खेळ जाणिवांचा

Khel Janivancha

खेळ जाणिवांचा

भाग 1

नारीवादी
पात्र
श्याम
आई अरुणा
दादा ( वडील वसंत )
आजी राही बाई
बहिणी प्रिया मोठी
मेघा छोटी

भाग 1

एक वास्तविकता, एक सत्य, जे आज प्रत्यक्षात सगळ्यांसोबत घडत आहे.

कुठे तरी आपल्याच जिवलग नात्याला त्याची झळ बसत आहे. तरी आपण ह्यात नारीवादी दृष्टीकोनाच्या बाजूने बोलत आहोत.

ह्यात कोण नारीशक्ती कोणा एका पुरुषाला भारी पडत आहे.

एक आवाज इतका मोठा बुलंद होत आहे की त्यात दुसरा आवाज पुरता दाबून टाकला जात आहे...

शक्तीच्या नावाखाली ही शक्ती अन्याय तर करत नाही ना ??? कधी असा प्रश्न आपल्याला पडला तर नाही ना !!

पुरूषांवर अन्याय होत तर नाही ना ??

ही नारी शक्ती खरंच न्यायी आहे ना, ती दांभिक तर होऊ पहात नाही ना !! सगळे कायदे तिचेच आहेत असे तर ती समज करून घेत नाही ना ?

स्त्री सुजान, समजदार, व्यवहारी, गुणी, सर्वगुणसंपन्न, विचारी, सावरणारी ,माया ममता, प्रेम दया भावना असे कैक गुण असणारी नारी खऱ्या अर्थाने आजही तशीच आहे की काळानुरूप तिच्यात बदल होताना दिसत आहे तुम्हाला..

माझी ही कथा ह्याच थाटणी वर आधारलेली आहे
ह्या कथेला न्याय देणार की कथा नारीचे बदलते रूप आपल्या समोर मांडणार पाहू..

श्याम, जरा शांत समंजस मुलगा आई वडिलांना दोन मुलींनंतर नवसाने झालेला, म्हणून तो घरात खूप लाडाचा होता. बहिणींसाठी खूप जिवाभावाचा धाकटा लहान भाऊ, आत्या आजीसाठी वंशाचा दिवा होता.

त्याचे खूप लाड होत घरात. एकुलता एक म्हणून त्याने सगळ्यांचे फक्त प्रेम आणि अतोनात लाड अनुभवले होते.

स्वभाव गुणाचा असल्याने तो बाहेरच्यासाठी, शेजाऱ्यांसाठी ही खूप खास होता, जीव लावून घ्यायला जीव लावावा ही लागतो हे त्याला माहित होते, जीव लावला तर त्यात त्याग ही करावा लागतो काही नात्यात ही समज त्याच्याकडे होती.


आईबद्दल त्याला मनात अतोनात प्रेम होते, तिने किती देऊळे, देव देवादीक, नवस, उपवास तापास, निर्जळी उपवास केले त्याच्यासाठी हे त्याला आईने तर नाही पण आजीने बऱ्याचदा सांगितले होते. कधी तर ती अनवाणी पायाने तासंतास देवाच्या प्रदक्षिणा करत..चक्कर आली होती तरी तिने चालणे बंद केले नाही. म्हणूनच त्याच्या मनात आईसाठी आणि बाबांसाठी खूप उच्च स्थान होते. त्या दोघांच्या त्याग खूप मोठा होता.

श्याम विचारी होता म्हणून आजीने ज्या काही गोष्टी त्याला सांगितल्या होत्या, त्यात त्याच्या बाबांचा मोठेपणा ही ठासून सांगितला होता. मग तो विचार करी की, कसे माझ्या बाबांनी तर आईला मुली झाल्या म्हणून कधीच दोष दिला नाही, किंवा कधी मुली झाल्या म्हणून स्वतःला कम नशिबी समजले. उलट श्यामला बाबांचे विचार इतके प्रगल्भ वाटत होते की, ते त्या काळात ही म्हणत, "मलाच मुलगा नको" आणि असे सगळ्या नातेवाईकांसमोर सांगितले होते बाबांनी. ह्यात बाबांच्या सांगण्याचा हेतू इतकाच असेल की, आईला मग कोणी दोष देणारच नाही.

तसे ही त्या काळात स्त्रीलाच सगळे दोष देऊन मोकळे होत.

तसेच आईलाच आजीने व इतर नातेवाईकांनी ह्यासाठी दोषी ठरवले असणार हे नक्की.

तीच जबाबदार आहे मुलीला जन्म द्यायला. खानदानी गुण आहे हा. तिच्या आईला सगळ्या मुलीच होत्या मग हिला ही मुलीच होणार असे आजीला वाटत.

पण खरे तर बाबांच्या आईला ही पाच मुलीवर बाबा झाले होते, मग दोष बाबाला का नाही दिला कोणी.

तश्यात मी झाल्यानंतर सगळ्यांची तोंड बंद झाली असावीत, मग आजीसाठी घराण्याचे नाव मोठे करणारा मी वंशाचा दिवा म्हणून जन्माला आलो.

मी जन्माला आल्यानंतर मात्र आजीला बाबांचा जास्तच अभिमान वाटत असावा. इथे ही जे काही झाले ते बाबांमुळे झाले असे आजीला नक्कीच,100 टक्के वाटत असावे.

तसे ही मला कधीच आठवत नाही की, आजीने आईबद्दल कधी तरी गुणांचे काही चार शब्द बोलली असावी, तसे मला तरी आठवत नाही..

असो मी मात्र माझ्या आईच्या खूप अभिमान बाळगेल, तीच माझी खरी आदर्श आहे,असेल ते ही आल्वेज. तिने मला जीवावर उदार होऊन जन्माला घातले आहे. ती देवाच्या दारात जातात परत आली आहे. तिची तशी ती जिद्दच होती की, "मी देवाघरी जाऊन माझे मूल घेऊन येईल. त्यासाठी देवाने माझे प्राण घेतले तरी चालेल."

बाबा म्हणतात ती खूप गुंगीत ही हेच बोलत होती. तिला मूल हवे होते आणि ह्या घराला वंशाचा दिवा द्यायचा होता, आणि बहुतेक तिला सतत लागणारे दूषणे,की मुलगा न व्हायला हीच ! हीच !! कारणीतभूत आहे.

उठता बसता जर कोणी तुम्हाला असेच टोचणारे जिव्हारी लागणारे शब्द बोलत असतील ,किंवा तुमच्या मुलींना कोणी वर खाली बघत असतील तर त्या स्त्रीला सहाजिकच हे जीवन नकोसे वाटत असणार, आणि आईला ही तसेच झाले असणार हे नक्कीच. आज जरी ती खुश दिसत असली तरी तिने मला जन्माला जर घातले नसते तर तीच तशीच परिस्थिती आज ही असती..

श्यामला आईने जणू श्यामच्या आईने दिलेली शिकवण देऊन मोठा केला होता. तिला एक स्त्री म्हणून जो मान मिळणे अपेक्षित होते तो मान जो तिला कधी सासरी मिळाला नाही तो श्याम ने त्याच्या आयुष्यात कोणत्या ही रुपात आलेल्या प्रत्येक स्त्रीला देणे गरजेचे आहे. मग ती घरातली कामवाली असो, ती झाडू मारणारी असो, कोणाची बहीण असो, आजी असो की इतर कोणती ही स्त्री जी त्याच्यासोबत काम करणारी असो. स्त्रीच्या प्रत्येक रूपाचा आदर श्याम ने मनोमन करावा ,तिला कधीही ही हीन लेखू नये. तिला मदत लागल्यास भावा सम हात द्यावा, कधी मुलगा व्हावा, कधी नातू होऊन मदत करावी. ह्यात आपला मोठेपणा आणि आदर वृद्धिंगत कसा होईल असे सदैव आपले आचरण असावे.

श्याम आज का कोणास ठाऊक सगळे जुने पाढे जणू मनन करत होता.

तो जुने घरगुती अल्बम घेऊन बसला होता. अगदी बाबांच्या कॉलेजच्या काळातले फोटो असलेला. कुठे आई बाबांच्या लग्नाचा, तर कुठे त्याच्या बहिणीचे काही बालपणीचे फोटो असलेला.

मग तो त्या अलबम कडे गेला ज्यात त्याच्या बालपणीचे फोटो होते, तो अल्बम खूप खास सजवलेला होता. त्यावर लिहिले होते, "आमचा कुलदीपक". हे असे लिहिलेले पाहून त्याला हसू आवरेनाच ,त्याला समजेना हे असे विचित्र नाव कोणी सुचवले असेल, आणि कोणी ते टाकून घेतले असेल. हे असे बाबा तर नक्कीच नाही करणार, आईने तर असा भेदभाव करणे शक्यच नाही, उलट तिने तर ताईंच्या फोटोचा अल्बम फुलांनी सजवला आहे, पण त्याला नाव द्यावे असे तिला ही सुचले नाही, मग ही अवलिया करामत कोणी केली असेल, कोणी ही खटाटोप केली असेल,आजोबा तर हे असे काही करणे शक्य नाही. आजी नाव सुचवू शकते no doubt पण इतक्या सुंदर सोनेरी पेनाने कोणी लिहिले असेल, आधी ही मी बऱ्याचदा हा अल्बम पहिला पण तेव्हा सगळे काही सहज घेत गेलो होतो मी,पण आज त्याची गम्मत कळते,आज जाणून घ्यावे वाटते हे कोणी लिहिले असेल. मुख्य म्हणजे का हे सुवर्ण अक्षरात लिहिले असेल. म्हणजे नकळत हे धनुष्य पेलवायची सर्वतोपरी ही माझीच जबाबदारी आहे. मला ओझ्यातून मुक्तता नाही हेच सिद्ध करत असावे हे शब्द.

बराच वेळ ह्या विचाराने श्याम गांगरलाच होता.
हुड उनाड वय आता त्याला सोडून जबाबदारीचे वय साद घालत होते. त्याला जाणीव होत होती,हळूहळू ती जाणीव त्याला मोठेपणा आणि मोठे करत होती. हे मोठेपण जणू चक्रव्यूहात त्याला ओढत होती. जसे बाबा आजपर्यंत करत आले होते ,नको ते भार सोसत आले होते, तारेवरची कसरत करत वयाची त्यांनी सत्तरी गाठली होती. तरी कधी तोल गेला तरी स्वतः स्वतःला सावरत पुढे आले होते. सगळ्यांचा मान पान ,आदब, त्यांनी चोख सांभाळला होता. त्यांनी त्याचे नाव लौकिक मिळवले होते, त्यांच्या बहिणींचा सन्मान आगत्या, पाहुणचार ,कर्तव्य जणू वडिलांच्या बरोबरीने पार पाडले होते, एक मामा, काका,भाऊ,मुलगा, पती म्हणून त्यांनी नेहमी आपली जबाबदारी सांभाळली होती..

अगदी आता तीच जबाबदारी घेण्याची वेळ श्याम वर येणार होती ,बाबा श्याम ला सगळे सोपवून मोकळे होणार होते. घरात त्याची चर्चा ही होताना खुद्द श्याम तिथेच होता. पण इतक्या लवकर ही जबाबदारी दादा श्याम वर सोपवणार नव्हते. तेव्हा श्यामला खूप शिकवून मोठे होऊ द्यावे मग त्याला हळूहळू हे प्रपंच सोपवून आपण मोकळे व्हावे ही बात दादा बोलून गेले होते.

आता मला वंशाचा दिवा ह्या टॅग लावल्याबद्दल माझेच मला हसू येते, हे मला खूप जड ओझे वाटते, अक्षरशः हे ओझे लादले जणू माझ्यावर कुठल्या तरी नको त्या जबाबदारीचे.

खरे तर वंशाचा दिवा ह्याने प्रकाश पाडवा हाच हेतू असतो, पण जर मी दिवा लावण्यात कमी पडलो तर, मी प्रकाश होऊन वंश नाही उजळू शकलो तर, मी जर घर लयास घेऊन जाणारा,वंश भस्मसात करणारा ठरलो तर, हे किती अवघड आहे माझ्यासाठी. मी जिला लग्न करून आणेन तिनेच जर वंशाचा दिवा नाही जन्माला घातला तर ,मग गेला ना वंश, बुडाला ना माझा वंश, मग असे होईल ह्या दिव्यानेच वंश बुडवला असा आरोप करतील ना माझे पूर्वज .

आता श्यामला जरा जरा कळत होते की बाबा आणि आईने कसे हे शिव धनुष्य पेलवले असेल, त्यांना किती मन मारून जगावे लागले असेल. सगळ्यात जास्त आईची फरफट झाली असेल.
बऱ्याचदा तर बाबांच्या समोर तिचे बरोबर असून ही तिला ती बरोबर आहे हे सिद्ध ही करता आले नाही.

आईला आजी ने त्रास दिला तरी तिने कधी दादांकडे एका शब्दाने ही तक्रार केली नाही.

प्रिया आणि मेघा ताई यांना बऱ्याचदा आजीने नको तितके बोलले होते, त्यांना आजीने मारले ही होते.पण तरी आईने दादांना ह्याबाबत काही एक कळू दिले नव्हते. यात आईला किती मानसिक त्रासातून जावे लागले होते ,ती रात्र रात्र एकटी बसून रडतांना मी पाहिले होते. तसेच उसने अवसान आणून परत ढीग भर भांड्यांचा राढा ,ती खरकटी काढत असत. सुरीने लागले होते आणि हाताला खोल जखम झाली होती तरी ती सगळे काम निमूटपणे करत होतीच..त्यात साबण जात,कधी मीठ जात तर कधी तिखट ही जात होते. तिला आजीने कधीच घरकामात हातभार लावला नव्हता, ती म्हणत आहेत ना तुझ्या दोन मोठ्या मोठ्या पोरी मग त्यांना सांग की घर काम ,घे जरा त्यांची ही मदत ,त्यांना काय फक्त पोसायला ठेवले का ? पण आजी किती ही बोलू दे ,आईने कधी प्रिया ताई आणि मेघाला त्यांच्या अभ्यासाच्या वेळेला मदती साठी बोलावले नव्हते.

आजी लाख म्हणत होती, "मुलीने शिकून काय करायचे,नौकरी थोडी करून देणार सासरचे . तसेही मुलीच्या जातील घर काम काय चुकते का, तू स्वतःच बघ ग अरुणा तू ही चांगली मोठी मस्तरीन होतीच ना, तुला ही नौकरी करायची नाही म्हंटले तर आलीस ना नौकरी सोडून परत घरी..तू तर आली तशी जुंपलीस स्वयंपाक घरात, आणि धुनी भांडी करायला ना तुझा विचार चालला ना वसंत च काही तुझ्या सासऱ्याने ऐकले. मग तूच विचार कर ,तुझे हे हाल होते मग तुझ्या मुलींचे कसे असतील..जरा शिकवा त्यांना ही घरकाम ,नुसते पुस्तक घेऊन काय दिवे लागणार आहेत. त्यापेक्षा त्याच पैशात श्याम चे शिक्षण करा. त्याचे शिक्षण झाले की नौकरी लागेल आणि नौकरी लागली की घरात चार पैसे येतील. श्याम तर काही हातभार लावेल, ह्या तुझ्या पोरी नौकरीला लागल्या की स्थळं येतील आणि त्यांच्या पगाराचे पैसे सासरचेच घेतील, मग त्यांच्या पैश्याचा आपल्याला काय उपयोग ग."

श्याम घरातील सगळ्यांच्या जीवनात काय घडत होते घडले होते ह्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साक्षी होता जणू, जाणीव खोलवर होत जातं होती सगळ्या परिस्थितीची. तेव्हाच मन दुःखी ही होत आणि आता आपल्याला हे धनुष्य पेलवण्याशिवाय गत्यंतर नाही. तेव्हा आई बाबा यांनी मन मारले आता मोठा नसलो तरी करता धरता म्हणून मला हे जमणार नसले तरी जमवावे लागणार आहे. हो बाबांसोबत आई उभी होती साथ द्यायला पण मला आई सारखी कोणी साथ देणारी मिळेलच असे नाही..

श्याम बद्दल आपण बघितले ,तो कोण कसा ,त्याच्या घरचे कसे ,आणि त्याला पडलेले असंख्य प्रश्न ह्यावर ही कथा मालिका आहे ,आणि त्यात आई हे मुख्य स्त्री पात्र आहे हे हळूहळू रंगत जाणार आहे..

क्रमशः.....?

🎭 Series Post

View all