खंत मनातील - हक्क

We all must have gone through these experiences in our lives. At times we even fail to realise our own mistakes...In the process, differences crop up and we hurt our own people.. Read these series of episodes with a positive mind and try to underst

! हक्क !

शालिनी हायस्कुल मधे टिचर , गेले पाच वर्षे नोकरी करतेय , दोन लहान भाऊ , एक नुकताच अप्रेंटिस म्हणुन रेल्वेत लागला पुढे तिथेच काही जागा निघाल्यावर परमनंट व्हायचे चान्सेस होते त्याचे , स्टायपेंडही मिळत होता , लहान सेकंड इयरला , आई गृहीणी वडील एका दुकानात मॅनेजर म्हणुन काम करतायत , एकंदरीत खाऊन पिऊन , पोटापुरत कमावुन आहे त्या परिस्थितीत आनंद मानुन , ह्या परिस्थितीतून पुढे जाण्याची जिद्द मनी बाळगुन , जगत असणारे सुखी कुटुंब .

शालिनी मोठी म्हणुन तिला आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावीशी वाटत होतं आणि त्यानुसार ती फावल्या वेळात ट्युशन्स सुद्धा घ्यायची , नातेवाईक तिचे लग्नाचे वय झाले किती दिवस तुमच्याकडे ठेवता म्हणून टोमणे मारणारे , मुलं लहान असताना आई वडीलांची तुटपुंज्या पगारामुळे सतत ओढाताण व्हायची , पण शालिनी आणि भावंड अभ्यासात हुशार त्यामुळे शालिनी पटकन नोकरीला लागली त्या पाठोपाठ हरीश तिचा लहान भाऊ पण नोकरीला लागला म्हणून आता कुठे घरात चैनीच्या वस्तु गोळा झाल्यात ,

त्यातच आईच्या मदतीने स्वयंपाकाला एक बाई ठेऊन तिने खाणावळपण सुरु केली , आणि सगळ कस छान सुरु होतं ,

अश्यातच तिला शाळेतीलच एका शिक्षिकेने आपल्या भावाच्या मुलासाठी मागणी घातली , मुलगा निलेश एका काॅलेजमधे क्लर्क होता , वडील निवृत्त शिक्षक , आई गृहिणी , बहीणीचे लग्न झाले होते आणि लहान भाऊ इंजिनियरींगच्या तिसर्‍या वर्षाला घरी थोडी शेतीपण एकंदरीत सधन परिवार , नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता , निलेश ऊंचपुरा दिसायला छान पाहताच शालिनीला आवडला , हो नाही म्हणता म्हणता लग्नाला होकार देण्यात आला , खुप आनंदाने सगळे सोहळे साजरे झालेत , शालिनी नोकरी करत राहणार हे आधीच ठरले होते .

लग्नाला एक महीना झाला असेल , असेच सहज बसल्या बसल्या सासुबाईंनी तिला पगार विचारला , 

तिने सांगीतला , किती तारखेला मिळेल तेही विचारुन घेतले , 

मग पगार मिळाल्यावर दुसर्‍या दिवशी तिच्या समोर सामानाची यादी लिहीली , 

तिला सुद्धा महीनाभर वापरायला काय लागेल ते विचारले आणि यादीत समाविष्ट केले , 

मग मुलाला म्हणाल्या निलेश हे वाणसामान आणायचे आहे , ही घे यादी येताना घेऊन ये , 

नाही मला वेळ नाही आज यायला ऊशीर होईल , 

आणि पगार थोडा ऊशीरा होईल माझा , 

लगेच अनुजा म्हणाली आई माझ्याकडे द्या यादी मी घेऊन येते , सासुबाईंनी लगेच यादी तिच्या हातात दिली , 

संध्याकाळी आठ हजाराच वाणसामान रिक्क्षात टाकुन घेऊन आली अनुजा !

त्यानंतरही घरात काही सामान लागल्यावर सासुबाईने तिला आणायला सांगीतले , दुसर्‍या महिन्यात तर सासुबाईंनी तिला दिराच्या अॅडमिशन साठी पैसे द्यायला सांगितले जवळ जवळ पंधराहजार तिने त्याला दिलेत , 

असेच मग कधी इलेक्र्टिकचे बिल भरणे , 

घर खर्च तिला करायला सांगू लागल्या , 

आता तिला स्वतःला सुद्धा पैसे उरेनासे झाले , 

आईबाबांना मदत करने तर बंदच झाले , 

शालिनी त्रस्त झाली काय करावे आता , 

तिच्या मैत्रिणीने तिला सल्ला दिला , 

आता तुला बोलायची गरज आहे , 

ह्याच विचारात ती संध्याकाळी घरी आली सकाळी जाता जाता सासुबाईंनी तिला पाचहजार मागीतले कारण ननंदेला काही काम आहे तर तिला पाठवायचेत म्हणुन बँकेतून घेऊन ये म्हणाल्या , त्यांना पैसे दिल्यावर तिच्या साठी काहीच शिल्लक ऊरणार नव्हतं म्हणुन आज स्पष्ट तिला बोलावच लागणार होत .

आल्या आल्या नेहमीप्रमाणे सासुबाईंनी तिचे हसुन स्वागत केले , त्या चहाच करत होत्या , तुझ्यासाठीही ठेवला बर मी चहा , जा हातपाय धुवुन ये , तिच्या ह्रदयाची गती वाढलेली होती , कसे बोलू मी , काय वाटेल त्यांना , किती छान वागतात माझ्या सोबत , घरचे काम ही पुढच्या पुढे करतात , काय करु मी , पण पाचहजार दिलेत तर माझ्या जवळ काहीच ऊरणार नाही , मग ऊद्या तर मलाच त्यांना पैसे मागावे लागतील शाळेत जायसाठी , काय वाटेल त्यांना , पगार व्हायला दहादिवस शिल्लक आहेत अजुन , काय करु मी ,,,,? 

तिला नाही म्हणायच्या कल्पनेनेच रडायला येऊ लागलं , चहा सुद्धा प्यायला बाहेर जाऊ नये अस वाटू लागले , तेवढ्यात सासुबाईंनी आवाज दिला , चहा थंड होतोय ये लवकर ,

तशी डोळे पुसून ती हाॅलमधे आली , चहा घेताच सासुबाईंनी लगेच विचारले , आणलेस पैसे ? 

क्षणभर ती गडबडलीच पण सावरुन म्हणाली , 

आई आज शाळेत अचानक मिटींग झाली म्हणुन मी बँकेत जाऊ नाही शकले पण ऊद्या नक्की घेऊन येते , 

अगं अशी काय करतेस तिला अर्जंट मधे द्यायचे आहेत पैसे , अस कर बँकेतुनच तिच्या खात्यात तू पाठवुन दे पैसे , 

हो असच कर !

आता मात्र पुर्ण बळ एकवटुन तिने सासुबाईंना म्हंटले , 

आई माझ्या जवळ पैसे कमी आहेत मी तीन हजार देऊ शकते ,,,!

सासुबाईंना जसा शाॅक लागला , 

डोळे विस्फारुन त्या तिला म्हणाल्या , 

तुला एवढा सारा पगार आहे , 

किती वर्षांपासन नोकरी करतेस आणि पैसे नाही म्हणतेस ?

कुठे खर्च केला तुझा पगार ?

अहो आई घरातच खर्च होतोय ना,,,!

अरे बापरे ! मग काय ऊपकार करतेस का ,,,?

राहतेस ना आरामात ,, इतक्या सुंदर घरात,,,आणि नोकरी करणारी सुनच हवी होती आम्हाला,,,ह्या घरासाठी निलेशने कर्ज काढले होते,,, त्याला हफ्ते पण भरायचे असतात,,,मग तू जर असेच पैसे इकडे तिकडे खर्च करत राहशील तर कस जमणार,,,! 

ते काही नाही , पुढच्या महीन्यापासून तू पुर्ण पगार माझ्या हातात द्यायचा ,,,! ऊद्या तीन हजार आणुन दे,,,दोन हजार राहु देत तुझ्याकडे,,!

आणि हो खर्चावर निर्बंध ठेव,,, बरे नाही एवढा खर्च करणे,,,!

शालिनीने वाद नको म्हणुन मान डोलावली,,,पण मनात उलथापालथ झाली,,,आता तिची भिस्त निलेशवर होती,,, तो मला समजुन घेईलच,,,!

घरचे सगळेच माझ्याशी चांगले वागतात , 

पैश्यासाठी बिघडायला नको,,,मी आज त्याच्याशी बोलते,,तिने निर्धारच केला,,,रात्री ऊशीरा निलेश आल्यावर तिने त्याला झालेला प्रकार सांगितला,,,कस करु आता,,तुच मार्ग काढ,,,आईला समजाव,,,! 

हे बघ शालु डार्लिंग घरात सगळा व्यवहार आई करते ,,,मी सुद्धा माझे पैसे आईच्या हातात देतो,,,तुही दे,,,! 

काय अडचण आहे,,,,? 

चल मला झोप आली ,, ये झोपायला,,,!

तो लगेच आडवा होऊन घोरायला लागला,,,शालुची झोपच ऊडाली,,,,काय करु मी आता,,,माझ्या लहान भावालापण पैश्याची गरज आहे,,मी त्याला म्हंटले होते तुझी मदत करणार ,,,मग कसं करु आता,,,पुढल्या महीन्यापासून पगार सासुबाईंना द्यायचा ,,,आता तीनहजार,,,दोनच शिल्लक,,,म्हणजे माहेरी अजिबातच मदत करता येणार नाही,,,अतीव दुःखाने तिला रडु कोसळले,,,नाही म्हणेल तर घरात महाभारत होईल,,,माहेरी कळेल,,,आईबाबांना किती वाईट वाटेल,,,,काय करु मी,,,,,????

ह्याचा अर्थ काय,,,तिचा स्वतःचा पैसा असताना तिला तो कसा खर्च करावा ,, हे का सांगावे ,, कुणीही,,,?

अर्थात पैसा हा चांगल्याच कामांसाठी वापरावा ,,,!

आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे आपण मुली , सुनेवर अवलंबुन नसतो,,,पण आता काळ बदलला आहे,,,मुली शिक्षण घेऊन कमावत्या होत आहेत,,,त्यांची मनापासुन इच्छा असते आपल्या आईवडीलांना अडीअडचणीत मदत करावी,,,

माहेरची परिस्थिती चांगली असेल तर प्रश्नच नाही,,,,!

पण जबरदस्तीने तिच्या कमाईचे पैसे सासरच्यांनी का घ्यावे,,,?

मुलींनो आपले पैसे सुरवाती पासुनच योग्य ठिकाणी गुंतवावे ,,,जेणेकरुन घरच्याच अडीअडचणीत पुढे कामी येतील,,,! 

तिच्या कमाईचे पैसे हे सर्वथा तिच्या हक्काचे आहेत,,,कुणीही ते घेऊ शकत नाही , जबरदस्तीने,,,!

००००००००

🎭 Series Post

View all