला या सगळ्याची मनातून खूप चीड येत होती पण तसं न दाखवता  चेहऱ्यावर खोटे स्मित हास्य घेऊन  ती उभी होती. आठ वाजे पर्यंत सगळे गेस्ट आले आणि स्मिता रावी आणि अरण्यकच्या शेजारी जाऊन उभी राहिली. तिने माईक घेतला आणि बोलायला सुरुवात केली.

स्मिता,“ आजच्या या पार्टीमध्ये तुमच्या सगळ्यांचे मी स्वागत करते. हा समारंभ कशासाठी आहे हे तुमच्या एव्हाना लक्षात आलेच असेल तर मला हे सांगताना  खूप आनंद होत आहे की माझा मुलगा अरण्यक याने दोन दिवसा पूर्वी रावी चव्हाण हिच्याशी लग्न केले आहे. त्याचीच official announcement करण्यासाठी ही पार्टी आहे. So meet my gorgeous daughter in law ravee aranyk virshaiv!”  त्यांनी घोषणा केली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.


 

       सगळे अरण्यक आणि रावीचे अभिनंदन करत होते.तर मिडियावाले त्या दोघांचे फोटो घेण्यात मशगुल होते. आता पार्टी सुरू झाली होती कोणी सॉफ्ट ड्रिंक घेत होते तर कोणी हार्ड ड्रिंक घेत होते. कोणी स्टार्टरचा आस्वाद घेत होते तर कोणी बफे कडे जाऊन जेवण करत होते. अरण्यक मित्र आणि मैत्रिणींबरोबर बोलण्यात व्यग्र होता. रावी सीमा,तन्वी बरोबर उभी होती तर स्मिता पाहुण्यांची विचापुस करण्यात गर्क होती.केशवला मात्र हे ऐकून धक्का बसला होता. कारण त्याचे रावीवर प्रेम होते आणि ते रावीला कळण्या आधीच हे सगळे घडले होते. तो कसा बसा तास भर तिथे थांबला आणि अरण्यकला काही तरी थाप मारून निघून गेला. सिया जरा उशिराच पार्टीमध्ये पोहोचली तिने अरण्यकचे हसतमुखाने  अभिनंदन केले पण अरण्यक मात्र तिच्या अनपेक्षित येण्याने जरा अवघडला होता ते पाहून सिया त्याला हसून म्हणाली.

सिया,“ o my god A.V.!इतकं ऑड वाटून नको घेऊस इथे सगळ्यांना माहीत आहे की मी तुझी गर्लफ्रेंड ups sorry  ex girlfriend आहे असं ही आपण कुठे लग्न करणार होतो तूच तर आपलं रिलेशनशिप सुरू होण्या आधीच हे सगळं क्लिअर केलं होतस so chill! And by the way congratulations!” ती हसून शेक हँडसाठी हात पुढे करत म्हणाली.

अरण्यक,“ oh! Thanks a lot! सिया! तू माझं खूप मोठं टेन्शन दूर केलंस!” तो हसून तिला शेक हँड करत म्हणाला.

     रावी हे सगळं लांबून पाहत होती आणि अरण्यक किती नीच आहे ज्या मुलीशी तो अगदी काल पर्यंत रिलेशनशिपमध्ये होता तिलाच याने स्वतःच्या लग्नाच्या रिसेप्शनला बोलावले आहे आणि तिच्याशी हसून बोलत आहे जसे काही घडलेच नाही आणि ही सिया पण निर्लज्जच म्हणायची यांनी बोलावले आणि ही आली तोंड घेऊन मला तर वाटले होते ही आली म्हणजे पार्टीत तमाशा करणार पण ही तर अरण्यकशी हसून बोलत आहे कसली विचित्र नाती आहेत यांची!

            रावी याच  विचारांच्या तंद्रीत होती.तिच्या हे ही लक्षात नाही आले की सिया तिच्या जवळ आली आहे. सियानेच चुटकी वाजवली आणि ती भानावर आली.सिया तिला म्हणाली.

सिया,“ कहाँ खो गई मॅडम! ” ती हसून म्हणाली.

रावी,“ आहे इथेच!” ती संकोचून म्हणाली.

सिया,“ congratulations! You are lucky girl to have a man like A.V!” ती शेक हँडसाठी हात पुढे करत हसून म्हणाली.

रावी,“ अच्छा! कारण A. V. हँडसम आहे म्हणून की तो श्रीमंत आहे म्हणून मी स्वतःला लकी समजू!” ती कुच्छितपणे हसून म्हणाली.

सिया,“ अजिबात नाही तो खूप हँडसम आहे म्हणून ही तू लकी आहेस असं मी म्हणत नाही आणि तो श्रीमंत आहे म्हणून ही मी तू लकी आहे असं म्हणत नाही तर he is a wonderful human being म्हणून मी तू लकी आहेस असं म्हणाले कारण  तुला असा जीवनसाथी मिळाला आहे.” ती अरण्यककडे पाहत  म्हणाली.

रावी,“ असं! मग तू त्याची girlfriend  होतीस त्याने तुझ्याशी का लग्न केले नाही?” तिने तिला रोखून पाहत विचारले.

सिया,“ सोड ना यार तुला नाही कळणार ते पण एक दिवस तू ही मान्य करशील की तू नशीबवान आहेस!” असं म्हणून ती निघून गेली.

       रावी मात्र पुन्हा विचारात पडली. काय मुलगी आहे ज्याने हिचा वापर करून घेतला ज्याने हिला धोका तिला ही त्याचीच तारीफ करत आहे.अरण्यक  मी नशीबवान आहे की नाही माहीत नाही पण आज पासून तू कमनशिबी ठरणार! तुझे वाईट दिवस सुरू झाले.ती समोर उभा राहून हसून बोलणाऱ्या अरण्यककडे पाहून विचार करत होती. तो पर्यंत स्मिताने तिला हाक मारली. पार्टी रात्री एक वाजे पर्यंत रंगली आणि त्या नंतर सगळे घरी गेले. पण एक ब्रेकिंग न्यूज बरोबर घेऊन ती म्हणजे बिझनेस टायकून आणि most eligible bachelor A. V. म्हणजेच अरण्यक वीरशैवने त्याच्या पर्सलन सेक्रेटरीशी लग्न केले आहे.जी उद्याच्या वर्तमानपत्राची हेडलाईन असणार होती. आणि आजच्या सगळ्या न्यूज चॅनलवर झळकत होती.


 

    रावीने अरण्यकशी का लग्न केले असेल? रावीचे अरण्यकशी असे काय शत्रुत्व होते?

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत.

©swamini chougule












 





 










 

🎭 Series Post

View all