खंत मनातील - कवडी चुंबक

We all must have gone through these experiences in our lives. At times we even fail to realise our own mistakes...In the process, differences crop up and we hurt our own people.. Read these series of episodes with a positive mind and try to underst

कवडी चुंबक 

आपल्या अवती भवती असे कवडी चुंबक लोकं असतात .

असतात मानवी स्वभाव काही भिन्न भिन्न प्रवृत्तिचे . 

मी सौ. सुलभा खुशमिजाज रा. आटपाट नगर ! 

अहो हे नगर फारच फेमस आहे हो,,,

आपणा सर्वानांच माहीती आहे ह्या नगराची ,

मध्यमवर्गीय घरातील , आतापर्यंत पंचवीस वर्षाचा माझा संसार झालेला पुढे शंभरीतर गाठायचा माझा विचार आहेच , हा,,हा,,हा,, मला ना असेच स्वतःशी कधी कधी बोलावसं वाटत , मला बुद्धू बनायला आवडतं म्हणजे तेवढाच दुसर्‍याला आनंद देते मी हा,,हा,,हा,,

आणि मी मैत्रिणींशी किंवा नातेवाईकांशी कितीही चांगली वागले आणि त्यांच्या कोणत्याही गोष्टींना नावे ठेवली नाहीत तरीही आज मला तुम्हाला माझ्या जीवनात घडलेल्या काही गमती जमती सांगायच्या आहेत , 

आठवुन मी तर फार हसते बुवा , 

कधी कधी थोडा राग येतो , 

पण भारीच गंम्मत वाटते ,

आपण जगरहाट करत असताना भिन्न स्वभावाच्या व्यक्तींना सामोरे जातो , नको तिथे लोकं हात आवरुन घेतात ,

माझ्या ही बघण्यात आलेत बघा असे मानवी स्वभाव .

एक नुकतीच मैत्री झालेली मैत्रीण मीना आणि अजुन काही मैत्रीणी मिळुन नाटक बघायला गेलोत आपआपल्या गाडीने .

मी आधीच ठरविले होते , 

नाटक बघीतल्यावर तिकडेच राहणार्‍या माझ्या जुन्या एका मैत्रीणीला भेटायचे , 

नाटक संपल्यावर पाच वाजता माझ्या ह्या नवीन मैत्रीणीला कळल मी कुठे जाणार ते , 

ती म्हणाली माझ पण घर तिकडेच आहे चल मी पण येते , आपण जाऊ तुझ्या मैत्रिणीकडे आणि मग तू माझ्याकडे पण येशील , 

तिची इच्छा बघुन म्हंटले ठिक आहे चल जाऊया , 

मग आपआपल्या गाडीने निघालो माझ्या मैत्रीणीकडे .

मैत्रिणीला आधीच कळवलं होतं मी येणार म्हणुन ,

तर सरिता कडे पोहोचल्यावर , खुप गप्पा झाल्या , 

तिने आधीच नाश्ता बनवुन ठेवला होता मग खाणं ही झाल , 

आता चहा तू माझ्याकडे घ्यायचा , 

नवीन मैत्रीण मीना म्हणाली , 

मग आम्ही सरिताचा निरोप घेऊन निघालोत मीना च्या घरी .

दार ऊघडुन आत गेल्यावर तिने हाॅल मधे बसवले मला , 

घर खरेच खुप छान होतं बंगलाच होता , मला तिथेच सोडुन , चहा घेवुन येते म्हणाली , पाच मिनीटा नंतर मी म्हंटल , हिच घर बघावं , म्हणुन बोलतच मी आत गेले ,

छान आहे गं डायनिंग रुम ,

बेडरुम पण छान , असे बोलत किचन कडे वळली मी , 

पण किचन ओटा मोठा का नाही केला गं !

म्हणत गॅसवरुन नजर फिरली , 

आणी पुन्हा चमकुन मी गॅसकडे बघीतले ! 

किचन स्वच्छ , सगळे भांडे घासलेले , बाकी सामान जिथल्या तिथे ठेवलेले , पण माझ्या मनात खुपच विचार दाटलेत,,,

अगदी अस्वस्थ झाली मी , बोलायसाठी तोंड ही ऊघडत नव्हतं ,

दरदरुन घाम फुटत होता ,

तरीही ओट्याजवळच घुटमळली मी ,

पुन्हा हळुच वळुन गॅसकडे बघुन निरीक्षण केले ,

चहाच्या भांड्यामधे जिथुन चहा ओतायचा कपामधे , त्याठिकाणी सुकलेल्या आल्याचा ऊभट तुकडा , ठेचलेला ,, अर्धा थोडा भांड्याच्या वर आणि खाली थोडा चिकटलेला , भांड्यात जेवढे दुध टाकलेले , त्याच्यावर ते भांडे ब्राऊन झालेले आणि थोडी थोडी चहापत्ती चिकटलेली त्याला , 

आता ताजी चहापत्ती टाकलेली पांढर्‍या दुधावर तरंगत होती , आणि अर्धा लिटर दुधाची पिशवी , त्यात थोडचं दुध शिल्लक होत , ती कोपर्‍यातुन कापलेली भिंतीच्या आधाराने ऊभी होती , मनात कालवा कालव झाली ! 

ही घरात एकटी , बाकी फॅमीली बाहेरगावी , मग ,,,, ?

न राहवुन तिला म्हंटल भांड एवढ ब्राऊन का ?

हसतच ती म्हणाली , 

अगं सकाळी चहा केला आणि ठरवलं की संध्याकाळी एकटी साठी काय स्वयंपाक करायचा , 

चहा चपातीच खाऊ , 

मग सकाळीच अजुन दोन चपात्या जास्त टाकल्यात आणी चहाच भांड लगेच मी फ्रिज मधे ठेवल ,,,बरं,,,,

तुला वाटेल नाहीतर काही ,,,,,

बाहेर नव्हत बरं,,,,

अच्छा ,,,,,,,,

एव्हाना मला मळमळ व्हायला लागली ,

पण मला तिला दुखवावस वाटत नव्हत ,

चहा कमी गॅस वर ठेवलेला ,

तिला मी म्हंटल ,

अगं जाऊ दे , 

मी चहा नाही घेत , 

मला ऊशीर होतोय , 

अंधार ही झालाय ,,,,

नाही नाही थांब , 

झालाच चहा , 

घेवुनच जा ,,,

म्हणत गॅस मोठा केला , चहा झाला , कपात गाळणी ठेवुन गाळत असताना , चहा थोडा कपात पडून बाकी वरच थांबला , कपात पडेचना , मग तिने , अरे ,,, म्हणत दुसरी गाळणी घेवुन चहा गाळला , 

म्हणजे चहाच भांड गाळणीसकट फ्रिज मधे ठेवण्यात आल होत , सकाळी साडे आठ ते संध्याकाळ काय रात्री पर्यंत !

पोटात गोळा येत असतानाही , 

माझं तोंड ऊघडत नव्हतं ,

मलाच घाम फुटला होता दरदरुन ,

मग मी ठरवलं आता एक घोट घेतल्यासारखे करते ,

आणि फेकुन देते चहा , 

घाबरतच एक घोट घेतला,,,,घाम पुसला,,,,

आणी तो अर्धा कप चहा मी पुर्ण पिऊन टाकला ,,,,, 

अगदी ताजाच वाटला मला तो चहा,,,,,!

हुश्श,,,,किती जिवघेणा प्रसंग !

माझ्या ठिकाणी दुसर कुणी असतं तर,,,,

माझ्या धाडसा साठी मीच माझी पाठ मनोमन थोपटुन घेतली .

पुर्ण बिल्डिंगची प्रेमळ वहीनी , घरात सुन , मुलगा , नातू , मुलगी , सासू , नवरा , एक पुर्ण वेळ मोलकरीण , 

घरात येणार्‍या जाणार्‍यांचा राबता , 

खाऊ पिऊ घालायची भारी हौस अगदी वाॅचमनला न चुकता चहा , त्याने डबा नाही आणला की जेवण वगैरे देणार ,,, 

कधीही जा त्यांच्याकडे चहा नाश्ता दिल्याशिवाय जाऊ देणार नाही .

अश्या आमच्या वहीनी बाजारात गेल्या कि 1 , 1 किलो अश्या चार पाच तरी भाज्या आणणार , एका वेळेस म्हणजे सकाळी एक किलो भाजी बनवायची , खाऊन ऊरलेली फ्रिज मधे ठेवायची , संध्याकाळी दुसरी एक किलो भाजी बनवायची , खाऊन ऊरलेली फ्रिज मधे ठेवायची , अश्याच जेवढ्या प्रमाणात आणल्या असतील त्या एका वेळेसच बनवायच्या , 

ऊरलेली फ्रिज मधे , मग सगळ्या बनवुन झाल्या कि नंतर ती पहिली भाजी गरम करुन खायची असेच ऊतरत्या क्रमाने भाज्या संपवायच्या , कधी कधी स्वस्त भाज्या असल्या की त्या जास्त पण घेवुन यायच्या , 

अश्या तर्‍हेने त्या आठवडाभर भाज्या खायच्या , 

हे सुनेकडुन आणि मोलकरणी कडून कळलेल , त्यामुळे तुमचा माझ्या बद्दलचा अंदाज चुकतोय , कारण मी अजिबात खोटं बोलत नाहीये आणि मी वहीनींच्या तोंडुन कितीतरी वेळा ऐकलं कि त्या सकाळी बनविलेली भाजी संध्याकाळी खात नाहीत,,,,, हा,,हा,,हा,,,,

अगदी " ताजीच " भाजी बनवतात .

आता असं आहे आपल्या गोड स्वभावामुळे सुनांनाही मी आपलीच वाटते ,,,मग मनं करतात रिते,,,त्या , कधी कधी,,,आणि आपल्याला आतल्या गोटातली माहीती मिळत राहते,,,,कधी कधी,,,,!

आता त्यांचा चहा , घरातुनच कळलं , सकाळी सहा वाजता बनलेला चहा नऊ वाजेपर्यंत पुरतो त्यानंतर दुसर्‍यांदा भरपुर बनवलेला चहा अकरा वाजे पर्यंत किंवा संपेपर्यंत असतोच किटली मधे , 

एकदा शेजारणीला त्यांची मोलकरीण वरुन खाली येताना दिसली , कुठुन आलीस म्हणुन तिने विचारल , 

टेरेसवर चणे वाळत टाकलेत , टोचलेत किड्यांनी , झाल,,,,

तिसर्‍या दिवशी चार फॅमीलीला छान पैकी चना मसाला खायला मिळाला , 

एका घरातील चार लोक खातील एवढी भाजी प्रत्येकाला , ज्या शेजारणीला हे माहीत होत ,,, 

तिने आधी मला सांगायची तसदी घेतली नाही,,,!

माझं जेवण झाल्यावर ती सांगायला आली,,,

{ अश्या मैत्रिणी असल्या पेक्षा नसलेल्या बरं ना ! }

आम्ही आपली चाटून पुसुन फस्त केली होती भाजी,,,,

विचार करा आमची अवस्था काय झाली असेल,,,

पण माझे मिस्टर खुशमिजाज ह्यांनी मला हिंम्मत दिली,,,

सुलू नाॅनवेज खातो ना आपण,,,?

मग नो प्राॅब्लेम,,,,! पचतय गं सगळं,,,,!

तिने मात्र भाजी घरी पोहोचल्यावर गुपचुप गुरांना खाऊ घातली ,,,,,,,! { शहाणी कुठली }

माझ्या ह्या दोन्ही मैत्रिणी श्रीमंत,,,!

फक्त आयुष्यात माझ्या मनातील " खंत " मला हीच आहे ,,,,

मी जर अशी कवडी चुंबक म्हणा किंवा कंजुष असती ,,,,,,

तर आज माझा ही , ह्या दोन मैत्रिणीं एवढा मोठ्ठा बंगला , मोठ्ठा फ्लॅट असता,,, हाय,,,,, माझं कर्म,,,,

काही काही गोष्टी आपल्याला लवकर सुचतच नाही बुवा,,,,

बुद्धूच मी,,,खरेच,,,!

हसू शकता तुम्ही,,,तुमच्या चेहर्‍यावर आलेलं छोटस स्माईल ही मला या महामारीत सुखावुन जाईल .

सत्य घटनेवरुन प्रेरीत

आजची कथा मी काॅमेडीच्या अंगाने लिहीली आहे .

०००००००

🎭 Series Post

View all