काय हे अस? .. भाग 3

माझी मैत्रीण मोनिका राहते त्या सोसायटीमध्ये खूप फ्लॅट खाली आहे असं ती म्हणत होती आणि ते ऑफिसच्या जरा जवळही आहे


काय हे अस? .. भाग 3

घरचेच अस करतात

©️®️शिल्पा सुतार
..............

तो दिवस कसातरी पास झाला. सुप्रियाने चार वाजेनंतर दोन तीनदा घरी फोन केला होता, ऑफिस मधुन ती लगेच निघाली,

आईने सुप्रियाला येताना एक दोन भाज्या आणायला सांगितल्या होत्या, सुप्रिया घरी आली, तिने भाज्या आईला दिल्या, आई पैसे देत होती ते सुप्रियाने घेतले नाही, मात्र सुप्रियाने काही आणायला सांगितलं की तिचे आई-बाबा लगेच तिच्याकडून पैसे घ्यायचे, घरात राहीला काही लागल तर त्याचा खर्च ते सुप्रिया कडून घ्यायचे, तरी चांगलेच श्रीमंत होते ते, पण छोट्या नातीचा खर्च त्यांच्या कडून होत नव्हता,

"असू दे आई पैसे नको देवू लगेच, काही फरक पडत नाही",.. सुप्रिया

दादा ऑफिस हून आलेला होता तो रक्षितला घेवून बसलेला होता, आई चहा करत होती,

"तू घेणार का चहा सुप्रिया",.. दादा

"नको मी निघते" ,... सुप्रिया

"काय झाल सुप्रिया? ",.. दादा विचारात होता

"काही नाही काम आहे खूप मी निघते",... लगेचच पाच मिनिटात ती राहिला घेऊन निघाली.

सुप्रियाची मैत्रीण राधिका डॉक्टर होती मानसोपचार तज्ज्ञ तिला भेटायला सुप्रिया राही गेल्या, डॉक्टर राधिका राहीला काही प्रश्न विचारत होती, त्याचे उत्तर तिने व्यवस्थित दिले, राही बाजूला खेळत होती,

" बोला सुप्रिया... राही ठीक आहे एकदम काळजी करू नको",.. राधिका

सुप्रिया डॉक्टरला सगळ सांगत होती, आईच्या अश्या वागण्याचा राहीने धसका घेतला आहे, तिच्या मनावर काही परिणाम होणार नाही ना, अंथरुण ही ओल करते आता कधी कधी राही,

"हो होवु शकतो तिला त्रास, तुला काळजी घ्यावी लागेल, या पुढे ती घाबरणार नाही अश्या ठिकाणी ती राहिली तर चांगल, तिची वाढ नीट होईल, अजून खूप लहान आहे ती, बाल मनावर आता पासून एवढा ताण नको " ,.. राधिका

"आता काही प्रॉब्लेम नाही ना, सकाळी रडत होती ती" ,.. सुप्रिया

" ठीक वाटते ती आता काळजी करू नकोस सुप्रिया, पण परत तिला तुझ्या आईकडे एकट सोडु नकोस ",.. राधिका

हो.

सुप्रिया राही घरी आल्या, येतांना मुद्दाम राहीच्या आवडीची भाजी करण्यासाठी सुप्रियाने पनीर घेतल, श्रीखंड घेतल, स्वयंपाक करून सुप्रिया सचिनची वाट बघत होती, घरी आल्यावर राही एकदम खुलली होती, ती तिच्या रूममध्ये खेळत होती . एकदम कॉन्फिडंटली ती सगळीकडे वावरत होती, असं राहू द्यायच आहे मला राहिला एकदमच मोकळं आणि छान,

जरा वेळाने सचिन आला तो अंघोळ करून आला, तिघांचं जेवण झालं, जेवतानाही राही खूप बोलत होती, शाळेत काय काय झालं ते सांगत होती, सचिन आणि सुप्रिया आनंदाने ऐकत होते.

राही झोपायला गेली, सचिन टीव्ही समोर सोफ्यावर बसलेला होता, सुप्रिया येऊन त्याच्याजवळ बसली... "मग काय केलं आज सुप्रिया?",

तसं सुप्रियाच्या डोळ्यात पाणी होतं.

सचिन बघत होता तिच्याकडे,.." काय झालं आहे सुप्रिया? , तू रडतेस का?",

" सचिन मी तुला एक गोष्ट सांगते आहे, तुला माहिती नाही काही , पण तू जरा ऐकून घे",.. सुप्रिया

" काय झालं आहे? काही प्रॉब्लेम आहे का? ",.. सचिन

" हो आणि हा प्रॉब्लेम खूप वर्ष झाले आहे ",..सुप्रिया

कशाबद्दल?

" माझी आई मला नेहमी त्रास देते मला, खूप सहन केल मी तीच वागण, तिला मी आवडत नाही, आता तिचा हा त्रास माझ्यापुरतं नसून आता ती राहीला ही खूप त्रास देते ते , राही खूप घाबरून असते तिकडे जायला, नाही म्हणते रडते ती तिकडे ",.. सुप्रिया

बापरे.. सचिन पटकन राहीच्या रूम मधे गेला, ती झोपली होती तिच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याला कसतरी वाटत होत, काय झालं आहे एवढ प्लीज सांग

सुप्रिया तिच्या लहानपणापासूनच सगळं सचिनला सांगत होती आणि आता ही कशी राही तिकडे घाबरून राहते तस माझ बालपण गेल आहे सचिन, मी छोट्या छोट्या गोष्टीला अजूनही खूप घाबरते, स्वतः च्या घरात कोणतीही गोष्ट घेतांना धडकी भरते मला, राहीला नको व्हायला अस, तिचा कॉन्फिडन्स चालला जाईल अस केल्याने, मला नाही आवडत असं,

आज मी राहीला डॉक्टर कडे नेल होत, माझी फ्रेंड नाही का ती राधिका तिच्याकडे, तिने सांगितल राही घाबरेल अश्या ठिकाणी तिला नको ठेवायला, नाही तर पुढे तिला मानसिक त्रास होवु शकतो, आणि आता राही रात्री अंथरूण ओल करते माहिती का

"बापरे काय चाललय हे?",.. सचिन

"हो ना अस करते आई, मला पूर्वी अस केल तिने पण मी कधी कोणाला काही बोलली नाही, आता राहीला अस नको व्हायला",.. सुप्रिया

"इकडे ये सुप्रिया",.. सचिनने तिला जवळ घेतल, मी आहे तुझ्यासाठी मला का नाही बोलली आधी तू अस, अजिबात काळजी करायची नाही, जावु नका आता त्यांच्या कडे तुम्ही दोघी,

" हो माझं हेच म्हणणं आहे की आपण राहिला नको ठेवायला आईकडे आणि इथूनही दुसरीकडे घर घेऊ आपण शिफ्ट होवू ",.. सुप्रिया

" ठीक आहे तू म्हणशील तस पण आता एकदम टेंशन फ्री राहायच काय",.. सचिन

हो.

"तू ऑफिस मधून सुट्टी घे थोडे दिवस किंवा वर्क फ्रॉम हो मिळतं का ते बघ , आपण करू काही तरी ",.. सचिन

" माझी मैत्रीण मोनिका राहते त्या सोसायटीमध्ये खूप फ्लॅट खाली आहे असं ती म्हणत होती आणि ते ऑफिसच्या जरा जवळही आहे , तिचा मुलगा जातो पाळणा घरात, ते पाळणाघर चांगल आहे आणि नाही तरी संध्याकाळी चार ते सातच राहायचं आहे तिथे राहिला, आपण तिथे ठेवूया का तिला ? चांगले आहेत ते लोक आणि सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज पण आहे लाइव, ऑफिसमधुन मी केव्हाही बघू शकते राही काय करते ते",... सुप्रिया

" चालेल तुला योग्य वाटतं ते कर पण तू अजिबात कुठल्याही गोष्टीचा प्रेशर किंवा टेन्शन घेऊ नकोस आणि विसरून जा तुझ्या बाबतीत काय केलं आहे आईने ते आपण, लांब राहू त्यांच्यापासून, उगाच त्रास करून घेऊ नको ",.. सचिन

आता सुप्रिया खूप खुश होती, तिने ऑफिसमध्ये मेल टाकला मला पंधरा दिवसाची सुट्टी हवी आहे किंवा मी ऑनलाईन काम करायला तयार आहे

ऑफिस तर्फे चार-पाच तासाच ऑनलाईन काम करायची तिला परवानगी मिळाली.

🎭 Series Post

View all