खंत मनातील - भान

We all must have gone through these experiences in our lives. At times we even fail to realise our own mistakes...In the process, differences crop up and we hurt our own people.. Read these series of episodes with a positive mind and try to underst

! भान !

चला ऊठा लवकर मुलांनो , की अलार्म फक्त माझ्यासाठीच लावला होता , अरे पोरा ऊठ बरं मग वेळ होईल नेहमी सारखाच , इथूनच ऊशीरा निघाले तर परतायला रात्री खुप ऊशीर होईल , 

अगं हो माताजी ! झाली का सकाळीच सुरु भुणभुण , 

जा तू त्या रव्याला फोन करुन सांग मी ट्रिपला येत नाही म्हणून , मी तुला आधीच बोललो होतो , तू खुप काळजी करतेस आई , मी नाही जात ,,,!

अरे रागावलास का राजा , मी ना ते ,,, रात्र होईल ना खुप परतायला ,, म्हणून,,,,

आई मला राग नाही आला गं , फक्त तुला काळजीत नव्हत टाकायच म्हणून , कालपण म्हंटल मला घरीच तुझ्या सोबत थांबायचे आहे म्हणून ,

अरे हो ठिक आहे , मी काहीच बोलत नाही , तू माझा बापच आहेस बाबा ssमला माहीत आहे तुला माझी काळजी असते , पण,,,, आता जाऊ दे आणि हो तयार , रव्या येईलच एवढ्यात ,

मग अतुल आंघोळीला गेला , पटकन पंधरा मिनीटात तयार होऊन बाहेर आला आणि आईला आवाज दिला , 

आई माझा चहा ! 

तशी सिंधु चहाचा कप सोबत पोहे घेऊन आली , 

अरे बापरे तुझ तर रेडीच आहे गं ,

हो आणि हा तुझा टिफीन , पाण्याची बाॅटल , एक चादर , नॅपकीन , हे साबण , हे मुखशुद्धीसाठी आणि ,,,, 

अगं हो,, हो ,,हो ! श्वास तर घे बाई , तू ना कमालच आहे , 

कशी काय ग सगळ करतेस , 

मग ! आई ना तुझी मी , म्हणून ,,, हसतच सिंधु म्हणाली , 

आई आता तू निवांत राहा आणि माझी जास्त काळजी करु नकोस , त्या आशू कडे दे लक्ष , त्याला पण उठव आणि कामा मधे त्याची मदत घेत जा , लहान नाहीये तो , 

ऐ उठ रे आशू !

मी निघतो आणि आईकडे लक्ष दे जरा , 

काल तिला बरं नव्हत , 

हो का ! मग कशाला जातो दादूड्या फिरायला , 

कर ना तिची सेवा मग , चिडून आशू म्हणाला आणि अथंरुणातून उठला , अच्छा बघ गं कसा चिडला , 

ऐ आश्या इकडे बघ !

दाद्या बघ मला आश्या नाही म्हणायचं , आई सांग त्याला ,

अरे तुम्ही दोघे झाले का सुरु ,,, 

तेव्हढ्यात बाहेर हाॅर्न वाजला सोबतच रव्या चा आवाज आला, अ बे ढापण्या ,, ये बे बाहेर ,, का झोपलाच आहेस अजून पाळण्यात ,, सोबतच मुलांचा बोलण्याचा आवाज आला , हसतच सिंधु ने दार ऊघडले , 

ऐ रवी असा काय बोलतो माझ्या मुलाला ! 

काकू अहो त्याला घरीच राहायला आवडत किती मुश्किलीने तयार झाला म्हणून ,,, हसतच रवी म्हणाला , 

बरं ये ना बे तिथून काय बघतो , काय प्रवचन सुरु आहे का , रवी बाबांच ! 

हा ना सुधारणार नाही , तू जा रे ! ही घे जेवणाची पिशवी , म्हणत सिंधु ने त्याला टिफीन दिला , लवकर यायच , जास्त मस्ती नका करु हाँ !

बरं येतो मगं , आश्या बेटा येतो रे ! 

अरे आश्या नको म्हणूना , म्हणत आतून धावतच आशू बाहेर आला , तसा त्याला कवट्यात ऊचलून एक गिरकी घेऊन त्याच्या गालावर पप्पी घेतली अतुल ने , 

छी दाद्या कसा रे तू ! मग सगळेच हसायला लागले आणि अतुल गाडीत बसून चिखलदर्‍याला रवाना झाला , 

गाडी जोपर्यंत नजरेआड होत नाही तोपर्यंत आशू आणि सिंधु बघत ऊभे होते बाहेर , 

चल आई तो येतो संध्याकाळी , म्हणत आशू तिला आत घेऊन आला .

सिंधु एका क्लासवन आॅफीसरची बायको लग्नाआधी जाॅब करायची , नंतर जाॅब सोडला आणि पुर्णवेळ संसाराला दिला खुप आनंदी जीवन ती जगत होती , मोठा मुलगा बारा वर्षांचा झाला असेल , अचानक तिच्या पतीला गळ्याचा त्रास व्हायला लागला , चेकअप केल्यावर गळ्याचा कॅन्सर झाल्याचं निष्पन्न झाले , कुटुंब तर हादरुनच गेले तिचं , पण तरी सुद्धा हिमतीने ती या घटनेला सामोरी गेली , नवर्‍याला मुंबईच्या चांगल्या डाॅक्टरांकडे घेऊन गेली , ऊपचार सुरु झाला , आॅपरेशन सफल झाले , पण तीन महीन्यांनी पुन्हा त्रास झाला , पुन्हा मुंबईला नेले , डाॅक्टरांनी अथक प्रयत्न केले पण त्यांना वाचवू शकले नाही ,,, 

सिंधु तर कोलमडूनच पडली पण आपल्या मुलांकडे बघून पुन्हा ऊठून ऊभी राहीली , तिने एका शाळेत नोकरी सुरु केली , मुलांना सांभाळून नोकरी करने जिकीरीचे होते पण मुलही कुटुंबावर आलेल्या प्रसंगाने शहाणी झाली होती वेळे आधी , म्हणूनच ती हे अस्त्र पेलू शकली , तिचे मुलं तिची खुप काळजी घ्यायचे , अतूल बीई झाला आणि लगेच अमरावतीच्या एका कंपनीत नोकरीला लागला , दोन वर्षानी म्हणजे आता लहान आशू पण बीई झाला आणि नोकरीसाठी त्याने अर्ज भरले होते ठिकठिकाणी , सिंधु शाळेत शिकवायला जायची , पुढल्यावर्षी रिटायर्ड व्हायचे ठरवले होते तिने , 

अतुल च्या आग्रहाखातर .

घरातले सगळी कामं आटोपल्यावर दोघांचे जेवणं झालेत , वामकुक्षी झाली , संध्याकाळचा चार वाजता चहा झाला , 

तसे सिंधु काळजीने म्हणाली , आशू जरा दादाला फोन लाव बरं ! अगं अशी काय करते , तो येईल रात्री परत , 

मजा करु दे त्याला मित्रांसोबत , आधीच तो कुठेही बाहेर जात नाही आपल्याला सोडून , आज कसाबसा गेला , 

तर करु दे न एन्जाॅय त्याला , चिल्ड ना बेबी , 

प्रेमाने तिच्याकडे बघत आशू म्हणाला , 

तशी हसून सिंधु म्हणाली हो तो येणारच आहे पण मी आई आहे तुला नाही समजणार बाळा ,,

एवढ्यात आशू च्या फोनवर अतुल चा काॅल आला , 

बघ गं आई ! तुझ्या लेका पर्यंत तुझी काळजी पोहोचली , हा बघ त्याने काॅल केला , घे घे माते , बोल त्याच्याशी ,,, 

आनंदाने सिंधुने मोबाईल घेतला , कानाला लावून ती घाईनेच बोलली , का रे मी म्हंटल होत ना फोन करशील ,,,,

अहो काकू ऐका माझ,,, पलीकडून रवी बोलत होता , 

रडत,,,, तसे दचकून ती बोलायची थांबली ,,, काय रे रवी ,,, फोन तर ,, एकदा तिने फोन कडे बघून खात्री करुन घेतली,,,अतुलचा आहे ,, कुठाय तो,,,तू का बोलतोस ? 

काय झाल बेटा,,,तिचा आवाज खोल जात होता,,, रडतच रवी ने सांगीतले , काकू आम्ही चिखलदर्‍यात पोहोचल्यावर आधी बागेत थांबून नाश्ता केला अजून दोन पाॅईंट बघीतल्यावर सगळे म्हणाले आधी भिमकुंड बघुया , मी म्हणालो होतो तरी की आपण शेवटी जाता जाता बघुया भिमकुंड कारण तो सुरुवातीलाच लागतो , पण ह्या मुलांनी ऐकल नाही माझं ,,, 

मला तू ते नको सांगूस रव्या,,, ओरडतच सिंधु म्हणाली , 

आधी माझ्या अतुल सोबत बोलण करुन दे माझं,,, दे लवकर त्याला फोन,,, अनामिक शंकेने सिंधु म्हणाली , 

तसा मोठ्यांने रडत रव्या म्हणाला , कुठून बोलायला सांगू काकू ,, अरे काय झाल रे सांग ना पटकन ,, 

आशू लगेच तिच्याजवळ येऊन ऊभा राहीला , 

आई काय झाल गं दादाला ! 

हा बघ ना सांगायच्या ऐवजी रडतोय,,,

थांब दे फोन माझ्याकडे , आशू ने फोन स्पीकर वर टाकला आणि रवीला म्हणाला , दादा आता सांग ना रे माझा दादूड्या कुठे आहे ,,, 

अरे बेटा ,, रडतच रवी म्हणाला , आम्ही भिमकुंड जवळ आलो तर हे सगळे मुलं झर्‍याजवळ जाऊन मस्ती करत होते , पाणी ऊडवत होते एकमेकांवर , लोटालोटी पण करत होते आणि अचानक अतुलचा पाय घसरला आणि तो भिमकुंडात पडला ,,,,,,, 

कायssssआशू आणि सिंधु एकाच वेळेस ओरडले ,,,, मग मग कुठे आहे तो,,,,

आम्ही लगेच पोलीसांना कळवले , अॅम्बुलन्स बोलावली , पोलीस यायच्या आधीच आम्ही स्थानीक लोकांना खाली पाठविले त्यांनी शोधल तो पर्यंत पोलीस पण आले ,,,,, 

अच्छा,,,! निश्वास टाकत दोघे ही ऊत्तरले , मग आणल का त्याला दवाखाण्यात ,,,आम्ही लगेच येतो ,, कोणता दवाखाना ते सांग सिंधु डोळे पुसत म्हणाली ,

काकू अहो ,,,, तो तिथेच गेला हो,,,,, अतुल कायमचा आपल्याला सोडून गेला,,,,,,

काय,,,,, सिंधु आणि आशू दोघे ही गपगार झाले ,,,,आशूच्या हातातून फोन गळाला ,,, तो आणि सिंधु एकमेकांकडे बघत मटकन खाली बसलीत,,,,,,अश्रुंचा महापुर दोघांच्याही डोळ्यातून वाहत होता ,,,,,,, रडता रडता त्यांचे लक्ष भिंतीवर टांगलेल्या बाबांच्या फोटोकडे गेले ,,,,,, आता दादा पण,,,,!

ऊत्साहाच्या भरात मुलं भान हरपतात आणि मग अश्या काही घटना घडतात , त्यापेक्षा सगळ्यांनीच जमेल तसे थोड भानावर राहून आनंद लुटला असता तर,,,,,,!

०००००००

🎭 Series Post

View all