खंत मनातील - जवळचे?

We all must have gone through these experiences in our lives. At times we even fail to realise our own mistakes...In the process, differences crop up and we hurt our own people.. Read these series of episodes with a positive mind and try to underst

जवळचे ? 

फोन ची रिंग वाजल्याबरोबर , सुरुचीने फोन घेतला , हॅलो अगं सुरु दार ऊघडून तुझ्या दारातील डब्याची पिशवी आधी आत घे बरं , 

अगं निशा कशाला गं एवढा त्रास घेतलास , 

त्यात त्रास कसला ?

हे बघ मला ऐकायच नाहीये काहीचं , फक्त तो डबा त्या पिशवी सकट आत घे , प्लास्टीकच्याच डब्यांमधे जेवण दिलय , तेव्हा ते भांडे तुच वापर मला परत नको , अगं पण असे का ? ती भांडे तू परत घेणार नाही , गेले पाच दिवस दोन्ही वेळ डबा आणुन ठेवतेस दारात , 

धन्यवाद ही नाही म्हणतेस , 

तुझे ऊपकार मी आयुष्यात कधीच विसरणार नाही गं निशा ! 

हे वेडा बाई , बघ एवढ भावनीक व्हायची गरज नाही , रडायची तर अजीबात नाही , आपण मैत्रिणी आहोत जास्त जुनी मैत्री नाही पण आपले मनं जुळलेत , 

डबा पोचवुन देणे म्हणजे काय मोठी गोष्ट नाही , 

कुणीही आनंदाने करेल तुझ्यासारख्या गोड मैत्रिणी साठी , 

बरं बाबा ठिक आहे डोळे पुसत सुरु म्हणाली , 

आता अजिबात कोणतीच फाॅर्म्यालिटी नाही पाळत , पण तू फक्त आज रात्रीचाच डबा पाठव ऊद्या पासून मोना डबा पाठवते म्हणाली तसेही ती जवळच राहते त्यामुळे तिला जास्त त्रास होणार नाही , नक्की ना ? 

हो गं , तुला माहीतच आहे आम्हा दोघींच किती साटलोट आहे ते ? 

कुठे ही आणि कधीही आम्ही सोबतच असतो , 

ठिक आहे गं जीवाभावाची मैत्रिण डबा पाठवणार म्हणजे आता मला बाजुला व्हावेच लागेल ! हसून निशा म्हणाली ,

अगं तू अडचणीच्या वेळेस जी मदत केली ती अनमोल आहे गं निशा , 

ती कायम माझ्या ह्रदयात राहील !

हो,, हो ,,गं माहीत आहे मला सुरु , 

मी गमतीने बोलली , 

बरं कशी झाली भाजी सांगशील मला , नक्की नक्की , सुरुने फोन बंद केला , श्रेयाला आवाज देऊन बाहेरुन डबा आत घ्यायला सांगीतले , 

श्रेया ने डब्याची पिशवी आत घेतली , सुरुने बेडरुमचं दार ऊघडल , 

बेडवर बसुनच तिने पिशवी बघीतली , बघते तर एका मोठ्या पाच खानी डब्यामधे डबे भरुन जेवण दिलेल , 

अगदी खीर सुद्धा ! सोबत फळे ही , पोह्यांचा चिवडा वेगळा बांधुन दिलेला , आई अगं मावशीने बघ काय काय पाठवले , काल तर चिरोटे किती सारे पाठवले होते ते ही खुप सारे , 

अगं तिला माहीत आहे तुम्हा मुलांना आवडतात असे पदार्थ म्हणुन घेऊन येते ती , 

बरं मला भुक लागली जरा वाढुन आण माझ्या ताटा मधे , 

दारात ठेव ताट मी घेते पाणी ही देशील कोमट आणि तुम्ही सगळे जेवा !

सुरुने दार बंद केले आणि ती डोळे मिटून बेडवर पडली , 

तिला भरभरुन रडायला येत होतं , आपल्या घरापासुन बारा किलोमीटर लांब निशा राहते पण जस तिला कळल मला कोरोना झाला आणि मी होम काॅरंटाईन आहे तसेच तिने काहीही न बोलता डब्याची पिशवी दारात ठेऊन दिली , गेले पाच दिवस सकाळ संध्याकाळ !

आणि मोना एकाच एरियात राहणार्‍या आम्ही दोघी जिवलग मैत्रिणी , 

कुठेही सोबतच , किती एकत्र फिरलो , एका ताटात खाणे , तिला टायफाईड झाला तेव्हा मी ती बरी होईस्तोवर तिला डबे पाठवलेत जिवाभावाची मैत्रिण म्हणुन , 

तिच्या नवर्‍याला कोरोना झाला तर तिला भेटुन सांत्वन केल तिचं , 

नवर्‍याच्या काळजीने स्वयंपाक केला नाही माहीत पडल्यावर मी तिला जेवण घेऊन गेले , 

तसेही ते दुसर्‍या गावीच जाॅब साठी होते म्हणुन तिच्यापासुन धोका नव्हता मला म्हणुन बिनदिक्कत तिच्याकडे गेले , आणि माझ्या नवर्‍याला , मुलाला कोरोना झाला माहीत झाल्यावर तिने काळजी घे म्हणुन मुश्किलीने एक दोन काॅल केलेत , ते ठिक होता होता मला कोरोनाने गाठले , फक्त श्रेयाला कोरोनाने नाही झाला , 

पण श्रेया बारा वर्षाची तिला स्वयंपाक येत नाही वरवरचे कामे करते , 

कोरोनाने आधीच नवरा व मुलाला कमजोर केलय , 

ते ही किचन मधे काही करु शकत नव्हते , 

मला कोरोना झाला सांगायला मी तिला काॅल केला ऐकल्यावर म्हणाली , 

अरेरे , अगं काळजी नाही घेतली का गं ? मला तर म्हणत होतीस मी काळजी घेते म्हणुन , 

तरी तुला म्हंटले होते हाॅस्पीटल मधे ठेव त्यांना , 

पण जाऊ दे सुरुची , 

बघ वेळ अशी आहे घराबाहेर पडायला ही भीती वाटते , 

कधी कधी फोनवर सुद्धा बोलायची भीती वाटते गं , 

काळजी घे बाई , जास्त तब्येत खराब वाटली तर दवाखाण्यात भर्ती हो , आणि मला माहीती देत जा , एखादा मेसेज केलास तरी चालेल , 

तुझी काळजी वाटते गं , 

बरं घाबरु नकोस आपण भेटू लवकरच , हे ही दिवस निघतील , 

बाकी ठिक आहेत ना ! 

हो गं सगळे अगदी मजेत आहेत , 

चल ठेवते फोन , सुरुने फोन ठेवला , 

मनं तिच खिन्न झालं होतं ! 

हिच का ती मैत्रिण गळ्यात गळे घालुन फिरणारी !

तू काय आणि कशी खाणार विचारलं सुद्धा नाही !

सगळ जगच तिला आता ढोंगी वाटू लागलं , 

अशी मैत्री जर कामी येत नाही तर मग काय आहे शिल्लक जगात !

कसं कोण जाणे सुरुचा औषधांचा कोर्स सुरु झाला पहील्या दिवशी आणि दुपारीच तिला निशाचा काॅल आला , 

तिला एक दोन दिवसांपुर्वी मोनानेच सांगीतले होते , 

सुरुच्या नवर्‍याला , मुलाला कोरोना झाला म्हणुन , 

सहज आज तिला वेळ मिळाला सुरु सोबत बोलायसाठी घरच्यांची विचारपुस करायसाठी म्हणुन तिने काॅल केला होता , 

सुरुचा आवाज ऐकुणच तिला कळले ती बरी नाहीये , 

सुरुने सांगीतले तिलाही कोरोनाने गाठलय तसेच निशा म्हणाली हो गं हे तर होणारच होतं काळजी घेऊन घेऊन किती काळजी घेणार ना , 

आपल्याला कधी ना कधी ह्याला सामोरे जाणे आलेचं , 

हिम्मत हारुन चालणार नाही , 

किती धीराने तू नवर्‍याच मुलाचं केलस , आता स्वतःलाही असच जपायच आहे , खचायच नाही , तुझ्या मुलांना , नवर्‍याला आणि आम्हा मैत्रिणींना तू पाहीजेस म्हणुन तुला पुर्ण विश्रांती घ्यायची आहे , कशाचीच चिंता करु नकोस , घर खराब होतय , होऊ दे ! 

फक्त तुझ्या तब्येतीचा विचार कर , 

अगं कोरोना हद्दपार झाला की आपण गोव्याची ट्रिप काढूच फॅमीली सकट , 

मग आता तू गोव्यात जाऊन काय काय मज्जा करायची त्याचे स्वप्न रंगव , 

बेडरुम च्या बाहेर पडू नकोस , 

जेवणाच ताट तुझ्या बेडरुमच्या दाराशी येईल , बस्स आराम कर ! 

मोहतरमा हमारी मेहमान नवाजी को देख़ो तो जरा !

ओ हो माझी मैत्रिण तर शायरी वर आली , 

पण कुठे काय गं मीच सकाळी खिचडी मांडली पण आता ऊठुन होत नाहीये , ह्यांना जमेल की नाही माहीत नाही , 

अरे मग मैत्रिणी कशा साठी आहेत ? 

मी माझ्या बद्दलच बोलले , 

तू फक्त माझं ऐक , संध्याकाळ पासुन मी स्वतःहा तुझ्या घराबाहेर जेवणाचा डबा ठेवते ! 

संपल,,,अवाक्षरही काढू नकोस !

तेव्हा पासून आजपर्यंत तिने डबा आणला , पण आता खुप झाल , 

तिला त्रास देणे बरोबर नाही , गेले पाच दिवस जेऊ घातल , खुप झाल हे , आणि मानसिक आधार ही दिला तिने मला , नाहीतर खरेच मी मनातून खचले होते ,

ज्यांच एवढ केल त्यांनी नावालाही जेवणा बद्दल विचारले नाही , 

तेव्हढ्यात श्रेयाने आवाज दिला , आई ताट वाढलं गं , घे !

सुरुने दार ऊघडले श्रेया डायनिंग टेबलवर जेवायला बसली होती बाबांना आणि दादाला त्यांच्या बेडरुम मधे ताट दिलीत तिने , 

श्रेया जेवण झाल्यावर जरा हाॅटेल किंवा खाणावळ सर्च कर बघू जरा , 

घरगुती चांगल जेवण मिळाल पाहीजे , ऊद्यापासुन आपण बाहेरुन जेवण मागवू !

अगं पण तू म्हणालीस ना निशा मावशीला कि मोना मावशी डबा देणार ? 

अगं तस बोलले नसते तर तिने बाहेरुन डबे थोडे ना मागवू दिले असते ? 

पण का गं ,,,अस,,मोना मावशी तर तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना ? 

आणू दे तिला मग डबा ,, 

अगं वेडा बाई मी असेच माझ्या मनाने बोलले ते,,, जाऊ दे श्रेया ,,, जास्त विचारु नकोस ,, 

सर्च करुन मला नंबर पाठव मी बोलते मग आणि तिने दार बंद करुन जेवायला सुरुवात केली , 

टेबलवरच तिचा आणि मोनाचा हाॅटेलमधला हसतानाचा एक फोटो होता , जेवता जेवता सुरुने तो फोटो पालथा ठेवुन दिला ,,,,,,

कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगात काळजीने आपआपल्या घरातच राहणे योग्य ,,,

पण सहज पणे जिथे आपण मदत करु शकतो आपल्या ओळखीच्या , जवळच्या व्यक्तीला , जरुर करावी,,,

निशा सारखी धाडसी मैत्रिण विरळाच,,,

पण जवळच राहणारी मोना सारखी मैत्रिण , तिच्या मनात असत तर ती नक्कीच तिला जेवण पुरवू शकली असती,,,

पण हे ही आहे काही महीला , पुरुष कोरोनाचा नको तेवढा बाऊ करतात,,,

अर्थात प्रत्येकाच्या शरीरयष्टीनुसार प्रकृतीवर कमी जास्त प्रमाणात प्रभाव होतोच आहे , 

कोरोना घातकच आहे , नसत डेअरींग कुणीही करु नये,,,,!

घरात राहा , काळजी घ्या , पण एकदमच निष्ठुर बनू नका दुसर्‍यां प्रती !

खंत मनातील सगळ्याच कथा सत्य घटने वरुन प्रेरीत आहेत !

०००००००००

🎭 Series Post

View all