खेळ मांडला...भाग 7

Katha Tichya Sangharshachi

खेळ मांडला...भाग 7


पूर्वार्ध...

मुक्ता डॉक्टर मॅडमच्या घरी आऊटहाऊस मध्ये राहायला आली, तिथे ती काम करायची, त्याचा तिला मोबदला ही मिळत असे. मुक्ताला समोर शिक्षण घ्यायचं होतं. तिने तिची इच्छा बोलून दाखवली.

आता पुढे,

"अग थांब कुठे चाललीस? आलीस ना चहा घेऊनच जा."

"मॅडम चहा वगैरे काय? तुम्ही मला माझ्या कामाचे पैसे देता हेच खूप आहे माझ्यासाठी."

"अग बस ग बस आज कृतीका येणार आहे, तिची आणि तुझी भेट करून देईल. तिला फोनवर सांगितलं ना तुझ्याबद्दल. तुझं खूप कौतुक वाटतं तिला. इतका धाडसी निर्णय घेतलास ना तू त्यामुळे ती तुझ्याबद्दल खूप हॅप्पी आहे. अग असं काय बघतेस माझ्याकडे मी सांगायची विसरले ना अग कृतीका माझी मुलगी, मेडिकलच्या फायनल इयरला आहे."

"मॅडम मी येते ना थोड्या वेळात." असं म्हणून निघून गेली.

"मावशी बाई आज कृतिका येणार आहे तिच्या आवडीचं काहीतरी जेवण बनवा."

"हो बाई साहेब तुम्ही जसं म्हणाल तसं बनवते मी."

मुक्ताने समोर शिकायचं ठरवलं, डॉक्टरने तिची सगळी मदत केली. तिला घरी पुस्तक आणून दिलीत, ती  घरीच अभ्यास करायची. बघता बघता मुक्ताला चार महिने पूर्ण झाले
तिची सगळी ट्रीटमेंट आणि औषध डॉक्टर कडूनच व्हायच्या. त्यामुळे मुक्ताला जास्त काही काळजी नव्हती.

एक दिवस मुक्ता तिच्या खोलीत बसलेली होती. अचानक दरवाजा ठक ठक झाला, मुक्ता दार उघडायला गेली, बघते तर काय समोर सुमित उभा होता.

"तुम्ही? तुम्ही इथे का आलात?"

"तुला शोधत शोधत आलो इथे, मला सोडून आलीस ना तू, असं का वागलीस? हे योग्य नाहीये आता इतके दिवस मी गप्प राहिलो पण आता नाही. आता तर मी तुला धडा शिकवणार आहे." असं म्हणून तो आत शिरला.

"हे बघा सुमित, तुम्ही इथून निघून जा. तुम्ही जर अजून काही चुकीचं वागलात तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसणार."

"धमकी देतेस मला."

"नाही चेतावणी देत आहे. इथून निघून जा, तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमची बायको एकटी आहे तर हा तुमचा गैरसमज आहे तुमची बायको एकटी नाही आहे माझ्यासोबत माझी आपली लोक आहेत."

"बघू तरी आता एक हाक मारलीस तरी कुणी शकेल का तुझ्या मदतीला?"

सुमित आत येऊन चेअरवर बसला, टी पाय वर त्याने पाय ठेवले.

"हे बघा सुमित मी शेवटचं सांगते इथून निघून जा, मला तुमचं तोंडही बघायचं नाहीये."

"ते तर तुला बघावंच लागेल एकदा नाही तर वारंवार बघावं लागेल." असं म्हणून तो तिथून उठला.

त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदललेले होते, आता चेहऱ्यावर राग दिसत होता. त्याने तिच्या अंगावरची ओढणी फेकली, तिचे गाल पकडले.

"शहाणी बनतेस तुझं हे वागणं योग्य नाहीये, मी तुला घरी न्यायला आलोय."

"मी येणार नाही."

"मी तुझा नकार ऐकायला आलेलो नाहीये. मी तुला घरी न्यायला आलो."

"नाही मी येणार नाही."

सुमितने मुक्ताला बेडवर पाडलं आणि तिच्यावर अत्याचार केला. सगळं करून झाल्यानंतर शर्टाचे बटने लावत तो खुर्चीवर बसला.

मुक्ता निपचित पडून होती, तो तिथून निघून गेला. ती अजूनही तशीच पडून होती.

काही वेळाने डॉक्टरच्या घरच्या मावशी बाई आल्या. त्यांना मुक्ता निपचित पडलेली दिसली. मावशी आत मध्ये धावत आल्या.

"मुक्ता, अग ये मुक्ता बोल ना ग. अशी का पडून आहेस मुक्ता."
तिने मुक्ताला हलवलं, तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं तेव्हा मुक्ताला जाग आली. मावशीने तिला उठून बेडवर व्यवस्थित बसवलं.

"काय ग काय झालं?"
मुक्ताने
"डॉक्टर कुठे आहेत." विचारलं

"त्या क्लिनिकला गेल्या आहेत, तुला काय झालं?"

मुक्ता रडायला लागली, मावशीला सगळं कळलं.

"कोण आलं होतं? सांग मुक्ता कोण आलं होतं? तो आला होता का? त्याने काही केलं तुझ्यासोबत? तू थांब मी बाईसाहेबांना फोन करते." असं म्हणतं मावशी बाई निघून गेल्या.

त्यांना सगळी घटना सांगितली थोड्यावेळाने डॉक्टर क्लिनिक मधून घरी आल्या, त्यांनी बॅग ठेवली आणि आऊट ऑफ मध्ये मुक्ता कडे गेल्या. मुक्ता अजूनही तशीच बसून होती.

"काय झालं मुक्ता? बोल मुक्ता काय झालं?"

मुक्ता डॉक्टरला बिलगून पुन्हा रडायला लागली.

"मॅडम तो आला होता, तो आला होता मला न्यायला.. आला होता मी जाण्याला नकार दिला म्हणून त्याने माझ्यासोबत.."

"तू चल पोलीस स्टेशनला."

"पण मॅडम.."

"तू चल माझ्यासोबत पोलीस स्टेशनला." डॉक्टर तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेल्या. सुमितची तक्रार देऊन आल्या.

तो त्याच्या गावी पळून गेलेला होता, पोलिसांनी तपास केला काही दिवसांनी सुमितला अटक करण्यात आली.

क्रमशः

🎭 Series Post

View all