Dec 06, 2021
Kathamalika

काय फरक पडतो???? (भाग५)

Read Later
काय फरक पडतो???? (भाग५)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

भाग 1 https://www.facebook.com/581606972323826/posts/1033838273767358/?sfnsn=wiwspwa&funlid=qIdaFHbMD6ibihnO

भाग 2
https://www.irablogging.com/blog/kay-fharak-padtopart-1_4732

भाग 3
https://www.facebook.com/581606972323826/posts/1035841593567026/

भाग 4
https://www.facebook.com/581606972323826/posts/1038468979970954/

हे बघ......तू आधी आरडा ओरडा करणं थांबव....आणि तू जो विचार करत आहेस तस काही नाही, आणि मी तस काही करू ही नाही शकत........सो प्लिज तू आधी शांत रहा....मला तुझ्याशी बोलायचं आहे, पण तू मगाशी लग्नाला नाही बोललीस आणि मी तुला खुश होऊन मिठी मारली त्यासाठी सॉरी.........पण तू ओरडणार नसशील तरच मी तुझ्या तोंडावरून हात काढेन..... प्लिज!!!!!एवढं सगळं एका दमात बोलून नितेश तिला डोळ्यानेच विनवतो तशी ती पण शांत होते......त्याच बोलणं ऐकून तिला पण थोडं हायसं वाटते. नितेश तिच्या तोंडावरून हात काढतो आणि तिला हात जोडून विनंती करतो की प्लिज ओरडून कोणाला बोलावू नको. मला खरचं तुला थँक्स म्हणायच आहे पण तू मगाशी बोललीस ते ऐकून मी इतका खुश झालो की काय करू हेच सुचत नव्हतं.....म्हणून मी तुला मिठी मारली. आय अॅम एक्ट्रीमली सॉरी फॉर दॅट......."नितेश"
 

बोल......काय बोलायचं आहे तुला....आणि हो...... काय ते लांबूनच बोल माझ्याशी."मधुरा"
(नितेश डोळे बंद करून मान हलवूनचं होकार देतो आणि बाजूला असलेल्या खुर्ची वर जाऊन बसतो)

 

पहिल्यांदा तर थँक् यु सो......मच..... की तू लग्नाला नाही म्हणतेस.कारण मला तुझ्याशी लग्नच करायचं नव्हतं.खरतरं मला तुझ्याशीच काय कुठल्याच मुलीसोबत लग्न नाही करायचं आहे......."नितेश"(चेहरा एकदम गंभीर करत बोलतो)


 

का बरं???नाही म्हणजे माझ्याशी नाही करायचं तर त्याला कारण ही तसंच आहे पण तुला कुठल्याच मुलीशी लग्न का नाही करायचं आहे. चांगला जॉब आहे बिजनेस आहे एवढा मोठा मग का नाही करत लग्न."मधुरा"

 

प्रत्येक मुलीची लग्नानंतरची काही स्वप्न असतात.आपला नवरा एखादया राजकुमारा सारखा जरी नसला तरी तो त्यांची छोटी छोटी स्वप्न पूर्ण करणारा असावा असचं प्रत्येक मुलीला वाटते.त्यांची तशी इच्छाचं असते आणि का नसावी.आपलं घर आपली माणसं सोडून ती इथे आपल्यासाठी येणार आणि आपण काय करणार तर विश्वासघात......... "नितेश" 

म्हणजे?????तू काय बोलतो आहेस मला काहीच कळत नाही!!!!जरा समजेल अस सांगशील का???"मधुरा"
 

मी लग्न जरी केलं तरी माझ्या बायकोला सुखी नाही ठेऊ शकत आणि मला जर लग्न करायचं झालंच तर तिने मी आहे तस मला स्वीकारावं कारण मी कधीच बाप नाही होऊ शकत........."नितेश"(डोळयांतल पाणी पुसत मधुरा ला सांगतो)

(त्याच हे वाक्य ऐकून तिला धक्काच बसतो,ती मनातच म्हणते....... एवढा चांगला मुलगा आणि त्याला देवाने पण अस....... आयुष्यात अर्ध सुख का बरं द्यावं??? मधुरा त्याच्या बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसते आणि त्याला पाणी पियाला देऊन शांत करते.)

थोडा दीर्घ श्वास घेऊन नितेश पुन्हा बोलू लागतो. 

मी डॅड ना सांगितलं होतं आधीच की मी बाप नाही होऊ शकत. माझं बोलणं ऐकून त्यांना ही धक्काच बसला.आई तर काही बोलेचं ना......."नितेश"

 

पण तू तुझ्या टेस्ट का करून घेतल्या???........."मधुरा" 

कारण मी ही माझ्या डॅड चा मुलगा नाही. जो प्रॉब्लेम मला आहे तोच माझ्या  डॅड ना आहे........ म्हणून माझ्या आजोबांनी आई ला बाहेरगावी नेऊन दुसऱ्या माणसाचे स्पर्म आईच्या गर्भाशयात सोडायला लावले. माझी आई नको नको म्हणत असताना सुद्धा तिला कुणा दुसऱ्याच्या जीवाणू च्या मदतीने आणि आधुनिक रित्या गर्भधारणा करावी लागली आणि मग त्यातून मी जन्माला आलो....जे माझ्या आई सोबत झालं तेच मला माझ्या बायको सोबत नाही होऊ द्यायचं आहे.मी कुठल्याही मुलीपासून तिचा "आई" होण्याचा हक्क नाही हिराऊ शकत........."नितेश"

 

पण मग........ तू जर तुझ्या आई-वडिलांच्या संबंधातून जन्माला नाही आला आहेस तर मग तोच प्रॉब्लेम तुझ्यात कसा???"मधुरा"
(सॉरी मी जरा एकदम असा प्रश्न विचारला पण हा प्रश्न येतोच ना..) 

बरोबरच विचारलं तू. ज्यांना मुलंबाळं होत नाही अशी माणसं सहसा मुलं दत्तक घेतात.कोणी अगदी लहान बाळ घेत तर कुणी मोठं....... समजूतदार.जसं ते बाळ घरात रुळायला लागतं तस तस ते घरातल्या माणसांवर जात, मग त्याच वागणं,बोलणं आणि अगदी दिसणं सुद्धा..........कोणाला वाटतच नाही की हे बाळ त्यांच नसून दत्तक घेतलेल आहे.तसच माझं झालं........जरी मी या दोघांचा मुलगा नसलो तरी हे दोघेच माझे आई वडील आहेत म्हणून हा प्रॉब्लेम कदाचित मला पण झाला असावा........."नितेश"

 

डॅड मला खूप फोर्स करत आहेत लग्नासाठी पण मी त्यांच्या हट्टापायी कुणाच्या मुलीचं आयुष्य खराब नाही करू शकत. त्यांचं म्हणन आहे की पैसा फेकला की सगळं मिळतं.....पण सुख...............त्याच काय??????? पैशाने सगळं मिळवेन मी पण सुख कधीच नाही मिळवू शकणार आणि जर एखाद्या मुलीला तीच स्वतःच च अपत्य हवं असेल तर मी ते कसं देऊ शकणार आहे?????"नितेश" 

बरोबर आहे तुझं..........पण तू तुझ्या डॅड ना समजावून बघ ना!!!!"मधुरा" 

नाही समजून घेत आहेत ते........मी जेव्हा टेस्ट केल्या माझ्या आणि त्यांना जेंव्हा ही गोष्ट सांगितली तेंव्हाच त्यांनी मला बजावलं आहे ("हे जे काही रिपोर्ट वैगरे केले आहेस ना ते नाहीसे करायचे....... कायमसाठी आणि मी पसंद करेल त्या मुलीशी लग्न करायचं.......पुढे तेच होईल जे या आधी झालं आहे. मी बाप बनू शकत नव्हतो पण तरी तुझा जन्म झालाच ना!!!!!!!आणि काय फरक पडतो???.आणि ही एवढी सगळी संपत्ती तुमची च तर आहे. पुढे हिचा वारसा चालवणारी पिढी हवी आहे मला. विषय संपला.......") हे सगळं महाभारत होऊन आता दोन एक महिने झाले असतील आणि तुझे पप्पा भेटले. मग पुढे काय झालं ते तर तुला चांगलंच माहीत आहे."नितेश" 

त्याच सगळं बोलणं ऐकून मधुराच्या डोळ्यात पाणी येत आणि आता ती स्वतःहून त्याला मिठी मारते.....त्याच्या पाठीवर थोपटत त्याला म्हणते........नको काळजी करू देवाने तुझ्यासाठी काही तरी खास आणि खूप स्पेशल अस राखून ठेवल असेल आणि तुला ते नक्की.....मिळेल."मधुरा" 

थँक्स मधुरा.......माझं सगळं आरडाओरडा न करता ऐकून घेतलंस.....(नितेश डोळा मारत आणि हसतच म्हणतो.)

त्याच्या अशा बोलण्याने वातावरण थोडं हलकं होत.


 

मधुरा थोडक्यातचं त्याला कैवल्य आणि तिची लव्हस्टोरी सांगते. नितेश तिला पुढील नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि निघून जातो.साडेबारा होत आलेले असतात पण कैवल्यचा फोन आलेला नसतो म्हणून मग तीच त्याला कॉल करते पण त्याचा फोन स्विचऑफ येतो.मधुरा थोडी काळजीतच असते. 

कैवल्य चा विचार करतच तिला उशिरा कधीतरी झोप लागते.
 

सकाळी अलार्म च्या आवाजाने मधुरा जागी होते.सहा वाजलेले असतात.मधुरा शॉवर घेऊन फ्रेश होऊन खाली जाते आणि सविता ताईंना कॉफी करायला सांगून ती मिटिंग साठी थोडी रिविजन करत असते.कुठे काय राहील नाही ना ते चेक करत असते. सविता ताई कॉफी घेऊन येतात तशी मधुरा सगळ्या पेपर्स चा पसारा बाजूला ठेऊन छान अशी वाफळती कॉफी घेते. या सगळ्यातच सात वाजतात. तशी मधुरा तिचा लॅपटॉप आणि गरजेचे सगळे पेपर्स घेऊन मिटिंग जॉईन करते आणि जवळ जवळ दोन अडीच तासांनी तिची मिटिंग आटोपती होते. एकाच ठिकाणी बसून तीच अंग थोडं आकडल होत म्हणून ती उठून जरा आळोखे पिळोखे देत असते.सगळं झाल्यावर ती पुन्हा ऑफिस ला जायला रेडी होते आणि खाली येते.
 

बघते तर काय नितेश च्या आणि तिच्या आई च्या गप्पा चालू असतात. मधुरा पण थोडा वेळ असल्याने त्यांना जॉईन होते आणि त्याच निमित्ताने ती तिचा निर्णय पण सांगते मधुरा ची आई थोडी नाराज होते पण नितेश ही मधुरा च्या बोलण्याला दुजोरा देतो आणि हा निर्णय दोघांचा आहे असं सांगतो. 

दोघांनीही सहमताने हा निर्णय घेतला आहे म्हंटल्यावर त्या काही बोलल्याच नाही.


 

मधुरा घरी सगळ्यांना बाय करून ऑफिस ला जायला निघते आणि सोबत नितेश पण निघतो.मधुरा आधी ऑफिस ला जाणार होती आणि ड्रायव्हर काकांना सांगून तिने नितेशला ही घरी ड्रॉप करायला सांगितलं होतं.मधुरा गाडीत बसून कैवल्य ला फोन करते पण त्याचा फोन बंद येतो.तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसते म्हणून नितेश तिला काय झालं विचारतो,तर मधुरा सगळं सांगते...नितेश तिची समजूत काढतो.आणि त्याच्या फोन ची वाट बघायला सांगतो.मधुरा ऑफिस जवळ उतरते आणि नितेश ला बाय करून निघून जाते.जायच्या आधी गाडीतच दोघे आपला मोबाईल नंबर एक्सचेंज करतात आणि मित्र म्हणून नेहमी बोलत राहू अस नितेश म्हणतो...

क्रमश:
कथेचा हा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा.कथा पोस्ट करताना ती लेखिकेच्या नावसहित करावी कारण साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे तसे आढळल्यास सक्त कारवाई केली जाईल.कथेचे पुढील भाग वाचण्यासाठी मला फॉलो करा.
धन्यवाद????????

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading