खंत मनातील - धोका

We all must have gone through these experiences in our lives. At times we even fail to realise our own mistakes...In the process, differences crop up and we hurt our own people.. Read these series of episodes with a positive mind and try to underst

धोका

इलियाना बेडरुम आवरत होती , मनातल्या मनात तिचा संवाद सुरु होता , चला आता एक महीना मला एकटीला काढायचा आहे , म्हणजे माझ्या मनाप्रमाणे मला रुम सजवता येईल !

टेबलवर तिला जाॅनचा फोटो दिसला , 

गोड हसत तिने फोटो ऊचलून फोटोचीच पप्पी घेतली , 

डियर जाॅन आता एक महीना आपण भेटणार नाही , 

कसं होईल माझ माहीत नाही , 

तुझ्याशिवाय कसा जाईल माझा वेळ , 

हो मला माहीत आहे मला काॅम्पीटेटिव्ह एक्जाम ची तयारी करायची आहे आणि मी तुला म्हंटले ही होते मी मन लावुन अभ्यास करते ह्या संधीचा फायदा घेते आणि म्हणुनच ह्या वेळेस मी ना माहेरी जाणार ना सासरी मी इथेच आपल्या घरी थांबते काय सारख सारख तू शिपवर गेला की माझी रवानगी गावी आता कंटाळली मी ,

ते ही बर ह्या वेळेस तू एकाच महीन्याने परत येणार आहेस , तर मोकळे पणाने मी इथेच राहते , 

तू काळजी करु नकोस बस ये परत लवकर आणि साॅरी हां ! तुझ्या जागेवर कपाटावर मी आता अतिक्रमण करणार एक महीना , 

स्वतःच मोठ्याने हसून तिने जाॅनचा फोटो पुसून टेबलवर निट ठेवला , 

बंद ड्राॅवर मधले पुस्तकं वर टेबलवर ठेवले , 

चला आज आराम करते आणि ऊद्या पासून अभ्यासाला लागते .

जाॅन आणि इलियानाच सतरा महीन्या पुर्वी लग्न झाले , 

तसे कुटूंबानी ठरवुनच लग्न केलेल , 

खुप आनंदाने , ऊत्साहाने दोन्ही परिवाराने लग्नाची तयारी केली होती आणि एका चर्चमधे भरपुर मित्रमंडळी नातेवाईकांच्या ऊपस्थितीत लग्न सोहळा पार पडला 

आणि इलियाना काही दिवस जाॅन सोबत सासरी राहून , 

जिथे जाॅनची पोस्टींग होती तिथे आलेत , 

जाॅनला कॅप्टन होता , काॅर्टर मिळाल होत नेव्हीच , बेसवरच !

जेव्हा ही तो शिपवर जायचा हिची रवानगी सासरी किंवा माहेरी व्हायची ,

काॅर्टर मधे असल्यामुळे तशी भीती काहीच नव्हती , 

ती एकटी राहू शकत होती , 

तेव्हढ्यात फोन वाजला , 

wtup विडीओ काॅल होता जाॅनचा , 

हॅलो स्वीटहार्ट काय करतेस ? 

अरे मी रुम आवरत होते , 

तू काय करतोस ? 

मी अगं निघालो आता , 

पुढे नेटवर्क नसेल तुझ्याशी बोलता येणार नाही ,

म्हणुन म्हंटले बोलुन घेतो , हसुन जाॅन म्हणाला , 

हो रे काय तुला पण सारख सारख जावं लागत लांब , 

मला तर करमत नाहीये तुझ्याशिवाय , 

हो गं माझी नोकरीच शिपवरची काय करणार ? 

पण ह्या वेळेस मी महीन्या भरानेच येणार आहे परत ,

तू म्हणाली होती ना अभ्यास करणार ,

तर आता चांगल्या तर्‍हेने अभ्यास कर , 

माझा विचार कर ना जरा ! 

मी तुझ्यापासून लांब इकडे , 

मला सुद्धा करमत नाही तुझ्याशिवाय , 

म्हणुनच तर तुझे खुप सारे फोटो मी मोबाईल मधे घेतलेत काही विडीओ पण घेतलेत गं आपले , 

फोटोवरच भागवतो महीनाभर , 

काय करणार ना,,,, ! 

अरे हो एवढा सेंटी नको होवुस , निघतील हे दिवस , 

बरं ठिक आहे आता मधे कुठे नेटवर्क असले तर मला तुझ्याशी बोलता येईल नाहीतर एका महीन्यानंतरच बोलू आपण , काळजी घे स्वतःची , 

आणि माझी अजिबात काळजी करु नकोस , 

बरंं चल , आता नेटवर्क जाईलच पाच मिनीटात ठेवतो फोन , 

बरं बरं जाॅन मम्मापप्पां सोबत बोललास का ? 

नाही गं वेळच मिळाला नाही तू सांग त्यांना , 

हो मी करणार त्यांना फोन पण तू आता पाच मिनीटं आहेत तर बोलून घे पटकन , 

नाही गं आता तर जमणारच नाहीये ,

हे काय दोन तीन मिनीटं गेलेत की पुन्हा , 

तूच फोन करुन कळव त्यांना , 

फोन बंद करतो मी आता कारण मला तो इथे जमा करावा लागतो , 

चल बाय love you , 

love you to तेव्हढ्यात फोन बंद झाला , 

अरे गेला वाटत हा नेटवर्कच्या बाहेर , 

तिने थोडे नाराजीनेच फोन कडे बघीतले , 

डोळ्यात आसवं आलीत तिच्या , 

त्याच्या आठवणीने , 

काय ही नोकरी सारखी टुर,,टुर,,,!

पुन्हा तिने फोटो कडे बघीतले ऊगाच आपण आज सकाळी त्याच्याशी वाद घातला , 

तो खरेच प्राॅमीस केल्या प्रमाणे वागेलच अशी आता मात्र खात्री पटतेय , 

चुकत असतं माणुस ,

मग काय तिच ती गोष्ट ना धरुन ठेवायची आपण !

तो प्रयत्न करतोय ना सगळ्या गोष्टी विसरुन पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी , 

मग आपणही विश्वास करायलाच पाहीजे त्याच्यावर ,,, 

हो खरेच,,,आता मी त्याचे सगळे अफेयर विसरुन त्याच्या सोबत पुन्हा नव्याने सुरुवात करते ,,,

मम्मा म्हणते तसे परिक्षेचा निकाल काहीही लागो मात्र संसारात एक बाळ येऊच दे,,,,,

नवरा बायको त्यामुळे जुळून राहतात ,

आहेत ना दोन्ही मम्मा सांभाळायसाठी,,,

आणि माॅम बनण्याच्या कल्पनेनेच ती सुखावली,,, 

पोटावरुन हात फिरवला तिने ,,,

आता जाॅन परत आला की त्याच्याशी बोलतेच ,,,

हवय मला बाळ,,,

मनोमन हसतच ती जाॅनच्या फोटोकडे बघत होती ,

तेव्हढ्यात तिच्या फोनवर दोन मेसेजेस आलेत , 

आवाजाने तिची तंद्री भंग झाली ,

तिने मोबाईल कडे बघीतले त्याचेच दोन मेसेज होते ,

अरे हा कसा नेटवर्क मधे ,,

अच्छा असेल नेटवर्क म्हणुनच तर त्याने मेसेज केला,,,

तिने आनंदून मेसेज बघीतला ,,,

" स्विटहार्ट तुझ्याशिवाय कसा राहू इकडे,,फार आठवण येईल गं तुझी,,," मनोमन सुखावली इलियाना , 

खरेच हा आपल्यावर खुप प्रेम करतोय ,,,

तिचे डोळे पाणावले,,,

" बरं मी तुला कालच म्हणालो होतो मला तुझे सुंदरसे काही फोटो पाठव , विडीओ पाठव ! पण तू अजुनही पाठवलेले नाहीस , चल मी तुला खुप मिस करतोय,,,यार अगर मेरे साथ शिप पर तू होती तो कितना अच्छा लगता ना ,,,! अभी मुझे यहाँ एक महीना बोअर होना पडेगा,,, चल जल्दी से फोटो भेज,,,नेटवर्कसे बाहर होने के पहले,,,,,और आधे घण्टें में शायद नेटवर्क चला जायेगा ,,बाय love you "

इलियाना मेसेज बघुन अगदीच खुश झाली,,

पण लगेच तिच्या लक्षात आले,,,

नेटवर्क जाऊन अर्धातास तरी झाला , 

मग हा नेटवर्क मधे कसा ? 

आणि फोटोतर कालच त्याने स्वतःघेतलेत ,

मग हा पुन्हा कसा ,,,मागतोय ,,,काय हे ,,,हा,,मेसेज,,,,!

तिचे डोके फिरायला लागले ,

म्हणजे,,म्हणजे,,,धोका !

हा सुधारणार नाही,,,?

तिला रडायच्या ऐवजी आता राग यायला लागला,,,

किती मुर्ख आहोत आपण ,,

प्रत्येक वेळेस त्याला माफ केलं,,

जेमतेम सतरा महीने झालेत कसे बसे,,,,

एका महीन्यानंतरच खरेतर त्याचा दिलफेक स्वभाव तिला कळला पण वडीलधार्‍यांना न सांगता ती स्वतःच हॅण्डल करु पाहत होती , प्रत्येक वेळेस त्याची चोरी पकडल्यावर माफी मागणे आणि पुन्हा तिच चुक करणे अविरत सुरु होते ,

चार पाच दा झाले,,,शेवटी मम्मापप्पांना सांगुन समजावणे झाले,

त्यानंतर आता कुठे थोड तिला रिलॅक्स वाटत होतं त्यातच शिपवर जाव लागल,,,,आणि आता पुन्हा हे,,,

म्हणजे हा कधी सुधारलाच नव्हता,,,

नाटक होत सगळं,,,!

चुकून त्याचा मेसेज इकडे आला,,ते बरच झालं,,,,

खरा चेहरा ह्याचा कळला मला,,,

तेव्हढ्यात तिसरा मेसेज ,,,

व्हेरी व्हेरी साॅरी,,,चा पण आला ,

ठिक आहे आता मी हे सहन करणार नाही !

माझं ठरलय,,,

पाच मिनीटानंतर " अगं मी गमतीने मेसेज केलाय तुला ,

आणि हसण्याचे इमोजी आलेत "

चल बाय , नेटवर्क जाईल आता,,,,!

आणि त्याचा फोन बंद झाला ,

पण जे समजायचं ते समजले इलियानाला ,,,

गडबडून त्याने व्हेरी व्हेरी साॅरी पाठवुन , 

तिच्या शंकेच रुपांतर विश्वासात बदलवले !

जो व्यक्ती माझ्याशी प्रामाणिक नाही , 

तो कधीही मला दगा देईल,,,,

त्याच्या सोबत मी आता राहणार नाही ,

आणि तिने लगेच पप्पांना फोन लावला,,

पापा , जाॅन कधी सुधारलाच नव्हता,, ,,,

त्याचे लफडे अजुनही सुरुच आहे,,,

फार खोटा बोलतो हो तो,,,,

त्याच्या सोबत नाही राहायचे मला आता ,,,

मला डिवोर्स घ्यायचा,,,

yess बेटा ,,

मला माहीत होत ,

हा सुधारणार नाही , 

पण मी तुझ्याच निर्णयाची वाट बघत होतो ,

ठिक आहे , तुझा निर्धार झाला ना,,,

ऊद्या मी तुला घ्यायला येतो ,

तू तयारीत राहा !

सतत लफडे करत राहणारे बाई असो अथवा पुरुष ,

चांगले जोडीदार होऊ शकत नाहीत ,

लग्नाआधी काहीही असेल त्याबाबत वाच्यता नको ,

पण लग्नानंतर तुम्ही आपल्या पार्टनरला 100 टक्के देणे प्रामाणिक असणे गरजेचे आहे ,

आत्मघात करुन काहीही शक्य होत नाही ,

आणि आयुष्यभर रडत राहून ,

स्वतःला त्रास करुन घेण्यात ही अर्थ नाही ,

त्यातून निघून चांगला मार्ग निवडणे कधीही ऊत्तमच ,

वडीलधार्‍यांनी पाठबळ देणे फारच गरजेचे,,,!

आतापर्यंत 25 तरी भाग झालेत , 

हा 26 सावा ,

सत्य घटनेवरुन प्रेरीत सगळेच भाग ,

नक्की वाचा , कमेंट्स द्या

मला माझ्या चुका सुद्धा कळतील !

०००००००

🎭 Series Post

View all