कधी दिलेस तू प्रेम

Kdhi Diles


कधी दिलेस प्रेम

त्याचे आणि तिचे जॉईंट अकाउंट होते

तिच्या खात्यातून हा तिला न विचारता बिनधास्त लागेल तेव्हा, पैसे काढत.

जर कोणा नातेवाईकांना गरज पडली तर हा मदतीला मागे पुढे न बघता त्यांच्या अकाउंट वर पैसे पाठवत..

आपण कोणाला किती मदत करत आहोत कोणाला किती पैसे देत आहोत ह्याचा त्याच्याकडे हिशोब नसायचा, कारण त्याला नाते महत्वाचे होते..

आई वडिलांचे करा पण त्यांचे करताना बायकोला विसरू नका ,त्यांच्या प्रेमाचा अतिरेक होईल आणि मग काय तर ह्या करण्यात बायको दुर्लक्षित आणि जास्त करून गृहीत धरली जाईल तर ते चालणार नाही..

मग आई वडिलांची नेहमीची भावनिक मागणी ,एकदम गलबलून येईपर्यंत , "भाऊ तू आमचं करू नकोस..ताईचे कर ,तिला आधार देणे हे तुझे कर्तव्य आहे ,आम्ही जर पैश्या वाले असतो तर तुझ्या पुढे हात पसरायची वेळच नसती आली...पण आम्ही पडलो गरीब...त्यात तिने मदत मागितली तर नाही म्हणता ही येत नाही बघ... ती रडली की काळजात जखम झाल्या सारखे होते... तिच्या सुखात आमचे सुख आहे असे समज आणि करत रहा तिला मदत..अगदी हवी तशी मदत देत जा..."


मग पुन्हा ते भावनिक होऊन ठरलेले वाक्य म्हणत , "आम्हाला नाही केले तरी चालेल भावांचे कर " आणि हा नवरोबा पुन्हा आई वडील यांना तर मदत करणार त्यात बहिणीला ही काही पैसे ठेवून जाणार... घर घर खर्च.. आई बाबांचे दवाखाने...इतर light बिल..

आम्हाला नाही दाखवले जग पण ते पैसे आत्याला ओपरेशन ला दे . तुझ्या कुवती प्रमाणे दे...आणि हो पुन्हा काही परत मागू ही नकोस..तिची तशी परिस्थिती नाही बरं.... तिला काही परत देता येणार नाही...मग तुझी बायको विचारणा करत बसेल पुन्हा पुन्हा... कुठे गेलेत पैसे...मग दिले तर कधी परत देणार...नको त्या चौकश्या करत बसेल तुझ्या मागे...आणि तुला मग पंचाईत सांगू की नको ,आपल्या आत्याला दिलेत...आणि तुझा आपला भाबडा स्वभाव...तू बोलून जाशील...ती देऊ शकत नाही..तिची परिस्थिती नाही...मग काय रण कंदन तुझ्या घरात..... मग म्हणेन , "मी कसे घर थोडक्यात चालवते तुला मात्र उधा माधा करायला आवडते.. मला मात्र हिशोब विचारणारा तू, स्वतः मात्र हवे तिकडे उसने ,काही असेच देऊन बस...परत घेण्याचा नावाने बोंब.."

इतके पैसे दिले पण आईच्या सांगण्यावरून ,आणि बाबांचे मन कसे दुखवायचे हे समजून त्याने आत्या कडून दिलेले 20 हजार परत मागितले नाहीतच...घरात ही बायकोला काही बोलला नाही...पण पैसे दिल्या बाबत कधी ना कधी तिला कळणारच होते...कारण महिना अखेरीस सगळ्या खर्च केलेल्या पैश्यांचे हिशोब एकमेकांना द्यावे लागणार होतेच...मग तेव्हा ती विचारणार ..माझी बाजू clear आहे पण तुझ्या हिशोबातील 20 हजार कुठे गेले आहेत. कोणाला दिले आहेत...मग ते परत कधी मिळणार आहेत, मुलांच्या शाळेत फी भरायची आहे... तो खळगा कसा भरणार आहेत....कुठून पुन्हा इतके पैसे आणणार आहेस...बर जेव्हा आपले ठरलंच होते की, जरी मदत करायची आहे तर, फक्त 1000 ,त्यावर एक कवडी ही जास्त नाही, कारण ते बुडाले तरी चालेल...पण 20 हजार अति रक्कम होत आहे...ती कशी manage करणार आहे तू...मी थोडे जास्त खर्च केले तर तू मला खर्चायला कमी पैसे देतोस...आता तू खर्च केले आहेस तू बघ घर कसे चालवायचे आणि मुलांची फी कशी भरायची ते...मी तर हात टेकले...इतक्या तरी कोण कोणाच्या जबाबदाऱ्या तू एकटा उचलशील..." तिचे बोल ठरलेले असत..ती चोख हिशोब करत.. आणि म्हणूनच ती वाईट पणा घेऊन ही घर व्यवसाठी चालवत होती...हे त्याला ही मान्य होतेच...पण आता आपण खूप अति करत आहोत आणि हे असेच चालू राहिले तर आपले घर खर्च कधीच भागणार नाहीत..

पर काही महिने जाऊ दिले नाहीत तर आई ने अजून एक अपेक्षा कम विनंती केली होती , अरे भाऊ तू खूप करतोस घरासाठी ,आमच्यासाठी पण ताईला काही कर...तिचा आर्थिक बोजा कमी होईल यासाठी तूच पुढाकार घे हो ,आपली सोनला ,तिला घर नाही ,किती दिवस ती भाड्याच्या घरात राहील ,म्हणून मीच तिला म्हटले मामा देईल हो तुला घर घेऊन...तर मी काय म्हणते रे भाऊ ,आम्हाला घर नसले तरी चालेल पण भाची ला दे"

यात हे सगळे विसरून जातात की मुलाचा ही संसार आहे ,त्याची बायको आहे तिच्या ही काही अपेक्षा आहेत ,तिला ही काही स्वप्न असतील नवऱ्या कडून..

आता हळूहळू त्याने ज्या नात्यांना अति प्रेम केले ,त्यांच्यासाठी त्याग केला ते त्याला टाळत होते... त्याचे दिवस खराब आले पाहून त्यांनी पाठ फिरवली होती..

आई वडिलांना आता बाकी मुलं आणि मुलीची फक्त चिंता होती..त्यांना मोठ्या मुलाची कसली काळजी ,कसली चिंता वाटत नव्हती..त्यांना छोटे जास्त प्रिय होते.. मोठा फक्त घरातील खर्चाला एक आधार म्हणून कामाचा होता... त्याने घरचे लेणे देणे, घर खर्च..वीज बिल..किराणा..नातेवाईकांना हवे तेव्हा पैस्याची मदत करणे.. हाच काय त्याच्यासाठी आई वडिलांचा हिस्सा..त्यांनी थोडेसे रडून अश्रू गाळले की भाऊ लगेच मदतीला उभा ,पण हाच भाऊ हा जेवला की उपाशी आहे त्याचे काही घेणे नव्हते...पण त्याच्या बायकोला हे स्पष्टपणे त्यांचे वागणे दिसत...पण ती काही करू शकत नव्हती..आधीच ती सगळ्यांच्या नजरेत वाईट ठरली होती...कारण ती आपल्या नवऱ्याला समोरून गोड बोलणारे भाऊ...इतर जण मागून मात्र नाव ठेवत...हे कमी पडले... ते कमी पडले... हे असे हवे होते... ते तसे हवे होते... अजून थोडे पैसे द्यायला हवे होते... मग काय सतत सतत आपल्या नवऱ्याचा अपमान होताना कशी बघू शकणार होती...

एकदा ती अशीच बाहेर कपडे वाळत घालायला म्हणून आली होती, तर तेव्हा तिला आपले दिर आपल्या नवऱ्या विषयी उलट सुलट बोलताना दिसले...अन ती येताच गप्प बसले... तेव्हा ती त्यांना म्हणून गेली ,"तुम्हाला स्वतःला तर काही खर्च करायला जमला नाही पण तुमचे भाऊ सगळ्यांचे खर्च करतात तर तुम्हाला ते ही कमी पडते..."

ती असे बोलत असताना कामावरून घरी आलेल्या नवऱ्याने ,ती आपल्या भावांना बोलते, भावा भावात भांडण लावते...वाद निर्माण करते म्हणून तिच्याशीच बोलणे टाकून दिले... ती ही त्या दिवशी खूप संतापली...चिडली...तिला राग आला...आणि राग तिच्या ठिकाणी अगदी योग्यच होता....हे तर त्याला ही माहीत होतेच पण त्याला घर परिवार जोडून ठेवायचा होता...अश्या क्षुल्लक कारणावरून मतभेद नको होते..

मग ती ही निर्णय घेते, तिला ही तिच्या आई वडिलांच्या आनंदासाठी नवऱ्या इतकेच झोकून द्यायचे असते..

ती निर्णय घेत आणि आपली बदली माहेरच्या गावी करून घेते

नवऱ्याला तिच्या आई वडिलांसाठी डावलले हे पटत नाही..ती आता ह्या घरातल्या दुबळ्या,दांभिक वृत्तीच्या माणसांमध्ये राहू शकत नव्हती...आणि त्याहून दुबळ्या मानसिकतेच्या नवऱ्या सोबत तर नाहीच...ज्याला बायकोची बाजू ही घेता येत नव्हती..

तो .."नवऱ्या पेक्षा आई वडील महत्वाचे तुला..तुझे माझ्यासाठी काहीच कर्तव्य नाही का "

ती... माझ्या आईवडिलांनी माझे मन कधीच दुखावले नाही..म्हणूनच ते महत्वाचे आहेत..माझ्या कडून फुटकी कवडी ही मागून घेतली नाही कधी...त्यांनी मला मोठे केले म्हणून कोणता अपमाप खर्च आणि त्याचा हिशोब लावला नाही कधीच.."

तो ,"तुला इतके प्रेम दिले ,जपले ,त्याचे काहीच वाटले नाही ..अन तू मला एकट्याला सोडून दिलेस "

ती..."काय कमाल असते ना, मी ह्या घरात आले तशी एकटीच होते, तू तुझ्या घरच्यांचा मागण्या पुरविण्यात रमलेला असायचा, त्यात तुला धन्यता वाटत...मी काही मागितले तर मला खर्च केल्याची आठवण करून देत असत.."

तो ," मी जीवापाड प्रेम केले तुझ्यावर त्याचे हे फळ.."

ती म्हणते , "तू कधी केलेस प्रेम माझ्यावर सांग.."

मी माझे कर्तव्य चोख बजावले जाते, मी कुठेच कोणाला काही कमी पडू दिले नाही..आणि तू मात्र छान प्रतारणा केलीस.. मला आधार साथ द्यायची तर दूरच मला तू दूर केलेस

तिने आठवण करून दिली..तू इतर सगळ्यांचे कर्तव्य चोख बजावलेस त्यात मी तुझी साथ देत गेले..की कधी तरी माझी वेळ येईल, तुला माझी ही आठवण येईल..तुला आठवेल की हिला ही आपण आपला वेळ आपली साथ द्यावी..तिच्यासाठी ही आपले काही कर्तव्य आहेत..पण तू तर तुझ्या नात्यात इतका गुंगलास की आपली एक बायको आहे, तिला आपली गरज आहे..तिला ही आपले प्रेम हवे ..पण ते तुला आज ही कळले नाही...तू केलेस खूप केलेस पण माझे काहीच केले नाहीस...


त्याला चूक कळली पण आता ती पुन्हा बदली करून घेऊ शकत नव्हती..काही वर्षे तरी तिला बदली मिळणार नव्हती..तेव्हा ती नाही ,नसणार ह्या विचाराने तो कोलमडला होता..


तिची साथ आता हवी होती...घरातील सगळे आप आपल्या कामात ,आपल्या बायकांसोबत खुश होते...ती होती तर ती काळजीपूर्वक त्याच्या जेवणाची ,खाण्याची ,ऑफिस च्या डब्याची सोय होत असत...आता ती नाही तर कोणाचे त्याच्या कडे लक्ष ही नव्हते... त्याला कोणी विचारत ही नव्हते... आई बाबा पण त्या मुलांच्या नातवंडांना खेळण्यात रमत होते... भाऊ आला काय आणि गेला काय हे त्यांना समजत नसत...तो आपल्या बायकोला आठवण करून कसे दिवस काढत असेल...हे त्यांना कधी त्याला विचारावेसे ही नाही वाटले... ती गेली अन त्यांना आयती संधी मिळाली...मोकळेपणाने भाऊ कडून ,वाटेल तेव्हा पैसे मागण्याची...ज्याला हिशोब नव्हता...कारण त्याची हिशोब मागणारी नव्हती...


तीने आपली भूमिका ठाम ठेवली होती...मला माझ्या अस्तित्वाची ओळख मिटवायची नसेल तर मी वेळीच वेगळे राहिलेले बरे... त्याला त्याचा विचार करण्याचे स्वातंत्र्य दिले होते... तो तिला भेटायला येत होता...पण ती मात्र पुन्हा त्या घरी जाऊ शकली नाही...


कधी कधी ...अंतर बरेच असते...त्यात प्रेमाच्या माणसाची किंमत ही कळते..