खंत मनातील - ऊत्साह

We all must have gone through these experiences in our lives. At times we even fail to realise our own mistakes...In the process, differences crop up and we hurt our own people.. Read these series of episodes with a positive mind and try to underst

! ऊत्साह !

आज पहाटे लवकरच नंदिनी ऊठली , आज सनीचा बारावीचा रिजल्ट लागणार होता , विचार करुनच तिला शहारुन येत होतं , गेल्या दोन वर्षांपासुन सारखी तिची धावपळ सुरु होती , एकुलता एक लेक असल्यामुळे विपीन आणि नंदिनीच सगळ लक्ष त्याच्याच कडे असायचं , त्यांना सनीला ऊच्चशिक्षणासाठी परदेशात पाठवायचे होते , त्यामुळे विपीनची बदली जवळच असणार्‍या तरी दोन तासाच्या अंतरावर असणार्‍या गावी झाली पण सनीच पुढल वर्ष बारावीच म्हणुन दोघांनी मिळुन घेतलेला निर्णय , 

नंदिनी , सनी सोबत पुण्यातच थांबेल आणि विपीन बदलीच्या ठिकाणी एकटाच जाईल , 

एवढेच काय त्याला डिस्टर्ब नको व्हायला म्हणुन विपीनही फार कमी येणजाण करत होता घरी , नंदिनीने पटापट घरची कामे ऊरकलीत , सनीला ऊठवुन तयार व्हायला सांगीतले , 

दोघे ही अगदी जय्यत तयारी करुनच फोन जवळ बसलेत , कारण बोर्डात असणार्‍या नातेवाईकांकडून त्यांना रिजल्ट कळणार होता , तेव्हढ्यात फोन वाजला नंदिनीने घाईनेच ऊचलला , अहो वहीनी सनीला 90% मार्क्स पडलेत , व्वा वा भाऊजी छानच बातमी दिलीत , अभिनंदन वहीनी , धन्यवाद भाऊजी , म्हणुन तिने फोन ठेवला आणि सनीला मिठीच मारली , अभिनंदन सनी खुप छान मार्क्स मिळविलेस बेटा , सनीही खुप खुश झाला आणि लगेच ही बातमी आॅफीसमधे असलेल्या विपीनला कळविली .

०००

अरे पुंडलिक , कुठे गेला हा !

विपीन सरांनी आॅफीस मधे बसल्या बसल्या आपल्या प्यून ला आवाज दिला मोठ्यांने , आणी टेबलवरची बेल दोन तीन दा वाजविली , 

तसेच धावतच गडबडीने पुंडलिक आत येत त्यांना म्हणाला , साॅरी सर ती तुम्ही दिलेली फाईल मी दोन नंबर टेबल वर द्यायला गेलो होतो , 

बरं ते ठिक आहे तुला आनंदाची एक बातमी सांगायची आहे , माझा मुलगा सनी बारावी पास झालाय आताच फोन आला मला , 90% मार्कस मिळालेत त्याला ! 

अरे वा सर अभिनंदन सर ! 

धन्यवाद तुझे , आज मी खूप आनंदात आहे , 

तू जा दूकानात आणी मिठाई घेऊन ये दोन किलो , 

पुर्ण आॅफीस मधे वाट ! 

हो ठिक आहे सर म्हणत पुंडलिक सरांनी दिलेले पैसे घेऊन आॅफीस च्या बाहेर गेला , 

आनंदातच विपीन ने नंदिनीला काॅल केला , 

अगं नंदू मी काय म्हणतो , आज सनीच्या आवडीचे पदार्थ बनव सगळे ,,,नाहीतर असे कर हाॅटेल मधे आॅर्डर दे ,,, नाहीतर असे कर त्याला ने हाॅटेलमधे , काय पाहीजे ते खाऊ घाल , दुकानात ही घेऊन जाशील हां त्याला , त्याच्या आवडीचे कपडे घेऊन दे ,,, त्याला वुडलॅन्डचा बुट हवा होता ना ? तो सुद्धा घेऊन दे,,,आणी ,,,, आणी,,,

हो हो हो विपीन राव भलतेच लेका वर खुश झालात,,,,

जरा दम घ्या हो ,,, त्याच्या यश मिळवण्यात तुमचा अमाप वाटा आहे , तुमच्या घरी येण्याने त्याच लक्ष अभ्यासापासुन विचलीत होईल म्हणुन तुम्ही किती मनावर ताबा ठेवलात , एकटे दिवस काढलेत तिथे , तुमचही खुप खुप अभिनंदन सर जी ! धन्यवाद नंदू , तू मला समजतेस , खरेच कधी कधी वाटायचं काय मुर्खा सारखे वागतोय आपण , 

शिकेल जेवढ शिकायचं ते , जेवढे मिळवायचे टक्के तेवढे मिळवू दे , चल जाऊ आपण पुण्यात , पण लगेच आपल स्वप्न आठवलं की वाटायच राहीलेत किती दिवस आता ,,,

हो हो महाशय पुरे स्वतःच कौतुक ,

म्हंटल माझ पण कौतुक व्हायला पाहीजे की नाही थोडं ,

हो गं खरेच ! तुझे तर विशेष कौतुक नंदू ,, मी तिथे नसताना , तूच मॅनेज केलेस सर्व , आई बाबांकडेही लक्ष पुरवत होतीस , तुझे तर करावे तेवढे कौतुक कमीच होतील ! 

पुरे पुरे महाशय , गेले वर्षभर त्याच्याच तर मागे होते मी ! तुमची पण फिकीर नाही केली , एकटेच तुम्ही लांब राहताय ! पण आता मी आणी सनी काही दिवसांसाठी तुमच्या कडे येणार आणी मग त्याच्या अॅडमिशनच बघाव लागेल ,,, तुम्हाला आता काही दिवस सुट्टी काढावीच लागेल , जरा बाहेर फिरुन पण येऊया काही दिवस , पण आता मला आपण सोबतच राहावे असे वाटते , 

हो गं नंदू मी पण एकटा इकडे बोअर झालोय सारखी तुम्हा दोघांची आठवण येते !

बरे आता मला धीर धरवून होत नाहीये , 

मी आजच सुट्टी टाकून निघतो ! 

अहो पण आता ऊशीर होईल ना निघायला ! 

ते काही नाही मला सनी ला सरप्राईज द्यायचे आहे ! 

त्याला सांगू नकोस मी येणार म्हणुन , 

पण आम्ही येऊच ना तिकडे , 

हो गं तो रिजल्ट हातात आल्यावरच तुम्हाला येणे जमेल , 

ह्या निमीत्ताने आईबाबांची पण भेट होईल , 

ते काही नाही मी येतोय संध्याकाळी ,

बरे बाबा ठिक आहे या मग , 

तुमच्यापण आवडीचे पदार्थ बनवते .

विपीन सरांनी अॅप्लीकेशन लिहीले , 

तेव्हढ्यात आॅफीस स्टाफ केबीन मधे आला , 

सगळ्यांनी सरांचे अभिनंदन केले ,

विपीन तर भलतेच खुश झालेत , 

बोलता बोलता कुणीतरी म्हणाले , 

पार्टी तो बनती है सर ! 

मग काय सगळ्यांनी एका सुरातच म्हंटले सर पार्टी हवी आज ,

बरे बाबा ठिक आहे , चला माझ्याकडून तुम्हाला आज पार्टी ! पण संध्याकाळी मला पुण्याला जायचे आहे घरी , 

तेव्हा आता च थोड्यावेळात आपण जेवायला जाऊ हाॅटेलमधे ,

पण सर आॅफीस तर पाच वाजता बंद होईल मग कसे ! 

अरे हो विसरलोच की ! बरे मग असे करु ! 

आॅफीस बंद झाल्यावर जाऊ जेवायला , 

मी पुण्याला जायच्या तयारीतच येतो ! 

जेवण झाले की लगेच निघतो , दोन तासात पुणे ! 

मग ठरल्या प्रमाणे , एका हाॅटेल मधे पार्टी झाली , ड्रिंक्स ची पण आॅर्डर देण्यात आली , आधी नाही म्हणणारे विपीन सर मग दोन तीन पेग रिचवून जेवण करुन पुण्यासाठी ऊशीरा हाॅटेलमधून बाहेर पडले , स्वतः कार चालवत ते रस्त्याने वेगात निघाले , आता त्यांना घराची अजूनच ओढ वाटू लागली , 

तसा गाडीचा वेग ही वाढला ,

आणी एका वळणावर नको तेच झाले ,,,

समोरुन आलेल्या ट्रकची समोरा समोर धडक लागली , 

धडक एवढी जबर कि कारचा पुढला भाग पुर्ण चेपला ,

आणी विपीन चे पाय त्यात अडकले ,

पण ट्रकवाला चांगला असल्यामुळेच त्याने लगेच त्यांना बघीतले , अॅम्बुलंसला फोन केला , अर्ध्यातासात अॅम्बुलंस आली , पुण्याला हाॅस्पीटल मधे त्यांना घेऊन गेलेत , 

घरी कळवले ! रात्री एक ला माहीती मिळाल्यावर नंदू आणी घरचे सगळेच रडत हाॅस्पीटल मधे आलेत , 

थोड्या वेळाने आॅपरेशन झाले त्यांच्या पायाचे , 

शांत व्यक्तिमत्वाचे विपीन सर ,

आजमितीला एक पाय गमावुन विचार करतायत मी कशी एवढी गंभीर चूक करु शकतो ,,,! 

नंदिनी स्वतःला दोष देतेय , 

मी त्यांना अडवायला पाहीजे होते वेळीच,,,,! 

सहकार्‍यांना पश्चाताप होतोय , 

आपण पार्टी मागायला नको होती ,,,,! 

चुकलं कुणाच ,,,,! 

अती ऊत्साहाने पाय गमावला ,,,,!

सदसदविवेक बुद्धी जाग्रुत ठेवायला हवी कोणत्याही प्रसंगी ,

दुसर्‍या दिवशी जाऊ शकले असते , 

दारु पिऊन कधीही गाडी चालवू नये !

सत्य घटने वरुन प्रेरित !

०००००००

🎭 Series Post

View all