खंत मनातील - नाते.. प्रेमाचे..?

We all must have gone through these experiences in our lives. At times we even fail to realise our own mistakes...In the process, differences crop up and we hurt our own people.. Read these series of episodes with a positive mind and try to underst

हॅलो अर्णव आज माॅल मधे भेट मला 7 वाजता , अगं आज आॅफीसमधे मिटींग आहे , आज नाही भेटता येणार , कारण रात्री किती वेळ लागेल माहीत नाही , कट्,,,,

फोन कट झाला ,,, अरे आला हिला राग,,, काय कराव माणसाने,,,आजकाल शर्वरी बघाव तेव्हा तणतणत असते ,

पण ठिक आहे , ऊद्या तिचा राग घालवतो , ऊगाच का एवढ्या वर्षाचे नाते टिकले आहे , ती समजते मला , शेवटी मी आमच्या भविष्यासाठीच तर मेहनत घेतोय ना ? आणि तो आपल्या कामात बीझी झाला .

रात्री मिटींग आटोपल्यावर अर्णव ने शर्वरी ला साॅरी चा मेसेज पाठवला , तिने बघीतला पण नो रिप्लाय , सोबतच पुढचा मेसेज होता , ऊद्या आपण भेटतोय संध्याकाळी , माॅल मधे नको , " Tip Top " हाॅटेलमधे भेटुया , नेहमीच्या ठिकाणी , ये 7 वाजता , वाट बघतो , मेसेज शर्वरीने बघीतला पण , नो रिप्लाय ! आताशा असच होतय , पण ती येते न चुकता , पक्की गाँठ आहे बाबा ,,, सात जन्म घेतल्यावरच सुटली तर सुटली ,,,,! हसूनच अर्णव बोलला , चला झोपा आता सकाळी लवकर ऊठायच आहे , पुन्हा मिटींग आहे , त्याची तयारी करायची आहे , चलो अर्णव शुभरात्री .

दुसरा दिवस अर्णव चा धावपळीत गेला , पण आज त्याने शर्वरीच्या आधी पोहोचायचेच ठरविले होते , सहा वाजताच त्याने काम आटोपले आणि राहीलेल काम तो ऊद्या लवकरच आॅफीसात येऊन करेल असे टीम मेट ना सांगून लगेच बाहेर पडला , चला फायनली आज आपण शर्वरीच्या आधीच पोहोचणार , त्याला खुपच आनंद झाला होता , तिच्या सगळ्या तक्रारी आज दूर करतो , बस माझ्या ह्या प्रोजेक्टवर सही झाली की मी मोकळा ऊद्यापासून , आधी तिला फ्लॅट बघायला नेतो , तिला आवडला तर बुकच करतो , गाडी तर घेतलीच आहे , स्वतःचा फ्लॅटच पाहीजे होताना ,,,! घ्या म्हणावं आता आणि लवकरच लग्न करतो , आज तिला प्रपोजच करतो , अरे ! अंगठी राहीलीच की , बरं अस करतो , तिला नेतो दुकानात तिच्याच पसंतीने घेतो ,,, हाँ हे ठिक आहे ,,, अर्णव भलताच खुश होता , आॅफीस चा महत्वाकांशी प्रोजेक्ट त्याच्याच देखरेखीखाली सुरु होता गेल्या चार पाच महीन्यांपासून , 

त्याने हा प्रोजेक्ट यशस्वीरीत्या तडीस नेला तर , 

प्रमोशन , पगारवाढ , फ्लॅटसाठी लोन , सगळ्याच गोष्टी सोप्या होणार होत्या नाही झाल्याच होत्या .

चला आलं हाॅटेल , घड्याळ बघीतली त्याने पावणे सात ,,,! व्वा वेळेत आलो , ती येईलच बरोबर सात वाजता , मग गाडी पार्क करुन तो नेहमीच्या टेबलवर बसला , आज थोडी गर्दी कमी होती , चला निवांत बोलता येईल शर्वरी सोबत , त्याने पुन्हा घड्याळ बघीतली , सात तर वाजलेत , ही आज कशी काय लेट , अस कस , ती नेहमीच दहा पंधरा मिनीटे आधी येते किंवा ठरलेल्या वेळवर , मग आज ,,, अरे 7 : 10 झालेत , अरे,,, त्याला आता कससचं वाटायला लागलं,,, फोन करतो तिला ,,, त्याने लगेच मोबाईल काढून तिचा नंबर डायल केला ,,, त्याच्या जवळच रिंग वाजल्या बरोबर दचकलाच अर्णव ,,, अरे ,,, शर्वरी आलीस,,, तिला आलेली बघून हायस वाटल त्याला,,, मी घाबरलोच होतो गं शरु ,,, यार अस नको करु कधी ह्यानंतर , तू आधीच येतेस ना ,,, मग आज का ऊशीर झाला,,,, त्याने घाम रुमालाने पुसत तिला विचारले,,, काहीच ऊत्तर आल नाही ,,, तसे त्याने तिच्या चेहर्‍याकडे बघीतले,,, काय झाल शरु , साॅरी ना,,, ह्या नंतर तुला हव तसच होणार सगळ , आपल स्वप्न पुर्ण होणार आता , हस गं जरा , चुप बसलेली तू बरी वाटत नाही ,,,,

प्रेमाने त्याने तिचा हात हातात घेतला,,,,ओ. के.

हळूच आपला हात सोडवून घेत शर्वरी म्हणाली , ऐ अस काय गं , त्याने पुन्हा तिचा हात हातात घ्यायचा प्रयत्न केला ,,, अरे थांब जरा , आपला हात मागे घेत शर्वरी म्हणाली ,,,

हो हो मला बोलू दे की आता,,,,

बरं बोल शरु,,, तू जे म्हणशील ते ,,, मी आपल्या नेहमीच्या पदार्थांची आॅर्डर दिली आहे ,,, तो पर्यंत बोलू आपण , बोल ,,!

शर्वरीने एकदा त्याच्याकडे बघीतले , मग थंडपणे बोलली , 

व्वा आज तर फारच प्रगती झाली आहे तुझी , अगदी सगळ्या गोष्टी वेळेत केल्यास की , 

बघ टोमणा नको मारु ना यार,,, आपल्या भविष्यासाठीच करतोय ना ,,, तू थांब जरा बोलू नकोस आज , माझ ऐक गं,, 

हो तुझ ऐकायच आहे रे मला,,,, 

बरं आधी प्लीज माझ ऐकुण घे ना,,, तिची बोलायची वाट न बघताच तो म्हणाला , गाडी तर घेतलीच होती , आता ऊद्या आपण फ्लॅट बुक करु , आणी मग तू म्हणशील तेव्हा लग्नं,,,! आनंदाने तो तिच्या चेहर्‍यावरील भाव बघू लागला , 

तिच्या चेहर्‍यावर हास्य होत,,, त्याला हायस वाटल,,, 

बरं ह्यावर तुला काहीच बोलायच नाही,,, तो हसून म्हणाला ,, हो बोलायच आहे रे,,, खुप खुप आनंद झाला मला हे ऐकुण ,, मी तुझ्यासाठी खुप खुश आहे,,, 

हो ना ,,,! मग दचकुन म्हणाला,,,काय म्हणालीस ? माझ्यासाठी,,,,! अगं राणी आपल्यासाठी म्हणं,,, 

नाही आता आपल नाही,,, तुझ आणि फक्त तुझ,,, 

ए अशी काय बोलतेस ,,अजून राग गेला नाही वाटत तुझा,,, 

अरे कुठे काय ,, नेहमी नेहमी तेच ते , मी रुसायच , रागवायच , पुन्हा ये रे माझ्या मागल्या,, किती दिवस चालणार होत हे,,, गंभीर होत शर्वरी म्हणाली,, 

आता मात्र अर्णव घाबरला,, हे काय बोलतेस तू शरु,, 

हे बघ मला घाबरवू नकोस गं,,, तुच माझ जीवन आहेस,,सर्वस्व आहेस,,काॅलेजपासून फक्त तुझ्यावरच प्रेम केलय,,ते आत्तापर्यंत , तुझ्या घरचे म्हणायचे ना स्थिरस्थावर हवा मुलगा,,,

माझी घरची परिस्थिती बेताचीच , म्हणून तर एवढी मेहनत करत होतो , आता मी त्या लायक बनलोय , तुम्हाला हवा तसा,,,,! तू एवढे वर्ष मला साथ दिलीस , आता वेळ आली आहे आपली एकत्र येण्याची , मग हे काय मधेच ? तू गंम्मत तर करत नाहीयेस ना ? हो गंम्मतच ना ?

तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला , 

ती शांत होती , मग त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली , 

अर्णव मी तुला कधीही प्राॅपर्टीसाठी काहीच म्हंटले नाही , 

तू जाॅबला लागल्यावर मी तुला म्हणाले होते आपण लग्न करु , पण तुला माझ्या घरच्यांच्या नजरेत भरायच होत , मी वारंवार तुझ्या मागे लागली ,, पण तू ऐकल नाहीस , प्रत्येक वेळेस मला गृहीत धरलस , वेळ झाला ! काय होत शर्वरीला थांबायची सवय आहे,, आज भेटू आपण , मी तासंनतास वाट बघतेय आणि तू चक्क मला विसरतोस,,,!

त्यावर फक्त साॅरी,,,! किती वेळा आपण मनमोकळे पणाने भेटलो,,, आठवत का तुला ? ती त्याच्या कडे बघत म्हणाली , मी सांगते , जेव्हा काॅलेजमधे होतो तेव्हाच आपण मनमोकळेपणाने भेटलो , एकमेकांसाठी जगलो,,, 

तिथून बाहेर पडल्यावर तू तर मला एकटेच पाडलेस,,, 

गाडी , घराच्या नादात,,! 

मी म्हणाले होते तुला ,, आपण मिळून नंतर घेऊया ह्या सर्व गोष्टी,,, पण तू कधीच ऐकल नाहीस,,,!

तुझी गाडी , घर तुला लखलाभ ! मी माझा रस्ता तुझ्यापासून वेगळा निवडला,,,! 

म्हणजे,,,? न कळुन अर्णव म्हणाला ,

ये सुबोध इकडे,, तिने बाजूच्या टेबलवर बसलेल्या मुलाला आवाज दिला,,, तो त्यांच्या जवळ येऊन ऊभा राहीला,,, 

अर्णव हा सुबोध , तू ओळखतोस ह्याला,,, मला जेव्हा ही तुझी गरज असायची ,, तेव्हा तू नाही सुबोधने माझी काळजी घेतली,,,आपल्या सोबत काॅलेजमधे होता हा,,,आपल्या ग्रुपमधे,,,मी फार ऊशीरा त्याच्या प्रेमाला ओळखले,,,,गेले तीन महीने मी तुला हेच सांगायचा प्रयत्न करत होते,,,पण तू सतत घाईत होता,,,यंत्र झाला होतास,,,,I आता तुझ्याकडे खुप काही आहे , खुप छान मुलगी मिळेल तुला,,,all the best , मला विसर,, एवढेच म्हणेन,,, I am sorry,,, मी म्हणते तुला आता,,,सांभाळ स्वतःला,,,!

तिने एक नजर अर्णवला बघीतले ,, आता आपण भेटणार नाही ह्यापुढे,,,,गुडबाय,,,अर्णव !

सुबोध आणि शर्वरी ला जाताना तो किंकर्तव्यविमुढ बघतच राहीला,,,,!

आपल्या जवळच्या व्यक्तिला भौतिक सुख देताना आपण तिच्या ह्रदयातून तर हद्दपार होत नाहीये ना,,,? विचार करावा,,,

०००००

🎭 Series Post

View all