खंत मनातील - मैत्री काचे सारखी

We all must have gone through these experiences in our lives. At times we even fail to realise our own mistakes...In the process, differences crop up and we hurt our own people.. Read this series of episodes with a positive mind and try to understa

! मैत्री काचे सारखी !

जतीन आणि सीमा खुप चांगले मित्र , अगदी बालवया पासून , एकाच शाळेत शिकायचे पुढे जतीनने इंजीनियरींग ला अॅडमिशन घेतली , सीमा ने फॅशन डिझाईनचा कोर्स करायचे ठरविले , खरे तर एकाच बिल्डिंग मधे राहणारे , शेजारीच म्हणाना , एकमेकांच्या घरी सुद्धा बिनदिक्कत येणेजाणे त्यांचे , आईवडीलांना दोघांच्याही मैत्रीचे विशेष कौतुक होते , 

कोर्सेस वेगळे झाल्यामुळे आता दोघांनाही जास्त वेळ नाही मिळायचा भेटायसाठी आणि आता त्यांच्या मित्रांमधे अजून नवीन मित्रांची भर पडली .

दोघे ही आपआपल्या काॅलेजमधे रमले , पण कुठेतरी एकमेकांना मिस करायचे , फोनवर बोलणे व्हायचे , मेसेजेस पाठविले जायचे , कधीतरी बिल्डींग खालीच भेट व्हायची , बोलणे व्हायचे , काॅलेजच्या गमती जमती सांगीतल्या जायच्या ,

पुढे अभ्यासाचा व्याप वाढला , दोघांमधील संपर्क कमी झाला , एकदा सहजच त्याचा डिपी बघून सीमाला त्याच्याशी बोलावेसे वाटले , म्हणून तिने काॅल केला , हॅलो जतीन कसा आहेस ? डीपी तर एकदम टकाटक आहे तुझा , ती गिटार हातात , भारीच वाटतोस रे , rock star वाटतोस यार !

बस तुझ्या काॅलेजच्या मुलीतर फिदाच झाल्या असतील तुझ्यावर , काय मस्त हेयर स्टाईल केली आहेस , वा मस्तच !

ओ हो आज आरामात आहेस वाटते , बर्‍याच दिवसानंतर आपण बोलतोय , हो ना यार , अरे नवीन नवीन डिझाईन मधे डोक लावाव लागतं , मग काय सतत तेच विचार असतात , डिग्री छान घ्यायची आहे मला ,,, इथे माझ्या टॅलेंटला वाव मिळतोय,,,,आणि हो तू पण सीरीअसली अभ्यास कर,,,ते बाहेरचे छंद तर जोपास पण चांगल्या तर्‍हेने डिग्री घे बरं,,, हो ग बाई ,, अभ्यास पण सुरुच आहे ,, आणि हा थोडा टाईमपास करतो,,,, ए टाईमपासच्या नादात टाईम निघून जाईल,,, भरकटू नकोस ,,, आपल ठरल होत ,,, बाकीच्या मुलांसारख आपण फक्त टाईमपास करणार नाही,,, आईवडीलांना काहीतरी करुन दाखवायचे,,,,हो की नाही,,!

yesss आहे लक्षात , ए कोणाशी बोलतोस , मधेच सीमाला आवाज आला , सीमा आहे ! ए कोण रे ती जतीन ?

अग थांब मी थोड्या वेळाने बोलतो म्हणत जतीन ने फोन बंद केला , तुला किती वेळा सांगीतले , मी सोबत असताना दुसर्‍या कुणाचाही काॅल घ्यायचा नाही , अगं ती माझी बालमैत्रिण आहे , शेजारीच राहते , ते मला माहीत नाही , माझ्या शिवाय तुझ्या जीवनात अस हे बाल पणीची मैत्रिण वगैरे चालणार नाही , ते तिकडे बाजूला ठेव , आणि काय रे शेजारी असल्यावर इथे काॅलेजमधे फोन करुन बोलायची काय गरज आहे ? काय आहे काय तिच्या मनात ! हे बघ सिया माझ्याकडून अस काही नाही , तिच्या मनातल मला माहीत नाही ! 

काय ,,,? म्हणजे नक्कीच काही तरी गडबड आहे , 

अगं नाही गं ,, हसतच तो म्हणाला , 

नाही , काय ते एकदाच क्लीअर सांग मला ? 

आपण लगेच वेगळे होऊ ,,! अगं बाई मी गमतीने बोललो गं , तुझी रिअॅक्शन बघायची होती , 

बघ हाँ जतीन खोटा बोललास तर,,, अगं खरेच सांगतो , 

ती कुठे आणि तू कुठे ,, अच्छा ! 

हो गं , वो किस खेत की मुली है भई , मेरे सिया के सामने ! गंम्मत अंगलट यायच्या आधी जतीन ने सांभाळून घेतले , 

तरी ही ती प्रश्नार्थक नजरेने जतीन कडे बघू लागली , 

ए सिया तू पण ना , ठिक आहे बाबा , तू सोबत असली की बस तुझ्याकडेच लक्ष देणार , नो फोन काॅल्स ! 

बाय दि वे सीमा खुप चांगली मुलगी आहे , 

बस हाँ ! चॅप्टर बंद कर तिचा ! चल कॅण्टीन मधे , 

ती बेंचवरन ऊठत म्हणाली , पुन्हा माझ्या समोर तिच नाव घ्यायच नाही , समजल !

ती तावाने समोर गेली , तिच्यामागून जतीन घाईघाईने गेला कॅण्टीन मधे .

संध्याकाळी जतीन घरी परतला , अचानक त्याला सिया येताना दिसली , हे,, ए,, सिया ,, बघ आजच खुप दिवसानंतर बोललो , आणि आजच आपली भेट झाली , 

बरं कशी आहेस , हसतच जतीन ने शेकहॅन्ड करायला हात पुढे केला , 

अरे माझे हात खराब आहेत , म्हणून त्याला डावलून सीमा चालायला लागली , 

हे,,हे,, सीमा अरे यार किती दिवसानंतर आपण भेटलोत आणि अशी काय घाईने घरी चाललीस , बस थोडा वेळ , इथे बेंचवर बसुया ! 

नको मला घरी जायच आहे , बाय !

हे,,, तो धावतच तिच्या समोर येऊन ऊभा राहीला , अगं तू अशी काय करतेस , बोलत का नाहीये ? 

आणि तुझी तब्येत बरी नाहीये का ? त्याने कपाळाला हात लावत तिला विचारले , 

खुप झालं तुझ नाटक जतीन ! 

खबरदार ह्या पुढे माझ्याशी बोलला तर ,,,! 

अरे , काय झाल तुला आणि अशी का बोलतेस ,, 

त्याने तिचा हात पकडत म्हंटले , 

त्याच्या हाताला झटका देऊन रागाने ती म्हणाली , 

तू दुपारी काॅल बंद करायला विसरला होतास ,,,!

ह्या नंतर आपल्या मैत्रीला विसर तू,,,,!

आणि मुकाट्याने ती आपल्या घरी परतली,,!

जतीन शाॅक लागल्यागत तिथेच थबकला ,,,

अरे ! हे काय झाल ! 

गंम्मत अंगाशी आली , बालमैत्रीण दुरावली !

कोणत्याही कारणाने मैत्रीत गैरसमज झालेत तर पहील्यासारखी मैत्री पुन्हा होने नाही,,,,

आणि मित्र मैत्रिणींनो एक संभाषण झाल्यावर मोबाईल डिस्कनेक्ट केला का ? चेक करणेच ऊत्तम,,,,

००००००

🎭 Series Post

View all