खंत मनातील - जिद्द

We all must have gone through these experiences in our lives. At times we even fail to realise our own mistakes...In the process, differences crop up and we hurt our own people.. Read these series of episodes with a positive mind and try to underst

! जिद्द !

अहो मॅडम ऊद्या पासून दहावीची परीक्षा सुरु होईल तर मी थोडी ऊशीरा कामाला येते , 

हो गं ठिक आहे ना चालेल , पण ऊशीर झाला तरीही ये मात्र ,

बरं कल्पना , झाला का रोशनीचा अभ्यास ?

करते का चांगला अभ्यास ?

हो मॅडम ! माझ्या तीन ही मुली अभ्यासात खुप हुशार आहेत ,

रोशनी चा तर पहीलाच नंबर येतो वर्गात आणि बाकी दोघी पहील्या पाच नंबर मधे असतातच ,

अरे वा मग तर खरेच खुप हुशार आहेत तुझ्या मुली ,

हो मॅडम खरच हुशार आहेत , रोशनी ला मेरीट यायचे आहे , खुप अभ्यास केला मॅडम तिने ,

ट्युशन कोणाकडे होती तिची ?

अहो ती घरीच करते अभ्यास , आपल्याला परवडत नाही ट्युशन , रोशनी लहान बहीणींना पण शिकवते काही अडचण आल्यास ,

अरे बापरे खरेच का ?

हो ना मॅडम , देवा शप्पथ ! वाटल्यास तुम्ही शेजारच्या पुष्पाताईंना विचारा त्यांची मुलगी रोशनीची वर्गमैत्रिण आहे ,

हो गं विचारायची काय गरज , तूझ्या बोलण्यावर माझा विश्वास आहे , बरं all the best तुझ्या मुलीला , माझ्याकडून शुभेच्छा ! 

हो सांगते मॅडम आणि थॅक्स मुलीकडून ,

बरं निघते मी , म्हणत कल्पना बाई घाईघाईने बाहेर गेली .

कल्पना चे राहणे अगदी स्वच्छ , काम निटनेटके , भाषा पण एकदम शुद्ध , ति स्वतः बारावी पर्यंत शिकलेली , पण दारुड्या बापाने लवकरच तिचे लग्न लावले , नवरा पण दारुडा , कामे करने सोडून दारुतच बुडालेला आणि असाच एकदिवस मेला , मग तिला भांडे घासायचे काम करावे लागले मुलींसाठी , कामे करुन तिने तिचे घर सावरले आणि मुलीही हुशार , शालीन , अभ्यासात मग्न राहणार्‍या , एकंदरीत छान चालल होत कल्पनाबाईचे आणि हो क्रिकेट वेडी होती कल्पना , मॅच सुरु असली की कामे बाजूला ठेवून ती मुलांसोबत मॅच बघायची , टाळ्या वाजवायची , कमेंट्स पास करायची , मुलांनाही तिची मजा वाटायची .

दुसरा दिवस कल्पना ऊशीरा कामासाठी आली , पण ऊत्साहाने भराभर कामे ऊरकवून परत गेली , तिसर्‍या दिवशी पण थोडी ऊशीराच आली ती आणि एकदम पडलेला चेहरा तिचा , माझ लक्ष गेल्यावर तिला विचारले मी ,

काय गं काय झाले ? तब्येत बरी नाही का ? 

मला फोन करायचा असता ना ! आज नसतं यायच तू !

तशी ति रडायलाच लागली , 

अगं , रडायला काय झाले ? सांग बघू मला काय झाले ते ?

मी तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारले ,

अहो मॅडम कालचा पहीला पेपर रोशनीचा , अभ्यासाच्या नादात काही खाल्लं नाही , मग सकाळी डोकच दुखायला लागले तिचे , झंडू बाम लावून दिला , डोक चोळून दिले पण आरामच नव्हता , मग तिला म्हंटल , सेंटर वर जाताना मेडीकल मधून एखादी गोळी घे , डोके दुखी साठी !

पेपरला जातानी तिने गोळी घेतली , खाल्ली आणि सेंटरवर गेली , अर्ध्यातासातच तिचा डोळा कधी लागला तिला समजलेच नाही , शेवटी तिथल्या सरांनी तिला उठवले पेपर सुटायला अर्धातास बाकी असताना,,, !

त्या अर्ध्यातासात जसा जमेल तसा पेपर सोडवला तिने,,,,!

घरी आली ति रडतच !

काय करु मॅडम , आम्ही तिघीही मायलेकी काल संध्याकाळ पर्यंत रडतच होतो , मग मीच तिला म्हंटले आता जे झाले ते झाले , ऊद्याच्या पेपरची तयारी कर आजचं सगळ विसरुन ,

अरे रे , खुपच वाईट झाल गं !

पण गोळी घेताना मेडीकलवाल्याला विचारल नाही का ? 

नाही ना मॅडम , त्यानेही तिला नाही सांगीतले कि झोप येईल म्हणून , बघा ना कसे लोक असतात , हि युनिफाॅर्म मधे होती , त्याने गोळी देताना विचार करुन द्यायला पाहीजे होता ना ?

बघा माझ्या एवढ्या हुशार मुलीच नुकसान झाल मॅडम आणि ती पुन्हा रडायला लागली,,,,!

अगं जे झाले ते झाले , आता तू जास्त विचार करु नकोस आणि मुलींशी चर्चा करु नको , अजून बाकीचे पेपर द्यायचे आहेत तिला , एक राहीला तरी पुढे तस काही तरी बघता येईल मग , अस काहीतरी गोल गोल बोलून मी तिला समजाविले , 

पण खरेच मनातून खुप वाईट वाटले , मुलीची हुशारी किती अभिमानाने ति सांगत होती परवा आणि तिच्या सोबत बघा काय झाले , शेवटी विचार करुन डोक दुखायला लागल्यावर मी माझे लक्ष दुसर्‍या गोष्टींकडे वळवले .

मग मे महीन्यात आमची बदली झाली , कल्पना बाईला आमचे तिघांचेही फोन नंबर्स दिले आणि रिजल्ट काहीही येवो त्रागा करायचा नाही आणि मला फोन करायचा म्हणून बजावून सांगीतले , पण मनात तेच होते " ही काही पास होणार नाही "

नंतर नवीन बदलीच्या ठिकाणी आम्ही आपल्या कामामधे गर्क होतो , दहावीचा निकालपण लागला , पण कल्पनाचा फोन आला नाही , मी जे समजायचे ते समजले , वाईट वाटले मला खुप , पण काही पर्याय नव्हता , तिचा एक नंबर होता माझ्याकडे लावून बघीतला , पण सेवा तात्पुरती बंद आहे म्हणून ऐकले , जाऊ देत , छान जमायच आपल , तरीसुद्धा तिने फोनकरुन कळवले नाही , तर मग मला काय ,,,!

नंतर एखाद्या महीन्याने एका नवीनच नंबर वरुन काॅल आला , मी घेतला तर पलीकडून कल्पना होती , आधीतर तिला रागावलीच मी , पण तिने साॅरी म्हणत तिचा फोन खराब झाला वगैरे कारणे सांगीतले आणि हा एका डाॅक्टरांचा घरचा नंबर आहे त्यांच्याकडून बोलते म्हणून सांगीतले , आमच काम सुटल्यावर त्यांच्याकडे ती कामाला लागली होती , 

अगं मला आधी सांग रोशनी काय करते ? कशीआहे ती ? मॅडम ती खुपच नाराज आहे ! 

अरे जाऊ दे गं , झाली एक चुक गोळी घ्यायची , ति गोष्ट आता आपल्या हातात नाही , नाहीतर तिला पुन्हा बसव दहावीला ,

अहो मॅडम ति पास झाली !

काय,,,! मी दचकलीच ,

कशी काय ? तूच तर सांगत होतीस , तिने अर्ध्यातासाचा पेपर सोडवला म्हणून !

हो तेच तर , जेव्हा पेपरला गेली आधी अर्ध्यातासाचा सोडवला त्यातच तिला झोप लागली , शेवटी सरांनी उठवल्या मुळे पुन्हा अर्ध्यातासाचा सोडवला , एकंदरीत एक तासाचा पेपर सोडवला आणि ती सेकंड क्लासमधे पास झाली , 

अरे बापरे ! का गं किती छान,, खरेच तुझी मुलगी गुणी आहे गं ! म्हणजे एका तासात तिने जे सोडवले ते अगदी बरोबर होते ऊत्तरं,, ! वा वा छानच बातमी दिली तू , अभिनंदन रोशनीचे आणि तुझेही , घ्या ना मॅडम बोला ना तिच्याशी , समजवा तिला , नाराज असते ती नेहमी , 

बर दे तिला फोन !

का गं रोशनी किती छान रिजल्ट लागला तुझा , सेकंड क्लास मधे पास झालीस , हे ही नसे थोडके ! नाराज का राहतेस जे झाले ते झाले ! 

होना काकू जे झाले ते झाले कळत मला ! पण असे का झाले , मी वर्षभर अभ्यास केला , मेरीट यायसाठी , पहीलीपासून पहीला नंबर , जिथे नेमका चांगला निकाल हवा होता तिथेच मी सेकंड आली हो काकू , आणि ती रडायला लागली , अगं बाळ अशी काय करतेस , रडू नको गं , मला ही रडवशील का ?

माझाही आवाज भारी झाला होता , रडू यायला लागले होते , 

हो काकू मला कळतच नाहीये काही , मी कधीच डोके दुखले म्हणून गोळी घेतली नाही आणि नेमके त्याच दिवशी कसे सुचले मला गोळी घ्यायचे , कळतच नाहीये ! आणि मला मेडीकल वाल्याच नवल वाटतय त्याने कमीत कमी मला कल्पना द्यायला पाहीजे होती हो काकू ,,,! 

अगं आता जी गोष्ट घडून गेली त्याबद्दल काय बोलायच बेटा ! जाऊ दे बरं , मम्मीचा विचार कर आणि तिच्यासाठी म्हणून खुश राहा , आणि आता बारावीच्या तयारीला लाग , तिथून तुझ करीयर घडेल आता , ठिक आहे ना बेटा ,

तिने नाराजीनेच हो म्हणत फोन ठेवला ,

पण मला जाणवत होत ती ही घटना विसरणार नाहीये ,

पण मनात एक विचार आला , तिने तीन तासाचा पेपर सोडवला असता तर,,,,,! 

का नाही ती नाराज होणार ? 

का तिला खंत नाही वाटणार ,,,,,!

कोणती ही गोष्ट आततायी पणे करु नये , अभ्यास एवढा केला की झोप अपुरी होऊन मग डोकेदुखी सुरु झाली,,,!

करायला गेली काय नी झाल भलतच,,,,!

मेडीकल वाल्यानी गोळ्या देताना योग्य आवश्यक ती माहीती संबधीताला द्यायला हवी ,,,,!

पण मला सगळ्यात जास्त कौतुक कल्पनाबाईचे वाटले , किती खालावलेल्या परिस्थितीत तिने स्वतः काम करुन घराची धुरा सांभाळली आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे तिला कळुन चुकले होते , तिनही मुली असताना तिने त्यांना शिकवण्यात कसर ठेवली नाही की मुली असण्याचा बाऊ नाही,,,!

धन्य धन्य ती माता,,,,!

००००००००००

🎭 Series Post

View all