खरचं का दोन ध्रुव आपण?

भिन्न स्वभावाची दोन माणसे जेव्हा पतीपत्नी या नात्यात एकत्र येतात तेव्हा दोन ध्रुव समांतर न राहता एकरूप होतात.
इरा राज्यस्तरीय स्पर्धा
फेरी- कविता फेरी
विषय- दोन ध्रुवावर दोघे आपण
कवितेचे शिर्षक- खरचं का दोन ध्रुव आपण?
जिल्हा -पुणे

*******************************************


खरचं का दोन ध्रुव आपण?

मी खळखळणारी अवखळ नदी, तु शांत सागर
ओलांडून द-याखो-या येवून भेटते तुला वळणावर

मी तप्त ज्वालामुखी, जशी धगधगती आग
गवसत नाही कधी मला तुझ्या अंतरीचा राग

मी हिरवीगार वसुंधरा, तु आभाळ निळंशार
घेऊन मिलनाची आस झुकतो क्षितिजापार

मी घोंगावते वादळ, तु मंद झुळूक वा-याची
वादळापुर्वीची शांतता मी, तु चाहूल शिरशिरीची

जल,अग्नी,वायु,आकाश,पृथ्वी जरी उगम आपला
प्रत्येकाचे वेगळे तत्व, प्रत्येकाने मी पणा जपला

एकमेकांशिवाय जरी कधी आपले हलत नाही पान
तरी सोडत नाही मी पण, दोन धृवावर दोघे आपण

@शब्दनक्षत्र ?
©️®️स्वाती सासवडकर कुंभार