Aug 05, 2021
कथामालिका

खंत मनातील - टाईमपास

Read Later
खंत मनातील - टाईमपास
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

टाईमपास

 

शांत झोपलेल्या शंतनू कडे शीना प्रेमाने बघत होती , किती निरागस भाव आहेत ना शंतनू च्या चेहर्‍यावर , अबोध मुलच झोपल्याचा आभास होतोय !

तेव्हढ्यात शंतनू ने कडा फेरला ,अर्धोनमिलीत डोळ्याने त्याने शीना कडे बघीतले आणि पुन्हा डोळे बंद करत तो म्हणाला शीना झोप आता आणि तिच्याकडे पाठ करुन तो पुन्हा झोपला ,

हो झोपते म्हणत शीना गोड हसली , किती भोळसट नवरा मला भेटला , ह्याला एवढी सुंदर यौवनाने बहरलेली बायको मिळाली आहे पण हा भाबडा बघा , तिच्याकडे पाठ फिरवुन झोपतोय , असा कसा रे तू , घे ना मला जवळ , तुझ्या कुशीत झोपायचे आहे मला , पण ह्या भोळसटाला माझ्या मनातल कधी कळेल !

तिने त्याच्या पाठीवर हात ठेवला , हातावरुन हात फिरवला पण तो कदाचित गाढ झोपला होता , मग थोड कंटाळुनच मनातल्या मनात झोप मग गधड्या म्हणत पाठ फिरवली आणि झोपायचा प्रयत्न करु लागली , पण झोप फार दुर कुठे तरी जाऊन बसली होती आज , आताश्या असच होतय , सकाळी ऊठला की वाॅक घेऊन येतो चहा ब्रेड बटर खाल्ले की आंघोळ आणि आॅफीस ची तयारी करुनच बेडरुम बाहेर येतो , खायला काही दिलं तर ठिक नाहीतर आॅफीसमधेच जेवणार सांगून बाय स्वीटहार्ट म्हणुन बाहेर जातो , संध्याकाळी परत आल्यावर थकलेला असतो कधी जेऊन येतो तर कधी जेवतो माझ्या बरोबर आणि लगेच झोपतो , मी काही विचारले तरच बोलतो अगदी यंत्रा सोबत मी वावरत असल्याचा भास व्हावा कधी कधी , खरेच हा थकलेला असतो का ? बोलत का नाही मोकळे पणाने हा ? हा कमी बोलणारा आहे असे आधी तर मला काही वाटले नव्हते ! टाम्पाला आल्यावर दोन वीकएन्डला मला तो बाहेर फिरायला घेऊन गेला , छान मज्जा केली आम्ही , त्याच्या डेव्हीड आणि मायकल दोन मित्रांचा परिवार ही होता सोबत पण घरी आल्यावर पुन्हा जसाच्या तसा , शांत !

नाही मी आता ऊद्या ह्या विषयावर त्याच्याशी बोलतेच , 

खुप झाले आता , निर्धार करुनच शीना झोपी गेली .

देवेन्र्द आणि मनिषाची शीना एकुलती एक लेक , 

दिसायला साधारण पण नाकी डोळी छान ,

ऊच्चशिक्षीत शीना ला शेजारीच राहणार्‍या नातेवाईकांनी त्यांच्या मित्राच्या मुलाचं स्थळ सुचविले , मुलगा इंजीनियर ms फ्लोरिडाला केल्यावर तिथल्याच टाम्पा ह्या शहरात नोकरी करणार्‍या शंतनुचे पॅकेज भरपुर होते , गोरापान दिसायला सुंदर शंतनू सहा फुट ऊंच होता , गेले काही वर्षे जाॅब केल्यावर त्याने तिथेच घर ही विकत घेतले होते , त्याचा भारतात परत यायचा विचार नव्हता आणि तसेही शीना आणि तिच्या आईवडीलांना परदेशाचे फार आकर्षण होते , शंतनुचे वडील आणि मोठा भाऊ घरचा बिझनेस सांभाळायचे , त्यांची मोठ्ठी इलेक्र्टाॅनिक्सच्या वस्तूंची शोरुम होती ठाण्यात , स्वतःचा बंगला होता मग शीना आणि आईवडीलांनी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता , शंतनू जेव्हा दोन महीन्याच्या सुट्टीत भारतात आला तेव्हा घरच्यांनी मुहुर्त बघुन त्या दोघांचे लग्न धुमधडाक्यात लावुन दिले , शीना शंतनू सारखा नवरा बघुन तर हवेत ऊडायला लागली तिच्या पेक्षा सुंदर तिला हवा तसा नवरा मिळाला होता , शंतनू ही आधी कमी बोलायचा पण लवकरच शीना सोबत मोकळे पणाने बोलू लागला , तिला फिरायला घेऊन गेला , तिच्या आईवडीलां सोबतही बसुन गप्पा मारल्यात त्याने , हनीमुन साठी महाबळेश्वरला जाऊन आले , त्याच्या स्पर्शाने मोहरलेली शीना , टाम्पाला जायच्या आधी जळगावला घरी ये चार दिवसांसाठी आईवडीलांच्या ह्या मागणीला चक्क तिने नाही म्हंटले , तुम्हीच इकडे ठाण्याला या चारदिवसांसाठी असा फोन केला , आईवडील तर तिचा आनंद बघुन भरुन पावले , मुलगी खुश आहे अजुन काय हवे !

एक महीना त्यांचा अगदी आनंदात गेला , त्यानंतर दोघे ही टाम्पाला आले , निरोप घेताना रडत असलेल्या शीनाला बघुन शंतनू म्हणालाही , तुला थांबायचे असेल आणखी काही दिवस आईबाबांकडे तर थांब मग मागाहून ये तिकडे , शीना रडता रडता हसलीच , वेडू कुठला लगेच थांब म्हणतोय , लगेच शीना चे आईबाबा म्हणाले नाही नाही तिला नाही थांबायचे , आम्हाला आठवण आली की आम्ही येऊ टाम्पाला , शीना तर फ्लाईट मधेही शंतनू चा हात पकडून बसली , दोन तीनदा शंतनुने तिला नीट बस म्हणुन सांगीतले , अखेरीस बराच टप्पा पार करुन टाम्पाला पोहोचलेत एकदाचे , शीना तर भलतीच खुश होती , तिथल्या थंडीचा तिला त्रास होत होता पण निसर्गाने नटलेल्या शिस्तबद्ध घरे मार्केट रहदारी आणि विशेष म्हणजे गोरे बघुन तर कोण आनंद होत होता तिला , गाडीतून ती सगळ्यांचे निरीक्षण करच घरी गेली आणि त्याचा तो मोठा बंगला बघुन चाटच पडली , तिचा जळगावचा मोठ्ठा बंगला त्या समोर अगदीच खुजा वाटला तिला , चकचकीत बंगला बघुन तर भारावलीच शीना , मी,,मी ,,ह्या बंगल्याची मालकीन,,,एवढा सुंदर माझा नवरा,,,तिला तर काय करु आणि काय नको होत होतं , अरे शंतनू साफच आहे रे बंगला ! तू तर दोन महीने इथे नव्हता मग कसा काय एवढा चकचकीत ?

अगं , माझ्या मित्राकडे चावी आहे एक त्याला माहीत होत आपण येणार म्हणुन त्याने केले असेल तेव्हढ्यात जीन्यावरुन एक गोरा धावतच खाली आला ,,,हे डेव्हीड,,,how are you honey ,,,शीना तर घाबरलीच ,,हा घरात कसा ,,,प्रश्नार्थक नजरेने ती एकमेकांना बिलगलेल्या डेव्हीड आणि शंतनुला बघत होती ,,,,शंतनुच्या चेहर्‍यावरची रौनक वाढली होती ,,,

लगेच भानावर येत शंतनू डेव्हीडला म्हणाला , हे डेव्हीड ,,meet my wife sheena ,,,,हे sheena ,,,nice to meet you,,,,how are you ? शेकहॅन्ड करत त्याने शीनाला विचारले ,,,भांबावलेल्या शीनाने fine,,,thank you म्हणत हात सोडवुन घेतला,,,आणि शंतनुला म्हणाली हा घरात कसा काय ? अगं मी एकटाच असतो तर हा कधी कधी राहायला यायचा , दोन महीने घर बंद ठेवल असत तर खराब झाल असत म्हणुन हा अधुन मधुन राहायचा इथे , by the way , he is married , त्याला दोन मुले आहेत तरी सुद्धा तो मला अधुन मधुन कंपनी देतो , मग शीनाला म्हणाला ती वरची राईट साईडची बेडरुम तुझी ,,, काय,,,? शीनाने चमकुन त्याच्याकडे बघीतले , i meen to say आपली बेडरुम ,,चल तुला दाखवतो ,,सामान घेऊन तिघेही वर बेडरुम मधे आलेत , तिला तिथेच ठेऊन डेव्हीड आणि शंतनू बाहेर गेलेत , तिची नजर डेव्हीड वरुन हटत नव्हती , किती गोरा आहे हा , आपला शंतनू एवढा गोरा असुनही ह्याच्या समोर काळाच वाटतोय , बाॅडी पण छान आहे ह्याची तर ,,,ऐ बाई शीना काय बघतेस , बस झाल , गोर्‍यावर फिदा नको होऊस ,,स्वतःच डोक्यावर टपली मारत ती रुम न्याहाळू लागली , त्यानंतर डेव्हीड आणि मायकलच्या परिवारा सोबत वीकएन्डला दुसर्‍या सिटीत , समुद्रकिनारी फिरुनही आलेत , पण एवढ्यात तिला जाणवले होते , शंतनू तिच्या जवळ,,,जास्त येत नव्हता आणि शक्यतोवर चुप राहायचा .

दुसर्‍या दिवशी पहाटेच ती ऊठली पण शंतनू तिच्या आधीच ऊठून फिरायला गेला तिला कळले सुद्धा नाही , ती भराभर घर आवरुन नाश्ता बनविला तयार होऊन ती शंतनूची वाट बघत बसली तेव्हढ्यात फोन वाजला , पलीकडून शंतनू होता अगं मी आॅफीस च्या कामाने बाहेर आलोय , हॅ ,,कस काय गेलास तू मला न सांगता,,,तयारी कधी केलीस,,,मला ऊठवल का नाही ? अरे सांगून गेला असतास की ? काय झाल शंतनू,,? हो हो बाबा चुकलो मी i am extremely sorry yar ,,,अगं तू किती गाढ झोपेत होतीस , मला तुझी झोप मोडवेना म्हणुन तुला नाही ऊठविले , तशीही मी रात्रीच बॅग भरुन ठेवली होती दुसर्‍या बेडरुम मधे , तेव्हा तू टिव्ही बघत होतीस , मग थकल्यामुळे मी लगेच झोपलो तुझ्याशी बोलन झालच नाही,,,,!

बरं , तू कधी येशील परत ? 

ऊद्या किंवा परवा ,

काय,,, अरे ,,,मी कशी राहू एकटी ,,

काय होते गं , काही भीती नाही तिथे ,, वाटल्यास मार्केट मधे जाशील,,रमव मन कसेतरी , मी लवकर यायचा प्रयत्न करतो , म्हणत त्याने फोन ठेवला , 

आता तर तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले , 

अस कस करु शकतो हा , मी एवढ्या गाढ झोपेत होते की ह्याची चाहुल सुद्धा मला लागली नाही , 

गाडीचा आवाज आला नाही,,

कसा काय मला न सांगता जाऊ शकतो,,,?

शेवटी तिला त्याचे बोल आठवलेत फोनवरचे आणि मग तिने स्वतःला शांत केले ,, जाऊदे एकटी राहून बघुया दोन तीन दिवस , सांगीतल्यावरही मला नाहीतरी एकटीलाच घरी राहणे होते ना ,,,जाऊ द्यात म्हणत तिने विचार झटकलेत .

जेवण खाण झाल्यावर घरात ती बोअर झाली , चल थोडी पायपीट करते , दार लाॅक करुन ती रस्त्याने निघाली , hello how are you,,,जे ओळखीचे ही लोकं नव्हते त्या लोकांच्या हसुन बोलण्याचा तिला फिरता फिरता जाम कंटाळा आला , काय हे लोकं यार ,, पाहील की हॅलो म्हणतात विचारपुस करतात , आमच्या भारतात या म्हणावं अनोळखी असतील तर बारा वाजलेले असतात प्रत्येकाच्या चेहर्‍यावर,,,

चल माॅल मधेच जाते ,,

हे hello sheena how are you ,,,, 

इथे कशी काय ,,,काही खरेदी करायची आहे ? 

अगं सोफी बोअर झाले घरी म्हणुन timepassसाठी आले माॅल मधे ,,,मग दोघीही थोड्या फिरल्यात गप्पा करत ,, तेव्हढ्यात तिचं लक्ष एका ठिकाणी दोन मुलं एकमेकांना किस करत होते तिकडे गेले , 

हे काय गं हे सोफी ,, ह्यांना लाज वाटते की नाही,,

आधी मुलमुली असे खुलेआम किस करायचे 

आणि आता तर हे मुल मुलं , मुली मुली ,, 

काय गं कस वाटत ना बघायला , ती रागाने त्यांच्याकडे बघत म्हणाली , हे शीना आता तर गे लोकांना मान्यता मिळाली आहे गं , एवढं काय त्यात आणि तू का राग करतेस त्यांचा ?

अरे का नाही राग करु , जे नॅचरल आहे ते आहेच ना ? 

अगं ही काय नवरा बायकोची जोडी होणार का ? 

कसे होणार गं ह्यांच ,,, चिंतेन शीना म्हणाली ,

पण मग तू,,,सोफी ने मधेच वाक्य सोडलं,,,

काय म्हणायच तुला सोफी ? तू म्हणजे काय ?

काय म्हणायच आहे तुला ,,,?

हे शीना तुझ्या नवर्‍याला विचार ?

काय,,,? त्याला का विचारु ? सांग मला सोफी , 

तू त्याच्या बेस्ट फ्रेंडची डेव्हीडची बायको ,

नाही म्हंटल तरी तुझी आज्जी भारतातलीच मग तुझे विचार असे कसे ?

अगं त्यात काय मोठी गोष्ट आहे , इकडे तर तुला खुप अशी जोडपी दिसतील , लेस्बीयन पण आहेत , घरातून फारसा विरोध इकडे होत नाही , काय वाईट त्यात , तुला आवडत नसेल तर सोडायच ना ! 

हे तू काय बोलतेस कळत नाहीये मला ,, काय म्हणायचं काय आहे तुला ,, हे बघ माझ्या पहील्या बाॅयफ्रेंडपासुन मला माईक झाला , पायाने अपंग आहे तुला माहीतच आहे , नंतर मला डेव्हीड भेटला माईक कडे बघुनच त्याने मला प्रपोज केले पण त्याने सांगीतले होते तो गे आहे , मला ही घराची माझ्या मुला च्या इलाजासाठी मदत हवीच होती म्हणुन मी डेव्हीड सोबत लग्न केले , मग तुझा दुसरा मुलगा डेव्हीड चा की ? 

शीनाने अचंबीत होत म्हंटले , 

अगं तो त्याच्या पहील्या बायकोपासुन झालेला ,

पण त्याच्या बायकोला गे असल्याचे कळल्यावर तिने मुलाला त्याच्याजवळ सोडून निघुन गेली , 

डेव्हीड आणि माझी दोघांचीही गरज पुर्ण झाली , 

मग तुला शंतनू ने सांगीतले असेलच नाही का ? 

तिने प्रतिप्रश्न केला शीनाला ,

शीनाला पुढच काहीच ऐकायच नव्हतं ,, तिला चक्कर यायला लागली तसे सोफी ने तिला पकडले , असे कर चल माझ्याघरी , नंतर तुला पोहोचवुन देते मी घरी , मला माईकचा फोन आला त्याला काही प्राॅब्लेम आहे , चल घरी ,,,,

तिने कार मधे शीनाला बसविले आणि घरी घेऊन आली ,, शीना तर काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती , मला काय माहीती मिळणार आहे आता ,,,नाही नाही देवा अस काही नसणार ,,हनीमून तर आमचा झाला ,, कुठेच तर कमी नव्हती ,,, मग,,,हॅट शक्य नाही,,हे ना इकडचे लोकं,,ह्यांना डोकच नाही,,,काहीही करतात,,,आणि ही सोफी नक्कीच माझ्या शंतनुचा राग करत असेल,,डेव्हीड तिला सोडून ह्याच्या सोबत राहायचा ना कधी कधी म्हणुन अशी बोलली ही ,,,!

आता कुठे तिला समाधान वाटू लागले ,, नाही असच आहे , हिच्या बोलण्याचा विचारच नको करायला,,,गॅरेज मधे गाडी थांबवुन दोघीही आत माईक च्या रुममधे गेल्या , माईकच्या व्हीलचेअरचे एक चाक निखळले होते , त्याला बघताच सोफीने ऊचलुन बेडवर ठेवले आणि शीनाला म्हणाली किचनमधुन पाणी घेऊन ये आणि काॅफी पण बनव आपल्यासाठी ,,,माईक च्या बेडरुम मधुन निघाल्यावर तिला हसण्याचे आवाज आले ,, वरच्या मजल्यावरुन , व्वा रे वा हा डेव्हीड वर आणि मुलगा खाली व्हीलचेअर वरुन पडला त्याची त्याला फिकर नाही की लक्ष नाही , कसा माणुस आहे हा , थांब जरा सुनावतेच त्याला जरा , ती रागातच जीना चढुन वर गेली हसण्याच्या आवाजाच्या दिशेने आवाज बंद झाला होता , पण बेडरुम ऊघडी होती डेव्हीडची पाठ दाराकडे होती आणि कुणीतरी त्याला मिठीत घेतलेले होते आणि तसेच ते थोडे फिरलेत दुसर्‍याचा चेहरा बघुन आणि तो लिपलाॅक सीन बघुन तिच्या पायाखालची जमीनच सरकली !

शंतनू,,,,,,आणि धाडकन ती खाली पडली ,

जाग आली तेव्हा तिचे डोके जड झालेले होते , पडल्यामुळे डोक्याला लागल होत , तिने हळुच मान कलती करुन बघीतले , डेव्हीडच्या हाॅलमधल्या सोफ्यावर ती झोपलेली होती , डेव्हीड सोफी आणि घाबरलेला शंतनू तिच्याचकडे बघत होते , शंतनू कडे बघुन तिचा राग ऊफाळुन आला,,,म्हणुनच तू माझा स्पर्श टाळत होता ,,माणसा ,

अरे काय म्हणू रे तुला ,,,हे काय बघीतले मी,,,मग मुंबईला तर माझ्याशी शरीरसंबंध ठेवलेस,,,

तुला तर हे अस आवडत होत,,,

मग माझ्यासोबत का वागलास असा,,

का धोका दिलास,,,काय करु मी ,,माझा संताप होतोय,,,

अगं शीना ऐक ,,मी तुला सांगणारच होतो ,,,

चुप एकदम चुप , कधी सांगणार होतास ? 

लग्नाच्या आधी का नाही सांगीतलेस , 

अगं आईबाबांनी मला गळ घातली होती लग्नासाठी , 

मी गे आहे हे त्यांना मी सांगू शकलो नाही त्यातच आजोबांची तब्येत बिघडली , त्यांची इच्छा माझं लग्न बघण्याची होती , मन मारुन मला लग्नं कराव लागल. , 

अरे पुरुषा सारखा पुरुष तू काय बोलू रे तुला , तू माझ आयुष्य ऊद्ध्वस्त केलस , मला तुझ्यासोबत राहायच नाही , मला लवकर परत पाठव भारतात ,

नाही तर मी काही करुन बसेन इथे , 

हे शीना ही काही एवढी मोठी गोष्ट नाहीये , काहीच फरक पडणार नाही गं , 

मी कशी राहते ,,,मला वाटल तर मी पण बाहेर जाते ,,,,

अरेरे,,,मला इथे थांबायच नाही मला घरी जायच,,

ती सोफीचे पुढचे बोल ऐकू शकली नाही ,

ती धडपडून ऊठली बाहेर गेली तिच्या मागेच शंतनू निघाला थांब रात्र झाली आहे गाडी काढतो , 

गाडीत शीना बसली आणि गाडी निघाली त्यांच्या घराकडे ,

शीनाने डोळे बंद केलेत , किती आनंदात होते मी , नवरा ,शहर , पॅकेज , सासर , भलमोठ्ठ घर गाडी बघुन हवेत होते मी ,,,,पण नवराच गे निघाला,,,, काय करु ह्या सुखाच,,,

किती खंत करु मी माझ्या नशीबाची,,,,का देवा माझ्यासोबत असे,,,,,,!

शीना काही दिवसात एकटीच भारतात परतली , आधीच सगळी माहीती तिने माहेरी , सासरच्यांना दिली होती , सासरच्यांनी शंतनू सोबतचे संबंध अगदी कागदोपत्री तोडलेत , शीनाने डिव्होर्स घेतला , तिला सासरच्यांनी भरपाई दिली सोबतच मुलाच्या कृत्याची माफी सुद्धा मागीतली ,

शंतनू ने वेळ मारुन न्यायसाठी लग्न ऊरकवले म्हणजेच फक्त timepass करायचा होता त्याला .

पण ह्या घटनेची खंत मनात ठेऊनच तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला .

का ? काय आहे हो " गे " किंवा " लेस्बियन " संबंधामधे !

जे नैसर्गिक भिन्नलिंगी संबंधाचे आकर्षण ते अगदी योग्य आहे !

मग हे काय ,,,? 

मला जुन्या विचारातील चांगल्या गोष्टी आणि नवीन विचारांच्याही चांगल्या गोष्टी नक्कीच आवडतात !

पण हा प्रकार ,,, नाहीच पटत !

काहीही म्हणा !

संगीता अनंत थोरात

14/06/2021

०००००००

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now