A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session3d0a7b9daa3fef70beef33d192a17e02450137bd186fedbbd4cf31e9bce0c6e9b9c70b82): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Ketkichya vani, nachla g mor part -7
Oct 30, 2020
स्पर्धा

केतकीच्या वनी,नाचला ग मोर भाग-७

Read Later
केतकीच्या वनी,नाचला ग मोर भाग-७

केतकीच्या वनी,नाचला ग मोर भाग -७
 प्रभातकाळी सुदामा देशमुख वाड्यावर घाईघाईत आला अक्काबाई ला म्हणाला ;"कालपासून गौरीला खूप त्रास होतोय खाल्लेलं सगळं उलटून पडतय नुसते निजूनच आहे काही घरगुती उपाय असेल तर सांगा"
 सुदामा अरे जरा दम खा भटके कुत्रे मागे लागल्यासारखे काय वाचळतोय? मला सविस्तर सांग बघू ,काय होतय गौरीला? 

  सुदामाने इथंभूत वर्णन केल्यावर आक्का बाई म्हणाल्या अरे सुदामा ही गोड बातमीचीच अवस्था आहे.मोरावळा देते चरवीत भरून,अनोशा पोटी रोज एक खायला दे
 गौरीला. आराम पडेल तीस.आत्ताच वेनुस देऊन खाली आलेय बघ. अजून मोरावळयाचे भांड हातातच आहे.आणि काय रे दोघं सवंगड्यांनी सोबतच विचार केला होता काय? 
  "म्हणजे अक्काबाई वेणू वहिनी पण?"

 "हो दोन दिवसापासून उसाचे सुरू आहे तिला काहीवेळाने चार घास खाल्ले तर उसाचे शांत होतात, पण वेणूस अन्नच गोड लागत नाही तर काय करणार ?लागणारहि कसे म्हणा ?गोड चाहुलीने आनंदात हिंदोळ्यावर झुलावे की पती  विरहाच्या दुःखात होरपळावे? देवाची लीला पण कशी आहे बघ, एका हाताने घेणार आणि दुसऱ्या हाती सुखाचे दान ओटीत घालणार..त्या जगतज्जेत्याच्या मनात काय आहे कुणास ठाऊक?
  अक्काबाई गौरीला बरे वाटले की मी निघतो पुण्यास. खरेतर आजच प्रवासास निघणार होतो पण गौरीचा त्रास पाहून पावले थबकली माझी.

  अवचित आलेल्या काळ्या मेघांनी धाडधाड बरसून धारणीस मनसोक्त झोडपावे मधेच कोवळी उन्हाचा सडा शिंपावा आणि नभात इंद्रधनू चे सप्तरंग अवतरावे अगदी तसाच मुकुंदा दिंडी दरवाजात अवतरला.उमाबाई हर्ष उल्हासाने विभोर झाल्या.मुकुंदाच्या अंगावरुन मीठ मोहऱ्या उतरवून लागलीच पेटत्या चुलीत टाकल्या. तात्यांना तर मनावरचे मणामणाचे ओझे उतरल्यासारखे झाले,त्यांनी पुढे येत मुकुंदास कवेत घेतले .आक्काबाय ने मुकुंदाच्या डोक्यावरून हात फिरवत कडाकडा बोटे मोडली.सगळा देशमुख वाडा आनंदाअश्रुंनी न्हाऊन निघाला.

 सुदामाने तर मुकुंदाच्या डोक्यात टपली मारली,कुठे दडून बसला होतास रे लबाडा ?एवढा मोठा झालास पण अक्कल नावाची गोष्ट नाही तुझ्या मस्तकात ...आता तरी सुधारा जरा कारण.... पुढचे उच्चारन्या आधी अक्काबायने सुदामास डोळ्याने दटावले ,नकारार्थी मान हलवत सांगू नकोस म्हणून इशारा केला.

 "आम्ही वैद्यकशास्त्रात परीक्षेत उच्च श्रेणीत उत्तीर्ण झालो याचं कौतुक कोणासही नाही.नुसती प्रश्नांची सरबत्तीच चाललीये."
ऐकलत का उमाबाई?आपले चिरंजीव उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले .देवापुढे साखर ठेवा.सगळ्या गावात साखऱ्या वाटा त्यांच्या डोळ्यात मुकुंदाच्या यशाचा अभिमान स्पष्ट झळकत होता.

  आम्ही परतीस वेळेतच निघालो होतो मध्येच बग्गीला जुंपलेल्या घोड्याच्या खुरास दुखापत झाली.वाटेत जाणारी येणारी एकही बग्गी दृष्टीस पडे ना ,मग घोड्याची जखम बरी होईपर्यंत वाटेतच तिष्ठत राहावे लागले आम्हास. घोड्याच्या दुखऱ्या पायामुळे संथ गतीनेच परतीचा प्रवास करून कसेबसे घर गाठले आम्ही .
 "बरे झाले बाबा;देव पावला म्हणायचा.आमचा तर धीर सुटत चालला होता. चिंतेची अवकळाच होती कशी घरावर न्हानादिक आवरून माडीवर जा,आधी वेणूस भेट. हसती खेळती पोर अगदी कोमेजली आहे ."सगळ्यांच्या हाती साखर ठेवत आक्काबाय म्हणाल्या.


 मुकुंदा दबक्या पावलांनी माडीवरच्या खोलीत गेला वेणुस हळूच साद घातली.स्वारीचा आवाज येताच अतीव आनंदाने वेणूने स्वतःला मुकुंदाच्या भरदार बाहुत झोकून दिले.आणि आनंदाश्रुना वाट करून दिलीे.जरा शांत होत ...कुठे होतात तुम्ही? तुमच्याशिवाय जगण आम्हास मरणप्राय यातना देत होतं.हो खूप छळलत तुम्ही आम्हाला पण आता यापुढे असे चालणार नाही कारण... मुकुंदाचा हात अलगद स्वतःच्या उदरावर ठेवला ही गोड चाहूल लागलीय .एक नाही दोन जीवाचीे तगमग सहन करावी लागेल आता...


 खरेच .....आश्चर्यचकित होत मुकुंदा म्हणाला, आम्हास चिमटा काढा बघू ;आम्ही स्वप्नात तर नाही ना ?खरेय होय?
   नजरेनेच हूंंकार भरत चेहरा ओंजळीत झाकत वेणू मुकुंदाच्या कुशीत पुन्हा  शिरली.
   मुकुंदाने हळूच ओंजळी बाजूला सारली वेणूस निरखत म्हणाला," आम्हाला किती आनंद झालाय आम्ही शब्दात वर्णू शकत नाही. खरे तर हा मणिकांचन योगच म्हणावा लागेल मानसन्मान जोडीनेच आलाय आमच्या जीवनात.
" म्हणजे आम्हास उमगले नाही?"

 आम्ही वैद्यकशास्त्र परीक्षेत उत्तम श्रेणीत यशस्वितेचा मान मिळवलाय आणि आता तुमच्या उदरी जे अंकूरलय तो आमचा सन्मान असेल.
  " होय हो तुम्ही आलाय तर किती प्रसन्न वाटते आहे आम्हास .नाहीतर गोड बातमी चा गोडवा कारल्याच्या कडून पणात मिसळला होता. "
   "अस्स होय ..आम्ही तुम्हास आमच्या यशस्वितेची गोड वार्ता दिली ,तुम्ही आम्हास येणाऱ्या सन्मानाचीे गोड चाहूल सांगितलित ,मग या सुरेख दिवसाचा गोडवा अजून वाढला असता तर बरेच होईल ना ?"मुकुंदा मिश्कील हसत वेणू कडे पाहून म्हणाला. 

  "ईश्श ....आपलं भलतच काहीतरी."
झुकलेली मान हाताने वर करत मुखावरची संपूर्ण रया गेली आहे तुमच्या.खूप थकलेल्या दिसताय. विश्रांती घ्या.आम्ही कर्म कर्तव्याची सोय पहायला तात्यांच्या सोबत जातोय.
   मुकुंदाच्या येण्याने वेणू मनोमन सुखावली.मातृत्वाच्या स्वप्नात निवांत झाली.
क्रमशः 

©
 आपल्याच परिचयाच्या 
 चौधऱ्यांच्या सुनबाई(गायत्री )
गाठभेट
 सस्नेह वाचक,
कसा वाटला आजचा गोड-गोड भाग ?लाईक ,कमेंट
करून जरूर कळवा.
पुन्हा भेटू 
छान छान वाचत राहू आणि आनंदी राहू.