खानदेशी उडदाची डाळ

Khandeshi Uddachi Dal

        खानदेशी उडदाची डाळ


साहित्य -  उडदाची फोतर असलेली डाळ १ वाटी ,थोडी चणा डाळ, कांदा १ मोठा , लसूण पाकळ्या चार , आल १ इंच तुकडा , खोबर, लाल तिखट , धणा - जीरा पावडर, गरम मसाला, जीर मोहरी


कृती - उडदाची डाळ आणि चणा डाळ एकत्र तीन वेळा धुवून शिजवून घ्यावी .


कांदा सोलून लांब कापून तव्यावर थोड तेल टाकून शेकून घ्यावा . खोबर लांब कापून थोड शेकून घ्याव.
आल बारीक कापून घ्यावे .
कांदा ,आल ,लसूण , खोबर मिक्सरमध्ये थोड पाणी घालून वाटून घ्यावे . ओला मसाला तयार झाला .

कढई मधे तेल गरम झाल्यावर जीर - मोहरी घालावी . त्यानंतर वरील ओला मसाला घालावा . ओला मसाला थोडा परतून घ्यावा .लाल तिखट, मरम मसाला, धणा - जीरा पावडर घालून तेलसुटेपर्यंत मसाला परतून घ्यावा .यात शिजलेली डाळ घालावी , भाजीत आवडीने पाणी घालावे .( दाट /पातळ ) चवीनुसार मीठ घालून दहा मीनिट शिजू द्यावी . थोडी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घालावी .

छान लाल मसाली खानदेशी पद्धतीची उडदाची डाळ तयार झाली .

तर घ्या जेवायला सोबत भाकरी / पोळी तोंडी लावायला कांदा ,टोमॅटो .