Feb 23, 2024
नारीवादी

खेळ मांडला... भाग 5

Read Later
खेळ मांडला... भाग 5


खेेेळ मांडला...भाग 5

पूर्वार्ध...

मुक्ता आणि तिच्या घरच्यांना सुमितच्या घरच्यांनी बोलावलं होतं. हे सगळे त्यांच्या घरी गेले. सगळे बोलत होते, घर बघावं म्हणून मुक्ता घर बघायला लागली,तिला पायऱ्या दिसल्या आणि ती त्या दिशेने निघाली.

आता पुढे,


मी त्या पायऱ्यांनी एक एक पायरी चढत गेले, तिथे दरवाजा होता दरवाजाची कडी उघडीच होती, मी हळूच त्या दाराला हात लावला. तो दरवाजा उघडला, त्या थोड्या उघडल्या दरवाजातून माझी नजर गेली तर आतील दृश्य बघून मी हादरले. ते एका परक्या स्त्रीसोबत एकाच बेडवर.. त्यांचं ते रूप बघून मी हादरली आणि लगेच खाली आले.

सुमितचा रोजचंच हे चालायचं, वेगळ्या बायांसोबत तो झोपायचा. ते सगळं सुरू असतानाही  मी गप्प राहिले आणि लग्नाला उभी राहिले, खरं तर लग्नाला फक्त माझ शरीर उभं होत कारण आत्मा तर आधीच मेला होता.

सुमितने फक्त माझ्या शरीराशी लग्न केलं, लग्नानंतरही त्याच्या वेश्या व्यवसाय सुरूच होता. जसा बाहेर इतरांच्या शरीरासोबत खेळायचा तसाच माझ्याही सोबत.
 
मुक्ताचे डोळे पुन्हा पाणावले,  मन भरून आलं...थोडं पाणी प्यायली आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली.

मला वाटलं लग्नानंतर सुधारेल, माझ्या वर प्रेम करेल पण अस काहीच घडलं नाही, दिवसा त्याला माझी गरज भासायचीच नाही, गरज होती ती फक्त रात्रीची.
मला खूपदा वाटलं ,सोडून जावं. कुठेतरी पळून जावं. पण माझा नाईलाज होता आणि सुमितने जरी मला सोडलं असतं तरी तेच सगळं घडलं नसत कशावरून. 
आता मला असच आयुष्य जगायचं आहे हे मी स्वीकारल होतं."


मुक्ताचं सगळं बोलणं ऐकून डॉक्टरच्या डोळ्यात पाणी आलं.. शेवटी डॉक्टरही एक माणूसच आहे, तीच मन भरून आलं.. तिने मुक्ताला शांत केलं आणि धीर दिला.

“तुझ्यासोबत जे काही घडलंय, ते जाऊ दे पण आता या बाळासोबत आपल्याला हे सगळं होऊ द्यायचं नाहीये ...तू तुझ्या बाळाला यातून वाचवू शकतेस पण त्यासाठी तुला सुमितला दूर कराव लागेल.


आता तू सुमित सोबत नाही राहायचं.. मी आहे तुझ्यासोबत मी सगळं करेल तुझं.

हे बाळ सुदृढ जन्माला यायला हवं, तुला या बाळासाठी सुमितला दूर करावं लागेल, तुला कळतंय का मी काय बोलतीय."

“पण मॅडम मी एकटीच कशी?”
मुक्ता बोलता बोलता थांबली

“तू एकटी नाहीयेस , मी तुझ्यासोबत आहे. राहिला प्रश्न सुमितचा तर ते मी सगळं बघेल.. सुमितला त्याच्या केलेल्या चुकीबद्दल शिक्षा नक्की होईल. त्याने तुला फसवलं आणि त्याची शिक्षा त्याला कोर्टातून मिळेल.
मुक्ता तोंडावर हात ठेवत
“कोर्टकचेरी... नाही.. नाही.. मॅडम आमच्याकडे तेवढा पैसा नाही."


"मुक्ता तुला आता मी सांगितले ना तुला काळजी करायची गरज नाहीये तुझं आणि तुझ्या बाळाचा काय करायचे ते मी बघेल."


तू फक्त आता आनंदी राहायचं स्वतःसाठी नाही तर त्या चिमुकल्या जीवासाठी. तू जे भोगलस ना ते त्या निष्पाप जीवाला नाही भोगायचंय, ते बाळ जन्माला येईल आणि सुदृढ येईल.
 
आता समोरचे सहा महिने मी तुझी काळजी घेईल, तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे."अस म्हणत डॉक्टरने तिच्या पाठीवर हात ठेवला आणि तिची आणि तिच्या बाळाची संपूर्ण जबाबदारी घेतली.


"तू जा घरी आणि तुझा निर्णय तुझ्या नवऱ्याला सांगून ये."

मुक्ता घरी गेली, तिने मनाशी सगळं ठरवलेलं होतं.

"आलीस? काय म्हणाल्या डॉक्टर?"

"डॉक्टर जे काही म्हणाल्या ते सगळं योग्यच होतं. सुमित मी घर सोडून जाणार आहे."

"म्हणजे?"
"म्हणजे मी आता इथे राहणार नाही, मी तुम्हालाही सोडून जाणार आहे."

"ये वेडी झालीस की काय? खुळ लागलंय की डोक्यावर पडलीस? काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का?"

"हो कळतंय मी हे घर सोडून जाणार आणि हो तुमच्या विरोधात कोर्टात केसही टाकणार आहे."

सुमित जोराजोरात हसायला लागला.

"ही बाई डोक्यावर पडली की काय. वेडी झालीस की काय ग की डोक्यावर पडली मला सोडून देणार आणि करणार काय तू? हे पोटातलं बाळ याला घेऊन कुठे जाणार?"

"मी माझं सगळं ठरवलं, कुठे जाणार काय करणार ते. समोर बघू पण आता मी इथे राहणार नाहीये." असं म्हणून मुक्ताने बॅग भरायला घेतली.

आधी सुमितला सगळं नाटक वाटलं, खोटं वाटलं पण तिला पॅक भरताना बघून तो सुन्न झाला.

"ये मुक्ती तू खरच मला सोडून जाणार, हो हे बघा मला माझ्या बाळाला वाचवायचे आहे तर मला तुमच्या पासून दूर जावंच लागेल. नाहीतर आपल्या दोघांना जो रोग झालाय ना तोच माझ्या बाळालाही होईल."

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing

//