
काय माहीत कशी असेल ती???? सुंदर नाजूक उठून दिसेल ती , गालावर सुरेखा खाली पाडून हसेल ती , करणा नसताना खोटीच रुसेल ती , काय माहित कशी असेल ती !!!!!!!!! ||१|| एकुलती एक कि सर्वात थोरली असेल ती , नाहीतर कदाचित सर्वात धाकटी असेल ती , संसार कसा सांभाळेल ती , काय माहित कशी असेल ती !!!!!!! ||२|| फॅशन करील की संस्कृती पळेल ती , परंपरा जोडेल कि परंपरा तोडेल ती, संसाराचा पसारा कसा आवरेल ती , काय माहित कशी असेल ती !!!!!!!!! ||३|| थोडी खट्याळ ,नखरेल ,लबाड असेल का ती , हुशार समजूतदार सुगरण असेल का ती , एक समंजस अर्धांगिनी शोभेल का ती , काय माहित कशी असेल ती !!!!!!!!! ||४||