खंत मनातील - वेडी माया

We all must have gone through these experiences in our lives. At times we even fail to realise our own mistakes...In the process, differences crop up and we hurt our own people.. Read these series of episodes with a positive mind and try to underst

वेडी माया 

अक्षय आणि आशय दोघे भाऊ , दोघांमधे पंधरा वर्षाच अंतर कारण त्यांच्या आईला मुक्ताला पहिला मुलगा अक्षय लग्नानंतर तीन वर्षाने झाला , महत् प्रयासाने !

तिला पुन्हा बाळ हवं होत पण गर्भच राहत नव्हता खुप प्रयत्न केलेत तिने आणि विलासरावांनी ,

डाॅक्टर कडे ट्रिटमेंट त्यानंतर आयुर्वेदिक वैद्याकडूनही इलाज करायची शेवटी तिच्या प्रयत्नाला यश आले आणि लग्नाला अठरा वर्षे झाल्यावर दुसर्‍या बाळाला तिने जन्म दिला .

कोण आनंद झाला मुक्ता आणि विलासरावांना , विलासरावांच किराणा मालाच मोठ्ठ दुकान होतं , होलसेलमधे ही ते किराणा विकायचे एकंदरीत होलसेल मार्केट मधे त्यांचा बोलबाला होता , श्रीमंत कुटुंब होत ते !

म्हणुनच त्यांना अजुन एक मुलगा हवा होता आणि त्यांच्या मनासारखे झाले म्हणुन कुटूंब फार आनंदात होते , विलासराव फक्त सातवी शिकले होते पण व्यवहार दांडगा होता त्यांचा , वडीलांकडून परंपरेने त्यांना मिळाला होता , मुलांसाठी मुक्ता आणि त्यांचे फार मोठे स्वप्न होते , जगातील सर्वोच्च शिक्षण त्यांना मुलांना द्यायचे होते , त्या नुसार त्यांनी अक्षय ला शहरातील नावाजलेल्या शाळेत टाकले होते , त्याला हवं नको ते सगळं काही ते लगेच घेऊन द्यायचे , फक्त तू छान शिकून कोणती ही ऊच्चपदाची नोकरी कर हेच ते सारखे अक्षय ला सांगायचे , त्यालाही कारण होते त्यांना शिकायचे होते आणि सरकारी नोकरीचे फार आकर्षण होते पण वडीलांनी सातवी झाल्यावरच आपल्या दुकानात काम करायला सांगून शिक्षणच बंद केले , वडीलांपुढे त्यांचे शिकण्याचे स्वप्न अधुरेच राहीले पण त्यांनी मनोमन ठरवले होते मुलांना खुप शिकवायचे एकाने तरी भारतातील सर्वोच्च पदाची नोकरी करावी , अक्षय हुशार होता अभ्यासात चांगली प्रगती होती त्याची त्यानंतर आशय झाला तो ही अभ्यासात हुशार होता त्यालाही चांगल्या नावाजलेल्या शाळेत टाकले , मुक्ताच विश्वतर आता अक्षय आणि आशय भोवतीच फिरत होतं , त्यांना आवडेल ते खाऊ घालणे , त्यांच्या फरमाईश पुर्‍या करणे अगदी अर्ध्यारात्रीसुद्धा काही खायला मागीतले की ती बनवून द्यायची त्यांना , साधा तापही आला तर ती त्यांना बरं वाटेपर्यंत त्यांच्याजवळ बसुन राहायची , बाहेरुन घरी यायला अक्षयला वेळ झाला की हिच्या आत बाहेर फेर्‍या व्हायच्या , मुलांच्या अती काळजीने ती अस्वस्थ व्हायची , आणि दुरुनच अक्षयची चाहूल लागली की तिची चिंता क्षणात ऊडून जायची आणि प्रेमाने जवळ घेऊन लगेच लाड करायची कधी कधी अक्षय कंटाळुन तिला म्हणायचा , तू अती करतेस हा , मी मोठा झालो आता एवढी काळजी नको करु आमची , हो रे बाबा तू मोठा झालास पण माझ्या पेक्षा नाही आणि जोपर्यंत मी आहे तो पर्यंत मी तुमची काळजी करणार , बघा मी तुम्हाला आताच सांगते माझ्यापासून दुर जायचा प्रयत्न करु नका तुम्ही दोघेही , आपण कायम सोबत राहू , हो गं आई अशी काय बोलतेस , 

मी कुठे चाललो तुला सोडून आणि आशय तर लहानच आहे , अजून वीस वर्षे तरी तुला सोडून जायची भीती नाही , 

कुठे शिक्षणासाठी नोकरीसाठी गेलो तरी परत इथेच येऊ आम्ही , काही ही झाले तरी आपण सोबतच राहू .

अक्षय डाॅक्टर झाला MBBS MD केलं त्याने मुंबईच्या मोठ्या हाॅस्पीटल मधे तो जाॅब करत होता सोबत स्पेशलायझेशन ही करायचे होते त्याला , त्यातच असिस्टंट डाॅक्टर शिवानी त्याला आवडू लागली , लवकरच दोघांनी लग्न करायचे ठरवले , MBBS MD झालेल्या शिवानीलाही पुढे शिकायचे होते , दोघांनी मिळून लंडन ला जाऊन स्पेशलायझेशन करायचे ठरवले , त्याआधी लग्न करुन मग जायचे ठरले , अक्षय ने घरी आईला सांगीतले थोड्या नाराजीनेच पण ती लग्नासाठी तयार झाली आणि बाबांना तयार करायची जबाबदारी अक्षय ने तिच्यावर टाकली , मुक्ताने मग संधी बघुन अक्षयला फाॅरेनला जायचे सांगीतले आणि सोबतच त्याने मुलगी बघीतली आणि लग्न करुनच दोघेही तिकडे जातील हेही सांगीतले , क्षणभर विलासराव चुप बसलेत मग हताशपणे म्हणाले मी किती स्वप्नं बघीतले अक्षय साठी तो सरकारी नोकरीत जायला हवा होता , पण काय आता त्याने जर निश्चय केलाच आहे तर ठिक आहे , शेवटी काय त्याच्या आनंदातच आपला आनंद , पण मुक्ता तुला सांगू का मुलं फाॅरेनला गेले की परत येत नाहीत गं !

त्याला सांगशील समजावुन शिक्षण घे म्हणाव हवं तेव्हढ पण शिकल्यावर परत घरी ये म्हणाव त्याला , हो हो आपला अक्षय आपल्याला सोडून राहू शकत नाही मला माहीत आहे तो परत येणारच .

मग अक्षय शिवानीचे कोर्ट मॅरेज करुन रिसेप्शन केले आणि काही दिवसातच ते दोघेही लंडनला रवाना झाले .

अक्षय लंडनला जाऊन दोन वर्षे झालेत इकडे आशयने इंजिनीयरींग ला अॅडमिशन घेतली , तिकडे तिसर्‍या वर्षी अक्षय आणि शिवानीला एका हाॅस्पीटल मधे भरपुर पगाराची नोकरी मिळाली तसेही त्यांना लंडन फारच आवडले , मग काही दिवस आपण इकडे जाॅब करुन अजुन अनुभव घेऊ आणि मग परत जाऊ भारतात असे दोघांचेही ठरले , आई बाबा आशय तिघेही अक्षय च्या भेटीला आसुसलेले होते , ह्या दोन अडीच वर्षात विडीओ काॅलींग ने ते बोलायचे ते ही जेव्हा अक्षय ला वेळ असेल तेव्हाच , कधीही त्यांना नाही बोलता यायच त्याच्याशी , जेव्हा अक्षयने तो अजुन काही वर्ष इकडे राहणार हे सांगीतल्यावर तर ते फारच नाराज झालेत , पण मुलाच्या आनंदापुढे त्यांच काही चालल नाही , मुक्ता आता थोडी दुःखी राहायला लागली तिला तसे बघुन आशय तिला समजवायचा , अगं आई दादा येईलना परत , मी आहे ना तुझ्या सोबत कशाला काळजी करतेस , हो रे राजा , 

तू नाही ना मला सोडून जाणार ? 

नाही कधीच नाही , मला ते फाॅरेन काही आवडत नाही , 

मी इथेच नोकरी करणार आणि नोकरी जर दुसर्‍या शहरात असली तर मी तुम्हालाही सोबत घेऊन जाणार ! 

वा जी वा मग आपला व्यापार कोण सांभाळणार रे ?

ते काही नाही ह्याच शहरात नोकरी करशील तू , 

बरं आई बघू नंतर कुठे नोकरी करायचे ते .

लवकरच शिवानी आई बनणार असल्याची बातमी अक्षयने दिली , 

आता कसे रे तिकडे कसे करणार ? 

घरातील मोठे कुणीतरी हवं ना , तुम्ही दोघेच कसे सांभाळणार अक्षय तू असं कर तिला इकडे पाठव सुट्टी काढून , 

मग घेऊन जाशील परत बाळ झाल्यावर , 

मुक्ता एकादमात त्याला म्हणाली ,

तसे दोघेही हसायला लागले , 

अगं आई आम्ही दोघे ही डाॅक्टर आहोत , 

काळजी घेऊ आम्ही , तू चिंता करु नकोस , 

शिवानीचे आईबाबा आमच्या मदतीला येत आहेत आणि ते थांबतील इकडे , 

अच्छा ! बरं बाबा ठिक आहे तसे आम्ही ही आलो असतो तिकडे , तुला खुप वर्षे झाले बघीतले नाही , 

अस काय करतेस आई रोज तर विडीओ काॅल करतो रोजच तर बघते तू आम्हाला , हसून अक्षय म्हणाला आणि तसेही दुकान बंद करुन बाबातर इकडे येणार नाहीत आणि आशय च काॅलेज असल्यामुळे तू ही येऊ शकणार नाहीस , 

काळजी करु नकोस जेव्हा जमेल तेव्हा नक्की आम्ही भारतात परत येऊ .

अक्षय ला जुळी मुले झालीत , आईबाबा तर ऐकुण आनंदलीच , खुप वाटत होत त्यांना नातू बघावेत , 

मुलाला भेटावे पण सगळं सोडून जाणे शक्यच नव्हते , 

मुक्ताची अगतिकता बघुन मग विलासराव म्हणाले असे करा तुम्ही दोघे जाऊन या तिकडे ,

पण आशयने काॅलेज सोडून तिकडे जायला नकार दिला आणि मुक्ताला मन मारुन राहावं लागलं , दोन वर्षा नंतर ,

आशयला एका कंपनीकडून नोकरीची आॅफर मिळाली , 

लगेच त्याने ती स्विकारली पण नोकरी मुंबईला !

तेच पुन्हा हा पण मुंबईला जाईल आणि तिथून परत नाही आला म्हणजे हा विचार करुन , मुक्ता आणि विलासरावांनी त्याला तू इथेच जाॅब कर किंवा तू आपला बिझनेस सांभाळ म्हणुन गळ घातली , 

आईबाबांच्या इच्छेखातर त्याने तिथल्याच एका कंपनीत नोकरी केली पण पगार जास्त नव्हता आणि त्या नोकरीत आशय खुश नव्हता , 

हळु हळु तो दुकानाकडे लक्ष द्यायला लागला , मग नोकरी सोडून त्याने सुपर मार्केट तयार केले आणि बिझनेसला वाढवले , 

बाबा आणि आशय मिळून छान सांभाळत होते दुकान !

लवकरच एक छानसी मुलगी पसंत करुन लग्न ऊरकवण्यात आले आणि हो खुप वर्षानंतर अक्षय आपल्या दोन्ही बाळांना घेऊन लग्नाला हजर राहीला , दोन महीन्याची सुट्टी घेऊनच दोघेही आले होते , त्याचे दोन्ही मुलं तीन वर्षाचे झाले होते , आईबाबा तर त्यांना बघुन भरुन पावले , किती लाड करु नी काय काय खाऊ घालू त्यांना , असे मुक्ताला झाले होते .

एका रात्री सहजच गप्पा करत अक्षय आशय आणि बाबा बसलेत , तर बाबांनी एक ब्रिफकेस कपाटातून काढली , 

बाबा हे हो काय अक्षयने विचारले , 

अरे बाबा माझं आता वय झालं , 

पिकलं पान केव्हाही गळू शकतं , 

म्हणुन म्हंटल तुमचा खाऊ तुम्हाला द्यावा , 

म्हणजे काय हो बाबा ? आशय ने ऊत्सुकतेने विचारले , 

अरे बाबांनो काही प्राॅपर्टी माझ्या आप्पांची आणि मी जमवलेली तुम्हा दोघांच्या नावावर केली मी काही महीन्यांपुर्वी , म्हंटल नंतर तुम्हा दोघांमधे प्राॅपर्टी साठी वाद नकोत , अहो हे हो काय बाबा , 

असं का बोलता , तुम्हाला काय वाटतं , 

आम्ही प्राॅपर्टी साठी भांडणार की काय ? हसून अक्षय म्हणाला , 

नाही रे राजा तस नाहीये , 

मी आपल माझं कर्तव्य करतोय , 

बस पुढे अडचन नको कोणतीही म्हणुन !

आता शांतपणे मी काय बोलतो ते ऐका , 

त्यांनी दोन फाईल काढल्या , दोघांच्या हातात दिल्या , 

शेतीचे दोन हिस्से केलेत , भरपुर प्लाॅट घेऊन ठेवले होते , ते दोघांना सारखे दिलेत , सुपर मार्केट आणि जुनं होलसेलच दुकान मात्र त्यांनी आशय लक्ष घालत होता म्हणुन आशय च्या नावावर केले पण तेवढीच नगद रक्कम त्यांनी अक्षयच्या खात्यात टाकली आणि स्वतःच्या बँक खात्यात मुक्ताला हिस्सेदार बनविले त्याचे सगळे डिटेल्स त्यांनी फाईलमधे ठेवले होते , सगळ बघुन मुल तर गहिवरलेच बाबांना मिठी मारून रडलेही , त्यांना तसे बघुन बाबा ही हळवे झाले , 

अरे मुलांनो जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हे सगळ माझ्याकडेच असणार तुम्हाला गरज पडली की सांगा मला आणि माझ्यानंतर मुक्ताला कुणावरही अवलंबुन राहावं लागू नये म्हणुन भरपुर रक्कम मी आमच्या खात्यात ठेवली आहे , 

ती कुणावर विसंबुन नसणार माझ्यानंतर , 

हे हो काय ! काय मरणाच्या गप्पा करताय सर्वात आधी माझाच नंबर लागणार आहे तेव्हा ते बँक बलेन्स तुमच्याच साठी ठेवा , डोळ्यात पाणी आणुन कसनुस हसत आई म्हणाली .

नवीन सून सायली स्वभावाने खुप छान होती , 

मुक्ता सोबत तिचे छान पटायचे , अक्षय ची सुट्टी संपली आईबाबांनी पुन्हा एकदा त्याला म्हंटले बेटा लवकर ये परत , तुला इथे जसे हवे तसे हाॅस्पीटल ऊभारुन देतो , 

पण लवकर ये परत , हो बाबा मी विचार करतो आणि लवकरच परत येतो , मग सगळ्यांचा निरोप घेऊन मुलांसहीत अक्षय लंडनला परत गेला .

एक वर्ष संपता संपता सायली आई बनली छान गोंडस बाळ जन्मल , मुलगा झाला होता त्यांना , आता मुक्ता सुन आणि बाळामधे अधिक व्यस्त राहत होती , बाळ दोन वर्षाचे झाले तसे दुसर्‍यांदा सायली आई बनली , मुलगी झाली तिला !

खुप वर्षानंतर घरात मुलीचा जन्म झाला म्हणुन सगळे फारच आनंदात होते अगदी दृष्ट लागण्या सारखा मुक्ताचा संसार बहरत होता एवढ्यात अचानक अक्षय ने बाबांना फोन करुन सांगीतले की तो आता लंडनलाच स्थायिक होणार फक्त अधुन मधुन भेटायला येणार त्यांना , 

ऐकुण आईबाबांना तर धक्काच बसला , 

हे काय करतोय अक्षय , 

आपल्या लोकांपासून एवढ्या दूर राहायचे , ते ही कायमचे !

त्यांना फारच दुःख झाले शिवाय सोबतच त्याने माझ्या नावावर असलेली प्राॅपर्टी विकून मला पैसे पाठवा , इथे मला माझ बस्तान बसवायचं आहे , माझ्या मुलांसाठी काही करायचं आहे म्हणुन लवकरात लवकर प्राॅपर्टी विका ! आदेशच दिला त्याने , बाबांची तर झोपच ऊडाली , मुक्ता रडून भेकुन दुःख हलक करुन पुन्हा नातवांमधे गुंतली पण बाबांच्या डोळ्यांसमोरुन त्यांचा अक्षय हलतच नव्हता , एक खंत मनात सलत होती , 

हेच दिवस बघायसाठी का,,,? 

मुलं होत नाही म्हणुन आई आप्पांची खाल्लेली बोलणी , त्यावर मुक्ताला ज्याने जिथेही सांगीतले तिथे नेऊन केलेली वेगवेगळी ट्रिटमेंट , 

तीन वर्षानंतर झालेलं बाळ , त्याला पहील्यांदा बघुन झालेला आनंद , भरभरुन केलेल दानं , आनंदाने वाटलेले पेढे , त्याचे हसणे , बोबडे बोल , वारस मिळाल्याचा आनंद , त्याला कडेवर घेऊन फिरणे , सायकल शिकविणे , बोट धरुन फिरायला नेणे अक्षय मोठा झाल्यावर बाबांच्या खांद्यावर हात ठेऊन एकदा म्हणाला होता , 

बाबा काळजी करु नका मी तुमच्या सोबत आहे , 

आपण मिळुन आपल एम्पायर ऊभ करु !

आणि आज तो , त्यांनी कष्टाने जमवलेली प्राॅपर्टी विकून फाॅरेनला राहायच म्हणतोय !

विचार करुन करुन ते फारच दुःखी झालेत , 

कधी तरी त्यांना झोप लागली , जाग आली तेव्हा त्यांना हलता येत नव्हते , कुठे तरी त्रास होत होता , हळुच डोळे ऊघडून बघीतल्यावर त्यांच्या लक्षात आलं , ते दवाखाण्यात बेडवर होते , आॅक्सीजन मास्क लावलेला , हातात सलाईन , त्यांचे डोळे ऊघडलेले बघताच आशय ने त्यांच्या हातावर हात टेकवत , बाबा शांत रहा , तुम्ही बेशुद्ध होते म्हणुन तुम्हाला दवाखाण्यात घेऊन आलो , 

आई,,मुक्ता,,, त्यांनी हळुच विचारले ,,,

हो आई बाहेर बसली आहे बोलावतो तिला , 

आशय आईला आत घेऊन आला , 

रडून रडून मुक्ताचे डोळे सुजले होते , चेहरा काळजीने काळवंडला होता , तिला बघुन बळेच हसल्या सारखे केले बाबांनी , हात ऊचलायचा प्रयत्न केला पण फक्त एक बोटच हलवू शकले , तसे पटकन मुक्ताने त्यांचा हात हातात घेतला , रडू आवरुन ती बळेच हसत म्हणाली , 

काय विलासराव हिच का तुमची बहाद्दुरी , 

सात जन्माच वचन दिलय तुम्ही मला , विसरलात !

अक्षयला सांगीतले तो लगेच आज बसेल विमानात ,

येईल तुम्हाला बघायला , बघा ऊद्या पोहोचेल तो , 

तुम्ही काळजी करु नका , बस शांत रहा , आराम करा , 

सगळं ठिक होईल , 

ते आशय कडे बघुन काही तरी बडबडले तसे आशयने त्याचा कान बाबांच्या तोंडाजवळ नेला , 

अक्षयला प्राॅपर्टी विकून पैसे पाठव ,,,, बिझनेस सांभाळ ,,, आईला एकटी नको ठेऊस ,,,,

बाबा तुम्ही ठिक होणार आहात ,,असं नका बोलू,,,,हे सर्व तुम्हीच करणार आहात,,,आता मात्र आशय ला रडू आवरेना ,,,, तो मागे सरकला ,,,, 

मुक्ता शांत होऊन विलासरावांकडे बघू लागली आणि विलासराव आपल्या मुक्ताकडे बघू लागले , 

त्यांचा हात मुक्ताच्या हातात होता ,,,दोघांच्याही डोळ्यातून अश्रु ओघळले ,,,तिकडे माॅनीटरचा आवाज मोठा झाला,,,जवळच असलेली नर्स धावतच डाॅक्टरांना बोलवायला गेली ,,,डाॅक्टर आलेत विलासरावांना चेक केले आणि त्यांचे मुक्ताला बघत असलेले डोळे बंद केलेत .

का असं व्हावं !

आपणच मुलांना उंच ऊडायसाठी पंख देतो , 

मग हे मुलं ऊडता ऊडता कधी घरट्यापासून दूर जातात कळत सुद्धा नाही !

मुलांनो उंच भरारी घ्या , प्रगती करा ,

पण जन्मदात्यांना असे अधांतरी सोडू नका !

मुलांना वाढवताना आईवडील आपलं घर केवढ आहे सुखसोयी देण्याचा आपला आवाका किती हे बघत नाहीत ,

सतत कुठल्याही प्रसंगात तुम्हाला सोबत ठेवतात , 

संरक्षण करतात , स्वतःसाठी नाही ,

पण तुमच्यासाठी स्वप्न बघीतलेत त्यांनी , 

तुमच्यासाठी कष्ट घेतलेत त्यांनी , 

त्यांचा हिरसमोड नका करु ,

तरी हे बरं की मुक्ताला दुसरा मुलगा आशय होता !

काही आईवडीलांना एकच असतो ,

कल्पना करा त्यांच कस होत असावं !

खंत मनातील सगळ्याच कथा सत्य घटनेवरुन प्रेरित आहेत .

००००००

🎭 Series Post

View all