खेळ मांडला...भाग 10 अंतिम

Katha Tichya Sangharshachi
खेळ मांडला... भाग 10 अंतिम

पूर्वार्ध....

सुमितला जामीन मिळाला आणि तो जेल मधून बाहेर आला. हे ऐकताच मुक्ता खूप घाबरली, तिने लगेच डॉक्टरला फोन केला. त्यांनी तिला धीर दिला. तिला चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या. तिथे सेशन होतं, मुक्ताने ते अटेंड केलं.

आता पुढे,

सेशन संपलं आणि ती कॉन्फरन्स रूम मधून बाहेर आली.

"मग कसं झालं स्टेशन?"

"छान माहिती मिळाली."

"हो ना..आता स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यायची."

"हो मॅडम आता मी स्वतःची पण काळजी घेणार आणि  बाळाची पण."

मुक्ताचे डोळे भरून आले.
"काय झालं मुक्ता? बोलता बोलता अशी थांबलीस का? आणि हे तुझ्या डोळ्यात पाणी?"

"सुमितचं बोलणं आठवलं. बाळाला पोटातच मारून टाक. ह्या चिमुकल्याला कस मारणार होते मी?"

"अग भ्रूणहत्या करणे गुन्हा आहे."

"माहित आहे."

"सुमित बोलला त्यावेळी मी माझ्या पोटावर हात ठेवला.
तेव्हा असं वाटलं माझं बाळ माझ्याशी बोलतंय. मला सांगतंय आई मला मारू नको."

"आई.. आई.. आई..
ये आई.. थांब जरा..
कुठे निघालीस
अग अग थांब जरा
मला असच टाकून देणार
आई मलाही हे जग बघायचंय ग,
या सुष्ट्रित  मलाही जन्म घ्यायचाय ग
मी मुलगी आहे हे कळताच
मला संपवायला निघालीस तू
अग पण मी तुझाच अंश ना
मला मारून टाकलस तर
त्रास तुलाही होणार.
आई तुझ्या आईनी जर असा
विचार केला असता
तर आज इथे उभी नसतीस
आई येऊ दे ग मला तुझ्या जवळ
माझ्या इवल्याश्या बोटांनी तुझ्या गालावर बोट फिरवू दे.
थोडं मलाही हे जग बघू दे.
(ती बाहेर आली, सगळं जग बघितलं, सगळ्या घटना बघितल्या ,अत्याचार बघितले) आणि
उगाच मी बाहेर आले
आणि हे विद्रोही जग बघितले
मुलगी  वयात आली
आणि शेजाऱ्याने आपलीच समजली
तिच्या वर अत्याचार करून
भूक आपली मिटवली
अतोनात यातना सहन करून
लग्नाच्या मंडपात ती
उभी राहिली
लग्न झालं सासरी गेली
वाटलं सुखाचे दिवस आले
पण त्यातही नियतीने
कट रचला
सासूने पेट्रोल ओतून
सुनेला जाळून टाकला
आत्मा जळला पण शरीर वाचलं
अतोनात यातना सहन करून
पदरात एक मूलं आलं
मुलगा मुलगा करता
मुलींना पोटातच मारलं गेलं
शेवटी शरीर ते किती काळ टिकणार
त्यानेही देह टाकून गेलं
उरला तो फक्त आत्मा
उरला तो आत्मा
आता तो कुणाला दिसणारही नाही
आणि त्याच्यावर अत्याचार होणारही नाही
होणारही नाही."


हळूहळू दिवस समोर जात होते, सुमितच्या बाबतीत अजून काही कंप्लेंट्स पोलीस स्टेशनला गेल्या म्हणून पोलिसांनी पुन्हा त्याला ताब्यात घेतलं आणि मुक्ताची केस सुरू झाली.

हळूहळू सुमितच्या विरोधात काही पुरावे मिळत गेले आणि मुक्तावर जबरदस्ती केल्याच्या गुन्ह्यामध्ये त्याला सात वर्षाची शिक्षा मिळाली.

मुक्ताला सात महिने पूर्ण झाले, तिने आता जेवण बनवण्याचं काम बंद केलं. तिला आता जास्त काम होतं नव्हते. पण तिचा व्यायाम आणि योग्य आहार सुरू होता.

बाळाच्या हालचालीने मुक्ताला बर वाटायचं. ती बाळाशी गप्पा मारायची.

"मुक्ता हे असं किती वेळ बोलत राहणार आहेस बाळाशी, अग जास्त वेळ एकाच स्थितीत बसत जाऊ नकोस. थोडा आराम करत जा ग."

"मावशी बाळाची हालचाल झाली की राहवंत नाही, मग फक्त बोलत राहावंसं वाटतं. माझ्या आयुष्यात आता फक्त माझं बाळ आहे. माझ्यासाठी तो आणि त्याच्यासाठी मी.
आता आयुष्यभर आम्हीच एकमेकांचे साथी.."

"तुझ्या आयुष्यात आम्हाला काही जागा नाही."

"नाही मावशी मला तस म्हणायचं नव्हतं. तुम्ही आणि डॉक्टर मॅडमचे माझ्यावर खुप उपकार आहेत, मी तर आयुष्याभर तुमची ऋणी असेल."

ती पुन्हा बाळाशी बोलायला लागली.

"तुझ्यासाठीच जगते 
तुझ्यासाठी कष्ट करते 
जीवाचा येवढा आटापिटा 
सोन्या तुझ्यासाठीच करते  
तू आहेस म्हणून 
जीवन जगावेसे वाटते 
तुझ्या भावी आयुष्यासाठीच 
आज दुनियेशी झगडते  
होशील तू मोठा करशील
माझे स्वप्न साकार हीच
एक इच्छा मनी देशील
मला मायेचा आधार  
देवाकडे एकाच मागणे 
माझ्या बाळाला सुख दे 
त्याचे दुक्ख मला देऊन 
माझे उदंड आयुष्य त्याला दे..."

मुक्ताने एका गोंडस बाळाला जन्म दिला, देवाच्या कृपेने बाळाला कुठलाही संसर्ग लागलेला नव्हता. संसर्ग होऊ नये याची काळजी घ्यायची होती.

मुक्ताचं नशीब चांगलं म्हणून बाळाला कुठलाही रोग झालेला नव्हता. मुक्ता आणि तिचं बाळ दोघेही सुदृढ होते.

समाप्त:

अशा कितीतरी मुक्ता या जगात असतील ज्या तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात असतील....चूक कोणाचीही असो भोगाव मात्र स्त्रीलाच लागत...तिच्या आयुष्याचा खेळ मांडला जातो... इथे चूक मुक्ताची नव्हती तरी तीच आयुष्य पणाला लागलं...मग चूक कोणाची?..
तिची..त्याची...की परिस्थितीची?

🎭 Series Post

View all