खंत मनातील - गृहीत

We all must have gone through these experiences in our lives. At times we even fail to realise our own mistakes...In the process, differences crop up and we hurt our own people.. Read these series of episodes with a positive mind and try to underst

! गृहीत !

घरात मुली च्या वाढदिवसाचे खुप प्लॅनींग सुरु , काव्या चार वर्षाची होणार , शमिता आणी रमेश ची एकुलती एक मुलगी ,

काही ना काही कारणाने तिचे , तिनही वाढदिवस त्यांना धुमधडाक्यात साजरे नाही करता आले , पण शमिताने चंग बांधला , काहीही झाले तरी ह्या वेळेस वाढदिवस साजरा करायचाच , सासर माहेरच्या सगळ्याच नातेवाईकांना काही दिवस मुक्कामीच बोलवायचे सर्व मिळून कुठे तरी फिरायला जायचे , असे गेले वर्षभर ती मनातल्या मनात प्लॅनींग करत होती , 

तिला वाढदिवसाला काय करायचे ते , एक एक गोष्ट आठवली की रजिस्टर मधे लिहून ठेवत होती , ऐन वेळेवर विसरु नये म्हणून , 

कधी कधी रमेश तिच्या अती ऊत्साहा वर हसायचा , 

शमिता , काव्या , रमेश च्या नोकरीमुळेच कुटूंबापासून दूर नागपूरला वास्तव्यास होते , 

मधेच कोरोना मुळे लाॅकडाऊन झाले , सगळ्यांना घरातच राहावे लागत होते , ह्यातच शमिता काळजीत पडली वाढदिवस करायला मिळेल की नाही वातावरन पाहू जाता रिस्कीच होते , शेवटी हतबल होऊन रमेश ने ठरवले ह्या वेळेस पण वाढदिवस घरातच करावा लागेल , 

तशी शमिताला रडूच यायला लागले किती प्लॅनिंग केले मी गेले वर्षभर आणी आता हे लाॅकडाऊन , कोरोना , 

तसे तिला जवळ घेत रमेशने समजाविले , " अग हा तर चौथाच वाढदिवस आहे तिचा , 

अजून खुप वाढदिवस तिचे साजरे व्हायचे आहेत ,

ह्या वेळेस नाहीतर काही हरकत नाही , पुढल्यावर्षी करु आपण साजरा , वाटल्यास त्या वेळेस एक चांगला बॅण्ड आणू घरी , दणाणून सोडू परीसराला "

तशी हसत डोळे पुसत शमिता म्हणाली , तुमच आपल काहीही हाँ ! काय लग्न आहे की काय तिच ! मग दोघेही हसायला लागले .

आता शमिताची मानसीक तयारी झाली होती घरीच तिघांमधे वाढदिवस साजरा करायचा , ती छान घरीच काव्याचा आवडता चाॅकलेट केक बनवणार होती , नवीन ड्रेस तर आणता येणार नव्हता पण तिने मोठा होता म्हणून एकदाही न घातलेला एक जुना खूप छान ड्रेस तयार करुन ठेवला , त्यातच आई , बहीण , भावांचे काॅल आलेत पण कोरोनामुळे काहीच जमणार नाही म्हणून आटापिटा न करता आपण नंतर साजरा करु वाढदिवस असे शमिताने सगळ्यांना सांगीतले .

वाढदिवसाच्या दिवशी सकाळ पासूनच शमिताची धावपळ सुरु झाली , कामाला बाई नसल्यामुळे तिलाच सर्व कामे करायची होती , चहा , नाश्ता झाल्यावर शमिताने ठरवले आधी स्वयंपाक करते मग छान केक बनवते नंतर घर सजवते , मी आज छान वनपीस घालते , बर्‍याच दिवसांपासन चांगली तयारच झाली नाहीये मी , मग ठरल्या प्रमाणे शमिता स्वयंपाकाला लागली आणी तेव्हढ्यात बेल वाजली , अरे ह्या लाॅकडाऊन मधे कोण येणार घरी ! 

कोण आहे जरा बघता का रमेश !

हो बघतो ! आणी एकच गलका झाला ! अरे वा वा ,, या या ,, मी कधीचा वाट बघतोय तुमची ,, लेट झालात !

अरे हो बेटा , तयारी तर रात्रीच करुन ठेवली होती , पण शेवटी निघताना काही ना काही राहातच होते ,, फायनली आमच्या लाडक्या काव्यांच्या वाढदिवसाला पोहोचलोच आम्ही,,,,,,

आवाजाने धावतच शमिता हाॅलमधे पोहोचली , लगेच सासू सासर्‍यांच्या पाया पडली , दिर - देवरानीला भेटली , तुम्हाला कशी काय परमिशन मिळाली यायला ? तिने कौतुकानेच दिराला विचारले , ते काही विचारु नका वहीनी , दवाखाण्याच्या बहाण्याने आम्ही आलोत खरे तर , तसेही आईला तुम्हा सर्वांची खूप आठवण आली होती तर दादा म्हणाला तुम्ही माझ्या मित्राशी बोला तो परमिशन मिळवून देईल , लाॅकडाऊन ला दोन महीने होत आले होते .

अच्छा,,,,! वळून तिने रमेश कडे बघीतले ,

ती मग हसून सगळ्यांशी बोलली , नंतर सर्वांना फ्रेश व्हायला सांगून ती चहा बनवायला किचन मधे गेली , पण मन तिचे सैरभैर झाले होते , चहा झाला , स्वयंपाक बनवला , जेवणे झाले , बोलता बोलताच दुपारचे चार वाजलेत , पुन्हा एकदा चहा घेतल्यावर शमिताने केक बनवला , घर बाकीच्यांनी त्यांना वाटेल तसे सजवले , एकदाचा केक तयार झाला , चला तयारी करुयात म्हणून शमिताने काव्याची तयारी करुन दिली , रमेश ही तयार झाला , आज काव्या आणी रमेश तिला खूपच खुश वाटलेत , बर्‍याच दिवसानंतर ते आईबाबांना भेटले होते ना ? 

वनपीस कडे बघीतले शमिताने पण,,,,मग एक सलवार कुर्ता घालून ती तयार झाली , ओवाळून आणी केक कापून काव्याचा वाढदिवस साजरा झाला , मग पुन्हा ती किचन कडे वळली रात्रीच्या जेवणाची तयारी करायची होती तिला ,,, पुन्हा स्वयंपाक केला त्यात थोडीफार मदत दिरानीने केली तिला , जेवणे झालीत , रमेश आणी काव्या तर हवेतच होते जणू , मग हाॅलमधेच सगळ्यांची झोपायची व्यवस्था केली , रमेश , काव्या पण हाॅलमधेच सगळ्यांसोबत गप्पा करत अंथरुणावर लोळत बसलीत पण थकल्या मुळे शमिता बारा वाजता झोपायला आपल्या बेडरुम मधे गेली , आणी दार आतून बंद करुन बेडवर स्वतःला झोकून देऊन डोळे मिटलेत , बंद डोळ्यातून आता तिच्या गंगा जमुना वाहायला लागल्या , एवढ्या वेळेचा दाबून ठेवलेला बांध फुटला होता तिचा ,,,, माझ्या घरच्या सगळ्यांना मी कोरोनामुळे येऊ नका म्हणाले , मला आज काय काय करायचे होते , पण पुर्ण दिवस माझा कामात गेला , सगळ्या गोष्टी मी रमेशला विचारुन केल्या पण त्याने मला , घरच्यांना बोलावले हे सांगायची पण तसदी घेतली नाही , वरुन कोणतेही कन्फेशन नाही त्याचे , आपल्यातच मस्त आहे तो , मला गृहीत धरुन,,,,,,,,,

जोडीदाराला गृहीत धरु नका,,,, मन जपा,,,,सुंदर फुलेल संसार तुमचा,,,,!

००००००००

वाचक हो ! खंत मनातील , मधल्या सगळ्याच कथा कुठे ना कुठे घडलेल्या आहेत माझ्या आजुबाजुला कदाचित तुमच्याही आजुबाजुला घडल्या असतील , माझ्या लिहीण्याचे एकमेव तात्पर्य आहे - " झालेल्या चुकांमधुन बाहेर पडून जर थोडा जरी कुणाला ह्या कथांमधुन फायदा झाला तर माझं लिहीणे सार्थकी लागेल असे मला वाटते "

सगळ्या कथांकडे सकारात्मकतेने बघा , एवढीच विनंती !

ह्या सगळ्या सत्यकथाच आहेत फक्त थोडी काल्पनिक मांडणी केल्यामुळेच , मी सत्यकथा हा टॅग वापरला नाही .

०००००००

🎭 Series Post

View all