खेळ मांडला...भाग 2
पूर्वार्ध...
मुक्ताचे रिपोर्ट एच.आय.व्ही.पॉझिटिव्ह आले होते. डॉक्टर जोशीने तिला बरेच प्रश्न विचारले, पण मुक्ता काहीच बोलली नव्हती. डॉक्टरने तिच्या नवऱ्याला बोलावून घेतलं.
त्याच्याशी बोलणं झाल्यानंतर तिने जे काही ऐकलं त्यावर तिचा विश्वास बसेना...
त्याच्याशी बोलणं झाल्यानंतर तिने जे काही ऐकलं त्यावर तिचा विश्वास बसेना...
आता पुढे,
सुमित तिथून निघून गेला. डॉक्टरांच्या मनातले मुक्ता विषयीचे विचार जात नव्हते. अस काय झालं असेल की सगळं माहीत असूनही मुक्ताने लग्नाला होकार दिला असेल?
काय घडलं असेल तिच्या आयुष्यात?"
सुमित घरी पोहोचल्यानंतर,
"मुक्ते ए मुक्ते..." सुमितने तिला आवाज दिला
मुक्ता आतून आली.
"अहो आलात तुम्ही? काय म्हणाले डॉक्टर?"
"तू डॉक्टरांना काय सांगितलंस?"
"मी काहीच सांगितलं नाही."
"मी काहीच सांगितलं नाही."
"मग त्या मला प्रश्न का विचारत होत्या?"
"कसले प्रश्न?"
"हे बघ माझ्या रोगाबद्दल मी लग्नाच्या आधी तुला सांगितलं होतं, सांगितलं होतं ना?"
"हो.." मुक्ताने होकारार्थी मानवली.
"मग तरी त्या डॉक्टर मला उलट सुलट प्रश्न का विचारत होत्या. तू त्यांच्या मनात माझ्याविषयी काय काय घालून ठेवलंस?"
"अहो असं खरंच काही नाहीये. मी डॉक्टरला काहीच बोलले नाहीये."
"हे बघ त्यांनी पुन्हा आपल्या दोघांना हॉस्पिटलला बोलावलं आहे, हे बघ मुक्ता मी तुला शेवटचं सांगतोय मला आता समोर काही राडा नकोय. एकतर ही डॉक्टर बदल, नाहीतर हे तुझ्या पोटातलं बाळ... मारून टाक त्याला."
"अहो असं काय बोलताय तुम्ही?"
"मग काय बोलू शेवटचं सांगतोय यानंतर मला राडा नकोय."
सुमित मुक्ताशी तुटक तुटक वागायला लागला. त्याच्या वागणुकीत फरक जाणवायला लागला होता. पण मुक्ताने जास्त लक्ष दिलं नाही कारण त्याचा त्रास झाला असता आणि त्याच्यामुळे बाळालाही झाला असता, आता तिला बाळाला कुठलाही त्रास होऊ द्यायचा नव्हता.
पंधरा दिवसानंतर मुक्ता एकटीच दवाखान्यात गेली.
“ मॅडम येऊ का?"
“ये मुक्ता, तुझा नवरा नाही आला सोबत?”
“ये मुक्ता, तुझा नवरा नाही आला सोबत?”
“नाही मॅडम, तो कामाला गेलाय मी एकटीच आली."
"ठीक आहे बस, घे पाणी घे."
"नाही मॅडम.. मी बरी आहे."
"नाही मॅडम.. मी बरी आहे."
"आता एका मोठ्या मॅडमचा सेशन आहे, तू ते सेशन अटेंड करावे असं मला वाटतं. हे बघ अर्धा तासात सेशन सुरू होईल, तू जा कॉन्फरन्स हॉलमध्ये जाऊन बस. बाहेर तुला नर्स सांगेलच. त्याच्यानंतर आपण बोलून भेटू."
"हो मॅडम."
असं म्हणून मुक्ता बाहेर आली आणि ती कॉन्फरन्स रूम मध्ये जाऊन बसली.
असं म्हणून मुक्ता बाहेर आली आणि ती कॉन्फरन्स रूम मध्ये जाऊन बसली.
काही वेळाने सेशन सुरू झालं. मुक्तासारख्याच अजून काही बाया तिथे बसलेल्या होत्या, सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती, भीती दिसत होती, धास्ती दिसत होती. मॅडमचं सेशन सुरू झालं.
"नमस्कार सगळ्यांना, हे बघा आजचा सेशन सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला काही सांगू इच्छिते. सगळ्यात आधी तुमच्या चेहऱ्यावरचे टेन्शन दिसते ना, ही काळजी काढून टाका, मनात कुठली भीती किंवा धास्ती ठेवू नका आणि काळजी तर अजिबात करू नका. आपल्याला आपल्या बाळांना कसं सुरक्षित ठेवायचं आहे हे बघायचं आहे. आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर निर्धास्तपणे तुम्ही लोक बसा
आपण काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे अस सेशन घेणार आहोत. तुम्हालाही काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता.
आपण काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे अस सेशन घेणार आहोत. तुम्हालाही काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता.
एच.आय.व्ही. किंवा एड्स हा एक प्राणघातक आजार आहे. एच.आय.व्ही.चा संसर्ग अनेक माध्यमातून होतो.एच.आय.व्ही. बाधित आईमुळे तिच्या होणा-या बाळाला याचा संसर्ग होऊ शकतो. मात्र आता प्रगत वैद्यकीय उपचारांमुळे एच.आय.व्ही. ग्रस्त आईच्या बाळाचे यापासून संरक्षण करणे शक्य आहे. या संक्रमणाबाबत अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतात.
आईकडून तिच्या बाळाला होणारा एच.आय.व्ही.चा संसर्ग टाळता येतो का?
तर होय, जरी मातेच्या एच.आय.व्ही.च्या संक्रमणाच्या स्थितीबाबत पुर्ण माहीती नसली तरी ती तिच्या मुलाला होणारा संसर्ग नक्कीच टाळू शकते. यासाठी त्या मातेने तिच्या गायनेकॉलॉजिस्ट सोबत चर्चा करुन याबाबत अधिक माहीती व त्यासाठी असणारे पर्याय समजावून घ्यावेत.
आईपासून बाळाला होणारा संसर्ग नेमका कसा टाळता येतो?
जर एखाद्या गरोदर महीलेचे एच.आय.व्ही. संक्रमण किती आहे हे माहीत नसेल तर तीला एन्टी-रीट्रोव्हायरल थेरपीचा सल्ला दिला जाण्याची शक्यता असते. एच.आय.व्ही. संक्रमण रोखण्यासाठी प्रसूतीपूर्व देण्यात येणारी औषधे ही त्या मातेच्या एच.आय.व्ही. संक्रमणाच्या प्रमाणावर व आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतात. यासाठी प्रसुतीनंतरही काही औषधे घ्यावी लागतात. बाळाला हा संसर्ग टाळण्यासाठी अशा मातांना स्तनपान तज्ञांच्या देखरेखी खालीच करावे लागते. जर एचआयव्ही बाधित आईचे गरोदरपण पुर्वनियोजित असेल तर तिच्या गर्भाला संसर्ग टाळण्यासाठी आधीपासूनच्या औषधे सुरु करावी लागतात. तसेच एच.आय.व्ही.साठी घेण्यात येणा-या औषधांचा गर्भावर दुष्परिणाम होऊ नये यासाठी अधिक काळजी घेणे देखील गरजेचे असते.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा