खट्याळ सासू नाठाळ सून

Sasu Soon Guj Goshti


खट्याळ सासू नाठाळ सून 


"सासूबाई ओ सासूबाई... आई गं आ , मेले गं मेले "

सासूबाई धावत पळत आरतीकडे आल्या ,

सासूबाई : काय गं काय झालं ..

सुनबाई : पोटात खूप दुखून राहिलंय ओ माझ्या ,मला सहन होत नाहीये

सासूबाई : अगं बाई .. हे काय आता नवीन नाटकं

सुनबाई : ओ नाटक बिटक करायला मी काय सुभद्रा पाटील नाही,खरंच दुखतंय

सासूबाई : बरं बरं, चल मी गाडी काढते ..घाल चप्पल.. डॉक्टरकडे जाऊया

सुनबाई : हो चला चला

सासूबाई : एकमिनीट ... तुला दिवस बिवस तर गेले नसतील ना गं ?

सुनबाई : काय ? ते कसं शक्य आहे ?.. मला तर उलट्या पण नाही झाल्या ना ...आणि चिंचा पण नाही खाऊ वाटते मला तर फक्त पापलेट खाऊ वाटत आहेत..

सासूबाई : अगं काही सांगता येणार नाही ,हल्ली कळत नाही कोणते लक्षण असतात... देवच पावला म्हणायचं

सासूबाई आणि सुनबाई गाडीत बसतात ...

सासूबाई : ए ड्रायव्हर, जरा हम दोनो का एक फोटो लेलो

सुनबाई : आता फोटो कशाला हवाय ? इथे पोटात दुखतंय आणि तुम्हाला भलतंच सुचत आहे

सासूबाई : अगं तुला दिवस गेले असणार, आपल्याकडे गुड न्यूज आहे हे सांगायला नको का सगळ्यांना ,चल पोटावर हात ठेव आणि हस बघू जरा..

सुनबाई : बघू बरं कसा आलाय फोटो , अय्या सासूबाई तुम्ही आज्जी बनणार आहात पण वाटत नाही तुमच्याकडे बघून

सासूबाई : आज्जी माय फूट .. मी तर तुझ्या लेकरांची मैत्रीण असेल जी त्यांना नेहमी बाहेर फिरायला नेईल आणि बिघडवून टाकेल त्यांना... जसं तू माझ्या मुलाला बिघडवलं

सुनबाई : आ हा हा .. आल्या मोठ्या माझ्यावर ओरोप करणाऱ्या , तुमचं पोरगं अगदी तुमच्यावर गेलंय ..दोन मिनिट सुद्धा तो तग धरू शकत नाही, 2,3 मिनिटांत शांत होतो

सासूबाई : म्हणजे ? तुला म्हणायचं काय ..

सुनबाई : नाही काही नाही, अहो मला असं म्हणायचं होतं की, दोन मिनिटं सुद्धा तो माझं ऐकून घेत नाही, 2,3 मिनिटांत शांत होऊन जातो तुमच्यापुढे...

सासूबाई : हो मग ..माझ्या शब्दाबाहेर नसतो माझा मुलगा .. बायकोचा पदर धरायचा नाही हे त्याला मी आधीपासूनच शिकवलं आहे

सुनबाई : म्हणून तर म्हणत होते मी, की तुमचा मुलगा तुमच्यावर गेलाय

ड्रायव्हर : बाईसाहेब दवाखाना आलाय

सासूबाई आणि सुनबाई दवाखान्यात जातात

सासूबाई : अगं आरती बघ की मला किती msgs आलेत अभिनंदन चे ,मला तर मुलगा हवा बाई

सुनबाई : मुलगा ? नाही बाबा मला मुलगी हवीय

डॉक्टर : बोला काय झालं ? कोण आहे पेशंट ?

सुनबाई : डॉक्टर सकाळपासून दुखत आहे पोटात, बघा बरं काय झालंय..

सासूबाई : डॉक्टर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, सोनोग्राफी, सिजर जे काही करायचं ते करा पैशांची काळजी करू नका, फक्त बाळ आणि आई सुखरूप ठेवा ..

डॉक्टर : बाळ ?

सासूबाई : हो ,आम्हाला वाटतय की हिला दिवस गेले असणार

डॉक्टर : अच्छा असं होय, बरं चला आरती मॅडम माझ्यासोबत ,चेकअप करून घेऊ

डॉक्टर चेक करत असतात तोपर्यंत सासूबाई सगळ्यांना फोन करून घरी लगेच हजर रहा बोलतात ,मुलाला फोन करून बर्फी आणि पेढ्या चा बॉक्स सुद्धा आणायला लावतात...

दोन तासांनी दोघी घरी पोहचतात , दोघींच्या चेहऱ्यावर हसू असतं

घरातील सगळे मंडळी दारातच आरतीचं स्वागत करतात, तिची आरती काढतात .. दिर आणि नंदन तर फुगे फोडतात..

सासरेबुवा : बोला मग कितवा महिना आहे बोलले डॉक्टर ?

सुनबाई : सासूबाई तुम्ही सांगता की मी सांगू ?

सासूबाई : मीच सांगते... बरं मला एक सांगा आज तारीख काय आहे ?

आरतीचा नवरा : एक एप्रिल

सुनबाई आणि सासूबाई एकत्रच बोलू लागतात..

" एप्रिल फुल बानाया बडा मजा आया "

सगळ्यांचा मुड ऑफ होतो...

तुम्ही पण चकित झालात ना ?
आपण पुन्हा जाऊया 2 तासांपूर्वी दवाखान्यामध्ये..
डॉक्टर आरतीला चेक करून येतात

सासूबाई : काय झालं डॉक्टर ,कितवा महिना आहे

डॉक्टर हसू लागतो ..

सासूबाई : अहो हसताय काय.. मी काय येडी बिडी वाटले का तुम्हाला ?

डॉक्टर : अहो नाही तसं नाही, तुमच्या सुनबाईला दिवस वैगरे काही गेलेले नाहीत, हा सगळा मिशरी चा परिणाम.. पोटात गोळा तयार झाला आहे मिशरी चा .. काही मेडिसिन लिहून देतो त्या द्या वेळेवर आणि हो मिशरी आजपासून बंद करा..

हिरमुसलेल्या सासूबाई आणि सुनबाई बाहेर आल्यावर एकमेकांना बघून हसत राहतात.. त्यांचा पोपट झालेला असतो..

सासूबाई : आता काय करायचं ? घरी कसं सांगायचं

सुनबाई : टेन्शन नका घेऊ, आज एक एप्रिल धावून आलाय आपल्यासाठी.. करूया त्याचा वापर आणि हो व्हाट्सअप्प स्टेटस पण बदला आता 

समाप्त..