काय हे अस? .. भाग 1

सुप्रियाला हे सगळं ऐकून खूप कसंतरी झालं, ती काही बोलली नाही, सगळ्या नातेवाईकांमध्ये आईने सांगितल होत सुप्रिया इकडेच असते


काय हे अस? .. भाग 1

घरचेच अस करतात.

©️®️शिल्पा सुतार
..............

"ऑटोप राही, मला उशीर होत आहे, तुला लवकर आजी कडे सोडते आणि मी ऑफिसला जाते",.. सुप्रिया

" मम्मी मला नाही जायचं आहे आजीकडे",..राही एकदम गळ्यात पडली,

"काय झाल बेटा? ",.. सुप्रिया

"आजी मला खूप रागवते, मला भिती वाटते तिकडे, काल तिने मला धपाटा मारला होता, ती आज खूप मारेल मला " ,.. राही रडत होती

" राही आजी नाही मारणार तुला, असं करतात का बाळा? , मी पण मारते ओरडते ना तुला, मग मारल तर मारल आजीने, का घाबरलीस तू ",.. सुप्रिया

" नाही मम्मी तूझ वेगळ, आजी रागाने वागते माझ्याशी",.. राही

आज राही ऐकत नव्हती, सुप्रियाला सुचेना काय करावे ते,

" जर तू आजी कडे नाही राहिली तर मी ऑफिसला कशी जाणार ",.. सुप्रिया

" मम्मी तू नको जावू ऑफिसला प्लीज, आजी नुसतं रक्षित कडे लक्ष देते आणि त्याला काही झालं की मलाच ओरडते, मला रक्षितला हात लावू देत नाही त्याचे काम मला देते" ,... राही

" लक्ष नाही द्यायचं बेटा ",.. सुप्रिया आता काळजीत होती,

राही अगदीच सहा सात वर्षाची होती दुसरीत जाणारी, सुप्रिया ऑफिस मधे गेली की ती सुप्रियाच्या आई कडे थांबत होती, शाळेतून आल्यावर तीन चार तासाचा प्रश्न होता, तेवढा वेळ आई का अस करते राहीला काय माहिती? , राही कसं काय लक्ष देणार छोट्या रक्षित कडे, रक्षित तिच्या भावाचा मुलगा, भाऊ वहिनी ऑफिसला गेले की आई त्याला ही सांभाळत होती, आईच नेहमीप्रमाणे झुकत माप रक्षित कडेच होत, नेहमी ती राहीकडे दुर्लक्ष करत होती

आई पण काय अशी करते समजत नाही माझी पण मजबुरी आहे हे असं राहिला आईकडे सोडून जायचं म्हणजे आई नेहमी चिडलेली असते, तिलाही काम पुरत असेल पण सगळ्या कामाला बाई लावलेली आहे त्याचे पैसे मी आणि दादा अर्धे अर्धे देतो, मुलं सांभाळायला ही बाई आहे, आईशी बोलावं लागेल... सुप्रिया तिचा तिचा विचार करत होती,

हा सचिनही ऐकत नाही किती वेळा त्याला सांगितलं की मी राहिला पाळणा घरात ठेवते, पण त्याला असं वाटतं की ती आजी आजोबांच्या घरी राहि नीट राहील, त्याला काय माहिती इकडे वेगळीच परिस्थिती आहे, आई ला मी आवडत नाही माझी मुलगी आवडत नाही,

काय सांगणार आहे आता त्याला माझे आई-वडील मला अस करतात नेहमी, थोडा सपोर्ट केला तर काय होणार आहे? ,

पूर्वीपासूनच असं करत आलेली आहे आई, दादाची प्रत्येक गोष्ट ती नीट करते माझी गोष्ट असली की चिडचिड करते, दादा वहिनी रक्षितला जपते, माझ्यावर राहिवर चिडचिड करते, नवीन विचारांची आहे ती असे सगळे म्हणतात, पण नेहमी तिने मुला मुली फरक केला आहे, माझ बालपण दहशतीत गेल, अजून आठवतो मला तो हातावरचा चटका, बापरे आईने राहीला चटका दिला तर, माझ्या ही मनात खूप भीती बसली आहे आई मुळे ,

काय विचित्र त्रास आहे हा, माझं मलाच माहिती, ऑफिसमध्ये पण राही कशी असेल या विचाराने नुसतं कसंतरी होतं मला, अजिबात शांतता नाही आणि आई काही ऐकून घ्यायच्या तयारीतही नाही, बाबाही तिची साथ देतात, वरून आम्ही तुमचे मुलं सांभाळतो तरी तुमचा आवाज मोठा असे म्हणतात, त्यामुळे काही बोलताही येत नाही, तोंड दाबून बुक्क्यांचा मार झाला आहे.

आज तिला राही कडे अगदी बघवतच नव्हतं, कसतरी सगळं सामान घेवून ती निघाली

सुप्रिया राही तिच्या आईकडे आल्या, आई रक्षितला घेऊन बसलेली होती, कामवाली बाई रखमा आलेली होती तिच्या सोबत आई बोलत होती.

"आली का राही ",.. आई

"तुम्हाला खूप काम आहे आहे मावशी",.. रखमा

" हो ना आता काय सांगणार बाई, वाटलं होतं म्हातारपणात जरा आरामात राहू पण कसलं काही सुचु देत नाही ही मुल मला, सुनबाई पण ऑफिसला जातात, ही पण ऑफिसला जाते, मी आहे बरी एकटी मुलांजवळ, आमचे हे तर काही करत नाही, त्यांचे काम ते ठरल्या वेळेतच करतात, मस्त फिरायला जातात मला अटकवून ठेवलं आहे",.. आई

सुप्रियाला हे सगळं ऐकून खूप कसंतरी झालं, ती काही बोलली नाही, सगळ्या नातेवाईकांमध्ये आईने सांगितल होत सुप्रिया इकडेच असते, कोणी ही आल की तिच्याशी नीट बोलायच नाही,

" राही मी जाते तू नीट रहा आजीकडे",.. सुप्रिया

" हिचा डबा आणला आहे का ग? ",.. आई

"हो आणला आहे आई, तिच्या बॅगेत आहे, नाश्ता झाला आहे तिचा, बाकी काही काम नाही, जरा वेळाने रिक्षा येईल, तिला बसवून दे",.. सुप्रिया

हो चालेल..

राहीचा चेहरा एवढासा झाला होता,

"राही बेटा आपण संध्याकाळी गार्डन मध्ये जाऊ खेळायला, नीट रहा आजीकडे तुझं तुझं खेळ",.. सुप्रिया

हो मम्मी..

सुप्रिया निघाली गेट जवळ गेल्यानंतर तिच्या डोळ्यात पाणी होतं, कोणाला सांगितलं तरी सुद्धा खरं वाटणार नाही की माझी स्वतःची आई मला असं करते.

जलद कथा मालिका स्पर्धा

🎭 Series Post

View all