खेळ मांडला...भाग 1
"पहा उषेच्या मधु स्मितातुन
फुलला गहिऱ्या अन् कमलांतुन
दिशादिशांतुन रंग गुलाबी
आगमनाची आस आला प्रकाश "
फुलला गहिऱ्या अन् कमलांतुन
दिशादिशांतुन रंग गुलाबी
आगमनाची आस आला प्रकाश "
प्रसन्न पहाट उगवली होती, सगळीकडे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता, कोकिळेने पण सुरांचे नाद घुमवले होते.
त्यात भर म्हणून देव्हाऱ्यातील घंटीचा नाद सर्वत्र घुमू लागला.
मुक्ताने तुळशीला पाणी घालून दिवसाची सुरुवात केली.
आज मुक्ताला रेग्युलर चेकअप साठी आणि टेस्टच्या रिपोर्ट साठी डॉक्टरांकडे जायचं होतं.
आज मुक्ताला रेग्युलर चेकअप साठी आणि टेस्टच्या रिपोर्ट साठी डॉक्टरांकडे जायचं होतं.
ती भरभर तयार झाली. सगळी कामे उरकवली.
"अहो आज चेकअप साठी जायचं आहे ना. तुम्ही येताय ना सोबत?" तिने खूप आशेने त्याला विचारलं.
"तू जा ग, झोपू दे मला." तो चिडून बोलला.
मुक्ता नर्व्हस झाली, त्याने तिच्यासोबत यावं अशी तिची इच्छा होती पण असं झालं नव्हतं.
सुमितला सांगून ती डॉक्टरांकडे गेली.
दवाखान्यात पोहोचल्यानंतर,
दवाखान्यात आज खूप गर्दी होती.
चेकअप, कॉनसेलिंग साठी सकाळपासून गर्दी दिसत होती.
मुक्ताने नाव नोंदणी केली आणि बाकावर जाऊन बसली.
मुक्ताने नाव नोंदणी केली आणि बाकावर जाऊन बसली.
बराच वेळ बसल्यानंतर तिने एका नर्सला विचारलं.
"मॅडम अजून किती वेळ लागेल?"
"मॅडम अजून किती वेळ लागेल?"
"थोडा वेळ लागेल, तूम्ही बसा."
जवळ जवळ दोन तासानंतर मुक्ताचा नंबर आला.
"मॅडम जा तुम्ही आत." नर्सने सांगितलं.
मुक्ता उठली, आणि कॅबिनकडे जायला निघाली.
“मॅडम आत येऊ का?"
“ये मुक्ता.."
मुक्ता आत गेली.
मुक्ता आत गेली.
“बस..काय म्हणते तब्बेत.. काळजी घेतेस ना?"
मुक्ताने स्मितहास्य करत होकारार्थी मान हलवली...
"मुक्ता तुझे रिपोर्ट्स आलेत.. हे काय चाललंय...?
आपली इतक्यांदा भेट झाली, समुपदेशन झालं..तू यातलं काहीच मला का सांगितलं नाहीस, आणि हे कधी घडलं, कुणामुळे झालंय? मुक्ता तुझे एच.आय.व्ही.रिपोर्ट पॉझिटीव्ह निघालेत...कसे?"
आपली इतक्यांदा भेट झाली, समुपदेशन झालं..तू यातलं काहीच मला का सांगितलं नाहीस, आणि हे कधी घडलं, कुणामुळे झालंय? मुक्ता तुझे एच.आय.व्ही.रिपोर्ट पॉझिटीव्ह निघालेत...कसे?"
मुक्ताने रिपोर्ट्स बघितले आणि हसायला लागली.
डॉक्टर आश्चर्याने बघत राहिल्या..
“ही अशी काय वागतेय? स्त्रिया अश्या रिपोर्ट्स बघून रडतात, आतून तुटतात, बेहोश होतात, स्वतःच भान हरपतात पण ही हसते." डॉक्टर मनातल्या मनात विचार करू लागल्या.
"मुक्ता काय झालं?"
“काही नाही मॅडम."
“मुक्ता मी मागल्या वेळी तुला एच.आय.व्ही संसर्ग रोगाबद्दल माहिती दिली होती, तुला त्यातल काही कळलं होतं का?”
“हो मॅडम..”
“हा रोग कशा-कशामुळे होतो हे ही सांगितलं होतं?
“हो मॅडम”
“हा रोग आई पासून बाळाला होऊ शकतो हे ही सांगितलं होतं, आठवत ना?”
“हो मॅडम”
“मग काय झालं?”
“मग काय झालं?”
मुक्ता फक्त हसली.
"मुक्ता तुझं वय फक्त 20 वर्ष आहे, तुझं संपूर्ण आयुष्य आहे असच जगणार आहेस का?
"मुक्ता मी तुला आता जे विचारणार आहे ना त्याची नीट उत्तर दे."
“तुझं लग्नाआधी कुणावर प्रेम होतं का?”
मुक्ताने नकारार्थी मान हलवली.
“तुझे कुणाशी शारीरिक संबंध होते का?”
मुक्ताने परत नकारार्थी मान हलवली.
“तुझं लग्नाआधी कुणावर प्रेम होतं का?”
मुक्ताने नकारार्थी मान हलवली.
“तुझे कुणाशी शारीरिक संबंध होते का?”
मुक्ताने परत नकारार्थी मान हलवली.
“कुणी तुझ्यावर बळजबरी केली होती का?"
“नाही.”
"ठीक आहे, मुक्ता तू तुझ्या नवऱ्याला माझ्याकडे पाठव. मला त्याला भेटायचं आहे."
मुक्ता घरी गेली, तिनी सुमितला मॅडमचा निरोप दिला.”
चार-पाच दिवसात सुमित डॉक्टरांकडे गेला.
"नमस्कार मॅडम, मुक्ताने सांगितलं की तुम्ही मला बोलावलं. माझ्याशी असं काय काम होतं."
“बसा. तुम्हाला मुक्ताने सर्व सांगितलं असेल."
“नाही..नाही तिने काहीच सांगितलं नाही."
“तुमची पत्नी मुक्ता एच.आय.व्ही.पॉझिटिव्ह आहे, माहिती आहे तुम्हाला?”
“नाही.."
डॉक्टर लांब श्वास घेत
“ओके... मग मला आता सगळं खरं काय आहे ते सांगा.”
“ओके... मग मला आता सगळं खरं काय आहे ते सांगा.”
“मॅडम मी एच.आय.व्ही.पॉझिटिव्ह आहे आणि हे मुक्ताला आणि तिच्या घरच्यांना माहीत होतं."
"काय? आणि तुम्ही हे सगळं माझ्यापासून लपवून ठेवलंय."
"तुम्हाला सांगून काय उपयोग होणार होता मॅडम?"
"हे बघा, मी डॉक्टर आहे, तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर मी तुम्हाला काहीतरी उपाय सांगितला असता. आता मुक्ता एच.आय.व्ही. पॉझिटीव्ह आहे आणि आता आईपासून बाळाला धोका होऊ शकतो. मुक्ता पासून तुमच्या बाळाला धोका होऊ शकतो आणि तुम्ही एच.आय.व्ही पॉझिटीव्ह आहात हे तुम्ही मुक्ताला कधी सांगितलंत? लग्न जुळण्याआधी?"
"नाही, आमचं साखरपुडा झाल्यानंतर मी तिच्या घरी सगळं सांगितलं, त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता त्यांनी निमूटपणे लावून दिलं लग्न."
डॉक्टर संताप व्यक्त करत.
“तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंत, एका निष्पाप मुलीचं आयुष्य उध्वस्त केलंय, आणि आता त्यात तो निष्पाप जीव... तो तर या जगात आलाही नाहीय.
आता तुम्ही एकटे का आलात तिला का आणलं नाही?असो.. तुम्ही तुमच्या पत्नीला घेऊन उद्या पुन्हा या...निघा आता."
डॉक्टर जोशी मुक्ताची केस हँडल करत होत्या. मुक्ता बद्दल हे सगळं कळलं आणि त्यांना खूप संताप झाला. आणि त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा