काय हे अस? .. भाग 2

अगं टेन्शन घेण्यासारखीच गोष्ट आहे, माझी आई किती बोलते हे तुला काय माहिती, तिच्यासमोर कोणीच टिकू शकत नाही,


काय हे अस? .. भाग 2

घरचेच अस करतात

©️®️शिल्पा सुतार
..............

सुप्रिया गेट जवळ उभी होती, तिला ऑफिसला जायचं होतं पण राही राहते की नाही हे ती जरा वेळ थांबून बघत होती.

" हे बघितलं ना रखमा कस बोलली ती.. हे करून घे, ते करून घे असं सगळं जाता जाता सांगतात मुलं, आपण त्यांच्या ऑर्डर ऐकायच्या",.. आई

" काहीही म्हणा पण ताई मुलीचं सासर जवळ नकोच असं म्हणतात",.. रखमा

" बरोबर आहे तुझं, इथे कुठे आहे तिच सासर, इथे ती एकटी राहते आपल्या घराजवळ आरामात, तिच्या सासरचे लोक लांब आहेत दुसर्‍या गावात, आहे का कसली जबाबदारी त्यांना, काही तसदी नको त्यांना, आपण उपसा यांचे काम, मुलांना बघा, हिला तिच्या सासूला बोलवून घ्यायला काय होतं, नाही पण यांना राहायचं आहे राजाराणी सारखं, त्यामुळे तर पोरीला इथे सोडून जाते",.. आई

" हो ना काकू तुम्ही खूप सहन करतात ",...रखमा

" रक्षित माझा नातू आहे हे ठीक आहे पण ह्या राहीला बघितल ना की असा राग येतो ना मला",.. आई

" शांत आहे पण पोरगी ",.. रखमा

सुप्रियाला सगळं ऐकू येत होत, तिने दरवेळी प्रमाणे या गोष्टीकडे कानाडोळा केला, आता मला खरंच सहन होत नाही, ती रडत होती, खरच माझे सासूबाई सासरे का येत नाही इकडे, किती वेळा सांगून झालं, ते पूर्वीपासूनच त्या शहरात राहिलेले आहेत तर ते आता इकडे यायला तयार नाही, तिकडे बरेच नातेवाईक आहेत त्यांचे मित्र मंडळी आहेत, काय करणार आहे मी एकेक प्रॉब्लेम, जाऊदे आपली मुलगी आहे आपल्यालाच बघावं लागेल काय करायचं ते.

मी बोलणारच आहे आज घरी गेल्यावर सचिन सोबत, एक तर इथून थोडं दूर घर घेऊ आणि राहिला पाळण्या घरात ठेवू, नाही तर मीच जॉब सोडते, काही नको हे काम किती ऐकून घ्यायचं,

आता प्रत्येक गोष्टीतच आई मी करते मी करते असं बोलून दाखवते, खरंच करते ती पण बोलून सगळं घालवते, किती त्रास होतो तिचा अशा बडबडीचा, आता तर राहिला सुद्धा भीती वाटायला लागली आहे तिची

सुप्रिया ऑफिसमध्ये आली, तिची मैत्रीण मोनिका तिच्याकडे बघत होती,.. "काय झालं ग सुप्रिया आज लेट झालीस तू? ",

"काही नाही ग रोजच आहे",.. सुप्रिया

"काय झालं राहिला शाळेत सोडायला गेली होती का ?",.. मोनिका

"नाही ग राहिला आई कडे सोडलं ती रहात नव्हती",.. सुप्रिया

" काय झालं ",.. मोनिका

" माझी आई ग खूप त्रास देते, मला राहीची काळजी वाटते",... सुप्रिया

" आमच्याकडे पण तेच होतं सासुबाई खूप त्रास देत होत्या माझ्या मुलाला, मी सरळ त्या एकत्र कुटुंबातनं दुसरीकडे घर घेतलं आणि त्याला पाळणा घरात मुलाला ठेवलं, नको नको झालं होतं, अग रोज कटकट, ऑफिस लांब पडायच, दुर आहोत तर, आता सगळे नीट वागतात ",.. मोनिका

" अग पण तुझ्याकडे तुझ्या सासूबाई तुला अस करत होत्या, ही तर माझी आई आहे ना? मग ती असं का करते? आपण आई बद्दल किती ऐकतो लोक बोलतात की आई असं करते मुलांसाठी, तसं करते, त्याग करते, आपण स्वतः एक आई आहोत ना मग आपण किती नीट प्रेमाने वागतो मुलांसोबत, माझी आई का अशी प्रॅक्टिकल ",.. सुप्रिया

मग माझ्याच बाबतीत असं का ग? मी काही खूप त्रास देते का तिला? कधीच काही मागत नाही मी, लहानपणापासून काही घेतलं की ओरडा बसायचा, त्यामुळे घाबरून मी नेहमी मागे असायची, लग्न झाल्यावर थोडे दिवस यांच्या पासून दूर होती मी, चांगलं होत, पण आमच्या दोघांची नोकरी या शहरात सासू-सासरे दीर जाऊ दुसऱ्या शहरात राहतात, राही होईपर्यंत लांब राहायचो आम्ही, पण आता राहिला कुठे ठेवणार म्हणून आईजवळ राहव लागतं,

"कठीण आहे हे ",.. मोनिका

" किती बोलते ग माझी आई मला रोज, माझं तर जाऊ दे ती राहीला सुध्दा आता हल्ली सोडत नाही, माझी एवढी सहा सात वर्षाची मुलगी नुसती घाबरून राहते त्या घरात, मला नाही आवडत आहे हे, मला असं वाटतं आहे की यामुळे तिची वाढ खुंटेल आणि तिला एक प्रकारचा दबाव तिच्या मनावर कायम असतो यातून वेगळाच मानसिक त्रास दिला होऊ शकतो तिला , काय करू मी मोनिका",.. सुप्रिया

"हो ग डेंजर आहे हे, लहान मुलांना अस नाही करायला पाहिजे",.. मोनिका

"मी आता स्टॅन्ड घेणार आहे, एकतर राहिला पाळण्या घरात ठेवणार, नाही तर मी थोडे दिवसाचा गॅप घेते, नोकरी सोडते नाही तर ऑनलाईन घरून काम करता येईल का याची रिक्वेस्ट येते",.. सुप्रिया

" हे बघ सुप्रिया जास्त टेन्शन घेऊ नको",..मोनिका

"अगं टेन्शन घेण्यासारखीच गोष्ट आहे, माझी आई किती बोलते हे तुला काय माहिती, तिच्यासमोर कोणीच टिकू शकत नाही, एकदम घाबरून जातो आपण, तब्येत खराब होईल अश्याने राहीची",.. सुप्रिया

सुप्रिया ऑफिसला गेल्यानंतर राही एकदम एका कोपऱ्यात बसून तिचा शाळेचा अभ्यास करत होती, थोडा जरी पसारा केला तरी आजी खूप रागवते त्यामुळे तो छोटासा जीव खूप घाबरून इकडे तिकडे बघत होता, कधी कधी तर फटके सुद्धा बसायचे राहीला, त्यामुळे कधी काय होईल असा विचार करून ती धास्तावलेले असायची, आज काल कधी कधी अंथरुण ओल करत होती राही, सुप्रिया काळजीत होती खूप,

रिक्षा आली राहीच्या चेहऱ्यावर आनंद झाला, पटकन ती शाळेत निघून गेली, आता ती चार वाजताच येणार होती आणि मम्मी येणार सात वाजता म्हणजे मला दोन-तीन तास आजी सोबत राहाव लागेल.

एवढी छोटी दुसरीतली मुलगी तरी उगीचच खूप मोठी आणि हुशार झाली होती ती आणि खूप विचार करायची ती.

🎭 Series Post

View all