खंत मनातील - गैरसमज

We all must have gone through these experiences in our lives. At times we even fail to realise our own mistakes...In the process, differences crop up and we hurt our own people.. Read these series of episodes with a positive mind and try to underst

गैरसमज

80 च्या दशकात , 21ची होता होता लग्नं झाले , 

शिवानी दिसायला सुंदर गोरीपान बघताच विश्वासला आवडली आणि पुढील तीन महीन्यातच लग्न आटोपुन शिवानी संसाराला लागली , 

कळायच शिवानीला सगळचं पण कमी बोलायची सवय कारण माहेरच्या परंपरेतुनच मुलींनी कमी बोलायच हे अंगवळणी पडलेल !

लग्न होऊन शिवानी विश्वासच्या घरात आली , सासुसासर्‍यांच्या व्यतिरिक्त एक दीर लग्न झालेली ननंद , लग्नघरात भरपुर पाहुणे आलेले , नवरीचे स्वागत झाले नंतरचेही सोपस्कार पार पडलेत , 

आता हनिमूनला कुठे जाणारेस दादा ? 

लहान ननंद लीलाचा प्रश्न , 

कशाला जाव लागत हनिमूनला ? 

मला ते कुठे लांब गेलेल आवडत नाही ऊद्या जेवणानंतर मला लगेच नाशीक ला जायचं आहे , 

बस ऊद्यापर्यंतचीच सुट्टी होती , अरे विश्वास तू सांगीतल नाहीस आम्हाला चारच दिवसाची सुटी काढून आलास ते ? 

आई जरा रागातच म्हणाली , 

अगं आई मला जास्त सुट्ट्या मिळत नाहीत तुला माहीत आहे , आधी सांगीतले असते तर तेव्हा पासून तुम्ही माझ्यामागे भुनभुन लावली असती म्हणुन आता विषय निघालाच होता तर सांगीतले , 

काय रे दादा असं करतोस फारच रुक्ष आहेस तू , 

वहीनीसोबत अजुन मोकळेपणाने बोलणेही झाले नाही , 

ऊद्या तिच्या माहेरचे पुजे साठी येतील मग काय तू मधुनच जाशील का परत ? 

लीला गाल फुगवून म्हणाली , 

मग काय त्यात ! नोकरी आहे माझी ती , जावच लागणार , काहीही झाले तरी ,

आणि तुला वहीनी सोबत राहायचे आहे ना ? 

तर तिला राहू द्या तुमच्याजवळ काही दिवस तुमच मन भरलं की घेऊन याल नाशीकला , 

ठिक आहे ना लीला ? 

त्याने थोडस हसतच लीला कडे बघत म्हंटले , 

घरचे नाराजीनेच पण तिला इथे ठेवणार म्हंटल्यावर थोडे खुश झालेत , 

पण डोक्यावरुन ओढणी घेऊन खाली मान घालुन बसलेल्या शिवानीच्या मनात ऊलथापालथ होत होती , 

म्हणजे हा मला इथे सोडून जाणार ! 

मी कुणालाच तर नीट ओळखत नाही .

लग्नाच्या धावपळीमुळे सगळे दमलेले तरीसुद्धा थोडबहुत जेऊन सगळे झोपलेत , 

ठरल्या प्रमाणे दुसर्‍या दिवशी पुजा झाली पुजेला माहेरची मंडळी पण आली , त्यांनाही कळलं विश्वास लगेच निघणार म्हणुन पण नोकरीसाठी जाण आवश्यक आहे म्हणुन काय म्हणायच आता , 

ते काहीच बोलले नाहीत , 

इकडे विश्वास बॅग भरत असता लीला हाॅलमधे बसलेल्या शिवानीला म्हणाली , 

वहीनी जा दादाला मदत कर , 

मी करु मदत ? तिच्याकडे बघत शिवानी म्हणाली ,

हो गं वहीनी तूच ना , 

बायको आहेस बाबा त्याची मग दुसर कोण करणार मदत , 

ती खट्याळपणे हसत म्हणाली , 

मग शिवानी थोडी चाचरतच बेडरुम मधे गेली , 

अंग चोरुन ऊभी राहीली तिला कळेचना कशी मदत करावी , कुठून सुरुवात करावी , 

तिला बघायला पाहुणे म्हणुन आलेत तेव्हा विश्वासच्या बाबा , आणि मामांनीच तिला प्रश्न विचारलेत , 

विश्वास फक्त तिला न्याहाळत होता ,

कपडे घेताना तिला फक्त शालूचा रंग कोणता विचारण्यात आले , कारण तेव्हा काही ठिकाणी सहसा मुली लग्नाचा बस्ता खरेदी करताना नसायच्या ,

त्यानंतर लग्नातच साखरपुडा तो ही एकटीचा ,

कारण मुलाच घरदार बघायला गेलेल्या वडीलधार्‍यांनीॅ तिथेच मुलाचा साखरपुडा ऊरकवला होता एकट्याचा ,

एक दोनदा तिची नजर चुकून लांब बसलेल्या विश्वासकडे गेली तर तो तिलाच बघत होता , 

आणि घाबरुन तिने नजर वळविली होती तेवढीच नजरभेट ,

त्या नंतर लग्नविधी , लग्न झाल्यावर गाडीत त्याच्यासोबत बसली ते ही बराच वेळ त्याला धक्का नाही लागणार ही काळजी घेत ,

शेवटी करवली बनुन आलेल्या शेजारी बसलेल्या आत्यानी तिला अडचण झाल्यावर , 

पोरी जरा तिकडे सरक ना म्हणत तिला हळुच धक्का दिला , त्यानंतर तर पुर्णवेळ तिच रक्त सळसळत राहीले विश्वासचा पहीला स्पर्श तिला घाम फुटायला लागला , 

पहिल्यांदा ती अनोळखी पुरुषाला एवढे खेटून बसली होती ,

आणि आता ती त्याला मदत करायला एकटी बेडरुम मधे आली , 

त्याने तिच्याकडे वळुन न बघताच म्हंटले , बस !

पटकन ती समोर असलेल्या खुर्चीत विसावली , 

तिला कळत नव्हतं काय बोलू आणि कुठे बघू , 

मग ती ऊगाच बाजुला ठेवलेल्या न्युज पेपरला लांबुनच बघु लागली , 

पाच मिनीटानंतर विश्वासच्या आवाजाने तिची तंन्द्री भंग झाली आणि ऊग्र परफ्युमचा दर्प तिच्या नाकात शिरला तसे चमकुनच तिने त्याच्याकडे बघीतले , 

विश्वास अगदी जवळ पलंगावर तिच्यासमोर बसला होता तिच्याकडे हसुन बघत होता , 

ती तर शहारलीच ! 

लाजून बळेच हसत म्हणाली नाही वाचायचा मला , 

मी पेपर नसते वाचत , पटकन बोलुन गेली ,

{ मग मनातच म्हणाली , वा गं भयताड पोरी तुझी काय इमेज बनणार आता तुझ्या नवर्‍यासमोर }

काही मदत करु का ?

काय करशील मदत ? त्याने प्रतिप्रश्न केला , 

तुम्ही म्हणाल ती , इकडे तिकडे बघत ती म्हणाली ,

बरं तुला अजुन काही बोलायचे आहे का माझ्याशी , 

नाही मी काय बोलणार , काही नाही बोलायच मला ,

{ अरे काय गं तू , बोलना आताच का चालला , थांब काही दिवस इथेच , तिच मन तिला म्हणत होतं }

लीलाताईंनी मला मदतीला पाठवले , 

म्हणजे तुला काहीच मदत करायची नव्हती आणि जबरदस्तीने तुला इकडे पाठवले असेच ना ! 

तिचा हात हातात घेत विश्वास तिचा चेहरा निरखू लागला , आता तर शिवानीला मनोमन वाटू लागले मी कुठे पळुन जाऊ ,

हे धरणी माते दुभंगुन तू मला कवेत घे , मला काय होतय मलाच कळत नाहीये , कसं बघू ह्यांच्याकडे , काय करु आता , तिला काहीच सुचेना , हातपाय थरथरायला लागले तिचे , चेहरा घामाने डबडबला , 

तिची अशी अवस्था बघुन तो ही क्षणभर चपापला , 

हो ,,हो ,,,हे काय , घाबरली की काय ? 

अरे,,,म्हणत त्याने तिचा हात सोडला , 

मग हळुच हसून म्हणाला बरं शांत हो , 

काय होतय तुला ? ती काहीच बोलली नाही ,

बघ मला माहीत आहे तुझ्यासाठी हे सगळं नवीन आहे ,

नवीन लोकांमधे अॅडजस्ट व्हायला वेळच लागेल ,

हो ना ,,,सगळ्यांच्या इच्छेखातर तुला इथे ठेवतोय ,

मग ये काही दिवसाने नाशीकला ,

सगळे चांगले आहेत आपल्या घरचे ,

तुला काहीच त्रास होणार नाही ,

खरेतर सुट्टी नसल्यामुळेच मला जावं लागतय ,

आता मात्र तिचा बांध फुटला आणि शिवानी हमसून हमसून दोन्ही हाताने तोंड लपवुन रडायला लागली ,

{ मनातल्या मनात ती बडबडत होती , मला काय होतय कळत नाहीये , अचानक अनोळखी लोकांमधे आले , कोण कसं काहीच माहीत नाही , फक्त विश्वास नवरा म्हणुन त्याच्याबद्दल स्वप्न रंगवलेत , पण तू तर एका दिवसातच मला इथे ठेऊन निघाला , मी कशी राहणार इथे आणि पुन्हा ती हमसून रडू लागली } आता मात्र विश्वास चपापला , 

तिच्या पाठीवर हात ठेवत तो म्हणाला , 

तुला काही प्राॅब्लेम आहे का ? 

काही दुखतय का ? तरी ती रडतच होती ,

बरं हे लग्न जबरदस्तीने करण्यात आलं का ,,,?

अहो ! नाही हो ,,,,अस काही नाही , तुम्ही मला सोडून चालले म्हणुन रडायला आले ,,,, एकादमात ती त्याच्याकडे बघत म्हणाली , रडून डोळे लाल झाले होते तिचे , 

त्याने खिशातला रुमाल काढून तिचा चेहरा पुसायचा प्रयत्न केला , तिने लगेच त्याच्या हातातला रुमाल घेऊन स्वतः चेहरा पुसू लागली ,

आता विश्वास गंभीरपणे तिच्याकडे बघू लागला , 

खरेच किती निरागस भाव आहेत हिच्या चेहर्‍यावर , 

तिला जे वाटतय तेही बरोबर आहे ,

तिला आपल्या भावना सांगताही येत नाहीयेत ,

ठिक आहे मग ठरलं माझं !

त्याने मनोमन निश्चय केला आणि तिला म्हणाला , 

माझी तयारी झाली , 

बॅग भरली आहे पण आता तू तुझीपण तयारी कर !

मला वाटत तुझी बॅग भरलेलीच आहे तुला जास्त आवरावं लागणार नाही , 

कशासाठी माझी बॅग भरु ? तिने न कळुन त्याला म्हंटले ,

आपण दोघे जाणार आहोत नाशीकला , आताच !

काय ,,,, तिचा चेहरा आनंदाने फुलला ,

पण लगेच म्हणाली बाकीच्यांना सांगीतले नाही ते काय म्हणतील , 

ते मी बघतो , तू आवर तुझं सामान , एकातासात आपण निघू , काही म्हणनार नाहीत ते ,

विश्वास कोर्टात जज होता आणि त्याने आताही एक निर्णय झटपट घेतला होता ,

ती तयारीला लागली इकडे बेडरुम बाहेर येऊन विश्वासने सगळ्यांना सांगीतले , मी शिवानीला सोबत नेत आहो , 

एका तासात निघू आम्ही , 

आई ,बाबा , लीला आणि लहान भाऊ एकमेकांकडे बघायला लागले , काय झाल काय ?

ही तर थांबणार होती म्हणजे हाच तर म्हणाला तिला इथे ठेवणार आणि अचानक काय जादू झाली ?

शेवटी आई म्हणालीच , का रे का घेऊन चाललास तिला ?

राहू द्यायच असत काही दिवस आमच्या जवळ , 

ननंद भावजयी जरा सोबत राहील्या असत्या , 

माझ्या मुलीला वहीणीचा पाहुणचार घेता आला असता ,,,,

अगं मग माझ लवकर येण होणार नाही म्हणून घेऊन जातो तिला आताच ,

घरचे पाहुणे गेलेत की तुम्ही सगळे नाशीकला या ,

मग लीलाचा चांगला पाहुणचार करु आपण ,

चल मी गाडी काढतो आणि लहान भावाला म्हणाला बॅग आण बाहेर , मी गेटवर गाडी आणतो , आणि तो बाहेर गेला ,

सगळ्यांनी एकमेकांकडे बघीतले , 

सगळ्यांचे चेहरे पडलेले होते ,

सुनील बेडरुम मधे गेला , 

शिवानीने तिचं वर असलेल सगळ सामान बॅगेत टाकून पॅक केलेल होतं , 

झाली का तयारी वहीनी , 

हो झाली !

फारच फास्ट काम आहे बुवा तुमच तर ,,,, सुनील म्हणाला ,

ती थोडस हसली , तेव्हढ्यात लीला आत आली 

व्वा वा वहीनी मानल बुवा तुम्हाला ,,,तेज एकदम,,,

तिच्या मागेच आई आत आली , कुठून जादू झाली,,,,,

शिवानीला ह्यावर काय बोलावं कळेचना ,,, 

कसनुस हसून तीने त्यांच्याकडे बघीतले ,,,

ह्यांनीच मला म्हंटले तयारी कर ,,, म्हणुन केली मी तयारी,,,

तिचा आवाज दडपणाने खोल गेला होता ,, 

तिघांच्याही चेहर्‍यावर तणाव तिला स्पष्ट दिसत होता ,

तेव्हढ्यात विश्वासची आत्या , मामी आत आल्यात ,

बाई बाई काय आजकालच्या पोरी आहेत ,,,लग्न झालं की त्यांना फक्त नवर्‍यासोबत देणघेण असतं,,

बाकी त्याला आईबाप आहेत नातेवाईक आहेत त्यांच्याशी काही देणघेण नाही,,,, 

मी भली आणि नवरा भला,,, नाही का वहीनी आत्या रागाने शिवानी कडे बघत म्हणाल्या ,,,

शिवानी घाबरुन त्यांच्याकडे बघत होती ,,,

आता तर शब्दही सुचत नव्हते तिला ,,,

कसे समजावुन सांगू ह्यांना ,,,,

बापरे , का मला रडायला आले काय माहीत ,,,,

मोठ्ठी चुक झाली माझ्याच्याने ,,,आता कस सावरु मी हे,,,,

महतप्रयासाने तिने डोळ्यातले अश्रु रोखले होते,,,,

रडायची सुद्धा हिम्मत होत नव्हती तिची,,,,

तेव्हढ्यात विश्वास आत आला ,,,झाली ना तयारी ?

त्याने शिवानीला विचारले , हो झाली,,,

चल सुनील बॅग घे बाहेर ,,, मग त्यांच्या सगळ्या बॅग गाडीत ठेवल्यात , कुणीतरी शिवानीला हळद कुंकू लावले जोडीने दोघे ही वडीलधार्‍यांच्या पाया पडलेत , 

विश्वास ड्रायव्हिंग सीटवर बसला , शिवानीने गाडीचे दार ऊघडले बसायसाठी , मागून तिला कुणाचेतरी वाक्य ऐकू आले,,,झाले आल्या आल्या ह्या पोरीने घर तोडले,,,,,,!

मुलगा बघा दहा मिनीटातच बदलला,,,!

कशी बशी शिवानी समोरच्या सिटवर बसली,,,

हात हलवुन बाय ,,बाय केले,,,,

पण तिला सगळ्यांच्या नजरे मधे तिच्यासाठी वेगळीच भावना दिसली,,,,

का,,,का,,,,रडलीस गं बाई,,,कशासाठी रडलीस,,,,

एक खंत मनामधे घेऊन ती विश्वास सोबत ,,,तिथून निघाली .

जास्त समज नसताना लग्नं ,

जन्मघरीच खुलून व्यक्त न होऊ शकलेली ,

अनोळखी लोकांमधे दुसराच दिवस ,

कमी बोलणारी शिवानी पुर्ण व्यक्त नाही होऊ शकली ,

प्रश्नांच्या सरबत्तीने गांगरुन काही बोलली ,

नवर्‍याने तिच्या मनाचा विचार केला ,

त्यावरुन बाकीच्यांनी तिचं कॅरेक्टर ठरवलं !

वेळ द्या नवीन सुनेला घरात मोकळ व्हायला ,

मनातल बोलायला ,

तिला हे नवीन घर आपलं मानायला ,

एवढ्यातच तिच्याबद्दल गैरसमज कशाला !

असेच काहीही न जाणता एकमेकांबद्दल फार गैरसमज करुन आपले नाते सुरुवातीलाच खराब करुन घेतात काही जणं !

००००००

🎭 Series Post

View all