Oct 20, 2020
स्पर्धा

केतकीच्या वनी, नाचला ग मोर भाग-६

Read Later
केतकीच्या वनी, नाचला ग मोर भाग-६

केतकीच्या वनी, नाचला ग मोर भाग-६
   पूर्व भाग थोडक्यात
   सैपाक घर आवरून झाल्यावर वेणू माडीवर जायला निघाली पण अंगात कणकण भासली . शरीरात गरम
लाह्या फुटत असल्यासारखे जाणवले.पायऱ्या चढायचेही
त्राण उरले नाही,म्हणून पहिल्याच पायरीवर मटकन खाली
बसली.

  आता पुढे,
   उमाबाई घाबरून तिच्याजवळ आल्या "काय झाले तुम्हास? अरे बापरे तुमचे अंग चांगलेच तापलेय. तुम्ही चला येथेच खालच्या खोलीत निजा आजच्या दिवस आम्ही मीठ पाण्याच्या घड्या ठेवतो तुमच्या कपाळावर  
तुम्हास बरे वाटेल."

  कपाळावरील पाण्याची घडी क्षणात वाळत होती.
अक्काबायच धणे-जिऱ्याचे पाणी घेऊन आल्या,"असा अचानक कसा काय ज्वर चढला म्हणावा ,आम्ही मुकुंदास बोलवतो"

  मुकुंदाने लगेच उपचार चालू केले .वेणूची अस्वस्थता, तिला होणाऱ्या वेदना मुकुंदाकडून पहिल्या जात नव्हत्या. सात दिवस उलटून गेले तरी ज्वरास उतार नाही. वेणूचे शरीर उपचारांना प्रतिसाद देत नाही ,म्हणजे आजार मानसिक आहे हे मुकुंदास ज्ञात झाले.

     वेणूचे मनगट हाती घेऊन मुकुंदाने नाडी परीक्षण केले. "काही झाले नाही तुम्हास ,लवकरच बऱ्या व्हाल तुम्ही. माझे बोलणे तुम्ही मनाला जरा जास्तच लावून घेतलेले दिसते.आधी मनावरचा  सगळा मळभ उतरवा बघू,तुमच्या प्रस्तावावर आम्ही सखोल विचार केला आहे .विलायतेस न जाता इथेच मानसन्मान मिळवायचा ठरविले आहे आम्ही."

  म्हणजे तुम्ही आम्हाला सोडून... पुढचे ज्वराच्या ग्लानीने वेणूस बोलता आले नाही.
        आम्ही तुम्हास, आपल्या कुटुंबास सोडून कदापि जाणार नाही.तुम्ही आमच्या अर्धांगिनी आहात, तुमच्या शिवाय आम्ही अपूर्ण आहोत.
  मुकुंदाच्या आश्वासनानंतर वेणूच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली.वेणू पूर्ववत बोलू चालू लागली.

  परीक्षेचा निकाल घेण्यासाठी मुकुंदा पुण्यात गेला.
   मंजू महेरपणास आली होती. नणंद भावजय घटका अन घटका गप्पा मारीत बसत ,कधी गौरी पण सामील व्हायची त्यांच्यात .
     पुण्याला जाऊन संपूर्ण एक वार पालटला होता तरी मुकुंदाचा थांगपत्ता नव्हता.सगळेच काळजीत होते.वेणूचे तर चित्त थाऱ्यावर नव्हते.तिच्या मनामध्ये वेगळीच धाक धुक होती.विचारपूस करण्यासाठी सुदामा गौरी आले होते. छोटा विनायक वेणु सोबत बोलत होता.वेणूकाकू त्याच्या खास आवडीचीच झालीे होती .

     लहानग्या विनूनेे नेमका प्रश्न विचारला ,"वेेणुकाकु ही विलायत कुठे आहे?"
   विनूच्या तोंडुन विलायत शब्द ऐकला आणि दाटलेल्या कृष्णमेघात भीतीची अनखी वीज रेखा सरकन चर्र करून गेली.सारेच अवाक होऊन निशब्द झाले.

   वेणुचा हात ओढत विनूने पुन्हा विचारले "सांगा ना काकू विलायत कुठे आहे?"
  असेल रे बाळा जगाच्या पाठीवर कुठेतरी.
   उत्तर एकताच छोटीशी कापडी पिशवी खांद्यास लावून विनु दिंडीदरवाज्याकडे  निघाला ..
    अहो, अहो विनायक राव कुठे निघालात?वेणू ने त्यास विचारले.
    "जगाची पाठ शोधायला ".....त्याच्या पाठीवर त्याच्या आईने मारलेल्या वळ पण असतील ना?तिथेच मुकुंदा काका सापडले तर सोबत घेऊन येतो."

    सगळ्यांना विनायकच्या बालसुलभ शब्दावर हसावं की रडावं हेच समजले नाही.कारण विनायक ची शंका खरी ठरली तर?खरंच मुकुंदा परीक्षेचा निकाल घेऊन परस्पर विलायतेस तर निघून गेला नसेल ना?सगळ्यांच्या मनात हेच प्रश्न घोळत होते.उत्तर मात्र कोणाजवळ ही नव्हते.

    वेणूू तर नुसत्या विचारानेच सैरभैर झाले होती.  आतापर्यंत एकवटलेले धीर अश्रूवाटे बाहेर पडत होता.

 सुदामा म्हणाला वहिनी दोन दिवस वाट पाहू नाहीतर मी पुण्याला जाऊन येतो तिथेच जाऊन काय तो सोक्षमोक्ष लागेल. असा धीर सोडू नका.

  देशमुखांच्या वाड्यात स्मशान शांतता पसरली होती. अन्नाचा एकही घास कोणाच्या हि घशाखाली उतरत नव्हता. दोन दिवसांपासून तात्या धण्यापेढीवर न जाता घरातच बसून होते.उमाबाईंची तर शून्यात नजर लागली होती .आक्काबाय ने तर गणपतीस पाण्यात ठेऊन वेठीस धरले होते .मंजुच्या माहेरपणाच्या आनंदावर विरजण पडले होते.

  नुकतीच अजारपणातुन उठल्याने वेणूस अशक्तपणा होतांच,त्यात डोळ्यात प्राण आणून वाट पाहण्याने अजून तब्बेत खालावली.अश्रूंची संततधार चालूच होती. मनातील मनात अघटित घडणार नाही याची शंका वादळ निर्माण करत होती. पण त्वरित तिचे दुसरे मन ग्वाही देत होते स्वारी असे करणार नाहीत.माघारी येतील ते .दुहेरी वादळाने अंतरमन हेलावले होते.
   सुख नंतर दुःख,शुभ नंतर अशुभ सृष्टीचा खेळ मान्य आहे आम्हास,पण इतकी जीवघेणी थट्टा का मांडलीय नशिबाने आमची.हे गणराया कुठं कमी पडलो आम्ही.

   आमचे सागरासारखे नितांत प्रेम स्वारिंना कळलच नसेल का ?एवढी प्रेम करणारं आपली माणसे असूनही  का आकाशाला गवसणी घालावयाचा अट्टाहास?आपल्याला वाटले होते आपणास अनुरूप कोंदण लाभलंय.वेडीच आशा होती वाटते .असे काय असेल की आम्हास दिलेला शब्द स्वारी पाळू शकले नसतील. वेणूचा विरह आकांत धारणीलाही कंप आणणारा होता. स्वारिं च्या विरहातील वणवा अधिकाधिक ज्वलंत होऊ पहात होता......

क्रमशः 
लेखिका 
आपल्याच परिचयाच्याच                             चौधऱ्यांच्या सुनबाई (गायत्री)
 गाठभेट 
सस्नेह वाचक,
खरेच लहान मुले किती निरागस असतात ना....

    कुठे गेली असावी बरं स्वारी? ............….....................आपली नाही हो,....वेणूची म्हणतोय आम्ही.....
भेटू पुन्हा
छान छान वाचत राहू आणि आनंदी राहूया.