Feb 23, 2024
नारीवादी

खेळ मांडला...भाग 6

Read Later
खेळ मांडला...भाग 6


खेेेळ मांडला...भाग 6

पूर्वार्ध...

डॉक्टरने मुक्ताला समजावलं, सुमितपासून दूर राहायला सांगितलं आणि सुमितच्या विरोधात कंप्लेट करून त्याला शिक्षा मिळायला हवी हे ही सांगितल, मुक्ता तयार झाली.
तिने घरी जाऊन सुमितला सांगितलं.

आता पुढे,

"आता मला असं काही होऊ द्यायचं नाहीये. माझ्या बाळाला सुरक्षित ठेवायचं आहे."

"हे बघ तुला ते बाळ महत्त्वाचं आहे की तुझा नवरा महत्वाचा आहे?"

"मला माझं बाळ महत्त्वाचं आहे, असला नवरा नकोय मला. तुमच्या असण्यात आणि नसण्यात काहीच फरक नाहीये."

"ये जास्त बोलून राहिली का तू?" असं म्हणून त्याने मुक्ताच्या गालावर एक जोरात थापड मारली, तशी मुक्ता बेडवर पडली."

"हे बघा तुम्ही आता काहीही करा, मी इथे राहणार नाही आणि हो तुमच्या आई बाबाला सांगा. त्यांनाही मी कोर्टात खेचणार आहे. आता इथे मी अजिबात राहणार नाही. तुम्हाला जे करायचं ते करा आणि आज माझ्यावर हात उगारलात यानंतर हात उचलायची हिंमत करायची नाही माझ्यापेक्षा वाईट कोणी राहणार नाही." मुक्ताचं वागणं बघून सुमितला खूप आश्चर्य वाटलं.

तो घरातून बाहेर निघून गेला, तो थेट हॉस्पिटलला पोहोचला. डॉक्टरच्या केबिनमध्ये गेला.

सुमितला बघून डॉक्टर खुर्चीवरून उठल्या…

"ही काय पद्धत आहे आतमध्ये येण्याची? तुम्ही विचारून येऊ शकत होतात?"

"ओ मॅडम मला काही शिकवू नका, माझ्या बायकोला शिकवलं तेवढेच पुरे आहे, काय पट्टी पडवली हो तुम्ही तिला? काय तिच्या डोक्यात घालून ठेवलं? आमच्या दोघांच्या आयुष्यात तुम्हाला कोणी घुसायला सांगितलं? आमचा आयुष्य आम्ही बघून घेऊ आमचं काय करायचंय तुम्ही त्यात नाक कशाला खूपसत आहात?"

"हे बघ सुमित, तू इथून शांतपणे निघून जा. नाहीतर मी पोलिसांना बोलवेन."

"मॅडम पैशाचा रुबाब मला दाखवू नका, तुमची अवस्था तशीच करीन मी जशी मुक्ताची केली आहे."

"ये तोंडाला आवर घाल."
सिक्युरिटी.. सिक्युरिटी.."

डॉक्टरने सिक्युरिटीला आवाज दिला.
"धमकी कोणाला देता?"
सेक्युरिटी गार्डने सुमितला बाहेर नेऊन गेटच्या बाहेर नेऊन टाकलं.

डॉक्टरने दीर्घ श्वास घेतला, चेअर वर बसली आणि पाणी प्यायली.

"बापरे किती डेंजर माणूस आहे हा? इथे येऊन असा वागला तर हा घरात मुक्ताशी कसा वागला असेल? हे भगवान मुक्ताला बर ठेव."

तो तिथून पळून गेला, काही वेळाने मुक्ता घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली.

"मॅडम आत येऊ का?"

"अग मुक्ता आलीस तू? मुक्ता मी खूप घाबरले होते ग मला वाटलं तुझ्या नवऱ्याने तुला काही केलं तर नसेल कारण इथे येऊन त्याने खूप राडा केला, त्यामुळे मी थोडी घाबरले होते. तू बरी आहेस ना मुक्ता?"

"हो मॅडम मी बरी आहे."

"ओके तू बस थोडा वेळ,गाडी आली की आपण घरी जाऊया."

डॉक्टर मुक्ताला तिच्या घरी घेऊन गेली, डॉक्टरने तिला आऊट हाऊस मध्ये  राहायला सांगितलं आणि मुक्ता तिथेच डॉक्टरच्या घरी काम करायला लागली. डॉक्टर तिला त्याचे पैसे द्यायचे  त्यातून तिचा महिना भागायचा.

डॉक्टरच्या फॅमिली सोबत पण मुक्ताचे ओळख झाली. त्यांचे संबंध दृढ व्हायला लागले, एक दिवस मुक्ता डॉक्टरच्या घरी गेली.

"अरे मुक्ता तू ये ना आत ये."

"सॉरी मॅडम न सांगता आले."

"अग असं काय करतेस आणि हे तुझंच घर आहे ना? आऊट हाऊस मध्ये राहतेस म्हणून काय झालं हे तुझंच घर समजून येत जा. काय म्हणतेस?"

"एक विचारू का मॅडम?"

"अग बोल ना, त्यात काय एवढं?".

"मॅडम मी फक्त दहावी शिकले, मला असं वाटतं की मी समोर शिकावं.म्हणजे बघा ना आता मी एकटीच आहे तर समोर शिकले तर माझा शिक्षणाचा काहीतरी फायदा होईल. मला छोटी मोठी कुठेतरी नोकरी मिळेल आणि माझ्या बाळाच्या भविष्यासाठी तर मला सगळं करावंच लागेल ना."

"हे बघ मुक्ता तू खूप छान विचार केलास पण सध्या आपल्याला आपल्या बाळाकडे लक्ष द्यायचं हे सगळं करून तू जर ते करणार असेल तर बघूया आपण विचार करूया.
घरी अभ्यास करून परीक्षा देता येते का हे बघावं लागेल. तुला तसं पुस्तका आणाव्या लागतील, तुला अभ्यासाला वेळ द्यावा लागेल, त्यात बाळाची काळजी, तुझे स्वतःचे काम इतकं सगळं तू करू शकणार आहेस का? याचा आधी विचार कर आणि तुझा पूर्ण विचार झाला की मग मला सांग मी करेल तुझी मदत."


"थँक्यू मॅडम. मॅडम मला हे सगळं माझ्या बाळासाठी करावचं लागणार आहे आणि मी करणार" असं म्हणून ती जायला निघाली.

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing

//