खंत मनातील - मातपिता

We all must have gone through these experiences in our lives. At times we even fail to realise our own mistakes...In the process, differences crop up and we hurt our own people.. Read these series of episodes with a positive mind and try to underst

! मातपिता !

अरे कधीची काॅल करतेय ! कुठे आहेस तू ? 

अगं आई मी कामात होतो आणी फोन ही सायलेंट मोडवर होता , म्हणून समजलेच नाही , 

बरं तू सांग काय म्हणतेस , कशी आहेस ? पप्पा कसे आहेत ? हो तुझे हे बरे आहे , स्वतः फोन करणार नाही , मी केला फोन की तुला आमच्या तब्येती आठवतात !

काय बाबा आमच जीवन एकुलता एक लेक , दुसर होऊ नाही दिल , एकालाच चांगले वाढवू म्हणून , आणी बघ ना आपल्याच पायावर धोंडा मारला , 

एक ग्लास पाणी ही मिळत नाही लेका कडून ,

अगं आई काय गं तू , हे असच असत ! 

तुझ्याशी बोलणे म्हणजे दगडावर डोके आपटणे , 

म्हणून , म्हणूनच मी तुझा काॅल घ्यायला कचरतो , 

अगं किती प्राॅब्लेम असतात ग ! तू पण समजून घेत नाही मला , 

तुला जर असेच शब्दा गणिक टोमणे मारायचे असतील ना ! तर मला काॅलच नको करत जाऊ ! 

वैतागून पियुष म्हणाला आणी फोन कट केला , 

एकक्षण आई त्याच्या बोलण्याने दुखावली , 

पण त्याचे दुखरे बोलणे लगेच तिच्या लक्षात आले ,

परत त्याला काॅल केला आईने , 

एकदा पियुष ने लक्ष दिले नाही परत तिसर्‍यांदा काॅल आल्यावर त्याने घेतला , 

हाँ बोल काही राहील असेल तर , 

अरे बाबा ! चिडला का रे बाळा ! अरे मी तुला आधीच म्हणाले होते ना ! दिवसातून एक काॅल मला करत जा ! पण तू करतच नाही राजा ! काळजी वाटते ना आम्हाला तुझी ! तुझ्या शिवाय बेटा कोण आहे आम्हाला दुसर , 

नातवाला बघायची खुप इच्छा आहे रे , 

पप्पा तर ऊठता बसता आठवण काढतात , 

काही खायला बनविले की तुझी आठवण येते , 

घास गळ्या खाली नाही ऊतरत रे ,

बरं कसा आहे आमचा आरव ! आई म्हणाली ,

हळवा होत पियुष म्हणाला , छान आहे गं आई आरव , 

खुपच बोलतो , तुम्हा दोघांची खुप आठवण काढतो ,

पण तू सांग ना कशी आहेस ? 

छान आहोत आम्ही दोघेही , 

तू काळजी करु नकोस बेटा ! 

आणी हो , ह्या वेळेस आम्ही तुझ्याकडे येतोय , 

आरव च्या वाढदिवसाला , 

कधी त्याला आणी तुला बघतोय असे झाले आहे , 

येऊ ना बाळा तुझ्याकडे ?

अशी काय बोलतेस आई , ते तुझेपण घर आहे ना ! 

तुम्हीच तर पहीली किस्त दिली आहे , 

तू कधी ही येऊ शकतेस , आणी हो खरेच ये , 

तू आणी पप्पा , मी असे करतो , 

जसा वेळ मिळेल तसेच तुमचे रिर्जेवेशन करतो आणी तुला कळवतो , 

तू राहू दे रे मी पप्पांना सांगते करायला ! 

अगं त्यांना कुठे पाठवते बाहेर , 

मी मोबाईल वरुन करतो ना !

खुश होऊन पियुष म्हणाला ,

ठिक आहे मग , चल ठेव , काळजी घे , बाय ,

बाय दद्दू बेटा , आई ही आनंदाने म्हणाली .

आज खुशीतच पियुष घरी आला , आरव नेच दार ऊघडले आणी डॅडा म्हणत त्याच्याकडे झेपावला , अरे अरे थांब मला फ्रेश होऊ दे , मग तुला घेतो आणी तो बाथरुम मधे गेला , कपडे चेंज केल्यावर आरव ला ऊचलून घेत त्याचा लाड केला आणी इकडे तिकडे बघत , अपर्णा ऐ अपर्णा कुठे आहेस ग ! 

मी आलो , 

हो हो आला मला आवाज , 

माझी मिटींग सुरु होती , नवीनच क्लाइंट होते , 

त्यामुळे फोन घ्यावा लागला , पण आवरले आता , 

अगं फार दमलो गं मी आज भरपुर कामं होती मला , 

आणी सगळी कामे माझ्या मनासारखे झालेत , 

छान कडक चहा दे ना मला , प्लिजsss ! 

हो का , मी पण तर कामातच होती ना गडेsss पण ठिक आहे तुझ्या प्रेमाखातर बनविते , म्हणत अपर्णा किचन मधे गेली , थोड्यावेळाने ती चहा बिस्किट ट्रे मधे घेऊन आली , 

त्याच्या पुढ्यात ठेवत म्हणाली , 

हं बोला महाशय आज काय विशेष , 

दिवसभर काय केलत ! 

अगं हो तुला सांगायचच राहील , 

आज आई सोबत बोलण झाल , 

अच्छा sss काय म्हणतात तुझ्या मातोश्री ! 

अगं आईला ना आरव ची खुपच आठवण आलीये , 

मग मी तिला म्हणालो तू ये म्हणून , 

तिच्या चेहर्‍याचा आढावा घेत हळूहळू पियुष म्हणाला !

अच्छा ss , मग ? 

काही नाही गं मग करतो त्यांच रिर्जेवेशन , 

अच्छा ss म्हणून अपर्णा ऊठून जायला लागली तसे तिचा हात पकडून पियुष म्हणाला , तू काही बोलली नाहीस , 

कश्या बद्दल ? त्याच्या कडे थंड नजरेने बघत अपर्णा बोलली ,

आई , पप्पा येणार आहेत त्या बद्दल ! 

अच्छा ss तुला ना बोलुन काही फायदाच नाही , 

काय झाले अपर्णा अशी काय बोलतेस , 

अरे तुला काही दिवसांपुर्वीच तर सांगीतले होते ना , 

आपण माझ्या ताईच्या परीवारासोबत गोव्याला जाणार आहोत म्हणून ,,,,! विसरलास ?

अरे,,,! माझ्या डोक्यातूनच निघून गेले , ओशाळल्यागत पियुष म्हणाला , 

अगं पण आठ , नऊ महीने झालेत आई पप्पा आपल्याला भेटले नाहीत , 

मग काय होते ? अजून काही दिवस नाही भेटतील त्यात काय , आणी तिकडून आल्यावर तू जाशील ना त्यांच्याकडे भेटायला , 

म्हणजे ? न समजून पियुष म्हणाला , 

अरे हे बघ मागच्या वेळेस ना आईंना माझा स्वयंपाक नाही आवडला , चहा ही आवडत नव्हता त्यांना , 

मग असे करुया एकतर तू जा तिकडे किंवा मग काही दिवस मी आणी आरव आम्ही माझ्या आईकडे जातो ,

मग बोलावं त्यांना इथे ,

अगं पण ,,,!

पियुष चे वाक्य तोंडातच विरले , 

ठिक आहे पियुष मी काहीतरी खायला बनविते , 

आणी ह्या विषयावर मला काही बोलायचे नाही !

पियुष डोक्याला हात लावुन बसला , आता कसे ! 

त्याच्या कानात आईचे मघाचे हळवे बोल गुंजत होते ! 

काय सांगू आईला,,,,,!

छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करु नये , त्यांचा एकुलता एक लेक असूनही त्यांना विचाराव लागतय मुलाला , आम्ही येऊ का तुझ्याकडे ? मला अपर्णाला काहीच म्हणायचे नाहीये , पण,,,आईवडीलांनी घरी यावे किंवा नाही,,,मुळात जवळ राहावे किंवा नाही,,,स्वतःच्या मुलाला त्यांना बोलवताना का प्रश्न पडावा,,,? ही त्याचीच जबाबदारी आहे,,,! 

पण मातृह्रदयी मुली कधी पासुन कठोर वागायला लागल्या,,,!

ह्याला जन्म द्यावा किंवा नाही त्यांनी विचार केला असता तर,,,,,!

०००००००

🎭 Series Post

View all