खंत मनातील - चुकलं कुठे

We all must have gone through these experiences in our lives. At times we even fail to realise our own mistakes...In the process, differences crop up and we hurt our own people.. Read these series of episodes with a positive mind and try to underst

! चुकलं कुठे !

अगं शिला माझी ना तब्येत बरी नाही गं , दोन दिवसांपासून अंगावरच काढतेय , हे सकाळीच जातात आणि रात्री ऊशीरा परत येतात , मग थकलेले असतात , म्हणून राहील डाॅक्टरांकडे जायच पण आज ना सकाळपासूनच पोटात पण दुखत आहे , काय माहीत काय झाले ते , आज मी ह्यांना बजावून सांगीतले आहे लवकर यायला , तसेही आपल्या गावातले डाॅक्टर रात्री ऊशीराच येतात दवाखान्यात जर आमचे हे नाही आले तर तू चलशील का माझ्यासोबत दवाखाण्यात , अगं एकटीला भीती वाटते जायची , तुला तर माहीत आहे मधले स्र्टिट लाईट ही बंद आहेत , रस्ता सामसूम असतो संध्याकाळी , बिना काकूळतिला येऊन म्हणाली 

अगं हो एवढ काय बाई त्यात , मी संध्याकाळी लवकर स्वयंपाक करते मग भाऊजी नाही आले तर जाऊ आपण दोघी , ठिक आहे ना ! आणी मी तुमचाही स्वयंपाक करते रात्रीचा , शिला बिनाला म्हणाली

अगं नाही कशाला तुला त्रास , तू येशील माझ्याबरोबर तेच खुप होईल , बीना म्हणाली 

ते काही नाही , ठरलं ! मी स्वयंपाक करणार , जा आता आराम करा , शिला ने जबरदस्तीने तिला घरी पाठविले

बरं म्हणत बीना घरी परतली .

बीना आणि शिला , मधे दोन घरे आड रहायच्या , चांगल्या मैत्रिणी , शिलाच्या नवर्‍याचा एका रस्ता अपघातात मृत्यू झाला , औरंगाबादला एका कंपनीत तो कामाला होता , आयटीआय करुन तो तिथे लागला होता , दोन मुले , बारावी शिकलेली शिला , एकंदरीत त्यांच चांगल चाललेल असताना अचानक असा अपघात झाल्याने मग नाईलाजाने शिलाला सासरी गावी याव लागल , गावालगत असलेल्या शेतातच त्यांच घर होत किंबहुना तिथपर्यंत तुरळक घरे होतीच , म्हातार्‍या सासूसासर्‍यांसवे ति तिथे राहत होती , मुल लगतच असणार्‍या शहरात शिकायला जायची सोबतच बिनाचा मुलगा पण जायचा , म्हणून त्यांची जरा घट्ट मैत्री , बिनाचा नवरा गावाजवळ असणार्‍या सूतगिरणीत कामाला होता , तिला एक मुलगा , गावात एकच छोटा दवाखाना त्यातही डाॅक्टर साहेब रात्री नऊ वाजता यायचे , 

एक तास थांबायचे आणि परत शहरात त्यांच्या दुसर्‍या क्लिनिक कम राहत्या घरी परत जायचे , म्हणून प्राॅब्लेम यायचा पेशंटना , ते रात्री तरी येतात म्हणुन एकप्रकारे दिलासाच होता गावातील लोकांना अडीअडचणी मधे ,

आज रात्री ही बीनाचा नवरा धनराज आठ वाजता परत आला पण खूप थकलेला होता , बिनाने त्याला म्हंटले चला डाॅक्टरांकडे जाऊ ,

तर तो म्हणाला माझे डोके फारच दुखत आहे तू कोणाला तरी सोबत घेऊन जा , 

अहो गाडीने पंधरा मिनीटात जाऊन येऊ ना आपण आणि डोके दुखीसाठी घेऊना डाॅक्टरांकडून गोळी तुम्हाला माहीत आहे मधे एक किलोमीटर अंधार आहे लाईट चालू नाही , 

पैदल जावे लागेल ना मग , 

मग काय होते , तेव्हढं ही चालता येत नाही का ? जा शिर्‍याचा अॅटो घरी आला असेल तिकडून येताना अॅटोत ये , 

मी देतो त्याला पैसे , 

बरं ठिक आहे माझ्यासाठी तुम्हाला तर वेळच नसतो , 

मला माहीतच होत असच होणार ,

म्हणून दुपारीच शिला सोबत बोलून ठेवल होत , 

आता तिला घेऊन जाते आणी आज तिनेच जेवण आणून दिलेल आहे मगं देऊ का वाढून ,

नको नको तू ये तिकडून मग आपण जेऊ , 

तो पर्यंत झोपतो डोकं फार दुखत आहे म्हणून धनराज झोपला .

बिना आणि शिला तयारी करुन , पायी दवाखान्याकडे निघाल्या , लोकांची तुरळक वर्दळ होती , गाडीच्या प्रकाशात आणि घरातून येणार्‍या प्रकाशामुळे रस्ता तसा दिसतच होता त्यांना , नऊ वाजता डाॅक्टर आले , 

तीन पेशंट होतेच बिनाचा चौथा नंबर , 

तिला तपासल्यावर डाॅक्टरांनी जवळच्या गोळ्या आणि रिकाम्या आणलेल्या बाॅटल मधे औषध भरुन दिले , 

खाण्यामधे काही पथ्य सांगीतले आणि तीन दिवसांनी पुन्हा यायला सांगीतले , 

ह्यातच पावणे दहा वाजलेत , 

दोघीही मग तिथून घाईघाईने घराकडे निघाल्या , 

वाटेत शिर्‍याच घर लागल पण तो अजून आॅटो घेऊन शहरातून नव्हता आला , म्हणून मग त्या निघाल्या घराकडे गप्पाकरत , एव्हाना वर्दळ पुर्णच कमी झाली होती , तुरळक घरांचे दारपण बंद झालेले होते पण कुठुनतरी लाऊडस्पीकरवर मोठ्यांने गाण्याचा आवाज येत होता , तश्या ह्या दोघीही म्हणाल्या कोण एवढ्या रात्री गाणे ऐकत आहेत , 

पण बरं झाल त्यामुळे जरा छान वाटत आहे , 

आणि अचानकच शिला कळवळली खुप मोठ्ठा आवाज झाला शिला आणि बिना दोन बाजूला धाडकन पडल्या , 

सोबतच तिसरही कुणीतरी एका घराच्या भिंतीवर आदळले , तिघेही जोरात किंचाळले , 

आजूबाजूच्या घराबाहेरचे मिनमिनते लाईट लागलेत ,

लोकं धावलेत , त्यांना ऊचलून लगेच काही लोकांनी दवाखान्यात नेले , डाॅक्टर दवाखाना बंद करणारच होते मग ह्यांना बघून ते थांबलेत , 

तिघांनाही तपासले आणि ह्यांचा इलाज इथे शक्य नाही , शहरात सरकारी दवाखान्यात न्याव लागेल म्हणाले ,

तो पर्यंत धनराजला सांगायला एकजण घरी गेला तर तोही त्याच्या मोटरसायकलने तिथे आला , 

त्याला कळेचना काय कराव ते , 

कारण तिघेही बेशुद्ध होते , 

मग डाॅक्टरांच्या टाटा सुमो मधे तिघांना टाकून गावातील अजून दोन व्यक्तींना घेऊन धनराज शहरात आला त्यांना दवाखान्यात भर्ती केले , लगेच ऊपचारही सुरु झालेत कारण तेच डाॅक्टर तिथले मेडीकल आॅफीसर होते , 

तर घडलेला किस्सा असा ,

गावाच्या बाहेर मेन रोडवर एक हाॅटेल होते , तिथे पाच मित्र पार्टी करायसाठी आलेत आणि त्यांच ठरलं हातभट्टीची प्यायची मग तशी त्यांनी डिमांड केली , 

हाॅटेल मालकाने आपल्या चोवीस वर्षीय मुलाला मोटरसायकलने गावात पिटाळले दारु आणयसाठी आणि तेही पंधरा मिनीटात आला पाहीजे असा दम देऊन ,

मुलाला मोठा भिंगाचा चश्मा लागलेला , 

मोटरसायकलचे लाईट बंद झाले होते आदल्या दिवशी पण वेळ नाही मिळाल्यामुळे , ते काम ऊद्या करु असे ठरलेले , दुसरे असे कि शिलाने घातली होती काळपट साडी , 

बिनाने चाॅकलेटी साडी घातलेली , 

आजूबाजूला प्रकाश नाही मग गडबडीत जे नव्हते व्हायला पाहीजे तेच झाले ,

वडीलांच्या दबावा खाली येऊन तो एका हातात बाॅटल घेऊन भरधाव निघाला आणि आपल्याच गोष्टींमधे मग्न असलेल्या बिना आणि शिलाला गाडीचा आवाज सुद्धा ऐकू आला नाही आणि हा भयानक अपघात झाला , 

शिला ला पाच ठिकाणी फ्रॅक्चर , 

कायम बेडरेस्ट घ्यावी लागेल अशी स्थिती , 

बिना ला कमी मार तिचा फक्त पाय फ्रॅक्चर आणि हाॅटेलचालकाच्या मुलाच्या डोक्याला जबर मार , 

तो आयसीयु मधे !

सगळे नातेवाईक डोक्याला हात लावुन बसलेत , 

एकमेकांकडे बघतायत , दोष कुणाला द्यायचा आता,,,!

या कथेच्या अनुषंगाने एक सांगावेसे वाटते ,,,रात्री पायी बाहेर पडताना डार्क कपडे घालू नये आणि पायी चालताना अश्या बाजुने चालावे जिथून तुम्हाला समोरुन गाडी येताना दिसेल तुमच्याच साईडने , नियम वेगळे सांगतात चालायला पण तुम्ही दिवसासुद्धा वाॅकींग करतानाचे अपघात वाचाल तर तुमच्या लक्षात येईल सहसा आपल्याला मागुनच धडक मारल्या जाते ,,,,, 

खंत माझी मधल्या आतापर्यंतच्या सगळ्या कथा सत्यघटनेवर आधारीत आहेत .

०००००००

🎭 Series Post

View all