खरंच मी नशिबवान

Dont judge book by its cover

सत्यकथा

राहुलचे पदवीपर्यंतचे शिक्षण  पूर्ण झाले ,चांगल्या  गुणांनी उत्तीर्ण झाला तो, त्याने नोकरी करत करत पुढचं शिक्षण  करण्याचा विचार केला.हजर जबाबी होता आणि हुशारसुद्धा त्याने त्याच्या बळावर  इंटरव्ह्यूवमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं दिली.नोकरीवर तो रुजू झाला. काही दिवसातच तो मेहनतीच्या आणि हुषारीच्या जोरावर साहेबांचा खासमखास बनला.शांत स्वभावाचा मुलगा. कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही.काही दिवसातच राहुल फार लोकप्रिय झाला.त्याच्या स्वभावामुळे.. खरं तर जास्त बोलायचा नाही पण सतत प्रत्येकाच्या मदतीला तत्पर असायचा ,ही त्याची खासियत होती.पण मदत करताना तो ह्या कानाची खबर त्या कानाला लागून न्हवता देत.वेगळाच होता तो..त्याच्या मनमिळाऊ स्वभावामुळे तो काही दिवसातच, ऑफिस मध्ये प्रसिद्ध झाला.अगदी सहा महिन्यात बॉसने त्याला प्रोमोशन दिले.पण बोलतात ना की जस जशी प्रगती होते तसतसे जळणाऱ्यांची संख्या वाढत जाते,राहुल सोबत तेच झाले आता त्यांच्याबरोबरचे कलिग्स त्याला आता टोमणे मारायला लागले होते.सर्वांना वाटायचे की  राहुलने वशिला लावून नोकरी मिळवली आहे पण तसे न्हवते.आज जे ही मिळवले होते ते मेहनतीच्या जोरावर.राहुलला जाणवत होती त्या लोकांची कुजबुज पण तरीही तो शांत होता.
त्याने प्रोमोशनच्या आनंदात घरी पार्टी दिली होती, सर्व कालिग्सला त्याने बोलावले होते.. सर्वच आले होते ते कालिग्स सुद्धा जे त्याच्या पाठी कुजबुज करायचे.राहुलने सर्वांसाठी खाण्याची छान सोया केली होती.. ड्रिंक्स सुद्धा .राहुल सोडून सर्व ड्रिंक्स घेत होते.. राहुल निर्व्यसनी होता..पार्टी रंगात आली होती.एक रमेश नावाचा सहकारी तर त्याच्यावर फार जळायचा,कारण तो राहुलच्या आधी जॉईन झाला होता ऑफिसला तरी सुद्धा त्याची बढती न्हवती झाली... राहुलला तो नशेत बोलला "तुझं बरं आहे बाबा तुला सहजच भेटलं प्रमोशन, मी तुझ्या आधी येऊन सुदधा वाट बघतोय ,नशीबवान आहेस तू"

,"नशीबवान आहे तू" हे ऐकताच त्याच्या डोळ्यात पाणी तरळले.खूप भावनिक झाला तो. राहुलला आज सर्वांना काही तरी सांगायचे होते..
तो बोलला
,
Attention please,
"आज काही तरी मला सांगायचे आहे"

सर्व जण उत्सुक झाले खास करून, ते कलिग्स त्याच्यावर खार खाऊन होते.आपापसात कुजबुजायला लागले..कान टवकारून ऐकायला लागले...

राहुलने बोलायला सुरुवात केली.
मित्रांनो आज मला काही तरी तुम्हा सर्वां सोबत शेअर करायचे आहे..तुम्ही सर्व माझ्या आनंदात आज शामिल झाला त्या बद्दल खूप खूप आभारी आहे मी .खरं तर मला व्यक्त व्हायला आवडत नाही पण रमेश मला आताच बोलला नशीबवान म्हणून का माहीत आज खरंच बोलावेसे वाटले..

मी खरच नशीबवान आहे ,मी अश्या समृद्ध परिवारात जन्माला आलो, जिथे आई,बाबा,आजोबा,आजी,मी आणि माझी छोटी बहीण होती.. माझे आई वडील शिक्षित होते.माझा जन्म झाला तेव्हा माझ्या वडिलांनी लगेच माझ्या  गळ्यात सोन्याची चेन बनवून घातली ,सर्वांना खूप आनंद झाला होता, आजही माझ्या गळ्यात आहे माझा वडिलांची ती प्रेमळ भेट. मी खूप आनंदी होतो,माझ्या सुखी परिवारासोबत.मी शाळेत खूप हुशार होतो. माझी आईसुद्धा खूप शिकलेली होती, काही प्रोजेक्ट वैगेरे असेल तर ती बनवून द्यायची,माझा पहिला क्रमांक असायचा प्रोजेक्ट मध्येही, आणि शाळेत पहिला नंबर नाही चुकवला. शाळेतल्या शिक्षकांचा मी लाडका होतो..दिवस जात होते..काळाने माझ्यापुढे वेगळेच काही तरी वाढून ठेवले होते, मी पाचवीला  होतो तेव्हा माझी  आई कँसरने मरण पावली,एवढ्या लहान वयात आईच्या प्रेमाला मी मुकलो.आई गेल्यावर खूप रडू यायचे पण लहान बहिणीसाठी माझ्यात बळ आले, पुन्हा जगू लागलो, पण आईशिवाय जगणे म्हणजे फार  कठीण होते.पण जगत होतो आम्ही..आई गेल्यावर ,दोन वर्षांनी बाबा पण आजारी पडले आणि ते ही आम्हाला सोडून गेला .खूप मोठा धक्का होता माझ्यासाठी, आई आधीच गेली होती सोडून, बाबांचा आधार होता पण आता बाबा पण गेले..त्या धक्क्यातून सावरत नाही तोच माझी आजीपण गेली.. .मी खूप एकटा  पडलो ,मी, माझी  छोटी बहिण, आणि आजोबा आमचं तिघांच जग होते... ह्या कटू अनुभवांनी मला वेळेच्या आधीच मोठं केले,बालपण नाहीच जगलो.खूप काही शिकलो,स्वावलंबी बनलो..

आजोबा ,आणि छोट्या बहिणीसोबत गाडी रुळावर आली होती,चला कमीत कमी रक्ताची  बहीण तर होती ,पण देवाला ते सुख मान्य न्हवत.माझ्या छोट्या बहिणीलासुद्धा देवाने हिरावून  घेतलं एका आजाराने.आता काय उरल होते आयुष्यात ..देवाने माझी माणसं हिरावून नेहली. मी खूप कमजोर झालो होतो..आजोबांचाच  सहारा होता मला .. लाचार झालो होतो,माझ्या हातात न्हवते माझ्या माणसांना परत आणणे ,कितीही सुख दुःख आली तरी एकटाच सहन करत राहिलो.. एकटेपणाच विक्राळ रूप मी जवळून अनुभवलं आणि अनुभवत आहे...ते कोणाच्याही वाट्याला नको अशी मी देवाकडे प्रार्थना करतो ..मी माझं मन लावून शिक्षण पूर्ण केले,सर्व व्यसनापासून दूर राहिलो कारण मला माझे आयुष्य सुंदर जगायचे होते. आता माझ्या आयुष्याच लक्ष्य  फक्त परोपकार आहे,जर माझ्यामुळे कोणाची मदत होत असेल तर त्यात मला समाधान आहे. माझ्यामुळे एखाद्याला जर आनंद भेटतो तेव्हा माझ्या मनाला खूप आनंद होतो..माझ्या आयुष्यात आता गमावण्यासारखं काहीच नाही सर्वच गमावले आहे.

अगदी मी जेव्हा परीक्षेत  उत्तीर्ण झालो तेव्हा खूप आंनद झाला,मला माझं कोणीतरी हवे होते माझा आनंद वाटायला पण मी कमनशिबी माझे आजोबापण वारले त्याच वर्षी...
आणि आज माझं प्रमोशन झाले ,म्हणून मी तुम्हाला बोलावले आज पहिल्यांदा मला कोणीतरी भेटल माझा आनंद वाटायला..खूप छान वाटतंय.
या आयुष्याने एकच शिकवले मला ,आयुष्यात कधीही काहीही होऊ शकते,जीवन आहे तोपर्यंत आपल्या माणसाबरोबर छान जागा .सुख दुःख वाटून घ्या.जर जमलं तर निस्वार्थपणे गरजूंना मदत करा, ते सुख वेगळेच असते..
आहे मी नशीबवान कारण मला जगण्याचा अर्थ उमगला..राहुलच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या होत्या.. त्याच्या पाठीवर  जसा बॉसने हाथ ठेवला,त्याला भरून आले..त्याने बॉसला मिठी मारली ..किती दिवसाने तो मोकळा झाला होता.....
तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते, सर्वांचे मन भरून आले होते, त्याच्या विरोधकांनासुद्धा स्वतःच्या विचारांची लाज वाटली.राहुल सारखी व्यक्ती आपल्या मध्ये आहे ह्याचा सर्वांना अभिमान वाटला. प्रत्येकाला जाणीव झाली की ते किती नशीबवान आहे ,कारण सुख दुःख शेअर करायला प्रत्येकाकडे हक्काचे एक तरी माणूस होते.
आयुष्यात सहज असे काही भेटत नाही बरोबर ना,जे राहुलने आज मिळवले होते ते सहज नक्कीच न्हवते.. पण राहुलला जो जगण्याचा  अर्थ उमगला तो खूप मौल्यवान होता नाही का??खरच नशीबवान होता तो..

अश्विनी पाखरे ओगले✍️
❤️मनातलं मनापासून❤️
लेख आवडल्यास लाईक, कंमेंट, आणि नावासहितच  शेअर करा????????
मला फॉलो करायला विसरू नका????????