कायापालट....

आई वडील यांचे प्रेम म्हणजे मुलांसाठी जणू सुर्यप्रकाश

रीधिमा मोठी होताना जाणवलं की,सर्व मुलांपेक्षा थोडी वेगळी आहे...राकेश-रीमाला हे ऐकून धक्का बसला.. तीच्या वयाच्या मुलांपेक्षा तिला प्रत्येक गोष्ट समजायला वेळ लागत होता... रीमा खूप शांतपणे हि जबाबदारी पार पाडत होती, तिला विश्वास होता काही झाले तरी तीच्या प्रेमाने रीधिमामध्ये बदल होईल...पण तिचे वागणे  दिवसेंदिवस बिघडत चालले होते... आणि तें सर्व बघुन सगळ्यांनी तिला नाकारले...काहींनी तिला अशा मुलांचे वेगळे आश्रम असतात तिथे सोडायला सांगितले.. पण रीमामधील आई तयार होत नव्हती... जेव्हा राकेशनेसुद्धा इतरांप्रमाणे तिला लांब करायचे ठरवले, तेव्हा रीमामधली आई पेटून उठली... तिने ठरवलं, रिधिमाला मी मोठे करेन...माझ्या प्रेमाने मी तिच्या मध्ये चांगले बदल करेन...  राकेशला न जुमानता हा प्रवास तिने एकटीने करायचा ठरवला.. एकाच घरात राहून देखील या एका गोष्टीमुळे ते दुरावले होते....

एकदा खेळता खेळता रिधिमाने पिआनो खूप छान वाजवला... तिला इतके छान पिआनो वाजवताना बघुन रीमाला एक हुरूप आला, तिने नीश्चय केला... रीधिमाला तिची वेगळी ओळख निर्मांण करून देण्याचा.. तिने तिला पिआनोचा क्लास लावला, बाकी सगळ्या गोष्टी समजायला वेळ लागणारी रीधिमा हे मात्र लगेच शिकली.... एवढा छान पिआनो वाजवायची की क्लासच्या वार्षिक कार्यक्रमाच्या वेळेस तिचा खूप मोठा शो करण्याचा निर्णय तिला पिआनो शिकवणार्या शिक्षकांनी घेतला....

रीमाने आनंदाने राकेशला फोन केला.. पण राकेशने मात्र कौतुक न करता नेहमी प्रमाणेच रीधिमाला बोल लावले... अतिशय कुत्सितपणे हसुन रीमाला म्हणाला, शहाणी असशील तर नकार दे, नाहीतर सगळ्यांसमोर हसे होईल, शोभा होईल..

रीमाला खूप राग आला...बाबा असूनसुद्धा हा असे कसे बोलू शकतो, नॉर्मल असती तर किती कौतुक केले असते, ती अशी आहे ह्यात तिचा काय दोष?? असे विचार तिच्या मनात आले, पण तिला खात्री होती रीधिमाबद्दल त्यामुळे ती काहीच बोलली नाही.... जमले तर ये, मी इन्विटेशन कार्ड पाठवते तूला...

रीमा उत्साही असल्याचे दाखवत असली तरी थोडे टेन्शन तिला पण आले होते... पण ती नेहमीच रीधिमाला प्रोत्साहन देत असे... तिला कधीच नाराज करायची नाही.. आणि आज म्हणूनच ९ वर्षाची रीधिमा सगळ्यांसमोर मोठ्या धीराने जाऊ शकली...

कार्यक्रम खूप छान झाला... तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.. रीमाचा आनंद तर डोळ्यातून वाहत होता... इच्छा नसली तरी रीमावरच्या प्रेमामुळे राकेश देखील या कार्यक्रमाला आला होता... त्याला देखील नवल वाटले...

त्या संस्थेकडून रीमा आणि राकेशचा देखील सत्कार करण्यात आला.... तिचा हा कायापालट बघून राकेशलासुद्धा आनंद झाला..त्याने सर्वांसमोर आपली चूक कबुल केली आणि रीमाची माफी मागून म्हणाला आता पटले मला,पालकांकडून मिळणार प्रेम, कौतुक, शाबासकीची थाप म्हणजे मुलांसाठी जणू 'सूर्यप्रकाशच' असतो त्यातूनच त्यांचा कायापालट होतो....

साहित्य चोरी हा गुन्हा आहे.
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी.
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.

© अनुजा धारिया शेठ

🎭 Series Post

View all