खेळ मांडला...भाग 3

Katha Tichy Sangharshachi

खेळ मांडला...भाग 3


पूर्वार्ध...

सुमितने मुक्ताला सांगितलं की डॉक्टर बदल किंवा पोटातल्या बाळाला मारून टाक.
ती डॉक्टरला भेटायला गेली. त्यांनी तिला सेशन अटेंड करायला सांगितलं, त्यात एच.आय. व्ही. बाधित स्त्रियांना महत्त्वाची माहिती मिळणार होती. मुक्ता तिथे गेली, आणि सेशन सुरू झालं.

आता पुढे,

एच.आय.व्ही. ग्रस्त महीला तिच्या बाळाला स्तनपान करु शकते का?

एच.आय.व्ही. ग्रस्त महिलेच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीवर ते अवलंबून असते. वर्ल्ड हेल्थ ऑरर्नाजेशन नुसार जर त्या मातेच्या दुधाला पर्याय म्हणून एखाद्या सुरक्षित महिलेच्या स्तनपानाची व्यवस्था होऊ शकली किंवा अशा स्तनपानाचा खर्च बाळाच्या आईला आर्थिक दृष्टीने परवडणारा असेल तर ती तीचे दूध बाळाला देणे टाळू शकते. गरीब महीलांना आर्थिकदृष्ट्या हा खर्च परवडत नसल्याने त्यांना बाळाला वाचवण्यासाठी स्तनपान करणायाशिवाय दूसरा मार्ग नसतो. उच्च-मध्यम वर्गीय महीलांना मात्र हा खर्च परवडत असल्यामुळे त्या त्यांच्या बाळाला स्तनपान करीत नाहीत.

गरोदरपणी एच.आय.व्ही. टेस्ट करता येते का?
गर्भाला होणारा एच.आय.व्ही.चा धोका टाळण्यासाठी गर्भवती महीलेने गरोदरपणाच्या प्रत्येक तिमाही मध्ये एच.आय.व्ही. टेस्ट करणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे पहिल्या तिमाहीत करण्यात येणा-या सर्व टेस्ट मध्ये एच.आय.व्ही. टेस्ट केली जातेच. एच.आय.व्ही.चा संसर्ग गर्भाला होऊ नये यासाठी दोन्ही पालकांनी पहिल्या, दुस-या व तिस-या तिमाही मध्ये टेस्ट करुन घ्यावी.


गर्भवती महीलेकडून तिच्या बाळाला एच.आय.व्ही.ची लागण का होते?

एच.आय.व्ही. संक्रमित गरोदर मातेच्या बाळाला एच.आय.व्ही.चे संक्रमण झाल्यानंतर किंवा संक्रमणानंतर औषधउपचार न घेतल्याने किंवा गरोदर पणात कुपोषणामुळे संक्रमण होण्याचा धोका असतो. कधीकधी जेव्हा बाळाची आई एच.आय.व्ही. निगेटिव्ह असते पण त्याचे वडील एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह असतात तेव्हा या संक्रमणातून बाळाला संक्रमित होण्यापासून वाचवणे हे डॉक्टरांसाठी आव्हात्मक असते.


एच.आय.व्ही. औषधांमुळे हे संक्रमण थांबवता येते का?

एन्टीरीट्रोव्हायरल थेरपीने एच.आय.व्ही.चे संक्रमण रोखता येते हे सिद्ध झाले आहे. मात्र ते ती माता किती प्रमाणात संक्रमित आहे यावर अवलंबून आहे.जर मातेचे संक्रमण आटोक्यात येण्यासारखे असेल तर या रोगाच्या प्रसाराचे प्रमाण शुन्य ट्क्के असू शकते.

गरोदरपणात ही औषधे घेणे कितपत सुरक्षित आहे?

गरोदरपणात एच.आय.व्ही.चे संक्रमण रोखणारी बरीचशी औषधे अर्भकाच्या वाढीसाठी सुरक्षित असतात. मात्र इतर कोणत्याही औषधांप्रमाणे याही औषधांचे दोन टक्के दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.पण या औषधांमुळे एच.आय.व्ही.चे संक्रमण रोखले जाते या फायद्यापुढे औषधांचे साईड इफेक्टस नगण्य असल्याने ते सहन करणे शक्य होते.

गरोदर महीलेने औषधउपचार घेतले नाहीत तर तिच्या बाळाला एच.आय.व्ही.चे संक्रमण होण्याचा किती धोका असतो?


हा धोका ३२ टक्के असू शकतो. म्हणजेच अशा १०० उदाहरणापैकी ३२ महिलांच्या बाळाला हा संसर्ग होऊ शकतो. यासाठीच तिस-या तिमाहीतही गरोदर महीलेची एच.आय.व्ही. टेस्ट व तपासणी करणे गरजेची असते.


एन्टीरीट्रोव्हायरल घेणा-या महीलेच्या बाळाला एच.आय.व्ही.चे संक्रमण होते का?

एन्टीरीट्रोव्हायरल घेतल्याने अनेकांमध्ये चांगले परिणाम दिसून आले आहेत. मात्र काही केसेसमध्ये औषधांच्या वापरानंतरही हा व्हायरल लोड थांबला नाही. त्यामुळे अर्भकाला संक्रमण होण्याचा धोका निर्माण होतो. असे  झाल्यास तज्ञ औषध व उपचार बदलण्याचा सल्ला देतात.

आता समोर बघूया, कुणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता.

अर्भकाचे संक्रमण थांबवण्याचा सर्वात उत्तम उपाय कोणता?

एच.आय.व्ही. बाधित आईपासून अर्भकाचे संक्रमण थांबवण्याचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे डॉक्टरांनी सांगतलेले औषधउपचार न चुकता घेणे.
त्याच प्रमाणे या तीन प्रकारे तुम्ही हे संक्रमण थांबवू शकता.
प्रेगन्सी पुर्व तपासणीत एच.आय.व्ही. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास ताबडतोब औषधे घेण सुरु करणे.
सिझेरियन डिलीव्हरीचा पर्याय निवडणे ज्यामुळे बाळाला संक्रमण होण्याचा धोका कमी होऊ शकतो.
प्रसूतीपुर्व काळजी घेतल्याने आईपासून बाळाला होणारा संसर्ग टाळता येतो.

त्याचप्रमाणे अशा मातेने तीच्या आयुष्यभराच्या सुरक्षेसाठी व पुढील एड्सचा धोका टाळण्यासाठी न चुकता औषधे घ्यावीत

सेशन संपल्यानंतर सगळ्या बाहेर आल्या. मुक्ता डॉक्टरच्या कॅबिनकडे गेली.

"मॅडम येऊ का?"
"हो ये मुक्ता, बस"

"कसं झालं सेशन?"

"छान झालं मॅडम, सगळी माहिती मिळाली."

"हो ना बस आता, घे पाणी पी."

"मुक्ता आता मी तुला जे काय विचारणार आहे, त्याची नीट विचार करून उत्तर दे. तुझा नवरा पॉझिटिव आहे हे तुला लग्नाआधी माहित होतं?"

मुक्ता शांत बसून होती.

“मुक्ता अस शांत बसून नाही चालणार.. काय झालंय सांग मला.. तुला सगळं माहिती असूनसुद्धा तू हे पाऊल का उचलल? का स्वतःचा जीव धोक्यात घातलास? याच कारण मला कळायला हवं, बोल मुक्ता."
 
 
डॉक्टरने मुक्ताच्या खांद्यावर धीराचा हात ठेवला, तिच्या जवळ बसल्या, मुक्ताला धीर वाटला आणि तिने मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.


क्रमशः

🎭 Series Post

View all