खंत मनातील - कुरघोडी

We all must have gone through these experiences in our lives. At times we even fail to realise our own mistakes...In the process, differences crop up and we hurt our own people.. Read these series of episodes with a positive mind and try to underst

कुरघोडी

अंग हे फळं असे का ठेवलेत ? ते आईंना खायला दिलेत ,

मग कापून द्यायचे ना ! कळतं नाही का ?

अरे मी दुसर काम करत आहे त्या कापून घेऊ शकतात ना फळं , राहू दे तू तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही म्हणत सारंग ने चाकू ऊचलून फळे कापून प्लेट मधे ठेवुन प्लेट आईकडे सरकवली , खा गं आई , हो म्हणत आईने फळे खाल्लीत . 

स्वातीची आंघोळ सकाळीच ऊरकली होती , 

सारंग तयारी करुन दूध आणि काही सामान आणायला बाहेर गेला , एका तासाने परतला अरे आई तू आंघोळ नाही केली , का गं स्वाती आईला गरम पाणी नाही दिलस टाकून ! 

अरे ते मोठ पातेल ऊचलायला जड जात त्यातही गरम पाण्याची भीती वाटते , अच्छा मनात नसल की कारण तर देशीलच ना म्हणत सारंग ने गरम पाण्याच पातेल बाथरुम मधल्या बादलीत रिकाम केलं , 

ऊद्यापासून त्या छोट्या पातेल्यात पाणी तापव म्हणजे तुला ऊचलता येईल , बरं ठिक आहे .

थोड्या वेळाने स्वयंपाक झाल्यावर स्वातीने सारंग ला आवाज दिला , या जेवायला ताट वाढते , हो येतो !

तोपर्यंत स्वातीने ताटं वाढलीत सारंग हात धुवुन आला , आईला दिला का आवाज ? 

नाही दिला बोलवा तुम्ही तसेही त्यांनी ऐकलच असेल ना ! 

पण तू द्यायला पाहीजे आवाज तिला जेवायसाठी , 

दे आवाज !

बरं बोलावते , 

आई ताटं वाढलेत या जेवायला , हो आलीच म्हणत शारदा आई जेवायला आल्यात तसे बघीतले तर त्या तिथल्याच किचन च्या लगतच असणार्‍या बेडरुम मधल्या खिडकी जवळ ऊभ्या राहून बाहेर बघत होत्या कान मात्र मुलगा सुनेच्या बोलण्याकडेच होते .

जेवणात साध वरण सोबत वरुन घ्यायला तुप , भात , कोशिंबीर , शेंगदाण्याची चटणी , लोणच , चपाती , वांगे बटाट्याची भाजी .

जेवता जेवता शारदा आई म्हणतात आमच्या कडे अस वरण नाही बनवत आम्ही , 

वांगे बटाट्यात तेल टाकल की नाही !

तुमच्याकडे अशीच बनवतात का ? 

ती रात्री भाजी ऊरली होती ना ! आई म्हणाल्या

हो आहे एक वाटी , मग काय तशीच ठेवायची का ?

आण गरम करुन , हो म्हणत स्वातीने भाजी गरम केली , 

घ्या आई , अरे आईला का देते शिळी भाजी , 

तिला डाॅक्टरांनी शिळ खायला नाही सांगीतले , 

तू खा ती भाजी ! बरं म्हणत

स्वातीने मान डोलावुन सारंग कडे बघीतले तो ताटाकडे बघत शांतपणे जेवत होता .

दुसर्‍या दिवशी सारंग ने आपल्या बहीणीला मावस बहीणीला परिवारा सकट जेवायला बोलावले होते म्हणुन आदल्या रात्री स्वातीने मसाला बनवुन ठेवला , 

घर थोड रात्रीच आवरुन ठेवले , 

सकाळी लवकर ऊठून साफसफाई केली आंघोळ केली , 

पीठ मळुन घेतले भात शिजायला ठेवला बस आता मटण आणले की मग भाजी करुया , 

होईल लवकरच मनातल्या मनात तिने कामाचे आराखडे बांधलेत .

दुपारी बहीणी परिवारा सकट आल्यात काही मदत हवी का ? नाही नको ताई बसा तुम्ही बस शेवटच्या सात आठ चपात्या बाकी आहेत स्वातीने हसुन म्हंटले , 

थोड्या वेळाने स्वाती म्हणाली ताई भाजी वाढा ना तुम्ही बाकी मी वाढते ताटात , 

नाही तुच वाढ तुलापण आलं पाहीजे ना !

म्हणत बहीणींनी हसतच अंग काढून घेतलं , 

जेवणामधे दोन किलो मटणाची भाजी , चपात्या , भात कोशिंबीर आणि श्रीखंड सोबतच पनीरची भाजी आणि जेवणारे स्वाती सकट बारा लोकं जेवता जेवता मधुनच ऊठुन स्वाती हवं नको ते बघत होती कुणीही भाजी कशी झाली सांगीतले नाही , 

तुमच्या कडे अशी बनवतात का भाजी म्हणुन स्वातीला विचारण्यात आले ! 

संध्याकाळी चहाची वेळ झाल्यावर चला आता निघतो आम्ही तसे आई म्हणाली अरे चहा पिऊन जा , 

मावस बहीणीची मुलगी म्हणाली मामी थकल्या असतील चला मी करते चहा ! 

लगेच बहीण म्हणाली नको बेटा आपण मामी कडे आलो ना , म्हणुन मामीलाच करु देत चहा तू बस इकडे , 

स्वातीने चहा करुन पाजला सगळ्यांना , 

तुमच्याकडे फिक्काच पितात वाटतं चहा ! 

स्वातीने मान डोलावली .

स्वाती सारंग चे लग्न होऊन जेमतेम एकच महीना होत आला ,

स्वाती सगळ्यांच्या मनात बसायचा विचार करत होती पण तिच्या प्रत्येक वागण्या बोलण्यावर प्रश्नच असायचे .

ननंदेकडे त्यांना जेवायला बोलावले आदल्या दिवशी तसा निरोपच दिला होता ननंदेने , 

आई म्हणाली ऊद्या ताई कडे जेवायला बोलावले आहे बेटा सारंग मग आजच मी ताईकडे जाते नोकरी करते रे ती , 

त्रास होईल तिला कामाचा , 

बरं ठिक आहे आई जा तू ताई कडे , 

ऊद्या लवकर ये ताई कडे हो येतो तू काळजी करु नकोस .

सकाळी ऊठल्यावर सारंगला आठवले आपल्याला बँकेत जायच होतं लाॅकर घ्यायसाठी अगं मी जाऊन येतो तोपर्यंत तू तयार रहा , हो ठिक आहे मग स्वातीने कालचा पडलेला पसारा आवरला नाश्ता केला तिला प्रचंड थकवा जाणवत होता काल जास्तच तिची धावपळ झाली होती , 

सारंगचे दोन मित्र आपल्या बायकांसहीत जेवायला आले होते ,

थोडा आराम करते म्हणत अंग टाकल्या बरोबर तिला झोप लागली , बेलच्या कर्कश आवाजानेच तिला जाग आली , 

अरे तू अजुन तयारीच केली नाहीस , 

हो रे हातपाय दुखत होते माझे डोळाच लागला , 

होते लगेच तयार तोपर्यंत सारंग ही फ्रेश झाला , 

पंधरा मिनीटात स्वाती ही तयार झाली साडी घालुन कारण तिला नातेवाईकांकडे जाताना किंवा घरी नातेवाईक आलेत तर साडी घालावी लागेल हे इंजीनियर नवर्‍याने आधीच सांगीतले होते म्हणुन .

ताई कडे पोहोचल्यावर आई ताई गालं फुगवून , 

मावस बहीण यायची होती , 

लवकरच आली आईने टोमणा मारला ,

आई , सारंग ऊशीरा आले म्हणुन इकडे यायला वेळ लागला , 

अगं आई अर्धा तास आधी आलो असतो पण ही तयारी न करता मस्त झोपली होती ! 

अस्स ,,,, आई ने स्वाती कडे बघीतले .

काय मदत करु ताई , ते काय विचाराव लागत का ?

जा भाजी कर , किती कामं असतात ताईला , 

मुलं सांभाळा नोकरी करा , घरचे कामं करा , 

जरा लवकर आली असती तर तिला मदत झाली असती ना !

मग मुकाट्याने स्वातीने चिकन बनविले तेव्हढ्यात मावस बहीण आली मग मिळुन चपात्या बनवल्या आणि सगळ्यांनी जेवण केले , 

स्वाती ते मोठ्या पातेल्यातले ऊरलेले चिकन छोट्या पातेल्यात काढ आणि घासून घे पातेलं ,

ताईला ऊद्या ड्युटीवर जावं लागेल थकेल बिचारी कामं करुन , बाई पण दोन दिवस सुट्टीवर आहे आई म्हणाली , 

हो करते म्हणत ननंदेचे किचन आवरले तिने ,

खरकटे पाणी फेकायला बाहेर आली असता शेजारीन दिसली , अरे तुम्ही वहीणी का ? हो ,,, व्वा जसे सांगीतले होते करुणाने अगदी तश्याच छान सुंदर आहात , 

तुम्हालाही कामाला लावले का तिने ?

तिला वेळच मिळत नाही घरचे कामं करायला , 

आईंची फार दमछाक होते , सगळे कामं करुणाचे आईच करते ती घरी असली तरी आईच सगळं करते ही मोबाईल मधे व्यस्त असते मुलंही आईच सांभाळते , 

एवढ्यात तुमच लग्न झालं म्हणुन आई आली नाही इकडे , 

बस करुणा बिमार पडायचीच राहीली होती ,

किती घाण करुन ठेवल होत घर तिने , 

काल आई आली आणि सगळ घर तिच स्वच्छ केल बघा !

शेजारणीने तिला माहीती दिली .

लहान दिराचे लग्न सगळी तयारी मोठी सुन म्हणुन स्वातीलाच करायची होती अगदी हळद बनवण्या पासून , 

छोटी मोठी सगळी कामे तिच्याच खांद्यावर टाकलेली , 

जसे जमतील तसे सगळं करण्याचा तिचा प्रयत्न सुरु होता , तरीही घरात सासू ननंदेकडून धुसपुस सुरुच वरुन कमी की काय येणार्‍या पाहुण्यांनाही तिच्यात काही ना काही ऊणीव दिसतच होती ,

सारंग कडून तर तिला अपेक्षाच नव्हती कारण कुणाची तक्रार केल्यास तिच्या समोरच तो त्यांना विचारायचा मग स्वातीलाच तोंड कुठे लपवू वाटायचं !

लग्न छान धुमधडाक्यात साजरे झाले , 

सगळ्या हौसी दिराने , ननंदेने पुर्ण केल्या , 

आई पण खुप आनंदात होत्या घरातील शेवटच लग्न होतं सारंगचे वडील जाऊन सहा वर्षे झाले होते , 

त्या आधी एक वर्षे करुणाताईचे लग्न झाले होते .

नवीन सुनेचं खुप आनंदाने स्वागत करण्यात आले , 

दोन तीन दिवसाने मावसबहीणीने त्यांना जेवायला बोलावले निघताना नवीन वहीणीच्या हातात साडी दिली , 

करुणाताईने काही दिवसाने जेवायला बोलावले ,

दिर म्हणाला हिच्या मैत्रिणीकडे भेटायला बोलावले आहे 

आधी आम्ही दोघे तिकडे जातो मग येऊ जेवायला 

मग सारंग ने आईला म्हंटले तुला आधी पोचवुन देऊ का ताईकडे ? 

का बरं ? नको , आपण तिघेही जरा लवकरच सोबत जाऊ तेवढीच ताईला मदत होईल सगळे ताईकडे गेलेत 

पुन्हा स्वातीलाच भाजी बनवायला सांगीतली , 

चपात्या ताईने लाटायला घेतल्या तसे आई म्हणाली 

तू हो बाजूला स्वातीला करु दे वाटल्यास तू शेक , 

चपात्या करत असता दिर दिरानी आलेत , 

या या हसून ननंदेने स्वागत केले पाणी प्यायला दिले , 

बसायला सांगीतले , मग हाॅलमधे बसुन सारंग दिर दिरानी सासुबाई जावई मिळून गप्पा करु लागले , 

हसत खेळत जेवणं झालीत घरी निघताना लहान वहीणीच्या हातात सलवार कुर्ती देऊन रवानगी करण्यात आली .

स्वातीला तर कळेचना हे असं का ते !

माझ्यासाठी वेगळे नियम आणि लहानी साठी वेगळे नियम का ?

ही पण इंजीनियर पण लग्नानंतर घर सांभाळावे लागेल ही अट तिने मान्य केली होती कारण पॅकेज त्याच चांगल होतं शिवाय ऊंच स्मार्ट होता सारंग म्हणुन पाहताच तिला आवडलेला ,

दिर सुद्धा चांगली नोकरी करत होता तो ही इंजीनीयर सोबत शिकलेल्या आपल्या मैत्रिणी सोबतच त्याने लग्न केले होते तिही इंजीनीयर , 

ताई शिक्षीका एकंदरीत सुशिक्षीत छोटा परिवार !

तरी ही मग स्वाती सोबत असे का ?

मोठी सून म्हणुन अवास्तव अपेक्षा !

आता दाबुन ठेवले तर हातात राहील 

नाहीतर काही खरे नाही हा विचार !

मोठीला घरातील सगळ्या रितीभाती 

सांगायचा प्रयत्न करणे किंवा 

तिच्या कडून त्या करवुन घेणे !

सुनेने साडीच घालावी हा हट्ट !

घरातील , ननंदेची सासूची सगळी कामे 

तिनेच करावे हा घोषा !

पण असे का ?

अहो 25वर्षाची मुलगी तुम्ही सून म्हणुन घरी आणता 55वर्षांच्या सासूबाई , ननंद 32वर्षाची दिर 27वर्षाचा दिर !

आता डिग्री घेऊन बाहेर पडलेली मुलगी नुकतीच नोकरी करत असता लग्न झालेली नोकरी सोडून घरसंसाराला लागलेली मुलगी !

काय अपेक्षा ठेवता तिच्या कडून ! 

तीचं लग्न झाल म्हणजे ती तुमच्या सर्वांपेक्षा मोठी झाली का ?

का तिच्यावर सगळ्या गोष्टी लादता !

तिला तिच लग्न तिच्या नवर्‍या सोबत थोड तरी एन्जाॅय करु द्या !

घ्याना थोडं सांभाळुन ! आज तुम्ही सांभाळाल ऊद्या ती तुम्हाला सांभाळेल !

मग दुसर्‍या सुने साठी एवढी मोकळीक का ? स्वाती समोरच !

कारण कोणती ही गोष्ट सहन करण्याची मर्यादा असते !

तुम्ही मर्यादा पार केलीत स्वातीने पण आता तिची मर्यादा ओलांडली , आता ती पण आपलं अंग सांभाळुन कामं करते , 

मग आता एकमेकींवर कुरघोडी करण्यात आयुष्य खर्ची घालत आहेत सासुबाई ननंद आणि सुना सोबतच भक्कम कोणाचीच बाजू न लढणारा नवरा सारंग !

असे प्रकार बघीतले की लेखिकेलाच खंत वाटते अश्या मानसीकतेची !

संगीता अनंत थोरात

24/06/2021

०००००००

🎭 Series Post

View all