Login

खरंच स्त्री स्वतंत्र झाली कां?

खरंच स्त्री स्वतंत्र झाली कां?
कविता
खरंच स्त्री स्वतंत्र आहे कां?

स्वावलंबी जरी झाली स्त्री
पूर्ण स्वतंत्र झाली कां?
आर्थिक भार उचलला पण
मुळचा स्त्री पिंड बदलला कां?...

तडजोडी स्वीकारून आयुष्य जगते
आलेल्या परिस्थितीशी एकरूप होते
एवढे करूनही सुद्धा स्त्री
प्रेमाच्या दोन शब्दाला पारखी ठरते

खऱ्या अर्थाने सांगायचे झाल्यास
स्त्री स्वतंत्र झालीच नाही
तिच्यातील अंतर्यामी वेदनांचा ज्वालामुखी
कधीच जगापुढे उफाळून आला नाही...

वरवरचे चित्र वेगळे पण
स्त्री स्वतंत्र होणारच नाही
कायम दुसऱ्यासाठी जगते ती
अंतरंग तिचे परमेश्वराला कळले नाही

सौ. रेखा देशमुख