खंत मनातील - स्त्री

We all must have gone through these experiences in our lives. At times we even fail to realise our own mistakes...In the process, differences crop up and we hurt our own people.. Read these series of episodes with a positive mind and try to underst

! स्त्री,,,,,, !

आई मला नाही करायच लग्नं , 

सांगीतले ना एकदा ! म्हणून सीमा आतल्या रुम मधे गेली , 

पाठोपाठ आई ही आली , असे का बरे बोलते गं , एवढातर छान मुलगा आहे , घरदार छान आहे , नोकरदार आहे , अजून काय पाहीजे तुला ! आणी बाबांच्या समोर काही बोलू नकोस तुला आताच सांगते ,

हे ना असेच आहे , मनात नसेल तरी करायचीच कामं सगळी , काय तर बाबांच्या धाकामुळे , पण मी आता ऐकणार नाही ! नाही म्हणजे नाही ,

आई अगतीक होऊन तिला म्हणाली , सीमा बेटा मला एक सांग , तुला कोणी दुसरा पसंत आहे का ? 

नाही ना आई कोणीच नाही ,

मग तू ह्या स्थळाला नाही का म्हणते ? 

आई ने काकुळतीला येत म्हंटले , 

बोलना बेटा कारण सांग मला तू , 

मग माझी जबाबदारी बाबांना सांगायची !

एक क्षण भर थांबून मग सीमाने निर्धार केला , 

आता बोलायलाच पाहीजे , " आई मला तो मुलगा आवडला नाही , दुसरे म्हणजे मला बाबा आणि तुझ्यासाठी काहीतरी करुन दाखवायचे आहे " 

अगं काय नाही आवडल तुला ? 

तो सावळा आहे , म्हणून मला आवडला नाही ? 

सीमा खाली बघत म्हणाली , 

अरे बापरे मला वाटले अजून काही आहे का ? 

थोडस हसतच आई म्हणाली , 

अगं बाई नाही म्हणायला हे काय कारण आहे !

आता तू लक्ष देऊन ऐक , तुला अजून एक लहान बहीण आणि भाऊ आहेत , आपली फक्त चार एक्कर जमीन आहे , 

त्यात किती राबतात तुझे बाबा , 

प्रसंगी दुसर्‍यांच्या शेतात ही मजूरी करतात ,

तेव्हा कुठे तुम्ही पोटभर जेवण करता आणि शाळेत जाता , आपल घर बघं दोन खोल्यांच आहे , छप्पर ही गळकं आहे , माझ्या साड्यांचे हे ठिगळ बघ , हे बाबांचे कपडे बघ किती ठिकाणी शिवले आहेत ते , 

असे असूनही एवढ्या श्रीमंत घरवाल्यांनी तुला मागणी घातली , 

आणी तू रंग बघत आहेस ? 

नाक डोळे बघ किती तेज आहेत त्या मुलाचे , 

शिवाय मुलगा कित्ती शिकलेला , बँकेत मॅनेजर , बंगला , गाडी आहे , काम करायला बाई माणस आहेत त्यांच्या घरी , 

आणी का ग माझा रंग कोणता आहे बेटा ? 

तिच्या कडे रोखून बघत आई म्हणाली तशी सीमा चपापून आईकडे बघायला लागली , 

माझा रंग तर काळा आहे गं बाई ! 

तुझे बाबा गोरेपान आहेत , डोळे घारे आहेत त्यांचे , 

तुझे रुप बाबांसारखे आहे ! 

तू जर माझ्या सारखी दिसायला असती तर ? 

अगं तुझ्या बाबाने तर मला पाह्यला बरोबर होकार दिला होता ! आणी तू,,,, ! 

म्हणत सीमाची आई प्रश्नार्थक नजरेने तिच्या कडे बघायला लागली , आणि हो आम्ही एवढेही गेलेलो नाहीये की मुलीच्या कमाईवर अवलंबुन राहू ,

सीमा आता चुप झाली होती , 

ती विचार करायला लागली , 

आई म्हणते ते बरोबर आहे , 

आपण काय त्याचा रंग रुप बघतोय , 

मला तिथेही शिकता येईलच की !

बरं ठिक आहे आई , 

तुम्हाला जे ठिक वाटेल ते करा , खाली बघत सीमा म्हणाली , 

तशी खुश होऊन आईने तिला मिठीच मारली , 

माझी गुणाची ती गं बाई ! 

आई बाबांच मन कळतय ना तुला ? 

किती दमछाक होते बाबांची घरदार चालवताना , 

छोटी चे पण तर करावे लागेल ना दोन वर्षांने लग्नं आणी जीवन ला अजून खुप शिकायचे आहे ! 

त्याला पण साहेब बनायचे आहे !

बर मग माझ्या शिक्षणाच काय ? सीमा म्हणाली

अगं त्यांना वाटल तर ते शिकवतील ना बेटा तुला , 

एवढे शिकलेले लोकं तर आहेत ! 

अच्छा म्हणजे त्यांना वाटल तर , 

आणी मला वाटतं म्हणून नाही का ? 

अगं बाई अशी बोलण्यात गुरफटू नकोस मला , 

माझी गुणाची पोरगी , तिथे लग्न होऊन गेलीस की तुला मग शिकायची पण गरज पडणार नाही !

माझी राणी बेटी महाराणी बनून राहील तिथे !

तो एकुलता एक आहे ! मग तर माझी मुलगी ओळखायलाच येणार नाही ! 

तेव्हढ्यात सीमा चे बाबा आलेत , 

आईने आनंदाने त्यांना म्हंटले , अहो किरण रावांकडे निरोप पाठवा होकाराचा !

अस्स काय ! अहाहा बेटा किती आनंदाची बातमी दिलीस तू , मी अस करतो ऊद्या जातो त्यांच्याकडे , 

बोलूनच येतो पाव्हण्यांसोबत !

आणी हो बाबा मला पुढे शिकायचे आहे ते आधी त्यांना सांगा ! अरे पोरी अशी अट थोडीना घालायची असते ! 

लग्न झाल्यावर मग बोलशील पाव्हण्यांसोबत मला खात्री आहे ते तुला पुढे शिकवतील !

आम्ही बोलणं बर वाटणार नाही ! 

मग आई कडे वळून सीमाचे बाबा पुढे कशी तयारी करायचे त्या विषयी बोलू लागले आणी सीमा भिंतीला टेकून खाली बसत दारातून बाहेर वर दिसणार्‍या आकाशाकडे एकटक बघत बसली,,,,,!

सीमा अभ्यासू मुलगी आणि आईवडीलांसाठी काहीतरी करुन दाखवायची ऊर्मी तिच्यातही होती , पण,,,,,

आधी नेहमीच मुलींची गळचेपी व्हायची,,,आता जरा काळ बदलला,,,,पण परिस्थिती पुढे काहींना आजही तडजोड करावी लागते,,,,आपल्या मुलींना समजून घ्या,,,,,!

आईवडील जर समजणार नाहीत , तर बाहेरचे समजतील का तिच्या मनाला ,,,,!

००००००

🎭 Series Post

View all