Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कविता

खरे सुख

Read Later
खरे सुख

विषय_राज्यस्तरीय कविता स्पर्धा फेरी_2
कवितेचा विषय_सुखाची परिभाषा

कवितेचे नाव_" खरे सुख"

सुख म्हणजे नसतो कधी
पैशाच्या माजाचा बाजार
पैशाच्या धुंदीत जडतात
नाना तऱ्हेचे आजार.

सुख म्हणजे नसतो हो
चकाकणारा सोन्याचा महाल
घराला घरपण देऊन
नात्यात आणायचा असतो बहर

सुख म्हणजे नसतं हो
उंची महालात राहणं
गरिबाच्या पोटावर मारून
मस्त मजेत खाणं.

सुख म्हणजे नसतं हो
अंगावरचे भरगच्च दागिने
मी सगळ्यात श्रीमंत आहे
हे जगाला दाखवणे

सुख म्हणजे नसतं हो
आलिशान गाडीतून फिरणं
तोडून समाजाचं कायदे ?
उगाच फुफाट्यात शिरणं

सुख म्हणजे नसतं हो
माय बापाला वृद्धाश्रमात धाडणं
नऊ महिने कबाड कष्ट करून
कशाला आईच्या गर्भात वाढणं

एक दिवस माणसा तू
चुलीवरची भाकरी खाऊन बघ
दोरीच्या पलंगावर एक रात्र
माणसा तू झोपून बघ

मजुरीच्या कष्टात
एक दिवस तू जगून बघ
सुखाची परिभाषा तू एक
दिवस गरीब होऊन बघ

© सविता पाटील रेडेकर नेसरी
तालुका _गडहिंग्लज
जिल्हा_कोल्हापूर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//