खंत मनातील - व्यसन

We all must have gone through these experiences in our lives. At times we even fail to realise our own mistakes...In the process, differences crop up and we hurt our own people.. Read these series of episodes with a positive mind and try to underst

! व्यसन !

मायबाई बुढा याची येळ झाली , ह्या पोट्टीसंग गोठी { गोष्टी } करता करता कसा दिस गेला समजलच नायी व माय , चाल , जाय तुया घरी , मले झाडू मारु दे , तुया काका साटी भाकर टाका लागन ना माय , आज त बजाराचा दिस , मायबाई मसाला वाटा लागन ना , चाल वं , 

बर व काकी जातो मी , कर तुयावाले काम , म्हणत ज्योती आपल्या घरी गेली .

तशी गीताकाकी कामाला लागली , भराभर घर अंगण झाडून , हातपाय धुवून दिवा बत्ती केली मुलांना शुभंकरोती म्हणायला सांगीतले त्यांना अभ्यासाला बसवून ती स्वयंपाकाला लागली , पटापट भाकरी टाकल्या , मसाला भाजून पाट्यावर ठेवला आणि तांदूळ गंजात टाकून चुलीवर शिजण्यासाठी ठेवले , मग मसाला वाटला तेव्हढ्यात काका आले , कुट गेली वं सिंधुची माय , होव मसाला वाटतो ना , भयीनची आतापावतूर काय करत होती वं , आँ ! ठेव थे बाजूले , थैली घे , होव येतो , तिने लगेच हात धुतले आणि धावतच बाहेर गेली थैली घ्यायला तसे वेळ झाला म्हणून काका रागात आलेले , तुया मायची कावुन वं येवढा येळ , आँ ! थैली तिच्या हातात न देता त्यांनी खाली फेकली आणि गीताकाकीच्या कानशिलावर जोरदार थापड मारली , तशी आजी कळवळलीच , तरीही खाली बसून तिने पडलेला भाजीपाला पटापट पुन्हा थैलीत टाकला , आणि धावतच डोळे पुसत आत गेली , मुलगी सिंधु आणि मोठा मुलगा राम दोघेही अगदी घाबरुन पुस्तकात डोक खुपसुन बसलेले , अस वागणं त्यांच नेहमीचच होत , पण आज तर बाजारचा दिवस , तालुक्याला बाजारात गेलं की दारु पिण्याचा वार त्यांचा .

सिंधु , राम थोडे मोठे झाल्याबरोबर त्या दोघांचेही लग्न करुन दिलेत , राम शेती करायचा , आबांच्या फारच धाकात , मान वर करुन बोलायची हिम्मत नाही , सिंधुला घर चांगल मिळाल , सासू सासरे छान , नवरा छान , निर्व्यसनी , नोकरी निमीत्त धनराज जिल्ह्याच्या ठिकाणी एकटाच राहायला गेला , कारण आईवडीलांजवळ कुणीतरी हवं म्हणून सिंधुला तिथेच गावी ठेवले , पुढे सिंधुला दोन मुले एक मुलगी झाली , इकडे धनराज

इतर लोकांसोबत राहून दारु प्यायला लागला , एकदा सुट्टी काढून तो गावी आला आणि सिंधुने भाजी चांगली बनविली नाही म्हणून ताटच फेकलं तसे घरातील सगळेच दचकले , काय झाल ह्याला , त्याचे वडील त्वेषाने म्हणाले पण त्याचे असंबंद्ध बडबडणे बघून काय ते समजले , आणि त्यांनी चुप राहणेच पसंत केले , त्यांनी नंतर धनराजला सांगीतले , घर घे शहरात आणि बायको मुलांना तू सोबत ठेव , आपली इथे शेती आहे , गुरे आहेत म्हणून आम्ही इथेच राहतो , हो नाही करुन करुन ठरले , आईबाबा गावी आणि सिंधु , मुल , धनराज सोबत , धनराज ड्युटी बरोबर करायचा पण घरी येतानाच दारु पिऊन घरी यायचा , सिंधु ने त्याला समजवायचा प्रयत्न केला पण प्रकरण शिव्या देणे आणि नंतर मारहाणी वर आले , तसे सिंधुने आपल्या माय ला एकदा सांगीतले तर माय म्हणाली , बाई वं , बाईची जातच अशी , करा लागते सहन , तुये आबा कशे करत , तुले तं सब्बन मायीत हाये , तरी म्हन्तं , बोलु नायी बाई नवर्‍याले पिरमान घे , तशे बुवा लय चांगला मानुस हाय , नोकरी करते , मायबाई तू शयरात रायत , मंग काय पायजे अजून , सिंधुने हसून डोळे पुसले , हो गं माय , बरोबर आहे तुझ .

सुधाला , सिंधुने लाडात वाढविले , धनराज दारु पित होता पण मुलीवर विशेष जीव , तसा मुलांनाही जीव लावायचा तो , त्याला जे शिक्षण मुलांना द्यायचं ते सर्व केल त्याने , सुधा हुशार ती ग्रॅज्युएट झाल्यावर तिच लग्न छान श्रीमंत घरी आणि सरकारी नोकरीत असलेल्या मुलासोबत केले .

सुधाला नोकरी करायची होती पण आईवडीलांनी म्हंटल तुझ लग्न झाल्यावर मग घरच्यांना विचारुन कर , सासरी आल्यावर तिचा दिवसच कामात जायला लागला , नवरा आपला कामात गर्क , त्याला तर बोलायलाही वेळ नाही मिळायचा , सुट्टीच्या दिवशी ही त्याची पार्टी चालायची मित्रांसोबत , मग परत येई तोच डोलत ! सुधाने त्याला प्रथम प्रेमाने समजावुन सांगितले ,

नंतर सासूसासर्‍यांना सांगून बघीतले तर काय होत थोडा पिऊन आला तर ! असे बोलुन तिला चुप करण्यात आलं , आई ला सांगितले तर आई डोळ्यांना पदर लावत म्हणाली , ताई गं एक माझ नशीब खराब , पण तुझ्याही मागे तेच ! कसेबसे सुधा ने तिला समजावले , आणि जस आहे तसे अॅडजस्ट करायचे ठरविले , पाहता पाहता सुधाला एक मुलगा , एक मुलगी झाली , सुंदर गोंडस लेकरे तिचे बघून सगळेच लहान मोठी मंडळी आनंदाने न्हालीत !

तन्वी आणि रितेश मोठे झालेत , स्वतःचे निर्णय स्वतःहा घेऊ लागले , तन्वी इंजिनीयर झाली रितेश लेक्चरर म्हणून काॅलेजवर लागला , मित्रांसोबत पार्टी करुन परतलेल्या मुलाच्या तोंडातून आलेल्या वासावरुन सुधाने ओळखले हा दारु पिउन आलाय , तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली , पण राग आवरुन तिने कशीबशी रात्र काढली , दुसर्‍या दिवशी पहाटेची कामे आटोपून ती रितेश च्या ऊठायची वाट बघत होती , रितेश थोडा ऊशीराच ऊठला आज रविवार असल्यामुळे सुटीच होती , का रे ! काल काय होत , तिने रागानेच त्याला विचारले तसे तो चाचरला , काही नाही गं , पण कश्याबद्दल विचारतेस , अरे रात्री दारु पिऊन आलास ना घरी ? त्याबद्दल विचारते आहे ! अगं आई ते असच गं , काय असच गं ? तुझी हिम्मतं कशी झाली दारु प्यायची ? तू कसा काय पिऊ शकतोस दारु ? का ? मी का नाही पिऊ शकत ? अरे तू लहानपणा पासन बघतोच आहेस घरात माझे आणि बाबांचे पिण्यावरुन सारखे खटके ऊडत असतात , मला अजिबात तो दारुचा वास सहन होत नाही , तुला सगळं माहीत असल्यावर तू कस काय अस करु शकतोस बाळा ! दारु अगदी वाईट पेय आहे , कितीदा तू मला रडताना बघीतलस , माझे डोळे पुसायचास तू आणि आज तुच पिऊन आलास !

सुधा रडतच म्हणाली , ते काही नाही , या नंतर खबरदार दारुला हात लावलास तर , अगं हे काय गं आई बोलन झालं , तू कोण मला सांगणारी पिऊ नकोस म्हणून , मी माझ बघेन ! मी स्वतःहा कमवतो , तुला काय प्राॅब्लेम आहे ? ह्या नंतर मी ऐकुण घेणार नाही , अस काही बोलली तर !

सुधातर डोळे विस्फारुन त्याच्याकडे बघतच राहीली , भरभर तिच्या नजरे समोरुन , आज्जी , आई आणि स्वतःहा ती तरळून गेली , सारी हयात त्यांची दारुड्या नवर्‍याला सहन करण्यात गेली आणि मी तर त्यांच्यापेक्षाही कमनशिबी राहीली , मला तर माझ्या पुढच्या पिढीने तर आताच फुलण्याआधीच गारद केलय ! 

काय आहे काय त्या दारुतं ! तुम्ही औषधा समान घ्याल तर औषध , नसता पुर्ण शरीरावर कब्जा करुन शरीर सडवते ती ! 

लिव्हर सोरोयसिस ने ग्रसित होण्याची संख्या वाढतेय ! घरात क्लेश वाढतो , पिणार्‍याची इज्जत कमी होते ते वेगळचं !

आणि सोशल ड्रिंकींग वगैरे काही प्रकार ऊरत नाही जेव्हा आपण तिचं सेवन करतो !

विचार करा , आज्जी , आई आणि सुधाने दारुचे सेवन केले असते तर !

०००००००

🎭 Series Post

View all